संभाषण क्र. १
"अरे, मराठी सिनेमा आलाय "हरिश्चंद्राची फॅक्टरी", येणार का?"
"मराठी ... चांगला आहे ना? तिकीट किती आहे? कुठे जायचेय?"
"आले असते रे, पण मला एक अमुक तमुक काम आहे .... "
"मागच्या वेळी तू चांगला आहे म्हणालीस आणि अगदी रडका/आर्ट फिल्म निघाला सिनेमा!!"
"अरे १२० रुपयेच आहे रे तिकीट...मराठीच तिकीट महाराष्ट्रात तरी कमीच असतं !"
संभाषण क्र. २
"अरे काल २७० रुपयांचा खुर्दा रे !!! आणि साला ३ तास गेले ते अजूनच!!!"
"का काय झाल?"
"अरे काय सांगू यार! तो "एक था टायगर" बघितला ना. मी तयार नव्हतो, पण जाम बोअर झालेलो यार, आणि तो पक्या म्हणाला चल यार, तेवढाच टाइमपास!!!"
"हो ना यार! आपलं बॉलीवूड कधी सुधारणार रे... कसले चिंधी चित्रपट बनवतात यार!"
"... एकतर चिंधी, नाहीतर कॉपी! लाज कशी नाही रे वाटत!"
"तुम्ही पैसे मोजून जाता कशाला रे मग ??"
अशी संभाषणे आपण सगळ्यांनीच ऐकली असतील किंवा स्वतः त्यात सामील झाले असाल. मी आणि माझ्यासारखे काही अल्पसंख्य - आम्ही अजूनही आवर्जून मराठी चित्रपट चित्रमंदिरात (उर्फ थेटरात) जाऊन बघतो. किंवा एखादा "रंगा पतंगा" किंवा "रमा माधव" चित्रपटगृहात नाही पाहता आला तर हळहळतो! पण तरीही चित्रपट/नाटक केवळ मराठी आहे म्हणून नाक मुरडणारे अनेक जण भेटलेत मला. "झी"च्या त्या प्रसिद्ध गाण्यात म्हटल्याप्रमाणे "आम्ही घेतला श्वास नवा... " नंतर (म्हणजे २००३-०४ नंतर) तर वर्षाकाठी ४-५ तरी दर्जेदार मराठी चित्रपट येतातच.बाकी काही असले तरी
१. विषयाची निवड
२. कथानक
३. अभिनय
४. दिग्दर्शन
या चारही बाबतीत अनेक मराठी चित्रपट हिंदीपेक्षा सरस आहेतच पण काही तर, आंतरराष्ट्रीय सिनेमाच्याही जवळ जाऊन पोचतात. वरील गुणतालिकेत मराठीला हिंदीपेक्षा निश्चितच जास्त गुण मिळतील. मात्र भांडवल आणि तंत्रज्ञान याबाबतीत जरा आपली पिछाडी आहे हे मान्य! पण तेही सुधारेल अशी अशा करूया.
तर मी जे बघितलेत आणि मला जे 'भारी' वाटले त्याची ही यादी. त्याशिवाय काही तितके भारी नसले तरी चांगले आहेत, थोडे लाभोद्देशी (कमर्शियल) असले तरी मुळात विषय आणि अभिनयासाठी मला ते चांगले वाटलेत. त्यानुसार खाली दोन याद्या दिल्या आहेत. त्यातील क्रम हा यदृच्छया आला आहे - म्हणजे मला जसं आठवलं तसं लिहिलंय. क्रम हा दर्जानुसार नाही, हां, वर्गवारी मात्र तशी आहे.
तेव्हा आता कोण म्हणाले की मराठी कशाला? तर त्याला/तिला ही यादी दाखवा. म्हणावं - " आधी हे पाहिलेस का? हे बघ आणि मग बोल!"
भन्नाट/भारी/झकास/सुरेख
1. श्वास
2. डोंबिवली फास्ट
3. रिटा
4. चकवा
5. पक् पक् पकाक्
6. १० वी फ
7. सुखान्त
8. हरिश्चंद्राची फेक्टरी
9. नटरंग
10. बालगंधर्व
11. गाभ्रीचा पाऊस
12. वळू
13. देऊळ
14. एक उनाड दिवस
15. बदाम राणी गुलाम चोर
16. YZ
17. अस्तु
18. नारबाची वाडी
19. Yellow
20. फँड्री
21. सैराट
22. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
23. काकस्पर्श
24. नीळकंठ मास्तर
25. ताऱ्यांचे बेट
26. मुंबई पुणे मुंबई
27. प्रेमाची गोष्ट
28. कायद्याचं बोला
29. 7 च्या आत घरात
30. गोष्ट छोटी डोंगराएवढी
31. कट्यार काळजात घुसली
32. नटसम्राट
33. उत्तरायण
34. पोष्टर बाँइज्
35. बालक पालक
36. शाळा
37. लोकमान्य
38. गंध
39. काँफी आणि बरंच काही
40. विहीर
41. निशाणी डावा अंगठा
42. सरीवर सरी
43. सावली
44. बोक्या सातबंडे
45. हँपी जर्नी
46. अनाहत
47. समांतर
48. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत
49. मसाला
50. जन गण मन
51. एलिझाबेथ एकादशी
52. सनई चौघडे
53. अगं बाई अरेच्चा
54. सुंबरान
55. सिंधुताई सकपाळ
56. मणी मंगळसूत्र
57. वासुदेव बळवंत फडके
58. राजवाडे अँड सन्स
चांगले पण भन्नाट नाही
1. नवरा माझा नवसाचा
2. एक डाव धोबीपछाड
3. झेंडा
4. दे धक्का
5. दुनियादारी
6. मोरया
7. उलाढाल
8. जाऊ तिथे खाऊ
9. हापूस
10. शुभमंगल सावधान
11. देऊळ बंद
12. गैर
13. बे दुणे साडेचार
14. गोलमाल
(वरील यादी ही सर्वस्वी वैयक्तिक आवडीनुसार आहे. तुमची आवड वेगळी असू शकते.)
मराठी चलतचित्रांची चलती आहे. फक्त आपण आधी बघायला तर हवं.
प्रतिक्रिया
26 Feb 2017 - 6:07 pm | दा विन्ची
धन्यवाद, यादी मधले आधी न पाहिलेले व यु नळीवर असलेले पाहीन
26 Feb 2017 - 6:18 pm | सतिश गावडे
या यादीत सुपरहीट रांजण दिसत नाही.
26 Feb 2017 - 11:59 pm | मधुका
26 Feb 2017 - 7:37 pm | एस
'कॉफी आणि बरंच काही' हा चित्रपट दुसऱ्या यादीत असायला हवा. बाकी मराठी चित्रपटांच्या दर्जा बॉलिवूडच्या बहुतांशी चित्रपाटांपेक्षा सरस असतो हे खरं आहे.
26 Feb 2017 - 9:12 pm | फारएन्ड
चेकमेट जबरी होता. एक मकरंद अनासपुरे व सिद्धार्थ जाधव यांचे रोल असलेला राजकीय पिक्चर आहे गावातील राजकारणावर. तो ही चांगला आहे. मक्या स्थानिक लीडर असतो व सिद्धार्थ त्याचा राइट हॅण्ड टाइप. रवी काळे सुद्धा आहे. बरीच टीम सुंबरान ची पण हा वेगळा आहे. अंकुश चौधरी व मुक्ता बर्वे चा डबल सीटही चांगला आहे.
झेंडा - दुसर्या यादीत बघून आश्चर्य वाटले. माझ्या लिस्ट मधे पहिल्या ५ मधे असेल तो. जबरी राजकीय ड्रामा आहे.
एक तो 'आजचा दिवस माझा' ही बर्याच लोकांना आवडला होता. मला विशेष नाही वाटला. तसाच पोष्टर बॉइज कसाबसा बघितला.
26 Feb 2017 - 9:41 pm | संदीप डांगे
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा... दोन्ही भाग भन्नाट आहेत. रुढार्थाने उच्च-अभिरुची, सामना-सिंहासन च्या बाजाचा नाही पण मार्मिक व विनोदी आहेत.
चेकमेट हा फारएन्ड यांनी उल्लेखित आवडता आहे.. हॉलिवूड स्टाईल प्रेझेण्टेशन सुंदर होते... तशा प्रकारचे चित्रपट अजून यायला हवेत...
26 Feb 2017 - 10:01 pm | जव्हेरगंज
रिटा
अस्तु
उत्तरायण
सावली
राजवाडे अँड सन्स
हे बघायचे राहिलेत. कोणी लिंक देईल काय?
26 Feb 2017 - 10:02 pm | पिशी अबोली
बघतो वो आम्हीपण थेट्रात जाऊन. अमराठी मित्र-मैत्रिणींना नेतोपण बघायला..
पहिल्या लिष्टीतले झालेयत बरेच. राहिलेले बघू आता.
26 Feb 2017 - 11:24 pm | आषाढ_दर्द_गाणे
न पाहिलेले सगळे चित्रपट शोधून पाहणार!
अनेकानेक धन्यवाद!
वाखूसा
बदाम राणी गुलाम चोर ज्या नाटकावर आधारित आहे ते 'माकडाच्या हाती शॅम्पेन' ते चित्रपटापेक्षा जास्त आवडले होते..
27 Feb 2017 - 8:26 am | मधुका
वरील लेखनात मी काही अक्षरे जाड ठशात आणायचा प्रयत्न केलाय. तेव्हा ते असे आले आहे.
हे html तसेच का राहत आहे? मिपामध्ये काही चूक आहे की माझं काही चुकतंय?
कृपया मार्गदर्शन करावे.
19 Nov 2020 - 6:52 pm | आंबट चिंच
वा हे आत्ताच पाहिले.
वाचन खुणा ठेवली आहे सवडीने पाहता येईल आता.
19 Nov 2020 - 9:14 pm | सिरुसेरि
अलिकडचे लक्षात राहिलेले मराठी चित्रपट म्हणजे फास्टर फेणे , गुलाबजाम .