गँगस्टर - 2

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
26 Mar 2017 - 9:20 pm

या युगांताला प्रखरतेची नांदी नाही. खोलीतल्या जाळ्यांसारखे मनातले विचारही धुरकट झालेत. घड्याळ वाजत राहते टकटक. जसं फटीतून बघितलेली त्या बाईची छाती. धकधक.
बाथरुमचा नळ सताड चालू आहे. वर पंखा गरगर फिरतोय. भिंतीवर एक पाल आहे. आणि या सगळ्याला काहीच अर्थ नाही.

फुललेला श्वास घेऊन मी त्या गंजक्या चाळीतून बाहेर पडलो. राहील थेटरमध्ये कसा आलो मला आठवत नाही. चालू असलेला कुठलातरी सिनेमा अखेर संपला.

"चलना है क्या?" ही एक कोण बाई मला काहितरी विचारत होती. आणि त्यावेळी मी कुठल्यातरी बोळीतून स्टेशनवर जात होतो.
"ए हिरो. आना" भिंतीला टेकून उभारलेली ती भरदार छातीची बाई आता रंगात आली होती.
"ए चिकने, किसे ढुंढरेला. बात तो सुन" ती बाई आता मागून खिदळायला लागली.
मी जागीच उभारलो. "नही मंगता" म्हणालो.
मग ती जवळ येत म्हणाली, "कुछ पिराब्लेम तो नही ना?"

स्टेशनवर एक लोकल धडधडत निघून गेली. कुर्ला जानेवाली धीमी लोकल दस मिनिट लेट है. यात्रियो कृपया ध्यान दे.

ती भरदार छातीची बाई रस्त्यावर कोसळली होती.
करीम मला मागे ओढत होता.

"भाई, जाने दो भाई. रंडी है साली" माझ्या उजव्या हाताच्या तळव्याला सणक भरली होती.
त्या बाईने थोडी हालचाल केली. मग डोके धरून तशीच रस्त्यावरंच बसून राहिली.

सुलतानपुरा. शहरातल्या जुनाट आणि मोडकळीस आलेल्या इमारतींनी हा भाग खच्चून भरला होता. बघावं तिकडं धंदेवाल्यांचा सुळसुळाट झाला आहे. करीम आला म्हणून ती वाचली. नाहितर राजस्थानचा उष्ण वाळवंटी प्रदेश मैलोनमैल पसरलेला आहे.

"मैने कल एक काम दिया था" मी संत्रा मागवत करीमला विचारलं.
"उसीके वास्ते आपके पास आया था भाय" मी बाटली फोडून ग्लासमध्ये ओतली. राहिलेली त्याला दिली.
"पाणी भाय?"
"नै"

फळकुटावर मांडी घालून बसलो. एक म्हातारा माणूस कोपऱ्यातल्या बाकड्यावर बसून चहा पित होता. स्टो पेटला होता. भज्याच्या खमंग वासानं पोटात भूक भडकली.

"मिल गयी आंटी, यहीच रहती है" पाचशेची नोट मिळाल्यासारखा तो डोळे मोठे करत म्हणाला.

मी मात्र डोळे गच्च मिटून तो ग्लास रिता करत गेलो.

क्रमश:

(छोट्या भागांसाठी क्षमस्व. पण हे असंच आहे)

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

26 Mar 2017 - 9:59 pm | किसन शिंदे

काय राव! मोजून ३० सेकंद लागले वाचून संपवायला.

एक एक ओळ वाचत कथेत गुंतत जाव आणि काही सेकंदातच क्रमशा: याव ?

सुमीत's picture

27 Mar 2017 - 7:31 pm | सुमीत

विलक्षन लिहित आहत आहात, असे अर्ध्या वर सोडुन नका जाउ

अॅस्ट्रोनाट विनय's picture

27 Mar 2017 - 8:26 pm | अॅस्ट्रोनाट विनय

पुभाप्र

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Mar 2017 - 8:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं चाललय ! पुभाप्र !!


१. काय राव! मोजून ३० सेकंद लागले वाचून संपवायला.
२. एक एक ओळ वाचत कथेत गुंतत जाव आणि काही सेकंदातच क्रमशा: याव ?
३. विलक्षन लिहित आहत आहात, असे अर्ध्या वर सोडुन नका जाउ

(छोट्या भागांसाठी क्षमस्व. पण हे असंच आहे)

करा, करा, शशक स्पर्धा करा, डबल शशक स्पर्धा करा. मग, आता घ्या ही शशक सिरियल ! आता कंप्लेंट करून काय फायदा ?! =))

तुषार काळभोर's picture

28 Mar 2017 - 8:50 am | तुषार काळभोर

=))