गँगस्टर - 3

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
28 Mar 2017 - 12:51 am

झोपडी ठिबक ठिबक. अंधारात हरवलेली. पुढे मोकळे मैदान. अन मोकाट जनावरे विसावलेली.

कोपऱ्यातल्या त्या बिल्डींगमधले दिवे अजूनही जळत होते. सभोवताली थोडीशी झाडी. अन बाकीच्या इमारती. आम्ही पायऱ्यांवर बसलो. बोचऱ्या थंडीने अंग शहारत होते.

करीमने बीडी पेटवली.

"वही दिखी" कोपऱ्यातल्या बिल्डींगकडे इशारा करत त्याने झुरका घेतला.
हे 'तिचं' कितवं ठिकाण? गिणती नाही.

"आप उसे जाके बात क्यू नही करते?" त्याने विचारलं. च्युता साला.
मी जरावेळ त्या मातीत लवंडलो.

टप टप टप बारीश आती है. दिल बहलाती है. धूप खिलती है. बाकी सब पसीना पसीना.
"जरा धीरेसे चला साले"...

नुकताच मिसरूड फुटलेला तो पोऱ्या गोंधळला होता.
"निचे उतर" आताच एका ट्रक ड्रायव्हरला लुटला होता. आणि हा साला घोळ करत चालला.

"लेकीन आपको जाना कहॉ है?" हे त्याचे फालतू प्रश्न.
"तेरे घर.. चल" ती मोटारसायकल शेवटी माझ्या हातात आली.

पहिली कीक. दुसरी कीक. तिसरी कीक...
"आप वो अॅक्सलरेटर दबा रहे हो.."

चॉक अप. न्यूट्रल. डावी उजवी. चौथी कीक.
डर्रर्रर...
"चल बैठ."

तो काहिच न बोलता बसला. कोण कुठला साला. हायवेला हात केला आणि थांबला.
अडकला.

"भाई, वो देखो बाहर आ गयी.." करीमने माझी झोपमोड केली. मी उठून बसलो.

त्या बिल्डींगमधले दिवे अजूनही जळत होते. गॅलरीमध्ये एक खुर्ची होती. खुर्चीवर एक बाई होती. आणि ती नाईटीमध्ये आरामात बसली होती. सुलेमानभाईचा कांडका आयटम. त्यांची एकमेव माहित असलेली जिवंत पत्नी.
"आखिर मिल गयी साली.. यहीच है" मी म्हणालो.

बराच वेळ तिकडे बघून कंटाळा आला. बहुतेक ती खुर्चीवरंच झोपली असावी.

"तू यहीच रूक, कुछ मिल गया तो मुझे खबर कर.. मै जाता हू.." मी उठून आळस देत म्हटलं. त्याच्याकडं हजाराच्या पाच नोटा फेकून दिल्या.

पहाट होत आली होती. निघालो. डोळ्यात झोप होती.

एक महकसी आ जाती है दिल में. बरसों हो गये. अब और इंतजार, सहा नही जाता.
"कीधर है घर तेरा?" मी त्या पोऱ्याला विचारलं.
"आगे से राईट!"
साल्या ट्रकवाल्याकडे चार हजारंच भेटले. भोकसला नाही ते एक बरं झालं.
"इधर तो झोपडपट्टी है. इधर रहता है क्या तू? साला गांडू.."

सकाळी उशिरापर्यंत झोपून होतो. फोनच्या आवाजानं जाग आली. करीमचा होता.
"वो सब्जी लाने गयी थी. अभी वापस आयी. बहुत बार फोन किया आपको.." च्युत्या साला.
"ऐसा बंडल फोन मत कर रे... कुछ अच्छा होना"

घड्याळ वाजते टकटक. फटीतून बघितली बाईची छाती धकधक. तिची लाकडी न्हाणी. बिना दरवाज्याची. दोन गोऱ्यापान मांड्याही दिसल्या. धडक.

"भाई, एक टेन्शनवाली खबर है" करीमनं संध्याकाळी पुन्हा फोन केला.

क्रमश:

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

लालगरूड's picture

28 Mar 2017 - 7:27 am | लालगरूड

मस्त भाऊ

प्राची अश्विनी's picture

28 Mar 2017 - 10:05 am | प्राची अश्विनी

मस्त!

अॅस्ट्रोनाट विनय's picture

28 Mar 2017 - 12:23 pm | अॅस्ट्रोनाट विनय

वा वा..अच्छा है अच्छा है

सुमीत's picture

28 Mar 2017 - 5:18 pm | सुमीत

पुढे काय होनार?? उत्सुकता

अभ्या..'s picture

28 Mar 2017 - 5:23 pm | अभ्या..

जव्हेरभाव, मजा येई ना. :(
.
शीतलीवाले, टईममशीन वाले, मैथिलीवाले, भानूवाले जव्हेरभाव कुटं हरवले?

विजुभाऊ's picture

4 Jul 2018 - 5:31 pm | विजुभाऊ

पुढे काय झाले भौ