जगात प्रेमाच्या संदर्भात दोन मतप्रवाह आढळतात. पहिला म्हणजे स्वभाव जुळले पाहिजेत आणि दुसरा अपोझिट अट्रॅक्स. असंच काहीसं मैत्रीच्या बाबतीतही होतं आणि म्हणूनच कधी कधी संभ्रम होतो, ही निखळ मैत्री आहे की प्रेम? स्वभाव जुळले म्हणून किंवा स्वभाव विरुद्ध आहेत म्हणून वादविवादाचे प्रसंग टाळता येत नाहीत. किंबहुना ते तसे येतातच. मग सुरू होतो राग आणि अबोला यांचा सिलसिला! एकान्तात राहवत नाही आणि गर्दी भावत नाही. काऊन्टर करण्यासाठी नेमका विषय टाळून कुणाशी गप्पा, नाटक-सिनेमा-रेडीओ-पुस्तक यामध्ये मन गुंतवण्याचे प्रयत्न सुरू होतात. दिवस कशा ना कशा त-हेने पार पडतो पण मग रात्रं खायला उठते. पुन्हा पुन्हा झालेला वाद, वादाचे मुद्दे, बरोबर, चूक आठवत राहतं आणि सोबत आठवत राहते, वाद घालणारी व्यक्ती. तिचे विचार, मांडण्याची पद्धत, कारणमीमांसा आणि हावभाव. हळूहळू शब्द ऐकू येईनासे होतात, आजूबाजूचा भाग धूसर होऊ लागतो आणि एखाद्या निपुण छायाचित्रकाराने टिपल्यासारखी ती व्यक्ती संपूर्ण मनपटलावर दिसत राहते. प्रश्न मन पोखरत राहतो, हे प्रेम तर नव्हे?
अगदी हीच भावना ब्रायन अॅडम्स आपल्या 'बेबी, व्हेन यो'र गॉन...' गाण्यात दर्शवतो. खरं तर हे एक युगल गीत आहे पण युगल गीतामधल्या सामान्य रचनेला इथे ब्रायनने पूर्ण फाटा दिलाय. एक कडवं पुरूषाचं आणि एक स्त्रीचं अशी सरळधोपट रचना न करता ब्रायन या गीताला सहगायनाचं रूप देतो. सहगायनाचं हे रूपच गाण्याला वेगळ्या उंचीवर नेतं. गाण्यात व्यक्त झालेली स्थिती मग कुण्या एका पुरूषाची किंवा एका स्त्रीची न होता ती सहभावना होते.
ब्रायनने यात सहगायिका म्हणून स्पाईस गर्ल्समधली स्पोर्टी स्पाईस, मॅलेनी सी निवडली. या निवडीतही ब्रायन बाजी मारून गेलाय. ब्रायनसारखाच हस्की आवाज असणा-या मेल सीचं गायन ब्रायनबरोबर इतकं मिसळून जातं की हे असं झालं नसतं तर गाण्यामागचा सार्वत्रिकत्वाचा भाव इतका परिणामकारकपणे श्रोत्यापर्यंत पोहोचूच शकला नसता.
ब्रायन अॅडम्स आणि मेल सी यांच्या 'बेबी व्हेन यो'र गॉन' गाण्याचा आनंद घ्या -
Lyrics -
i've been wandering around the house all night
wondering what the hell to do
i'm trying to concentrate but all i can think of is you
well the phone don't ring cuz my friends ain't home
i'm tired of being all alone
got the tv on cuz the radio's playing songs that remind me
of you
baby when you're gone - i realize i'm in love
the days go on and on - and the nights just seem so long
even food don't taste that good - drink ain't doing what it
should
things just feel so wrong - baby when you're gone
i've been driving up and down these streets
trying to find somewhere to go
ya i'm lookin' for a familiar face but there's no one i know
this is torture - this is pain - it feels like i'm gonna go
insane
i hope you're coming back real soon -cuz i don't know what
to do
प्रतिक्रिया
6 Oct 2016 - 2:08 pm | यशोधरा
अजून लिहायचे होते. आवडले. पहिला परिच्छेद सुरेख जमलाय.
6 Oct 2016 - 2:24 pm | महासंग्राम
देवा, कुठे लपले होता तुम्ही इतके दिवस.. झकास लेख.
6 Oct 2016 - 4:53 pm | एस
वॉव! अत्यंत आवडतं गाणं. छान लिहिलंय. पण अजून लिहायला हवं होतं याच्याशी सहमत.
6 Oct 2016 - 5:38 pm | A.N.Bapat
झकास , बरं झालं परत लिहिते झालात ...
6 Oct 2016 - 5:51 pm | बोका-ए-आझम
मग त्या विषयातलं आपल्याला ओ का ठो कळत नसलं तरी काही हरकत नाही.
6 Oct 2016 - 8:27 pm | मी-सौरभ
मला तर हे असं गाणं आहे हेच आत्ता कळलं.
बघू, ऐकू जमेल आणि कळेल तेव्हा.
प्रास भाऊ: तुम्ही लिहीत रहा, नक्की वाचले जाईल आणि पहिला परिच्छेद झक्कास.
6 Oct 2016 - 7:43 pm | A.N.Bapat
बोका ए आझम : कोणाला उद्देशून लिहिले आहे हे ?
7 Oct 2016 - 12:30 am | बोका-ए-आझम
मला पाश्चात्त्य संगीतातलं काहीही समजत नाही, पण प्रासभौंनी लिहिलाय म्हणून मी लेख वाचला. काही गैरसमज झाल्यास साॅरी!
6 Oct 2016 - 9:29 pm | गवि
जबरदस्त वेगवान गाणं. मूड बनवणारं.
प्रासभाऊ.. "हॅव यू एव्हर रियली लव्हड अ वूमन" हेही त्याचं एक अफलातून गाणं आहे रे.
7 Oct 2016 - 12:22 am | बटाटा चिवडा
अरे हे तर संदीप खरेंची कविता आहे, 'नसतेस घरी तू जेव्हा' .. क्या बात.. अजय-अतुल हिंदीत फेमस झाले, आता खरे साहेब English मध्ये.. वाह !!
7 Oct 2016 - 12:40 am | स्रुजा
वाह ! हे गाणं तुफान आवडतं. आणि तुम्ही फार सुंदर लिहीलंय. लेखाची सुरुवात अगदी झोकात. त्याच्या बाकी गाण्यावर ही लिहा.