फुतूर (खूळ)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
16 Oct 2017 - 1:40 pm

फुतूर दिमाग के
कभी खत्म नही होते
.
दुधिया कोहरे मे लिपटकर जब रात आये
तो उस कोहरे मे तुम्हारा चेहरा
बुझते हुए
टिमटिमाते बिजली के बल्ब कि तरह
नजर आने लगता है, धुंदलासा
दिमाग उस तस्विर को
आपही मुकम्मल कर लेता है
क्या ये फुतूर है,
या तुम भी मुझे याद कर रही हो?
.
फुतूर दिमाग के
कभी खत्म नही होते
.
वक्त की सुई
मुसलसल भागती रहती है
और ये दिमाग है के
तेरे दाये गाल के उस टिप्पेके भवरे में
अटका पडा है
जिसमे पुरी कायनात
घुमती रहती है
.
फुतूर दिमाग के
कभी खत्म नही होते
.
वैसे तो तुझसे दूर रहकर
खुश नही रह पाता
मगर जब तेरे शहद रंग चहरे पे
खिली कमसिन हसी
ये दिमाग अपनी पोटली से निकालकर
नजर मे भर देता है,
बिन बताये..
तो ऐसे खिल जाता हू
जैसे एक अर्से बाद किसी
पौधे ने धुप देखली हो
.

फुतूर दिमाग के
कभी खत्म नही होते
.
फुतूर ही सही
लेकिन अब ऐसा लगता है
किसी रोज तु मुझे उस कोहरे मे
मिल जाये और
मै मेरे दिमाग के ये सारे
फुतूर तेरे दिमाग मे भर दू
कितनी खुबसुरत होगी फिर
ये कायनात
.
हा.. फुतूर दिमाग के
कभी खत्म नही होते

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१४/१०/२०१७)

फुतूर=खूळ, वेडेपणा
मुसलसल=सतत
टिप्पा= खळी

------------------------------------------------------------------------------------------
एस यांचा भावानुवाद
------------------------------------------------------------------------------------------

माझा मेंदू ना, खुळावलाय पार
शप्पथ!
एकेक खूळ नुसतं...

दुधाळ धुकं लपेटून
रात्र येते दबकत, लाजत.
त्या दुधाळ बुरख्यातून
दूरवर लुकलुकणाऱ्या दिव्यासारखा
दिसू लागतो तुझा चेहरा
अंधुक अंधुक.
मेंदूलापण ना,
त्या धुक्यातही तूच दिसतेस!
बघ ना, एकेक खूळ नुसतं...
...की तुलाही येतेय माझीच आठवण?

एकेक खूळ नुसतं...

तिकडं तो काळ बघ,
ऊर फुटेस्तोवर धावतोच आहे
अव्याहत.
आणि इकडं हा माझा मेंदू ,
कसा अडकून पडलाय
तुझ्या डाव्या गालावरच्या
त्या नाजूकशा खळीच्या भोवऱ्यात!
माझं आख्खं जग फिरतंय गं
तिथं
कधीचं...

एकेक खूळ नुसतं...

तसा सुकून जातो पार
तुझ्याविना एकटा असा.
पण मग हा मेंदू
त्याच्या जादूच्या पोतडीतून
जेव्हा हळूच बाहेर काढतो
तुझ्या मधाळ मुखड्यावरचं
ते जीवघेणं हसू
अन् भरून टाकतो अवघ्या दिठीत.
मग असा काही बहरतो,
जणू कितीक दिसांनी
कुणा रोपट्यानं पाहिली असावीत कोवळी ऊन्हं...

एकेक खूळ नुसतं...

खूळ तर खूळ!
पण आताशा असं वाटू लागलंय
की त्या धुक्यात
एके दिवशी
तुझी-माझी गाठ पडावी
अन्
माझ्या मेंदूतली ही सारी खुळं
एकदाची
मी तुझ्या मेंदूत भरून टाकावीत.
किती सुंदर होईल मग
हे जगच आख्खं!
आपलं जग!

खुळावलाय पार,
तोच, माझा मेंदू!
तुझी शप्पथ...

-- एस

कविताप्रेमकाव्यमुक्तक

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

16 Oct 2017 - 3:15 pm | पद्मावति

शहद रंग चहरे पे, दुधिया कोहरा.... अरे काय आहे यार हे...कातील आहे, कातील! जियो!!
अनुवादही अप्रतिम जमलाय. सुंदर.

विनिता००२'s picture

16 Oct 2017 - 4:59 pm | विनिता००२

दोन्हीही सुरेख

पुंबा's picture

16 Oct 2017 - 5:27 pm | पुंबा

अहाहा!!!
खुप आवडली..

मगर जब तेरे शहद रंग चहरे पे
खिली कमसिन हसी
ये दिमाग अपनी पोटली से निकालकर
नजर मे भर देता है,
बिन बताये..
तो ऐसे खिल जाता हू
जैसे एक अर्से बाद किसी
पौधे ने धुप देखली हो

हे तर जबरदस्त!!

एस यांचा भावानुवाद सुद्धा अप्रतीम उतरलाय..
आता उरलेला दिवस या नितांतसुंदर कवितेच्या नशेत जाणार तर!!

चाणक्य's picture

16 Oct 2017 - 5:31 pm | चाणक्य

दोन्ही रचना मस्त.

भारी!! एस यांचा भावानुवादच वाचला. ते हिंदी ट्याण्जंट जातं.

गवि's picture

16 Oct 2017 - 10:52 pm | गवि

मस्त...

निशाचर's picture

16 Oct 2017 - 11:05 pm | निशाचर

अप्रतिम! गंगेच्या किनारी अनुभवलं होतं प्रथम धुकं, प्रयागजवळ. खूप वर्षं झाली, डोक्यात खुळंही किती तर्‍हेची होती तेव्हा. त्या धुक्यात पुन्हा ओढले गेल्येय. आता लवकर कुठलं विरायला ते.

ज्योति अळवणी's picture

17 Oct 2017 - 9:12 pm | ज्योति अळवणी

दोन्ही रचना अप्रतिम.

पण हिंदी लेखन चालत का मिपावर?

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

18 Oct 2017 - 1:16 am | मिसळलेला काव्यप्रेमी

भाषांतर किंवा भावानुवादासह चालतं.

सत्यजित...'s picture

1 Nov 2017 - 1:04 am | सत्यजित...

दोन्ही रचना अगदी अप्रतिमच!
खूप-खूप आवडल्या.अता आज,अजून काही वाचणे नाही!
मिका व एस,दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद!

शब्दबम्बाळ's picture

1 Nov 2017 - 3:18 am | शब्दबम्बाळ

तो ऐसे खिल जाता हू
जैसे एक अर्से बाद किसी
पौधे ने धुप देखली हो

साध्या सोप्प्या प्रतिमादेखील किती परिणामकारक होऊ शकतात याच उत्तम उदाहरण! :)
दोन्ही अतिशय आवडल्या!
पण हिंदी मधली एकदम हळुवार आहे, भावानुवादात तो हळुवारपणा मराठीमध्ये पहिल्या कडव्यातल्या "शप्पथ" मुळे जरा कमी झाल्यासारखा वाटलं... अर्थात मला तसे वाचताना वाटलं... स्वतंत्र काव्य म्हणून दोन्ही उत्कृष्टच!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Nov 2017 - 9:19 am | ज्ञानोबाचे पैजार

मिकाचा नाद करायचाच नाय.....

पहिल्या वाचनातच आवडली होती त्यानंतर आतापर्यंत कमीत कमी १० ते १२ वेळा वाचली असेल.

प्रत्येकवेळेस आधीपेक्षा जास्त आवडत जाते ही कविता.

पैजारबुवा,

तिमा's picture

1 Nov 2017 - 8:14 pm | तिमा

पहिल्यांदा वाचली तेंव्हा प्रतिसाद द्यायचा राहून गेला. एस यांचा भावानुवाद तोडीस तोड! छान!
गुलजार ना कधी भेटला होता का ?

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

3 Nov 2017 - 3:34 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

गुलजार ना कधी भेटला होता का ?

देवाला भेटायचे नसते, त्याचे दर्शन घ्यायचे असते. __/\__

शलभ's picture

4 Nov 2017 - 7:44 am | शलभ
खूपच सुंदर मि. का. भावानुवाद पण छान झालाय पण हिंदी खूप हळुवार आहे..
प्राची अश्विनी's picture

4 Nov 2017 - 10:53 am | प्राची अश्विनी

दोन्ही रचना सुरेख! अहलं भारी हिंदी वाचलं की complex येतो बुवा!
फुतुर..... हा शब्द किती नादमय आहे.

व्वा व्वा क्या बात है ! अनुवादासाठी विशेष दाद.