अता ही भेट टळणे शक्य आहे
(तुझे मजला वगळणे शक्य आहे)
जरासा जोर लावावास अजुनी
पहा माझे निखळणे शक्य आहे
नको इतकी मुजोरी आरशावर
तुझेही रुप ढळणे शक्य आहे
असे येऊ नये वेळीअवेळी
(कुणी काही बरळणे शक्य आहे)
जरा जपूनीच ये ग्रीष्मात इथल्या
तुझी काया वितळणे शक्य आहे
तुला पाहून येथे एकटीला
फुलांचे बावचळणे शक्य आहे
डॉ. सुनील अहिरराव
प्रतिक्रिया
24 Apr 2017 - 4:19 pm | वेल्लाभट
क्या बात है ! वाह वाह वाह !
24 Apr 2017 - 4:21 pm | दशानन
तुला पाहून येथे एकटीला
फुलांचे बावचळणे शक्य आहे
वाह!
24 Apr 2017 - 5:27 pm | सतिश गावडे
मस्त. आवडली कविता.
26 Apr 2017 - 9:58 am | drsunilahirrao
वेल्लाभट, दशानन , सतिश गावडे
__/\__
27 Apr 2017 - 2:57 pm | सत्यजित...
>>>जरासा जोर लावावास अजुनी
पहा माझे निखळणे शक्य आहे>>>क्या बात है!
>>>जरा जपूनीच ये ग्रीष्मात इथल्या
तुझी काया वितळणे शक्य आहे>>>बढीया!
1 May 2017 - 10:07 pm | drsunilahirrao
__/\__
4 May 2017 - 9:30 pm | बोका-ए-आझम
हा अप्रतिम प्रकार आहे !