आज जरा निवांत वाटतय..
सीझन संपला म्हणूनंही, आणी पुढचा येणार.. म्हणूनंही.!
रहाटगाडगं म्हणतात ना हो या चक्राला?
बराच वेळ करकचूsssन फिरल्यावर मग ते शां...त होतं , पुन्हा फिरण्यासाठी...!?
हे टळणारं नाही, हे नीट माहित असूनंही स्विकारत नाही मनाला. हे ठिकच. पण हे असलच पाहिजे जीवनात.. प्रगती साधायला.
असं का वाटत नाही? ? ?
पॉझिटिव्ह एप्रोचवाले २०० मार्क देतील माझ्या या दुसय्रा भावनेला. ! पण पहिलीचं निराकरण त्यांनाही झटकन सुचायचं नाही, हे माहिती आहे मला!
असो... चालायचंच. पाणी वहातं राहिलं पाहिजे.
रहाटगाडगं फिरवलं पाहिजे!
===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्त..
प्रतिक्रिया
12 Sep 2016 - 10:48 am | पथिक
सहमत.
12 Sep 2016 - 11:13 am | पैसा
चक्रनेमिक्रम. सगळीकडेच आहे. जन्माला आलेल्या कुणालाही त्यातून सुटका नाही.
12 Sep 2016 - 11:55 am | पद्मावति
मस्तं!
12 Sep 2016 - 12:23 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
छान लिहीलयं. पण हि कविता आहे?
12 Sep 2016 - 12:34 pm | अत्रुप्त आत्मा
@पण हि कविता आहे? ››› नाही.. आज सकाळपासून माझ्यात अडकलेला क मुक्त करायचा प्रयत्न आहे.
12 Sep 2016 - 1:00 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
चालू द्या...
12 Sep 2016 - 12:47 pm | प्रचेतस
असा सगळा प्रकार झाला तर.
12 Sep 2016 - 4:15 pm | अत्रुप्त आत्मा
अस्सं ...
आगोबा पांडू बनून धाग्यावर आला तर!
12 Sep 2016 - 4:18 pm | मुक्त विहारि
मस्त पैकी फिरायला जा.
किंवा मिपाकरांचा अड्डा जमवा.