चिरंजीव रॉक्स

इनिगोय's picture
इनिगोय in जनातलं, मनातलं
10 Jun 2017 - 10:59 pm

संवाद (१)
“If you wish to make an apple pie from scratch, you must first invent the universe.”
- Carl Sagan
९ – ही मस्त कोट आहे, मला आवडली.
३७ – तुला कळली?
९ – हो. म्हणजे तुम्हाला जर अगदी पहिल्यापासून ऍपल पाय बनवायचा असेल, तर आधी झाड लावावं लागणार. त्याच्यासाठी पृथ्वी बनवावी लागणार. त्यासाठी बिग बँग झाला पाहिजे म्हणजे युनिव्हर्स तयार होईल.
३७ – (!!) कार्ल सगान??

संवाद (२)
९ – हे काय गं, देवाची पूजा नाही केलीस?
३७ – नाही रे बाबा, मला पूजा वगैरे नाही जमत. माझा त्यावर विश्वास नाहीये. देव मानते हां मी, पण तो मूर्तीत असतो असं मला नाही वाटत.
९ – हो, even I think that.
३७ – मग तुला काय वाटतं? देव कुठे असतो?
९ – सगळीकडे! म्हणजे या कापडात, या भांड्यात, या प्लास्टिकमध्ये...
३७ – (!)
९ – ..देव सगळीकडे असतो.
३७ – आणि नेचरबद्दल काय वाटतं तुला?
९ – नेचरचं पण तसंच आहे.
३७ – म्हणजे?
९ – म्हणजे बघ ना, या सगळ्या ज्या वस्तू – कापड, भांडं, प्लास्टिक हे सगळं कुठून येतं? नेचरमधूनच.
३७ – हम्म! मग नेचरला विल असते का?
९ – असणारच ना.. बघ आता पाऊस पडतो, तर आपल्या planet जवळ सूर्य असा असायला पाहिजे, पाणी असायला पाहिजे हे सगळं कोणीतरी ठरवलं असणारच ना?
३७ – (!)
९ – म्हणूनच नेचरमध्ये अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात.
३७ – बरं नेचरचे कॉम्पोनंट सांग काय काय आहेत?
९ – नेचर तर सगळीकडेच आहे. झाडात, माणसात, डोंगरात.
३७ – नाही.. हे तर नेचर ज्याचा कॉम्पोनंट आहे, त्याची उदाहरणं झाली. नेचरचे कॉम्पोनंट काय आहेत?
९ – ओह.. पृथ्वी, हवा.. अं.. पृथ्वी, हवा.. अरे यार..
३७ – आणि?
९ - पृथ्वी, हवा, आग.. अरे कुठे गेले ते पाच भूतं?!
३७ – (!!!)
९ - अं.. पाणी.. आणखीन एक आहे, मी नेहमी विसरतो
३७ – या चारांचा अब्सेंस कुठे असतो सांग?
९ – (विचारात)
३७ – स्पेस. किंवा अवकाश, आकाश.
९ – हां. सो हे सगळे मिळून ठरवतात, काय काय करायचं ते.
३७ – (!!!!!!!!!!!)
३७ – (!!!!)
३७ – हे सगळं तुला कुठून कळतं रे?
.
.
.
.
.
.
.

संस्कृतीविज्ञानव्यक्तिचित्रणविचार

प्रतिक्रिया

सानझरी's picture

10 Jun 2017 - 11:13 pm | सानझरी

Img दिसेना..

मला जमत नाहीये बहुतेक. संमं मदत करा प्लीज.

इमेज पब्लिक केली आहे आहे ना? बाकी काही प्रॉब्लेम दिसत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jun 2017 - 3:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही वापरलेला कोड "इमेजच्या थंबनेल"चा आहे "इमेज"चा नाही.

गुगलफोटोत इमेज पूर्ण आकारात (थंबनेल नव्हे) डिस्प्ले करून मग तिच्यावर राईट क्लिक करून तिचा "इमेज कोड" मिळवा व तो इथेच प्रतिसादात टाका... मग संपादकांना तो लेखात हलवता येईल.

मुक्त विहारि's picture

10 Jun 2017 - 11:13 pm | मुक्त विहारि

काही समजले नाही....

(अज्ञानी) मुवि

ताक : समजावून दिले तर आम्ही नक्कीच समजून घ्यायचा प्रयत्न करू.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jun 2017 - 3:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

९ = वय वर्षे ९ असलेले मूल (लेखाच्या शीर्षकात 'चिरंजीव' असल्याने तो मुलगा आहे.)
३७ = वय वर्षे ३७ असलेला/ली पालक.

मुक्त विहारि's picture

11 Jun 2017 - 7:37 pm | मुक्त विहारि

धन्यवाद...

तशी आमची आकलन शक्ती काही बाबतीत कमीच.

वय नऊ च्या मानाने खरेच युअर चिरंजीव रॉक्स! :-)

इनिगोय's picture

11 Jun 2017 - 8:36 am | इनिगोय

खरंय. त्याच्याशी कोणीही कोणताही विषय बोलू शकतो. किंबहुना अगदी लहानपणापासूनच तसं करत राहिल्याने आता हे असे संवाद होऊ लागलेत. शिवाय वाचन प्रचंड आहे. त्यामुळे आकलनही चांगलं आहे.

भारीच! कार्ल सेगानवाला प्रसंग जास्त आवडला. चिंचोळ्या पट्टीत विचार न करता समोरची गोष्ट आपल्या इतर ज्ञानाशी पडताळून पाहावीशी वाटणं हे अतिशय महत्त्वाचं लक्षण आहे.

आणखी लिहा.

मुक्त विहारि's picture

11 Jun 2017 - 11:07 am | मुक्त विहारि

+ १

इनिगोय,

हे सगळं तुला कुठून कळतं रे?

ज्ञान ही आत्म्याची सहज प्रवृत्ती आहे.

आ.न.,
-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jun 2017 - 3:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं "बालक-पालक" संवाद ! बालक हुशार आहे, आमच्यातर्फे त्याला एक चॉकलेट द्या :)

दशानन's picture

11 Jun 2017 - 7:27 pm | दशानन

अरे, अज्जन महा'गुरू' या धाग्यावर आले नाहीत का?

;)

बाकी धाग्याबद्दल -
9*9*9*9 = 36
कॉमन 9 आणि 36
प्रश्न फक्त एका वर्षांचा राहिला, त्या एका वर्षात काय काय समजायला हवे त्या 9 वर्षाला याचा विचार महत्वाचा.

बाकी, गुगल स्काय वापरले की अजून डीप मध्ये सांगता येईल तुम्हाला (37) त्याला/तिला (9).

vikramaditya's picture

12 Jun 2017 - 1:43 pm | vikramaditya

Is busy instigating the author of other thread. He wants the author to provide some details, so he can show his wisdom.

जव्हेरगंज's picture

12 Jun 2017 - 1:28 pm | जव्हेरगंज

हे वाचून फोटो बघायची ऊत्सुकता ताणली!!

सूड's picture

12 Jun 2017 - 2:04 pm | सूड

भारीच की राव.

ज्योति अळवणी's picture

14 Jun 2017 - 11:33 am | ज्योति अळवणी

मस्त! खरच अलीकडे मुलं हुशार झाली आहेत