छोटीची आई
=========================
समस्या खूप आहेत..
अगदी सकाळी उठल्यावर;
दात घासण्यापासून..
रात्री झोपताना;
शू करून आणण्यापर्यंत.
हात थकतात !
पाय लटपटतात!
डोळ्यापुढे अंधार..
तरी होती उभारी!!!
तिच निरागस असणं..
तिच निष्पाप हसणं..
बघितलं की;
सार भरून पावायचं!
आजही ती तशीच असते..
आ़जही ती तशीच हसते..
बघितलं की;रडूच फुटत!
म्हातार्या डोळ्यांना..
तापदायक असती..
कंटाळता आलं असत!
सोडव विनवता आलं असत!
पण नाही...
हात जोडले तरी ..
ओठ हालत नाहीत..!
डोळे मिटायला आलेत..
आणि झोपच येत नाही..!!
माझी लाडी अजून छोटीच आहे.
देवा तिला गोठवलंस.. ठीक आहे!
पण मग मलाही गोठवायचंस..
छोटीची आई म्हणून!!!
=========================
स्वाती फडणीस....................... २६-०९-२००८
प्रतिक्रिया
27 Sep 2008 - 12:09 am | ऋषिकेश
खूप आवडली
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
27 Sep 2008 - 12:12 am | प्राजु
लेकरू मध्ये.
आवडली.. तिथेही दिला होता प्रतिसा. इथेही लिहिते आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
27 Sep 2008 - 12:17 am | स्वाती फडणीस
:)
27 Sep 2008 - 12:20 am | प्रियाली
कविता आवडली.
27 Sep 2008 - 12:29 am | शितल
स्वाती,
एकदम भावस्पर्शी कविता आवडली
:)
27 Sep 2008 - 3:05 pm | स्वाती फडणीस
:)