अमराठी लोकांना ऑनलाइन मराठी शिकवण्याच्या उपक्रमाबद्दल मी पूर्वी मिपावर सांगितले होते.
मिपा लेख १
मिपा लेख २
त्याच अनुषंगाने माझ्या नवीन कामाची ओळख मिपाकरांना करून देण्याची माझी इच्छा आहे.
२ ऑक्टोबर २०१७ रोजी मराठी भाषा शिकणाऱ्यांसाठी अजून एक सुविधा मी आजपासून सुरू केली आहे- "क्रियापद रूपावली". अर्थात एका क्रियापदाची वेगवेगळ्या काळातली, वेगवेगळ्या सर्वनामांसाठीची रूपे किंवा तसेच वेगवेगळ्या वाक्प्रचारांतली रूपे दाखवणारे संकेतस्थळ.
जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच अशा परदेशी भाषांसाठी अशी संकेतस्थळे/अॅप्स आहेत. मराठीसाठी मात्र याची उणीव भासत होती. ती पूर्ण करण्याचा हा माझा प्रयत्न आहे.
http://learnmarathiwithkaushik.com
वर जाऊन "To get verb forms click here" वर क्लिक करा.
माझ्या ब्लॉगवरून अनेक अमराठी व्यक्ती मराठी भाषा, मराठी वाक्यरचनेचे नियम शिकत आहेतच. पण हे नियम वापरून जेव्हा ते क्रियापद रूपे बनवतात तेव्हा त्यांना आपण बनवलेले वाक्य बरोबर आहे का नाही याची शंका आल्यास त्यांना माझ्याशी मेलवर किंवा फेसबुकवर संपर्क करून शंकानिरसन करावे लागते. आता त्यांना या संकेतस्थळवरून लगेच उत्तर मिळेल.
सर्व वाक्यांचे इंग्रजी(रोमन लिपीत) रूपांतरही दिले आहे. जेणेकरून नवख्या विद्यार्थ्याला उच्चारही समजतील.
माझ्या माहितीप्रमाणे मराठी भाषेसाठी असे संकेतस्थळ सध्या नाहीये. जर आपल्याला माहित असल्यास जरूर सांगा मला. मला बघायला आवडेल.
मी एकटाच हा उपक्रम चालवत असल्याने सध्या माहिती (कंटेण्ट्स) वर भर दिला आहे. लुक-अँड-फील अगदी साधा आहे.
तरी आपण या उपक्रमाला भेट द्या. आपल्या मित्रमैत्रिणी, सहकारी , नातेवाईक यांपैकी कोणी मराठी शिकत असल्यास त्यांना या सुविधेबद्दल सांगा. आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि टीका यांचे नेहमीच स्वागत आहे.
धन्यवाद,
कौशिक लेले
(LearnMarathiFast@gmail.com)
चित्र १ :
चित्र २ :
चित्र ३ :
चित्र ४ :
प्रतिक्रिया
14 Oct 2017 - 11:44 am | एस
नेहमीप्रमाणेच उत्तम काम करताय! फोटो दिसत नाहीयेत.
14 Oct 2017 - 10:29 pm | कौशिक लेले
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10155251059115910&id=६७१६९०९०९
धन्यवाद . फेसबुकवरची ही पोस्ट दिसत्ये का बघा.
14 Oct 2017 - 10:31 pm | कौशिक लेले
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10155251059115910&id=671690909
14 Oct 2017 - 12:17 pm | एस
तुम्ही फेसबुकवरून फोटो दिले आहेत. त्यांना पब्लिक अॅक्सेस दिलाय का ते एकदा चेक करा.
14 Oct 2017 - 10:31 pm | कौशिक लेले
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10155251059115910&id=671690909
धन्यवाद . फेसबुकवरची ही पोस्ट दिसत्ये का बघा.
14 Oct 2017 - 11:03 pm | एस
हो, पोस्ट दिसते आहे. पण तिथलेच असतील तर धाग्यात दिलेले फोटो इथे दिसत नाहीयेत.
15 Oct 2017 - 3:40 pm | कौशिक लेले
आता पुन्हा एकदा बघा डॉ सुहास म्हात्रे यांनी लेखात फोटो चढवले आहेत.
15 Oct 2017 - 7:36 am | तुषार काळभोर
अवांतर: फोटो - लेखातील लिंक कॉपीपेस्ट केली तर फेबुला लॉगइन करायला लागतेय. बहुतेक तुमच्या फोटोंना असलेल्या प्रायव्हसी सेटिंगमुळे होत असेल.
15 Oct 2017 - 3:40 pm | कौशिक लेले
आता पुन्हा एकदा बघा डॉ सुहास म्हात्रे यांनी लेखात फोटो चढवले आहेत.
15 Oct 2017 - 3:25 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही मराठी भाषेसाठी स्पृहणिय काम करत आहातच... त्यात या एका प्रकल्पाची भर पडली आहे ! हार्दिक अभिनंदन !!
तुमची चित्रे लेखात दृष्यमान केलेली आहेत.
चित्रांवर डबल क्लिक करून ती पूर्ण आकारात दिसू लागल्यावरच त्यांचे दुवे (लिंक्स / इमेज अॅड्रेस) कॉपी करून ते मिपात टाकावेत. थंबनेल्सचे (लहान आकारात दिसणार्या चित्रांचे) दुवे वापरून सहसा दुसर्या संस्थळावर (उदा : मिपावर) चित्रे दाखवता येत नाहीत.
15 Oct 2017 - 3:36 pm | कौशिक लेले
आपण केलेल्या कौतुकबद्दल धन्यवाद आणि फोटो दृश्यमान केल्याबद्दल विशेष आभार.
मिपा वर फोटो चढवायची कृती वाचून पिकासा/इन्स्टाग्राम पाहिजे अशी कल्पना झाली. मी ते वापरत नाही म्हणून थेट फेसबुकची लिंक देऊन बघितली.
पण आपण पुढाकार घेऊन दुरुस्ती केलीत हे आवडलं
- कौशिक
16 Oct 2017 - 8:21 pm | सूड
प्रशंसनीय!!
16 Oct 2017 - 11:34 pm | कौशिक लेले
धन्यवाद. आपल्या अमराठी मित्रांना-सहकाऱयांना या बद्दल नक्की सांगा !!
- कौशिक