---------------------------------------------
बायकांच्या बडबडीने जेव्हा
इच अँड एव्हरीजण कंटाळला
'रोज शंभरच शब्द बोलायचे'
सरकारने नियम काढला
मला फारसा त्रास नव्हता
नेहमीच मी कमी बोलायचो
गप्पा,भांडण,उपदेश
मोजक्या शब्दांत मांडायचो
नियम लागू व्हायच्या थोडं आधी
मला भलताच नाद लागला
एका गोग्गोड बडबड्या पोरीवर
नकळंत जीव जडला
व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तिला
प्रपोज करायचं ठरवलं
शंभर शब्द काय बोलायचे
गणित मांडायला घेतलं
"हॅपी व्हॅलेंटाईन डे" ऐवजी
"हॅपी व्हॅलेंटाईन" पण चालून जाईल
"माझं तुझ्यावर प्रेम आहे" पेक्षा
"आय लव्ह यू" त कमी शब्दहानी होईल
"तुझं हसणं, रुसणं, सत्तत बडबडणं मला आवडतं"
सात शब्द...अजून हवी थोडी हमी
"तुझं हसणं, रुसणं, सत्तत बडबडणं, गालावरची खळी, तिळ मला आवडतात"
दहा शब्द...अजून काही आहे कमी
मला आवडतात ऐवजी मला
खुप आवडतात?
दॅट्स परफेक्ट
कायकाय बोलायचं तिच्याशी
व्यवस्थित डोक्यात उतरवलं
शंभर शब्द राखून ठेवायचे
मी मनोमन ठरवलं
चहा पोहे त्यादिवशी मी
इशाऱ्यानेच मागितले
रिचार्जवाल्याला पॅक्सचे आकडे
कागदावर लिहून सांगितले
रुमवर येतांना माझा
बडबड्या मित्र दिसला
दुसरीकडे नजर वळवून मी
पटकन रस्ता बदलला
दोन शब्द वाचवायला आज मी
"हाड हाड" नाही केलं
कुत्रंसुद्धा भुंकणं विसरून
आश्चर्यचकित झालं
रूममध्ये घुसणार तेवढ्यात
शेजारची राणी समोर आली
क्लिपआडून हसंत मला
आय लव्ह यू म्हणाली
उद्या सांगतो बोलून मी
पटकन तिला कटवलं
उरलेल्या ९८ शब्दांचं गणित
मनामधे जुळवलं
आत येऊन रामदेव बाबा स्टाईल
लंबा श्वास ओढला
प्रेमयुद्ध खेळायला
मोबाईल बाहेर काढला
तिने कॉल उचलताच मी
टोपलंभर माती खाल्ली
माहोल बनण्याआधीच जीभ
डायरेक्ट आय लव्ह यू बोलली
थोडावेळ शांतता पसरली
थोडावेळ धडधड वाढली
न्यूटनच्या तिसऱ्या नियमाला स्मरून ती
त्याच फोर्सने "मी टू" बोलली
मनात हजारो शब्दांचा पाऊस पडला
अन शेकडो मोर नाचले
"आय कान्ट बिलिव्ह धिस
पुन्हा बोल न एकदा"
मी आठ शब्द उडवले
तिकडून मात्र काहीच
उत्तर नाही आलं
शंभर शब्द संपलेत तिचे
मी लगेच जाणलं
त्यानंतर एकोणतीस वेळा
मीच आय लव्ह यू म्हटलं
शांततेच्या कोलाहलात आमचं
शंभर नंबरी प्रेम उमललं
----------------------------------------------
प्रतिक्रिया
14 Feb 2017 - 11:37 am | संजय पाटिल
कॅलक्युलेटेड लव्ह...
14 Feb 2017 - 11:50 am | चांदणे संदीप
कॅलक्युलेटेड लव्ह... +२
कविता आवडली!
Sandy
14 Feb 2017 - 11:51 am | संजय क्षीरसागर
.
14 Feb 2017 - 12:00 pm | पैसा
:)
14 Feb 2017 - 5:08 pm | dhananjay.khadilkar
फार छIन
14 Feb 2017 - 6:05 pm | अॅस्ट्रोनाट विनय
कविता आवडल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे
14 Feb 2017 - 6:37 pm | जव्हेरगंज
हजार नंबरी !!!!
=))
14 Feb 2017 - 6:40 pm | प्रसाद_कुलकर्णी
च्या मारी... काय तुफान कल्पना.. काय तुफान प्रेम.. बेत एकदम फर्मास जमलाय.. लगे रहो उस्ताद !!!!
14 Feb 2017 - 6:59 pm | एस
हेहेहे! छानेय.
14 Feb 2017 - 11:16 pm | अॅस्ट्रोनाट विनय
धन्यवाद हत्तीभाऊ, प्रसाद,एस
15 Feb 2017 - 9:50 am | पुंबा
मस्त कविता...
15 Feb 2017 - 9:14 pm | पद्मावति
मस्तच.
15 Feb 2017 - 9:31 pm | सतिश गावडे
हे ही भारीच आहे.
अक्षरांच्या मर्यादेवरून मागे एकदा मिपावरील समूह व्यनिमधील सदस्य नामांच्या अक्षराच्या मर्यादेमुळे बरेच जणांनी आपले आयडी छोटे केले होते ते आठवलं.
15 Feb 2017 - 10:22 pm | अॅस्ट्रोनाट विनय
अक्षरांच्या मर्यादेवरून मागे एकदा मिपावरील समूह व्यनिमधील सदस्य नामांच्या अक्षराच्या मर्यादेमुळे बरेच जणांनी आपले आयडी छोटे केले होते ते आठवलं.
>> हायला हे माहितच नव्हतं