माझी काही ट्युलिप्स पेंटिंग्स

सप्तरंगी's picture
सप्तरंगी in मिपा कलादालन
21 Apr 2017 - 8:01 pm

मिपाकर्स,

ऑइल पेंटिंग मध्ये काम सुरु करून तपे ओलांडली , ती तपे ओलांडताना पण मध्ये मध्ये काही काळ जात राहिला जेंव्हा इतर व्यापांमुळे हि कला जोपासणे शक्य नव्हते. पण पूर्णविराम न देता अल्पविरामावर विसावा घेत का होईना पण चालत राहिले. जेंव्हा जमत नव्हते तेंव्हा बंद केले , थोडा वेळ मिळाला तेंव्हा त्या वेळेत होईल ते केले आणि भरपूर वेळ होता तेंव्हा झोकूनही दिले. त्यामुळे कशातच प्रभुत्व असे नसले तरी सगळेच थोडे थोडे जमू लागले , मग काही पेंटिंग्स केली , काही गिफ्ट दिली, काही विकली, काही exhibition मध्ये लागली.

या सर्व प्रोसेस मध्ये सर्वात जास्त काय मिळाले ते समाधान. आणि प्रत्येक टप्प्यावर नवीन काहीतरी शिकायला मिळाले, अजूनही मिळते आहे. शिकणे सोडायचे नाही असे ठरवून आजही वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत चालते आहे.... त्या शिकण्यातील थोडासा , माझ्या काही रंगांचा प्रवास मी इथे मांडते आहे.

माझी काही ऑइल - acrylic पेंटिंग्स शेअर करण्याचा मानस आहे जी मी इथे मिपा वर येऊन २-३ वर्षे झाली तरीही -करू- बघू- काय होईल केल्याने- कोणाला पडलय आणि कोणाचे अडलेय माझ्या पेंटिंग्सने- कुठे लिहीत बसणार मराठी मध्ये, तेवढ्या वेळात जग जिंकून येईन - असा काहीही विचार करत केली नाहीत.....आत्ताही अगदी विचार केलाय म्हणजे सगळे पटापट शेअर करेनच असे नाही पण माझ्या भोवर्यातून बाहेर यायचा प्रयत्न करेन म्हणतेय.

आवडले काही तर जरूर सांगा, इंटरेस्ट असल्यास किंवा सगळे काम बघावे वाटल्यास / लिंक हवी असल्यास व्यनि का काय म्हणतात तो करा. अगदी नाही आवडले तरी सांगा , क्रिटिकस कडूनही शिकायलाच मिळेल.

*****सांगण्याची आवश्यकता नसेल तरीही सांगणे इष्ट्य : ओरिजिनल फोटो आणि पेंटिंग्सचा copyright पूर्णत्वे माझा आहे.

धन्यवाद !!!
3 Tulips

Summer Breeze

प्रतिक्रिया

मोहन's picture

29 Apr 2017 - 11:00 am | मोहन

+१००

सुबोध खरे's picture

29 Apr 2017 - 11:43 am | सुबोध खरे

वा डॉक्टर साहेब
मला जे म्हणायचं होतं ते तुम्ही अगदी नेमक्या शब्दात मांडलं आहे.
आमच्या सारखे अर्ध मेंदू वाले( उजवा मेंदू न चालणारे) लोक ( जे बहुसंख्य आहेत आणि आपल्याला चित्रकलेतील काहीही कळत नाही हे सांगण्यात काही लाज वाटत नाही असे) चित्र पाहिल्यावर ते आवडतं किंवा नाही. किंवा एखादा गायक गातो ते आवडतं नाही तर नाही. त्याची रागदारी काय त्याचं घराणं कोणतं याच्याशी आमच्या सारख्याना काही घेणं देणं नसतं. मग त्यात एखादी तान वर गेली काय कि खाली गेली काय? काय फरक पडतो? एखाद्या पदार्थाची (उदा. मिरचीचा ठेचा) पाककृती चुकली पण पदार्थ चवीला उत्तम लागतो आहे ना मग झालं तर.
मुळात एखादी कलाकृती आपल्याला आनंद देते आहे कि नाही हाच मुद्दा आहे.
बाकी सर्व मोह माया आहे.

संजय क्षीरसागर's picture

29 Apr 2017 - 12:14 pm | संजय क्षीरसागर

तीन लोकांनी चित्रांचं यथोचित समिक्षण केलंय. मी एकटा असतो तर ठीके पण अभ्या आणि चित्रगुप्त या जाणकारांनी पण तेच मत व्यक्त केलं आहे. आणि नीट वाचलत तर लक्षात येईल की ज्या लाईन्सवर मी टिका केलीये त्याच मुद्यांवर त्यांनी सहमती दर्शवलीये. शिवाय मला आणि इनसिक्योरिटी ? स्वप्नातबिप्नात आहात काय ? का उगीच काहीही ठोकायचं म्हणून लिहीतायं ? जसं मी सकारण चित्रं का आवडली नाहीत ते लिहीलंय तसं तुम्हीही तुमच्या इन्सिक्योरिटीबद्दल लिहा म्हणजे बघता येईल.

विशुमित's picture

29 Apr 2017 - 10:24 pm | विशुमित

तुम्ही करा हो काही हातच राखून न ठेवता टीका आणि लेखन ! प्रत्येक विषयावर स्वघोषित तज्ञाची शेखी मिरविल्याशिवाय दोन घास गळ्याखाली ज्यांच्या जात नाहीत असे महाभाग जगात खूप आहेत. त्यांची पत्रास बाळगून आपण का आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना हिरावून द्यायचा ? हे त्यांच्या मानसिक इनसिक्युरिटीचे लक्षण असते. आपण आपले, त्यांची कीव करत, "... हाथी चले अपनी चाल" हे तत्व बाळगून आपला जिवनानुभव साजरा करीत रहावे !

तसेही पाहिले तर, या धाग्यावर चित्र कलेची जाण असणारे अतीअल्पसंख्य आहेत. त्यामानाने, चित्रातले काहि ही न समजणारे स्वयंघोषित रसिक आणि मनाचे मनोरे बांधणारे रसग्रहण करणारे कंपू बाज अनेक पटींनी जास्त आहेत, हे विसरू नका !

(सप्तरंगी जी तुमचा चित्रकलेचा प्रयत्न मनापासून आवडला पण तुम्ही स्वतः तरी संक्षी जी च्या पहिल्या प्रतिसादाला संयम दाखवायला हवा होता, असे राहून राहून वाटतं. बाकीच्यांच्या चिखल फेकी मुळे तुमच्या रंगाचा बेरंग झाला. हा सल्ला नव्हता, लोभ असावा...!!)

(सप्तरंगी जी तुमचा चित्रकलेचा प्रयत्न मनापासून आवडला पण तुम्ही स्वतः तरी संक्षी जी च्या पहिल्या प्रतिसादाला संयम दाखवायला हवा होता, असे राहून राहून वाटतं. बाकीच्यांच्या चिखल फेकी मुळे तुमच्या रंगाचा बेरंग झाला. हा सल्ला नव्हता, लोभ असावा...!!)

May be , पण मला त्यांना एकदा तर उत्तर देणे तर भाग होते आणि सांगणे जरुरी होते, नाहीतर मी त्यांचे सगळे म्हणणे मान्य करते आहे असा त्यांचा ग्रह झाला असता. अर्थात उत्तरे देऊनही काही उपयोग झाला नाही म्हणा.
बाकी लोभ आहेच :)

पण मला त्यांना एकदा तर उत्तर देणे तर भाग होते आणि सांगणे जरुरी होते, नाहीतर मी त्यांचे सगळे म्हणणे मान्य करते आहे असा त्यांचा ग्रह झाला असता

ह्याच चक्रात तुमचा धागा गुरफटला =))

सप्तरंगी's picture

30 Apr 2017 - 8:55 pm | सप्तरंगी

seriously, मी जे खरे आहे तेच लिहिले, तेंव्हा मी प्रामाणिक पण जरा नवीन होते...आता मुरेन हळू हळू :))

ठीक आहे हो, एवढे नका मनावर घेऊ!
"मुरा" पण लेखनीने. सगळेच चांगले असतात फक्त दृष्टिकोन वेगवेगळा असतो.
पुढील लेखाची वाट पाहतोय, लहानपनी माझी चित्रकला पाहून माझे मास्तर म्हणाले होते "लेका तू, घराच्या भिंती देखील रंगवू शकणार नाहीस कधी." पण मी अनेक वर्षाने रंगवली! माझ्या जुन्या लेखात कुठेतरी आहे तो लेख :D

अद्द्या's picture

3 May 2017 - 10:23 am | अद्द्या

आता शिक्षा म्हणून मोकळाया दाही दिशा ५ वेळा वाचा.. जोरात.. ऑफिस मधल्या आजूबाजूच्या लोकांना ऐकू गेलं पाहिजे नीट .. आणि आहे तशी वाचा.. उगाच आपले शुद्धलेखनाचे ठिगळ नका जोडू त्याला =))

बाकी.. चित्रे काढत राहा.. अजुनी चांगली येतील नक्कीच :)
बघायला आवडतील ती हि

दशानन's picture

3 May 2017 - 10:31 am | दशानन

=))
=))
=))
शमत!

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Apr 2017 - 11:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

@संक्षी :

तुमचे नाव नसलेला तो जनरल प्रतिसाद तुम्ही स्वतःवर ओढून घेतला यातूनच सत्य बाहेर आले, हाच खरा "ज्योक" आहे ! =)) =)) =))

स्वतःवर इतरांनी केलेली जराश्या टीकेने अंगाची आग-आग होणार्‍याने इतरांवर उद्धट आणि अहंमन्य शब्दांत टीका करणे किती विनोदी (नाही, नाही... "ज्योक"कारक) असते, हे आतापर्यंत अनेकांनी अनेकदा सांगूनही, तुम्हाला समजणे कठीण आहे, हे माहीत आहेच. :)

तुमचा चित्रकलेतला अधिकार सिद्ध करायची तुम्हाला एक संधी आहे : चित्रगुप्त यांनी सद्याच चित्रकलेवर चला, चित्रकलेची सुरुवात करूया... या नावाचा एक धागा टाकला आहे. त्यावर टाका तुमची स्वतःची चित्रे आणि घेऊ द्या आम्हाला तुमच्या चित्रकलेच्या अधिकाराचा प्रत्यक्ष अनुभव ! तुमचे चित्रकलेवरचे प्रभुत्व सिद्ध करण्याची ही उत्तम संधी आहे !

इतर विषयांबाबतही अश्या संधी भविष्यात येतीलच !

छय! असे काय सांगू नका. मी तर ग्रेट! मी माझी कला विकत प्रस्तुत करेन, पण सल्ला देणे व तो मान्य करायला लावणे हा माझा आग्रह आहे मिपावर.

आपलाच,
मि. पर-फेकट

संजय क्षीरसागर's picture

30 Apr 2017 - 12:33 am | संजय क्षीरसागर

तुमचे नाव नसलेला तो जनरल प्रतिसाद तुम्ही स्वतःवर ओढून घेतला यातूनच सत्य बाहेर आले, हाच खरा "ज्योक" आहे !

इथे केवळ माझ्या टिकेवरनंच सगळं मोहोळ उठलं आहे. बाकीच्या दोघांनीही टिका केली आहे पण ते इतरांना क्षम्य आहे. खरा प्रश्न असांय की तुम्ही इथले मान्यवर असतांना तुम्हाला आडून हल्ला करावा लागतो ! फालतू विडंबनावर सुद्धा तुम्हाला हात धुवून घ्यावासा वाटतो (आणि मग तो धागा डिलीट होतो) ! प्रतिवादात तुम्हाला शक्य नाही पण कोणतंही कारण न देता तुम्ही मला ब्लॉक करु शकता. मग तुम्हाला इतकं आडून वागण्यात कसली इन्सिक्योरिटी वाटते ?

आणि चित्रगुप्तांच्या धाग्यावर मी चित्रं टाकली की माझी कला कला तुम्ही जोखणार ? क्या बात है ! आहो, मी सुरुवातीलाच म्हटलंय, मी चित्रकार नाही पण माझा मुलगा चित्रकार आहे आणि त्याच्या अभ्यासाच्या अनुषंगानं मी चित्रकलेचा व्यासंग केला आहे. बहुदा तुम्हाला पूर्वग्रह नडतोयं. कारण ज्या पद्धतीनं मी चित्राचा अ‍ॅनॅलिसिस केलायं तो माझी सौंदर्यदृष्टी दर्शवतो. आणि इथल्या तज्ञांना तो मान्य आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येऊ नये हे दुर्दैव आहे. तुम्ही आपलं एकच तुणतुणं लावून धरलंय `सर्वज्ञ किंवा अहंकारी!'. थोडं स्वच्छ नजरेनं जगाकडे बघायला शिका (निदान माझ्या लेखनाकडे तरी), बराच फायदा होईल.

सचु कुळकर्णी's picture

30 Apr 2017 - 12:43 am | सचु कुळकर्णी

सर्वज्ञ किंवा अहंकारी
समर्थ पढत मुर्खांचि कमि लक्षण लिहुन गेलेयत. भागsssss.

संजय क्षीरसागर's picture

30 Apr 2017 - 1:03 am | संजय क्षीरसागर

इतर विषयांबाबतही अश्या संधी भविष्यात येतीलच !

अजून काय संधी हवी ? तुम्ही संपादक आहात, इच्छा असो वा नसो, तुम्ही (प्रतिसाद देत नसला तरी) माझं सर्व लेखन वाचत असणारच. मी काही फक्त प्रवास वर्णनं लिहीत नाही. उर्दू शायरी, चित्रपट परीक्षण (हे पार सतीश राजवाडेंनी अ‍ॅप्रिशियेट केलं असा मिपा टीमचा मला व्यनि आहे), उत्तम हिंदी गाण्यांवरचे लेख, पुस्तकाचं रसग्रहण, ललित लेखन, स्वतःच्या कविता, इतरांच्या कवितांची रसग्रहणं, मनासारख्या अगम्य विषयावरचे माझे प्रतिसाद आणि लेखन, कॅन्सरसारख्या दुर्धर रोगानं घरातलं माणूस उद्विग्न असणार्‍या सदस्याला दिलेला (आणि त्याला भावलेला) कंप्लीटली वेगळा दृष्टीकोन, पैश्यासारख्या जिव्हाळ्याच्या विषयावर नोबल विजेत्याच्या विरोधात मांडलेले (आणि निर्विवाद ठरलेले) विचार, सध्या करत नसलो तरी यापूर्वी इथे केलेलं अध्यात्मिक लेखन ......सॉलीड वाइड रेंज आहे लेखनाची.

इतरांचं मी समजू शकतो (कारण त्यांची रेंज उघड दिसते) पण तुम्हाला तरी निदान `अहंकार आणि सर्वज्ञपणा' म्हणून दरवेळी स्वतःची जेलसी सांभाळणारी मानसिकता नसावी अशी आशा करतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Apr 2017 - 4:33 am | डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही स्वतःबद्दल लिहिले आहे ते दुसर्‍यांनी म्हटले/लिहिले तरच भूषणावह असते. स्वतःच स्वतःच्या अंगावर लाल रंग उधळावा लागणे हे प्रसिद्धीसाठी काकूळतीला येण्याचे (डेस्परेशन) आणि इन्सिक्युरिटीचे लक्षण आहे !

सॉलीड वाइड रेंज आहे लेखनाची.

दरवेळी स्वतःची जेलसी सांभाळणारी मानसिकता नसावी अशी आशा करतो.

संक्षी, किती हसवणार आता !? पोट दुखायला लागले. =)) =)) =))

मराठीतले लेखन मी केवळ आणि केवळ छंद किंवा गंमत म्हणूनच करतो. त्यामुळे, त्यात चढाओढ, व्यवसाय, जेलसी किंवा इतर काही प्रायव्हेट लॉजिकवर आधारीत जावईशोध लावू नका !!! कोणाशीही कोणत्याच बाबतीत चढाओढ करायची गरज वाटणारे दिवस फार मागे सोडलेले आहेत... आणि तुमच्या प्रायव्हेट लॉजिकशी चढाओढ तर... तोबा, तोबा !! =))

कारण नुसत्या मनावरच्या तीन पोस्टस घेतल्या (अरा, टफि आणि मी) तर तिथे फिजिक्स, क्वांटम फिजिक्स, संगीत, थिअरी ऑफ रिलेटिवीटी, सायकॉलॉजिचे वेगवेगळे पैलू, उपनिषदं, जाणीवेचं त्रिभाजन आणि एकसंधता, काल, कालाची प्रक्रियेसाठी आवश्यकता, कालाचं स्थान, तो अस्तित्वात आहे किंवा नाही...... अशा अनेकविध महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली आहे.

फाट्यावर मारणे हा शद्ब सगळ्यांनाच माहिती आहे तो वापरणं सोम्यागोम्या पण करु शकतो. ज्याला त्या विषयात इंटरेस्ट आहे तो काँट्रिब्यूट करतो. आता तुम्ही वाचलंच नसेल तर तिथे आलेले प्रशंसात्मक प्रतिसाद तुम्हाला कळणार तरी कसे ? नाही तर स्वतःचे लिमीटेड इंटरेस्ट लपवायला फाट्यावर मारतो ही एक बेस्ट सुटका आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Apr 2017 - 1:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

संक्षी, किती हसवणार आता !? पोट दुखायला लागले. =)) =)) =))

चित्रगुप्त's picture

30 Apr 2017 - 1:42 pm | चित्रगुप्त

आता मिपावर नवीन शॉ.फॉ. प्रचलित करायला झालेतः
संकिहआ? पोदुला.
आणखी एकः
वप्रज्योसफामायेआ (वरील प्रतिसाद ज्योक समजून फाट्यावर मारण्यात येत आहे)

माहिती असलेल्यांकडून बाकी काही अपेक्षा नाही !

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Apr 2017 - 4:03 am | डॉ सुहास म्हात्रे

इथे केवळ माझ्या टिकेवरनंच सगळं मोहोळ उठलं आहे.

१. माझ्या दृष्टीने कोणत्याही अनावश्यक आणि अहंमन्य टीकेला काडीइतके महत्व नसते. त्यामुळे, इथल्या तुमच्या टीकेला तर मी कीव भरलेला दृष्टीक्षेप टाकून दुर्लक्ष केले आहे. उगाच, मी तिकडे लक्ष दिले आहे असा समज करून घेऊन स्वतःचे महत्व स्वतःच वाढवायचा केविलवाणा प्रयत्न करू नये !* :)

या जगात सगळेच जागतिक किर्तीचे कलाकार बोटावर मोजण्याइतकेच असतात, पण म्हणून इतर कोणी कलेला हात लावूच नये असे आहे काय (सगळ्यांची चाल हंसासारखी नसते, म्हणून बाकी कोणी चालूच नये काय ?) ?! प्रत्येकाच्याच कलेची आपापल्या परीने, केवळ स्वतःचे समाधान म्हणून का होईना पण, काही किंमत असतेच. हे स्वमग्न लोकांना समजायला कठीण जाते. मग, स्वतः कलाकार नाही हे नाईलाजाने कबूल करावे लागले तरी (परप्रकाशित) तज्ञ टीकाकाराचा अंगरखा घालून दुसर्‍याचा मनोभंग करायला ते तयार असतात. हे केवळ शुद्ध अपरिपक्वतेचे उत्तम उदाहरण असते. अश्या लोकांकडे दुर्लक्ष करणेच चांगले, कारण (अ) आपण उद्धटपणे विनाकारण दुसर्‍यांना दुखवत आहोत आणि (आ) असे सतत करण्याने आपल्याच मनात गरळ जमा करत असतो; हे दोन्हीही त्यांना स्वतःच्या अहंमन्यतेच्या आंधळेपणामुळे दिसू शकत नाही. अशी अपरिपक्व माणसे सतत स्वतःचे महत्व सांगण्याच्या प्रयत्नात असतात आणि इतर ते मानत नाहीत असे दिसले की चिडून काकदृष्टी बाळगून मिळेल त्याला टोचा मारत राहतात (हा आपला कमीपणा झाकण्यासाठी आक्रमक पवित्रा घेण्याचा विरोधाभासी प्रयत्न लो सेल्फ एस्टिम असलेल्यांमध्ये बर्‍याचदा दिसतो.)...

जाणकाराच्या योग्य टीकेला जरूर मान द्यावा व त्यातून शिकता येईल तितके शिकावे. पण अहंमन्य आणि उद्धट टीकेकडे दुर्लक्ष करून आपले काम जमेल तितके चांगल्या प्रकारे चालू ठेवावे आणि स्वतःला व इतरांना शक्य तितका आनंद द्यावा, हेच समाधानकारक असते. मी लेखिकेला केवळ याच दिशेने प्रोत्साहीत करत होतो.

२. तुमच्या टीकेवर टीका झाली. पण, इतरांची समतोल व सुसंकृत (उदा : चित्रगुप्त) टीका लेखिकेसकट इतर सर्वांनी आनंदाने मान्य केली. "हे का झाले असावे बरे ?"असा प्रश्न तुमच्या मनाला शिवतही नाही, हीच तर सर्वात मोठी गोची आहे.

तुम्हाला आडून हल्ला करावा लागतो !

हे केवळ हास्यास्पद आहे. तुम्ही स्वतःबद्दल फार गैरसमज करून घेतला आहे. जेव्हा मला तुमचे एखादे लेखन दखल घेण्याच्या लायकीचे वाटेल तेव्हा मी त्याबद्दल स्पष्टपणे लिहेन... मी नेहमी तसेच करतो. तुमचे नाव न घेतल्यास तुमचे लेखन फाट्यावर मारले आहे असे खात्रीने समजावे ! तसेही, तुमचे बहुतेक लेखन "प्रायव्हेट लॉजिक (या वेल डिफाईन्ड संज्ञेचा अर्थ माहीत नसल्यास डिक्शनरीत सापडेल)" या सदरात मोडते आणि अश्या लेखनावर नाईलाज झालाच तर मी काही लिहितो. कारण "प्रायव्हेट लॉजिक" वापरणार्‍याबरोबर केवळ वितंडवाद होतो आणि शेवटी हाताला काहीच लागत नाही... सगळाच आतबट्ट्याचा व्यवहार !

चित्रगुप्तांच्या धाग्यावर मी चित्रं टाकली की माझी कला कला तुम्ही जोखणार ?

असे मी केव्हा म्हटले ?! तुमच्यासारखा सर्वज्ञ असल्याचा माझा गैरसमज अजिबात नाही ! मिपावर चित्रगुप्तसाहेब आणि इतर खरे जाणकार आहेतच तुमची कला जोखायला. मात्र, हे कळायला माणसाने प्रथम "माझा समज तोच्च खरा समज" हा दुराग्रह सोडायला हवा. आता कोण पूर्वग्रहदूषित आहे हे तुम्हीच सिद्ध केलेत, नाही का ? :)

"स्वतःची चित्र टाका म्हटले की थातूरमातूर कारणे देऊन पलायन आणि केवळ ऐकीव माहितीवर तज्ञ असल्याच्या जोमात इतरांना खट्टू करायला पुढे धावणार", वा रे वा समतोलपणा आणि वा रे वा धैर्य !

माणूस किंवा संस्था कितीही ग्रेट असली तरी बाह्यपरिक्षकांकडून आपली प्रत जोखून घेणे बंद करू नये; असा सर्वमान्य दंडक आहे. हे बहुदा अहंकार आणि/किंवा असुरक्षितता (इनसिक्युरिटी) असताना टाळले जाते... आणि नकळत प्रत घसरण्याचे कारण ठरते.

एकच तुणतुणं लावून धरलंय `सर्वज्ञ किंवा अहंकारी!'. थोडं स्वच्छ नजरेनं जगाकडे बघायला शिका (निदान माझ्या लेखनाकडे तरी), बराच फायदा होईल.

'कोण स्वतःला सर्वज्ञ समजतो' आणि 'कोणाला जगाकडे डोळे उघडून बघायची गरज आहे' हे तुम्हाला बर्‍याच जणांनी बर्‍याचदा सांगून झाले आहे ! ते केलेत तर तुम्हाला फायदा होईल, पण मी तेच परत तुम्हाला कशाला सांगू ? :)

प्रतिवादात तुम्हाला शक्य नाही

"तुमने एकबार ठान ली तो तुम खुदका भी नही सुनते हो" हे तर सगळ्यांनाच माहित आहेच ! =)) =)) =)) तुमच्या याच सवयीमुळे बरेच जण तुमच्या लेखनावर प्रतिसाद देत नाहीत (त्यात मी पण आहे). याचा अर्थ असा नक्कीच नाही की तुमचे सगळे लेखन त्यांना मान्य आहे ! कभी कभी किसिको खुदके भरोसेपे छोड देनाही अच्छा होता है... याला मराठीत 'टाळणे' असे म्हणतात ;) :)

पण कोणतंही कारण न देता तुम्ही मला ब्लॉक करु शकता.

हा जावईशोध कोणत्या पुराव्यावर लावला ?! स्वतःचे उणेपण झाकण्यासाठी असा काही बिनबुडाचा वैयक्तिक रडीचा डाव खेळणे हे "इन्सिक्युरिटी" आणि "इंमॅच्युरिटी" यांचे सामयिक निदान करणारे लक्षण असते असे म्हणतात !

असो. तुमच्या ध्यानात न आल्यामुळे, परत एकदा सांगतो की, माझा मूळ प्रतिसाद केवळ लेखिकेला प्रोत्साहनपर होता. तुमच्या त्या 'स्पेशल' प्रतिसादाकडे मी दुर्लक्ष केले होते. त्यावर काही लिहावे असे वाटले असते तर, तडक त्या प्रतिसादाखाली लिहिले असते.

आता यावर तुम्ही काही लिहिले नाही तर मात्र अश्चर्यातिनंद होईल हे आत्ताच जाहीर करत आहे (शक्यता धूसर आहे). पण जर तुम्ही काही लिहिले आणि मी प्रतिवाद केला नाही तर वितंवाद टाळण्यासाठी त्याला फाट्यावर मारले आहे असे समजावे. धन्यवाद !

==================================

* उदा : मिपावरचाच अनुभव पाहता, तुम्ही एखादी गोष्ट अनेक दिवस, अनेक प्रतिसादांतून कळकळीने सांगूनही अनेक मिपाकरांना ती पटत नाही असे सतत दिसते. असे असतानाही, तुम्ही ज्यांना गुरुस्थानी मानता (किंवा नुसते मानता) अश्या "ओशोंना जे समजावून द्यायला तासभर लागेल ते तुम्ही पाच मिनिटात समजावू देवू शकता", अश्या अर्थाचे दावे तुम्ही मिपावर केला... त्यावेळेस, त्या प्रचंड विरोधाभासी दाव्याकडे बहुसंख्य मिपाकरांनी दुर्लक्ष करणेच योग्य समजले होते, हे तुमच्या ध्यानात आले का ?

संजय क्षीरसागर's picture

30 Apr 2017 - 9:33 am | संजय क्षीरसागर

का माझ्या लेखनाची (आणि प्रतिसादांची) वाट बघतात हे कळायला संपादक नसलेल्यांना सुद्धा फक्त माझा ट्रॅक बघणं पुरेसं आहे. कदाचित तुम्हाला फालतू विडंबनावर सुद्धा हात धुवून घ्यावसा वाटतो या दृष्टीदोषामुळे ते लक्षात येत नसावं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Apr 2017 - 1:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

असुद्या. असुद्या.

(अ) सगळीकडे नाक खुपसल्याने मोठेपण मिळते आणि/किंवा
(आ) जगाच्या उद्धारासाठी संताचा अवतार घेऊन मी येथे आलो आहे आणि/किंवा
(इ) नेहमी मीच्च बरोबर असतो आणि माझ्याबरोबर असहमत असणारे सगळेच्च चूकच्च असतात
असे अहंमन्य गैरसमज माझ्याकडे नाहीत आणि...
तसे करणे (कितीही विनोदी/कटकटीचे वाटत असले तरीही) जोपर्यंत माझा व्यक्तिगतरित्या संबंध नसेल आणि सर्वसाधारणपणे धोकादायक नसेल अश्या बाबतीत मी काही लिहायचे/बोलायचे टाळतो.

समाजातील प्रत्येकाला आपला अभिमान (अहंमन्यपणा नव्हे) बाळगायचा अधिकार असतो. त्यामुळे, आपले म्हणणे सभ्य आणि उद्धट नसलेल्या शब्दांत मांडणे ही... कोणी स्वतःला कितीही मोठा गुरू/स्वामी/तज्ञ/अधिकारी/इत्यादी समजत असेल तरीही... समाजाचा घटक म्हणुन प्रत्येकाची जबाबदारी आहे.

बादवे, तुम्ही सारखे संपादक संपादक काय लावले आहे... यात कोणाला जेलसीचा जळका वास आला तर तो गैर नसेल. :) "इथे मिपाच्या धोरणात राहून प्रत्येक सभासदाला आपले व्यक्तिगत मत मांडायला मुभा आहे. त्याबाबतीत, त्याच्याकडे एखाद्या पदाची जबाबदारी असणे किंवा नसणे हे गैरलागू आहे. पदाची जबाबदारी पार पडताना पदाचा आयडी वापरला जातो." तुमच्यासारख्या स्वघोषित विद्वानाला इतके तरी जरूर माहीत असायला हवे होते. पण असो, असतात एखाद्याचे गैरसमज. ;)

लिमिटेड व्यासंग असणारे तो जाणू शकत नाही असं दिसतं. बाकी तुमचं अहंमन्य, सर्वज्ञ हे तुणतुणं बंद होईल तेव्हा नेमक्या मुद्यांवर चर्चा होईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Apr 2017 - 9:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

दाखवला ना परत अहंमन्यपणा ?! =)) =)) (आता जी गोष्ट सतत स्पष्ट दिसते आहे त्याबद्दल बोलले जाणारच ना !)

इथे कोणाच्या व्यासंगासंबंधी सर्टिफिकेट द्यायला तुम्हाला नेमलेले नाही. ते बळजबरीने केले तर त्याला चोंबडेपणा म्हटले जाते आणि तशा सर्टिफिकेटची केराची टोपली ही सर्वोत्तम जागा असते हे नक्की. अशी दुसर्‍याला कमी दाखवणारी सर्टीफिकेट्स वाटत फिरणे, हे अगतिकतेचे लक्षण असते.

अधिकाराची किंवा व्यासंगाची प्रत आपल्या ज्ञानातील योग्य भाग, योग्य वेळेस आणि योग्य प्रकारे व्यक्त करण्याच्या ताकदीवरून (पक्षी : काय बोलावे, कधी बोलावे आणि कसे बोलावे यावरून) ठरते.

दुसर्‍याची रेघ खोडण्याने नाही तर स्वतःची रेघ मोठी करण्याने माणूस खर्‍या अर्थी मोठा बनतो. त्यासाठी सतत स्वतःवर लाल रंग उधळून स्वतःच स्वतःची जाहिरात करावी लागत नाही किंवा 'उचलली जीभ लावली टाळ्याला' असे करत दुसर्‍यावर चिखलफेक करावी लागत नाही... तसे करणे अत्यंत लाजीरवाणे दिसते आणि काकूळतीला आल्याचे लक्षण समजले जाते.

दशानन's picture

30 Apr 2017 - 9:10 pm | दशानन

वयाचा नाही किमान दिव्य'ज्ञान याचे तरी भान ठेवा ना, प्लिज.

सप्तरंगी's picture

30 Apr 2017 - 8:26 pm | सप्तरंगी

नुसते हे quoteच नाही तर अगदी पूर्णपणे अतिशय संयत रिप्लाय. यातुन मलाही कळते आहे मी काय करायचे आहे ते :) थँक्स डॉक्टर.

जाणकाराच्या योग्य टीकेला जरूर मान द्यावा व त्यातून शिकता येईल तितके शिकावे. पण अहंमन्य आणि उद्धट टीकेकडे दुर्लक्ष करून आपले काम जमेल तितके चांगल्या प्रकारे चालू ठेवावे आणि स्वतःला व इतरांना शक्य तितका आनंद द्यावा, हेच समाधानकारक असते. मी लेखिकेला केवळ याच दिशेने प्रोत्साहीत करत होतो.

प्रदीप's picture

1 May 2017 - 11:08 am | प्रदीप

चित्रकलाच काय, कुठल्याही कलेविषयी, खेळाविषयी जाण असणे, व ते स्वतः करता येणे, ह्यात फरक आहे ना? तेव्हा संक्षींनी व्यक्त केलेल्या मतांवरून त्यांनी त्यांची स्वतःची चित्रे इथे टाकावीत ही मागणी चुकीची आहे. आपण चित्रकार आहोत, असे त्यांनी कुठेच म्हटलेले मलातरी दिसलेले नाही, तसे असेल तर ते सांगावे.

मी चित्रे काढत नाही, तरीही मला त्या कलेविषयी आत्मियता आहे, आणि त्यातील काही बरेवाईट पाहिल्यामुळे, त्याविषयी काही जाणही आहे. तेव्हा मलाही ही चित्रे बाळबोध वाटली. संक्षींच्या मूळ प्रतिसादाशी मीही सहमत आहे. अर्थात त्यांनी जे लिहीले आहे, ते सौम्य भाषेत लिहीले असते तर ते बरे झाले असते. पण तसे करण्यास संक्षींना ब्रिट्सांचा बराच निकटचा सहवास लागेल, आणि ते तर पडले पुण्याचे !

ह्या सर्वावरून त्यांच्या सदर पेंटिंग्सबद्दलच्या मतांविषयी काही प्रतिवाद न करतां बरेच जण वैयक्तिक पातळीवरून त्यांनाच टोचत आहेत हे मला चुकीचे वाटते. त्यात, डॉ. साहेब, तुम्हीही सामिल झालात, त्याचे आश्चर्य वाटते आहे.

आपल्या कलाकृतिविषयी/ लेखाविषयी अनेकजण अतिशय हळवे असतात. इथेही तेच घडले आहे. वास्तविक लेख इथे टाकला, की आपले त्यावरील स्वामित्व संपले. मग टीकेस तयार रहावे, जमल्यास त्यावर चर्चा करावी. 'तुमची भाषा उद्धट आहे, तेव्हा तुमच्या मतांचा मी अनादर करत आहे' हा अ‍ॅटिट्यूड मला चुकीचा वाटला, तरी येथे तो मला अपरीचित नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 May 2017 - 12:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

अर्थात त्यांनी जे लिहीले आहे, ते सौम्य भाषेत लिहीले असते तर ते बरे झाले असते.

हांग अश्शी ! त्यांचा 'तो' प्रतिसाद परत वाचून, हे तुमचे वाक्य परत वाचलेत तर, तुमचे वरचे वाक्य फारच मवाळ आहे असे नक्की वाटेल !

डॉ. साहेब, तुम्हीही सामिल झालात, त्याचे आश्चर्य वाटते आहे.

हे म्हणताना, तुम्ही हे विसरता आहात की मी त्यांचे नाव न घेता लेखिकेला दिलेला सर्वसाधारण सल्ला त्यांनी स्वतःवर ओढून घेतला. कारण त्यांना स्वतःला आपण खूप उद्धट लिहितो याची खात्री असण्याइतके ते नक्कीच बुद्धीमान आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्यावर लिहिले आणि मगच पुढचे लेखन झाले. जो मुलाकडून ऐकलेल्या भांडवलावर मोठा तज्ञ असल्याच्या अविर्भावात दुसर्‍यांवर आसूड ओढतो; त्या व्यक्तीला आरसा दाखवला तर ते जाणून घेण्याचे धैर्य त्याने दाखविले पाहिजे... नाहीतर तो ढोंगीपणा (hypocrisy) आणि अहंकार ठरतो.

सतत, 'मी ग्रेट" अशी जाहिरात करणार्‍या आणि 'दुसरे कःपदार्थ' असे म्हणणार्‍यांची बाजू घेणे मला जमत नाही. तरीही बहुदा मी अशा प्रकाराकडे दुर्लक्ष करतो. मात्र, अशा लोकांनी एखाद्या नवीन काही करणार्‍यावर मिपाकरावर निष्कारण कठोर हल्ला केला किंवा माझ्यावर वैयक्तिक टीप्पणी केली तर ते सहन करणे म्हणजे "सहनशिलता" नव्हे "दुसरेच काही" ठरेल, हे काय मी तुम्हाला सांगायला हवे का ?

किमान नागरी मुल्ये लाथाडून, निष्कारण भोंचकपणा करणार्‍या मंडळींना मोकळे रान दिल्यास, आपण अनेक सुजाण व संयमित मिपाकर मित्रांच्या सहभागाला मुकण्याची शक्यता आहे. हा केवळ अंदाजच नाही तर असे पूर्वी प्रत्यक्षातही झालेले आहे. त्यामुळे, अश्या प्रकारात, सुजाण मिपाकरांनी त्रासग्रस्त मिपाकरांच्या बाजूने उभे राहणे केवळ योग्यच नाही तर मिपावरील वातावरण निरोगी व खेळीमेळीचे राहण्यासाठी आवश्यक आहे.

The world is a dangerous place to live; not because of the people who are evil, but because of the people who don't do anything about it.
: Albert Einstein

प्रदीपदांच्या मताशी मी ९९ टक्के सहमत आहे.
संजयजींचा प्रतिसाद मी पुन्हा वाचला. परत सांगतो मला त्यात काहीही वावगे, उध्दट असे वाटलेले नाही. किंबहुना फक्त चान चान अशाशिवाय इतर कोणताही प्रतिसाद नाहीये. सर्वाना आवडले ठिक आहे ना, एखाद्याला नाही आवडले तर का आवडले नाही याच्या कारणासहित सांगितलेला तो एकमेव प्रतिसाद आहे. धागाकर्त्याला फक्त चान चान हवे असेल तर टेम्प्लेट बनवता येतील. पण सर्व मेजॉरिटी चान चान वाल्याना विरोधी मत नकोच असेल तर मात्र अवघड आहे.
संजयजी चित्रकार असते तरच त्यांचा तो प्रतिसाद ग्राह्य असता असे मत असले तर यासाठी मी तयार आहे.
त्या वादग्रस्त प्रतिसादाप्रमाणेच माझे मत आहे. आणि ते ग्राह्य ठरण्यासाठी हवी ती परिक्षा द्यायला (कुठल्याही माध्यमात, कुठल्याहि विषयावर चित्र काढणे) मी तयार आहे. हे सर्व करण्यासाठी कारण एकच आहे ते तुम्हीच वर नमूद केलेले आहे

अश्या प्रकारात, सुजाण मिपाकरांनी त्रासग्रस्त मिपाकरांच्या बाजूने उभे राहणे केवळ योग्यच नाही तर मिपावरील वातावरण निरोगी व खेळीमेळीचे राहण्यासाठी आवश्यक आहे.

आपल्या ह्या मताशी आणि आल्बर्टबाबाच्या खालील मताशी मी शम्भरच नव्हे तर हजार टक्के सहमत आहे. फक्त सुजाण आणि त्रासग्रस्त ह्या व्याख्या प्रसंग परिस्थितीनुसार बदलतात हे नमूद करु इच्छितो.
The world is a dangerous place to live; not because of the people who are evil, but because of the people who don't do anything about it.

अभ्या जी तुमच्या मताशी मी १०१% टक्के सहमत आहे.

अश्या प्रकारात, सुजाण मिपाकरांनी त्रासग्रस्त मिपाकरांच्या बाजूने उभे राहणे केवळ योग्यच नाही तर मिपावरील वातावरण निरोगी व खेळीमेळीचे राहण्यासाठी आवश्यक आहे.===>>> हा कंपू गिरीचा छद्‍मवेष आहे.

त्यामुळे मी इथे आलो नव्हतो. इथे अ‍ॅ डिशनल प्रतिसाद यायला लागले म्हणून पोस्ट उघडली तर तुझा वरचा प्रतिसाद !

संजयजी चित्रकार असते तरच त्यांचा तो प्रतिसाद ग्राह्य असता असे मत असले तर यासाठी मी तयार आहे. त्या वादग्रस्त प्रतिसादाप्रमाणेच माझे मत आहे. आणि ते ग्राह्य ठरण्यासाठी हवी ती परिक्षा द्यायला (कुठल्याही माध्यमात, कुठल्याहि विषयावर चित्र काढणे) मी तयार आहे. हे सर्व करण्यासाठी कारण एकच आहे ते तुम्हीच वर नमूद केलेले आहे

तुझ्या या सडेतोडपणाला दाद देण्यासाठी हा खास प्रतिसाद !

प्रश्न माझ्याबाजूनं उभं राहाण्याचा नाही. आणि तशी कुणाकडून अपेक्षाही नाही. अलोन, आय अ‍ॅम इनफ ! पण ही योग्य असलेल्या विचारासाठी सगळं पणाला लावण्याची मानसिकता फार मोठी गोष्ट आहे. आणि जे इथे, तेच आयुष्यात. असाच राहा !

चित्रगुप्त's picture

25 Apr 2017 - 6:45 pm | चित्रगुप्त

बहुत सुकृताचे जोडी... म्हणून चित्रकलेत गोडी...
...पूर्वजांच्या, माता-पिता-गुरू यांच्या (आणि कदाचित पूर्वजन्मांच्या-) सुकृतातून चित्रकलेची गोडी एकाद्याचे ठायी निर्माण होत असते.
मात्र फक्त गोडी असून भागत नाही, प्रयत्नांची पराकाष्ठा करून अंगभूत कलेची जोपासना करावी लागते, जेंव्हा जेंव्हा, जे जे, ज्या कुणाकडून शिकायला मिळेल, ते ते आत्मसात करत सतत काम करत रहावे लागते. लहानपणी कौतुक करणारे अनेक भेटतात त्यातून उत्साह वाढता रहातो, परंतु बालपण ओसरले, की कौतुकापेक्षाही योग्य आलोचना करत मार्गदर्शन करणारे भेटणे आवश्यक ठरते, नाहीतर कलावंत त्याच त्या डबक्यात पोहत रहातो, कलेत साचलेपण येते, पुढील मार्ग आकळेनासा होतो. अश्यात कुणी 'बनचुके' होतात, कुणी कलेचा नाद सोडून देतात तर कुणी तेच ते पुन्हा पुन्हा गिरवत रहातात.
आपले असे तर होत नाही ना? याची काळजी कलावंताने अवश्य करत रहावी. "ब्राम्हणी बाळबोध अक्षर, घडसोन करावे सुंदर" असे समर्थांनी सांगितले आहे, ते रेखाटनाचे बाबतीतही लागू पडते. चित्रातली रेषा निर्दोष, लयबद्ध, जोमदार व्हावी यासाठी त्या दृष्टीने विशेष कष्ट घ्यायला हवेत. चित्राची रचना वैशिष्ट्यपूर्ण व्हावी यासाठी नवनवीन क्लुप्त्या योजाव्यात. दुसर्‍या कलावंताचे चित्र बघून त्याची नक्कल करत शिकायचे तर मुळात ते चित्र उत्कृष्टतम असावे लागते. परंतु या पद्धतीला मर्यादा आहेतच. त्यापेक्षा ज्या एकाद्या वस्तुकडे, दृष्याकडे, व्यक्तीकडे वगैरे बघताना "रूप पाहता लोचनी सुख जाले वो साजणी" असा साक्षात्कर होईल, त्यासमोर बसून त्याचे आकार-रंग-छटा यांचा वेध घेत त्यातील सौंदर्याचे मर्म जाणून घेण्याचा यत्न करणे हे जास्त श्रेयस्कर.
या दोन चित्रांपुरते बोलायचे झाले तर ही चित्रे सपक, विद्यार्थीदशेतील वाटतात. दिशा योग्य आहे पण अजून पुष्कळ मोठा पल्ला गाठायचा आहे, ही खूणगाठ मनात बांधून काम करत रहायला हवे आहे. तसेच "निंदकाचे घर असावे शेजारी" हे कलावंतासाठीतर फारच गरजेचे असते. टाळ्या पिटणार्‍या अनेक हातांपेक्षा कठोरपणे वर्म दाखवणारे एक बोट कलावंताला प्रगतीपथावर नेत असते.
आपल्याला इतक्यातच कॉपीराईट वगैरेंची चिंता करण्याची खरोखर गरज आहे का? याविषयी आत्मचिंतन करणे उपयोगी ठरावे. एकादा कलावंत महान झाला की कितीही कॉपीराईट असो, त्याच्या चित्रांच्या कॉप्या करून विकण्याचा धंदा जगभर चाललेला आहे, त्याची उठाठेव न करता आपण आपल्या मस्तीत जगणे श्रेयस्कर ठरते.

पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तसेच 'analysis करण्यासाठी प्रॉपर टीम' हा काय प्रकार आहे, त्यात कोण कोण आहेत, ते कोणते निकष लावून analysis करतात, त्याबद्दल त्यांना काय मिळते? वगैरेंविषयी माझ्यासारखेच अन्य वाचकांनाही कुतुहल असेल, तरी याबद्दल अवश्य खुलासा करावा. हे उपरोधाने लिहीलेले नसून निव्वळ कुतूहलवश लिहीले आहे, याची नोंद घावी. तरी काही वावगे लिहीले गेले असल्यास त्याबद्दल क्षमस्व.

तुम्ही ज्या पद्धतीची चित्रे इथे दिलेली आहेत, त्या प्रकारचे उत्कृष्ट काम आमेरिकन चित्रकर्ती Georgia o'Keefe यांनी केलेले आहे. त्यातून बरेच काही शिकता येण्यासारखे आहे. उदाहरणार्थ ही चित्रे:
.....
.....

मिपावर मी चित्रकलेवर थोडेबहुत लेखन केलेले आहे, त्याचे दुवे:

1. चांदबीबी आणि मादाम पोंपादूर : भारतीय आणि पाश्चात्त्य कलेतील भेद
http://misalpav.com/node/26407

2. चित्रकला (१) : देवादिकांच्या तजबिरीतील चित्रांची कहाणी
http://misalpav.com/node/25414
-------------------------------------------------------------------------
3. चित्रकाराच्या नजरेतूनः जाणिजे चित्रकर्म (भाग १)
http://www.misalpav.com/node/18741

4. कला, कलावंत आणि आपण : जाणिजे चित्रकर्म (भाग २)
http://misalpav.com/node/19482
-----------------------------------------------------------------------
5. मी चित्रकार कसा बनलो... काही आठवणी...
http://misalpav.com/node/18587

6. एका चित्रकाराच्या आठवणी...
http://misalpav.com/node/21369
---------------------------------------------------------------------------

7. एका तैल-चित्राची जन्मकथा (सचित्र- भाग १)
http://misalpav.com/node/21908

8. एका तैल-चित्राची जन्मकथा (भाग २ -संपूर्ण)
http://misalpav.com/node/21954
----------------------------------------------------------------------

9. चित्रानुभूतीत जगण्याची धुंदी ...
http://misalpav.com/node/31110

10. 'गाय' चे चोवीस कोटींचे चित्र, आणि साबरमतीच्या संताचे टमरेल
http://misalpav.com/node/26519
---------------------------------------------------------------------------
11. संग्रहालायातील कलाकृती आणि त्यांचे विविध विषय
http://misalpav.com/node/23441

12. सौंदर्यनगरीतील कलावैभव: शिल्पकला
http://misalpav.com/node/18950

यशोधरा's picture

25 Apr 2017 - 6:50 pm | यशोधरा

हा प्रतिसाद अतिशय आवडला. सुरेख लिहिलेत चित्रगुप्तकाका.

प्रचेतस's picture

25 Apr 2017 - 7:08 pm | प्रचेतस

सकारात्मक टीका कशी असावी ह्याचं उत्कृष्ट उदाहरण.

मितान's picture

25 Apr 2017 - 7:48 pm | मितान

+११११

हा प्रतिसाद मनापासून भावला, अश्याच प्रकारच्या प्रतिसाद मी इतर जेष्ठ सदस्यांकडून अपेक्षित ठेवत होतो.

अभ्या..'s picture

25 Apr 2017 - 7:19 pm | अभ्या..

=)) =)) =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2017 - 5:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

शरिराने की मानसिकतेने ? ;)

अप्रतिम प्रतिसाद. लेखिकेच्या धाग्यातील कॉपीराईट आणि इतर गोष्टींबद्दलचा टोन खटकला होताच पण काय ते कळत नव्हते. तुम्ही नेमके लिहीले आहे !

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Apr 2017 - 12:01 am | डॉ सुहास म्हात्रे

खर्‍या जाणकाराचा सुसंस्कारीत प्रतिसाद !

"फळांनी लगडलेले झाड विनम्रपणे वाकते", या वचनाची आठवण झाली !

सप्तरंगी's picture

28 Apr 2017 - 11:02 am | सप्तरंगी

चित्रगुप्तसर,
तुमच्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद. तुम्ही सांगितलेल्या काही गोष्टींवर मी नक्कीच विचार करेन. तुम्ही पाठवलेल्यापैकी दोन लिंक्स (तुमच्या आठवणी ) वाचल्या, छान लिखाण आहे तुमचे. बाकी लिंक्स मी निवांतपणे बघते.
Analysis टीम बद्दल सांगायचेच झाले तर ही टीम इथल्या एका चांगल्या site शी निगडित आहे आणि ते technique, material, individuality, creativity, imagination, artistic values इत्यादी यावरून आर्टिस्टच्या कामाचे ग्रेडिंग करतात. त्यात साधारणतः ७० ते १०० आर्टिस्ट्सची टीम असते जे आपले मत नोंदवतात.

उगाच भाडंणे करन्यापेक्शा असे काहीतरी टाकावे लोकांनी........ इथे वाचक भांड्णे ऐकायाला येत नाहीत...

संजय क्षीरसागर's picture

26 Apr 2017 - 12:59 am | संजय क्षीरसागर

१) चित्रगुप्त चित्रकलेतले दर्दी आहेत. मी जे म्हटलंय त्याविरुद्ध त्यांचं मत पडलं असतं तर सगळ्या सदस्यांना चढाईला भूमी कमी पडली असती. नाही नाही त्या प्रत्येकानं मागचे पुढचे सगळे स्कोर सेटल करत यथेच्छ हात धुवून घेतले असते. पण आता सर्वांचीच गोची पडली आहे. त्यामुळे वस्तुस्थिती मान्य करण्याऐवजी (सालाबदाप्रमाणे) `प्रतिसादाचा टोन' कडे गाडी वळवली जातीये. थोडक्यात सदस्यांना काय लिहीलंय त्याच्यापेक्षा कुणी लिहीलंय ते महत्त्वाचंय, हे पुन्हा अधोरेखित होतंय.

नीट बघितलं ( ते चष्मेवाल्यांना अवघडचे), तर त्यांच्या प्रतिसादात सगळी माझीच ऑब्झर्वेशन्स जवळजवळ त्याच टोन मधे आहेत.

अ) चित्रं अत्यंत सुमार आहेत. > ही चित्रे सपक, विद्यार्थीदशेतील वाटतात.

ब) त्यात काँपोझिशनचा लवलेश नाही. > चित्राची रचना वैशिष्ट्यपूर्ण व्हावी यासाठी नवनवीन क्लुप्त्या योजाव्यात.

क) शिवाय तुमच्या रेषेत दिसत लय नाही आणि रंगसंगती सौंदर्य दृष्टीचा आभाव दर्शवते. > चित्रातली रेषा निर्दोष, लयबद्ध, जोमदार व्हावी यासाठी त्या दृष्टीने विशेष कष्ट घ्यायला हवेत.

ड) ही चित्रं तुम्ही समोर ट्युलिप्स ठेवून काढली आहेत की रेफरंस चित्रावरुन कॉपी केली आहेत ? अर्थात, दुसरी शक्यताच जास्त आहे. त्या केसमधे रेफरंससाठी चांगली निवड करा. > दुसर्‍या कलावंताचे चित्र बघून त्याची नक्कल करत शिकायचे तर मुळात ते चित्र उत्कृष्टतम असावे लागते.

इ) कॉपी राईट वगैरे एकदा तुमची स्टाईल एस्टॅब्लिश झाल्यावरच्या गोष्टी आहेत. इतक्या प्रायमरी चित्रांबाबतीत त्याची काळजी सोडा. > आपल्याला इतक्यातच कॉपीराईट वगैरेंची चिंता करण्याची खरोखर गरज आहे का? याविषयी आत्मचिंतन करणे उपयोगी ठरावे.

२) अर्थात, चित्रगुप्त चित्रकलेतले दर्दी असले तरी फालतू चित्रं टाकून माझ्या पोस्टस भरकटवणे, माझ्या पोस्टची वेळात वेळ काढून विडंबनं पाडणे, अध्यात्मातले काहीही कळत नसतांना चांगल्या चर्चेत स्वतःच्या वकूबाप्रमाणे चित्रं टाकून रंगाचा बेरंग करणे हे छंद त्यांनी अनेक वर्ष नित्यनेमानं जपले आहेत. तरीही त्यांचे आभार्स. कारण गविला चित्रं आवडली आणि त्यानं लेखिकेला पार मार्गदर्शनाबद्दल रिक्वेस्ट केली म्हटल्यावर सदस्य बेभान झाले असते.

३) तर सांगायचा मुद्दा असा की लेखनावर फोकस करा (आणि माझ्याबाबतीत तर विषेशत्वानं !) कारण इतरांचं मला माहिती नाही पण मी जेव्हा प्रतिसाद देतो तेव्हा त्यामागे बराच विचार असतो. त्यात तुम्हाला कायम अहंकार दिसला तर तो चष्म्याचा दोष आहे.

चौथा कोनाडा's picture

27 Apr 2017 - 1:07 pm | चौथा कोनाडा

लै भन्नाट डिसेक्शन ! संक्षीदादा रॉक्स !

चिगुसाहेबांनी आवाज न करता केलेल्या "रस"ग्रहणाचं संक्षीदादांचे आवाजी "सार"ग्रहण !

तुम्हाला तुमच्या आणि चित्रगुप्तकाकांच्या प्रतिसादातली भाषा सारखी वाटत्ये यातच सगळं आलं.

चित्रगुप्त's picture

27 Apr 2017 - 2:25 pm | चित्रगुप्त

फालतू चित्रं टाकून माझ्या पोस्टस भरकटवणे

.... हे नेमक्या कोणत्या पोस्टांमधील कोणत्या चित्रांबद्दल लिहीले आहे, हे कळेल का ?

संजय क्षीरसागर's picture

27 Apr 2017 - 4:22 pm | संजय क्षीरसागर

विडंबनाच पहिल्यांदा बघू, (अर्थात तिथे ही आपली दिव्य चित्रं आहेतच)

सध्याचं हे एक ताजं उदाहरण घ्या कामिनीबाईंना वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये

तत्पूर्वी माझ्या एका उत्तम पोस्टचा विचका करु पाहाणारा हा दुसरा धागा पाहा सॉल्विंग द मॅन-कोलोन जिगसॉ : उर्फ एनिमाचे भांडे

आणि अजून समाधान होत नसेल तर स्वतःच्या प्रोफाईलमधे जाऊन स्वतःचा ट्रॅक पाहा.

चित्रगुप्त's picture

27 Apr 2017 - 5:50 pm | चित्रगुप्त

विडंबनं हे तर मिपाचं खास आकर्षण आणि बलस्थान आहे महाराज. आणि आम्ही पण ओशोंचे परमप्रेमी आहोत. ओशोंच्या प्रवचनातले मुल्ला नसरुद्दीनचे किस्से आणि अन्य मजेदार विनोद यामुळे प्रवचनांना आगळाच रंग येतो. आम्हाला वाटले तुम्ही पण ओशोंप्रमाणेच परम मिष्किल, बहुरंगी- बहुढंगी व्यक्तिमवाचे, खिलाडू वृत्तीचे असाल, आणि विडंबनांना मनातून का होईना, दाद देत असाल. ओशोंचे खरे प्रेमी असणारे माझे सर्व मित्र विनोदप्रिय, खट्याळ, टवाळखोर, आनंदी आहेत. गंभीर सुतकी चेहरे ओशोंनाही वर्ज्य होते.
एनलायटनमेंट वाल्या धाग्यात मी अगदी मूलभूत प्रश्न विचारला होता :

हे एनलाईटनमेंट म्हणून जे काही असते असे सांगितले जाते, ते धागाकर्त्यास/साईट-कर्त्यास स्वतःला झालेले आहे काय, असल्यास कसे, केंव्हा, त्याचे स्वरूप नेमके काय, त्यामुळे कोणते बदल घडून आलेत, वगैरे खुलासा आधी इथे केल्यास लोकांना पैका खर्चून सदस्यत्व घेण्याचा निर्णय घेणे सोपे जाईल. नुस्त्या ऐकीव/वाचीव माहितीच्या आधारे पायरी पायरीने मार्गदर्शन करणार असल्यास तसे आधी स्पष्ट करावे.

परंतु या मूलभूत प्रश्नाचे उत्तर न मिळण्यातूनच विडंबन उपजले.
आणि 'सॉल्विंग द मॅन-वूमन जिगसॉ' या धाग्याबद्दल काय बोलावे ? या तुफान, केवळ एकमेवाद्वितीय धाग्याचे विडंबन होणार हे तर नियतच होते.

राहता राहिला 'अध्यात्मातले काही कळण्या' चा प्रश्न. नियतीची ('अस्तित्वा'ची म्हणा हवं तर) माझ्यावर परम कृपा आहे, की तसले मला काही 'कळत' नाही. मी अध्यात्म 'जगतो'. तेच नितांत सुंदर आहे. त्याला 'कळण्या'चा विटाळ नकोच.

किरीटीकामधेनुचा पाडा । वरि कल्पतरूचा आहे मांदोडा ।
ह्मणौनि मनोसिद्धिचेया षडा । तो नवलु नोहे ॥

कारण गविला चित्रं आवडली आणि त्यानं लेखिकेला पार मार्गदर्शनाबद्दल रिक्वेस्ट केली म्हटल्यावर सदस्य बेभान झाले असते.

मला चित्रं आवडली आणि मिपावरत्या कलाकार मंडळींनी प्राथमिक चित्रकला / पेॅटिंग सर्वांना शिकवावं असं मला वाटलं म्हणून सदस्य बेभान होतील ??
का?
मला समजलं नाही?