(कुंतलांचा पसारा)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
21 Oct 2008 - 12:08 am

प्रेरणा - मिपाची कवयित्री प्राजू हिची 'आठवांचा पसारा' ही सुंदर कविता!

'चतुरंगप्रयातात' हे विडंबन करण्याचा प्रयास केलेला आहे..

उवा जाहल्या, कुंतलांचा पसारा
रिठ्याने कशा आज डोळ्यांत धारा

सुगंधीच मेंदी असावी उशाशी
उडू लागला रंग हा आज सारा

कसा आणला 'वीगही' मी लपूनी
गळू लागला केशसंभार सारा

उडाली पहा रातची झोप माझी
कुणा वैद्यकाचा मिळे ना सहारा

जरी टाळतो मी तुझ्या आलयांना
तुला नापिता पाहु येतो शहारा

चला संपला भार या डोसक्याचा
मिळाला वयाने मला हा इशारा

चतुरंग

कविताविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

21 Oct 2008 - 12:42 am | संदीप चित्रे

चालू दे रे रंग्या :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Oct 2008 - 12:48 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

=))
अजून अशी दोन-चार विडंबनं येऊदेत आज (भारतातल्या) रात्रीत! काम तरी होईल माझं!

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Oct 2008 - 12:50 am | बिपिन कार्यकर्ते

रंगा भाई आज एकदम पेटेले है...

उवा जाहल्या, कुंतलांचा पसारा
रिठ्याने कशा आज डोळ्यांत धारा

हे लै डेंजर. मधनं मधनं शिकाकाई वापरायला सांगा.... ;)

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Oct 2008 - 12:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे लै डेंजर. मधनं मधनं शिकाकाई वापरायला सांगा....
=))
मला भलतीच जाहिरात आठवली, 'डोक्याला डोकं भिडतं जिथे ...."
पण अमेरिकेत लायसिल नाहीतर मेडिकर मिळतं का हो?? :?

बेसनलाडू's picture

21 Oct 2008 - 1:41 am | बेसनलाडू

फार आवडले.
(केसाळ)बेसनलाडू

प्राजु's picture

21 Oct 2008 - 4:15 am | प्राजु

कधी लिहिलं हे?? आताच पहाते आहे...
मस्त झालंय..
कसा आणला 'वीगही' मी लपूनी
गळू लागला केशसंभार सारा

चतुरंग भाय... सह्हीच आहे हे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

21 Oct 2008 - 8:31 am | विसोबा खेचर

कसा आणला 'वीगही' मी लपूनी
गळू लागला केशसंभार सारा

हा हा हा! विगची कल्पना मस्तच... :)

आपला,
(टकल्या) तात्या.

आणि न देणार्‍या सर्व रसिकांचे आभार!

(खुद के साथ बातां : रंग्या, केसूगुर्जी दिसत नाहीत हल्ली, वाचनमात्र आहेत की काय? :W :? )

चतुरंग

शितल's picture

23 Oct 2008 - 6:18 pm | शितल

चतुरंगजी,
विडंबन लै भारी केले :)
हसुन हसुन दमले. :)

विनायक प्रभू's picture

23 Oct 2008 - 6:24 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
आई ग
वैतागले मी ह्या केसाना
अग पण ,,,, चे माक्याचे तेल का नाही लावत
म्हणजे सर्व केस गळुन टक्कल तर पडेलच
खूप डोके दुखुन कायमची झोप लागेल
छान विडंबन चतुरंगजी.
आजकल अपुन भी कविता वाचताय बर का

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Oct 2008 - 8:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'चतुरंगप्रयातात'ले विडंबन आवडले.

सुगंधीच मेंदी असावी उशाशी
उडू लागला रंग हा आज सारा

या ओळींवर जीव जडला.

-दिलीप बिरुटे

शेखस्पिअर's picture

23 Oct 2008 - 9:06 pm | शेखस्पिअर

....काय !!!!
"देवाच्या कात्रीचा आवाज येत नाही"