मागे आजानुकर्ण यांनी नार्सिससची कथा सांगितली. इथे त्याच्या प्रतिबिंबाने म्हटलेली लावणी देत आहे. ("विडंबन" म्हणण्याइतके यात व्यंग्य नाही, आणि काव्य म्हणण्याइतपत प्रतिभा नाही, आता काय करावे...)
नार्सिसस
नार्सिसस
जवळि असा बसस
तू न जर दिसस
मी पण नाही...
कोणता मम शिणगार?
तू जो करी काही!
त्या दिसा
दिला तू ठिय्या
करुनि मी हिय्या
थिरक भुवयांत
भुवयांत, लाल गालांत
लाल ओठांत
तू कशा
ओळखिला खुणा
सख्या सजणा
लऊ हळुवार
दे मुका मजला
पेटविले अंगार!
मी फार
तुझा रे यार
रंग आकार
तुझाच! क्षणात
तू-मी ये मिळू साजणा,
एकामेकांत.
(*बसस = बसायचास; दिसस = दिसायचास)
प्रतिक्रिया
11 Dec 2007 - 9:21 am | मुक्तसुनीत
धनंजयराव ,
नार्सिससच्या प्रतिबिंबाला प्रणयाचे काव्य स्फुरावे या मूळ संकल्पनेतच फार मोठी प्रतिभेची झेप दडली आहे ! नार्सिससच्या मिथकाचे (इतर मिथकांप्रमाणेच ) सुमारे शतकाभरापूर्वी मानसशास्त्रांमधील युगप्रवर्तनामुळे पुनरुज्जीवन झाले असे म्हणतात. मिथकामुळे "नार्सिसस सिंड्रोम"समजाऊन सांगावा हे शास्त्र झाले. पण प्रतिबिंबाच्या मनातील भावतरंगांच्या शक्यतेपर्यंत पोचते ते काव्य :-)
"मी फार
तुझा रे यार
रंग आकार
तुझाच! क्षणात
देऊ मिठी, मिळू
एकमेकांत.."
यामधे पराकोटीचे आत्मप्रेम दिसते ; पण का कुणास ठाऊक, "स्व" ला विलीन करण्याची चिन्हेसुद्धा आहेतसे वाटते.
महानोरांच्या ज्या मूळ लावणीचे हे विडंबन आहे ती फारच सुंदर आहे. (माझी एक अज्ञानमूलक शंका होती : ही लावणी पूर्वी रागात बांधलेली आहे काय ? म्हणजे , त्या लावणीची लोकप्रिय चाल ... )
12 Dec 2007 - 1:30 am | विसोबा खेचर
माझी एक अज्ञानमूलक शंका होती : ही लावणी पूर्वी रागात बांधलेली आहे काय ? म्हणजे , त्या लावणीची लोकप्रिय चाल ... )
बरीचशी पूर्वी रागातच आहे, परंतु काही ठिकाणी ती 'पूर्वी'पासून दूर जाते. 'रेगरेमग'(कोमल रिषभ, शुद्ध गंधार, शुद्ध मध्यम) ही पूर्वीतली महत्वाची संगती. मात्र 'कोणता करू शिणगार' मध्ये शुद्ध मध्यमावर जो ठेहेराव दिला आहे तसा पूर्वीत नाही. शिवाय तिथे पूर्वीतल्या 'रेगरेमग' या संगतीचेही पालन होत नाही...
अर्थात, लाईट संगीतात हे स्वातंत्र्य असतं! तिथे रागस्वरूप व्यवस्थितपणे पाळलं जाईलच असं नाही. असो, काहीही असलं तरी एकंदरीत हे गाणं बाकी एकदम झकास आहे...
तात्या.
12 Dec 2007 - 2:53 am | मुक्तसुनीत
मला अभिजात संगीताचे शास्त्रीय ज्ञान शून्य आहे. पण मी ती "दयाघना"ची चीज गुणगुणत होतो एके दिवशी आणि एकदम या लावणीवर घसरलो ....तेव्हा एक्दम पूर्वी रागाच्या नावाने "वॉला !" असे म्हण्टले होते :-)
11 Dec 2007 - 6:48 pm | चित्तरंजन भट
"नार्सिससच्या प्रतिबिंबाची लावणी" ही कल्पना फार चांगली आहे!
11 Dec 2007 - 9:38 pm | आजानुकर्ण
कविता फार सुंदर आहे. नार्सिससच्या मनाचे प्रतिबिंबच जणू.
- आजानुकर्ण
12 Dec 2007 - 1:21 am | विसोबा खेचर
कोणता मम शिणगार?
करि तूच जो काही!
भुवयांत गालांत
चुंबिले रे तरंग
उडले ते तुषार!
देऊ मिठी, मिळू
एकमेकांत...
हे शब्द चालीत बसत नाहीत.
मूळ 'राजसा जवळी जरा बसा...' ही बैठकिची लावणी फार सुरेख आहे. धन्याशेठ, याच चालीवर नवीन शब्द लिहिताना ते मूळ चालीत चपखल बसतील किंवा नाही हे पाहायला हवे! उगाच एका सुंदर चालीवर शब्द बसवायचा किंवा कोंबायचा अट्टाहास कशाकरता??
("विडंबन" म्हणण्याइतके यात व्यंग्य नाही, आणि काव्य म्हणण्याइतपत प्रतिभा नाही, आता काय करावे...)
अहो पण चालीची मधल्यामध्ये वाट लावलीत त्याचं काय? :)
तात्या.
12 Dec 2007 - 2:57 am | धनंजय
त्या गीताचे वृत्त तसे बरेच कठिण आहे (म्हणजे प्रत्येक कडव्यात मात्रा थोड्या वेगळ्या आहेत). आता केलेल्या बदलात तुम्ही सांगितलेल्या ओळींना शक्यतोवर मुळातल्या मात्रेस मात्रा ठेवली आहे. मला वाटते, की गाणार्याला ह्रस्व-दीर्घ पालटायची मुभा देऊन हे गीत रचले असावे. कारण गाणे ऐकल्याशिवाय मला मुळातले शब्द चालीत बसवायला कठिण गेले, मंगेशकरांना मात्र कठिण गेले नाही.
आता बघा (मुळात प्रत्येक कडव्यातला दुसरा भाग):
जवळि जरा बसा = करुन दिला विडा = शिकवल्या खुणा =?= नवतीचा भार
किंवा शेवटचा भाग
कोणता करु शिणगार, \ सांगा तरी काही =?= सोसता न येईल \ अशी दिली अंगार =?= तुम्ही नका जाऊ साजणा,\ हिवाळी रात
मला चालीचे सूत्र शोधणे कठिण गेले, पण हृदयनाथांना ते सापडले...
सोयीसाठी मूळ लावणी येथे देत आहे. लता-हृदयनाथांनी जिथे ह्रस्व-दीर्घ नेमके जिथे पालटले आहेत तिथे माझ्या लावणीत पालटलेत तर त्यांच्यासारखेच चालीत बसावे असे वाटते.
***
राजसा
जवळी जरा बसा,
जीव हा पिसा,
तुम्हाविण बाई
कोणता करु शिणगार,
सांगा तरी काही
त्या दिसी
करुन दिला विडा
टिचला माझा चुडा,
कहर भलताच
भलताच रंगला काथ
लाल ओठांत
या तुम्ही
शिकिवल्या खुणा
सख्या सजणा,
देह सतवार
सोसता न येईल अशी
दिली अंगार
मी ज्वार,
नवतीचा भार
अंग जरतार,
ऐन हुरडयात
तुम्ही नका जाऊ साजणा,
हिवाळी रात
***
12 Dec 2007 - 3:23 am | मुक्तसुनीत
म्हणजे काय असेल ? हा शब्द मी "सकवार" असा ऐकत होतो . "फ्रजाइल" या अर्थाचा तो असावा असे मला वाटायचे..
12 Dec 2007 - 3:46 am | धनंजय
"सुकुमार" पासून व्युत्पत्ती, अर्थ नाजुक.
स्रोत मोल्स्वर्थचा शब्दकोश. (हा लक्षात ठेवायला हवा. हा इंटर्नेटवर आहे, हे मी बरेचदा विसरतो!)
http://dsal.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?page=473&table=molesworth&d...
12 Dec 2007 - 7:55 am | विसोबा खेचर
धन्याशेठ,
आता केलेल्या बदलात तुम्ही सांगितलेल्या ओळींना शक्यतोवर मुळातल्या मात्रेस मात्रा ठेवली आहे.
आता बरचसं चालीत बसतंय! तरी पण,
मी पण नाही...
दे मुका मजला
पेटविले अंगार!
तुझाच! क्षणात
हे शब्द चालीत अद्याप नीट बसलेले नाहीत.
तू-मी ये मिळू साजणा,
ही ओळ चालीत बसते आहे तरी पण ऐकताना तेवढी खास वाटत नाही! काहीतरी खटकतंय! खरं सांगायचं तर मला कवितेतल्या व्याकरणातलं, वृत्तातलं, वगैरे काही कळत नाही पण सुदैवाने गाण्याचा थोडाफार कान असल्यामुळे गाताना काही गोष्टी खटकल्या त्याच सांगितल्या आहेत. मुद्दाम दोष काढण्याचा हेतू नाही/नव्हता नाहीतर तू म्हणशील की परत परत 'चालीत नीट बसत नाही' म्हणून तात्या का पिडतोय! :)
असो, नुकतेच आमचे मित्र किमयाहागारांनी (!) नेहमीप्रमाणे आम्हाला उद्देशून इथे काहीतरी हागून ठेवले आहे हा भाग निराळा! :))
आपला,
(गाण्यातला) तात्या.
12 Dec 2007 - 7:30 am | किमयागार (not verified)
अध्यक्ष,
'नार्सिससच्या प्रातर्विधीची लावणी' लिहाच तुम्ही!!
काय आहे, विषय तुमच्या जिव्हाळ्याचा असल्याने तुम्हाला ती उत्तम जमेल तसेच चांगली चालीत वगैरे बांधल्याने, सकाळच्या बैठकीला उत्तम साथ देखिल देईल. काय म्हणता?
-कि'गार
*****************************************************
अल्कोहोलचा परिणाम, दुसरे काय?
12 Dec 2007 - 7:57 am | विसोबा खेचर
काय आहे, विषय तुमच्या जिव्हाळ्याचा असल्याने तुम्हाला ती उत्तम जमेल तसेच चांगली चालीत वगैरे बांधल्याने, सकाळच्या बैठकीला उत्तम साथ देखिल देईल. काय म्हणता?
तुम्ही तुमचे नांव बदलून किमयाहागार असे का ठेवा. काय म्हणता? :)
तात्या.
12 Dec 2007 - 8:07 am | किमयागार (not verified)
त्याचं काय आहे अध्यक्ष, 'प्रातर्विधी' हा आमचा जिव्हाळ्याचा विषय नसून तो आपल्या आवडीचा आहे. त्यामूळे ओढून ताणून केलल्या 'किमयाहागार' पेक्षा साधे सोपे 'हगोबा खेचर' केलेले अधिक चपखल वाटत का नाही?
-कि'गार
अल्कोहोलचा परिणाम, दुसरे काय?
12 Dec 2007 - 8:23 am | विसोबा खेचर
त्यामूळे ओढून ताणून केलल्या 'किमयाहागार' पेक्षा साधे सोपे 'हगोबा खेचर' केलेले अधिक चपखल वाटत का नाही?
चालेल की! हागोबा खेचरही चालेल! :)
परंतु ही सगळी टोपणनावे झाली. आमचं खरं नांव चंद्रशेखर रामचंद्र अभ्यंकर (फोन ९८२०४९४७२०) आहे.
तुमचंही ते एकदा सांगून टाका, (बापाच्या नावासकट! अर्थात, बाप कोण ते माहिती असल्यास! आपला जन्म ही नक्की कुणाची किमया आहे ते कळले तर बरे होईल!:) म्हणजे मग आपण आपापली नांवे किमयाहागार आणि हागोबा खेचर अशी ठेवू! :)
तात्या.
आदरणीय पंचायत समिती -
धन्याशेठच्या कवितेत मला 'नार्सिससच्या प्रातर्विधीची लावणी' लिहाच तुम्ही' अशी असंबद्ध सूचना करून या माणसाने नेहमीप्रमाणे मला टार्गेट करून हागायला सुरवात केली आहे. त्यामुळे हे अवांतर/विषयांतर असलेले प्रतिसाद उगीचंच वाढत चाललेले आहेत. सबब, मी इतर सर्व सदस्यांची, पंचायत समितीची, व धन्याशेठची जाहीर क्षमा मागतो व इथेच थांबतो...
तात्या.
12 Dec 2007 - 1:26 pm | बाळासाहेब चौगुले
शंख हि फुन्कला
सडा हि शिन्पला
तरिबी दसरथ राजा
बाहेर का येइना?
ही लावणी कशी वाटते? :)))
12 Dec 2007 - 1:56 pm | विसोबा खेचर
तरिबी दसरथ राजा
बाहेर का येइना?
मस्त! :) बहुधा आदल्या दिवशी रात्री कौसल्येने आग्रह कर करून कांदाभजी खाऊ घातली असतील तीच जाम बाधली असतील दशरथाला! :)
आपला,
(घाईगडबडीत असलेला) तात्या.
12 Dec 2007 - 2:32 pm | बाळासाहेब चौगुले
तुम्हि घाइगडब्डित आहेत म्हणून तुम्हला लावणि समजलीच नाही.दसरथ राजाने भजी खाल्ली नाही तर कान्दा भजीच (आदल्या रात्रिची) दशरथ राजा आहे. आता समजल काय?
12 Dec 2007 - 1:35 am | सर्किट (not verified)
पुन्हा एकदा धनंजयच्या चौफेर प्रतिभेची साक्ष पटली !
लावणी आवडली.
- सर्किट
12 Dec 2007 - 3:31 am | बेसनलाडू
पुन्हा एकदा धनंजयच्या चौफेर प्रतिभेची साक्ष पटली !
--- सहमत आहे.
(सहमत)बेसनलाडू
18 Jan 2009 - 2:35 am | काळा डॉन
च्यायला काय पण प्रतिसाद देतात एक एक लोक..हसून हसून मरायची पाळी आली.