"कवींनी धुमाकूळ घातलाय
निव्वळ उच्छाद जिकडेतिकडे
ब्लॉगचा कट्टा ,फेसबुकची भिंत
ते ट्विटरची टाइमलाईन
कवीच कवी सापडतात
इकडेतिकडे चोहीकडे
एक जागा मोकळी सोडली नाही..
गझला काय, चारोळ्या काय
अरे दीर्घकाव्य लिहून
उप्पर से हायकू कायकू लिखनेका बाबा?
'कवी इलो' ची हाकाटी ऐकू आली की
पळत सुटतात सगळे सैरावैरा
कवींना दिलंय आपण मोकळे रान
आपले व्हाट्सऍप खुले सोडले
दिली आपली व्यासपीठं आंदण..
व्यासा, तू पण कवीच होतास ना रे?
आता यावर एकच उपाय उरलाय......"
वरच्यासारखं कुणी परत लिहताना दिसलं
तर त्याला पार उद्ध्वस्त करायचे..
शीघ्रकवितांचे धरण फोडून
मुक्तछंदांचा महापूर आणून
घरात त्याच्या सोडायचे
शेरोशायरींचे झुरळ....
त्याची पार शेळी करायची
शार्दूलविक्रीडीताच्या हल्ल्याने...
पाताळात दाबायचे
पृथ्वीच्या ओझ्याखाली....
तेजोभंग करायचा त्याचा
अभंगांच्या हत्याराने..
इंद्रवज्राच्या एका तडाख्याने
कोळसा करावा त्याचा!
ना ना मुझे छूना ना दूर ही रहना....
कवी हूँ मैं.... कवी हूँ मैं...
- स्वामी संकेतानंद
प्रतिक्रिया
23 Jul 2016 - 8:39 pm | ज्योति अळवणी
मुक्तीचा छंद लागलेला दिसतो आहे तुम्हाला स्वामी. पण बरी जमली आहे......... नसलेली कविता!
23 Jul 2016 - 8:52 pm | मदनबाण
स्वा मी . . . कं टा ळ आ ला अ से ल त र प री हुं में ऐ का ... ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bass Rani - Mumbai Dance feat. Julius Sylvest :- Nucleya
23 Jul 2016 - 8:54 pm | स्पार्टाकस
हेच म्हणणार होतो.
लेखाचे शिर्षक वाचुन परी हूं मै चीच आठवण झाली :)
23 Jul 2016 - 8:59 pm | स्वामी संकेतानंद
शेवटच्या २ ओळी त्यातल्याच तर उचलल्या आहेत.परीला कवी केले,बास! =))
23 Jul 2016 - 9:32 pm | नीलमोहर
मस्त !!
23 Jul 2016 - 9:37 pm | अत्रुप्त आत्मा
ह्या ह्या ह्या... =))
स्वामिज्जी पेटले! बुंगाट सुटले.
नवकवींचे धरण अटले.
23 Jul 2016 - 10:02 pm | कैलासवासी सोन्याबापु
व्यासा, तू पण कवीच होतास ना रे?
खासच!! यु नो व्हाय =)) =))
24 Jul 2016 - 12:50 am | संदीप डांगे
फेबुसकवर वाचलेली, आवळेल हाय...
24 Jul 2016 - 7:29 am | प्रीत-मोहर
मला वाटले अायुषमान खुराणा च्या येहीं हुं मैं वर बेतलेय का काय =))
24 Jul 2016 - 7:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मु़क्तछंद आवडले.
-दिलीप बिरुटे
24 Jul 2016 - 1:27 pm | गंगाधर मुटे
छान कविता
25 Jul 2016 - 9:19 am | पैसा
कविता पाडतोस, लोकांना छळतोस
त्याची पण कविता लिहितोस?
भेटच तू एकदा,
तुला शिकवीन चांगलाच धडा!!
=))