ज्यांची मने अध्यात्म अथवा स्त्रीमुक्ती पैकी कशानेही दुखावतात अशांनी पुढे वाचले नाही तरीही चालेल.
*** (मर्त्य मानवी नवरे तुझ्या चुलीत घाल !) ***
Like treasure hid in the ground,
like flavour in the fruit,
like gold in the rock and oil in the seed,
the Absolute is hidden in the heart.
I love the Handsome One:
he has no death
decay or form
no place or side
no end nor birthmarks.
I love him O mother. Listen.
I love the Beautiful One
with no bond nor fear
no clan no land
no landmarks
for his beauty.
So my lord, white as jasmine, is my husband.
Take these husbands who die,
decay, and feed them
to your kitchen fires!
(मर्त्य मानवी नवरे तुझ्या चुलीत घाल !)
*** ***
मुक्ततेची भावना बर्यापैकी नोशनल असू शकते, तुमच्याकडे स्वातंत्र्य असते तेव्हा तुम्ही प्रत्येकक्षण मुक्त (मोकाट)पणे घालवताच असे नाही. पण स्वांतत्र्य अथवा मुक्तता नाही ह्याची जाणीव झाली की मुक्तता नसणे खुपावयास लागते. राजस्थानात राज्यपाल म्हणून गेलेल्या एका माजी महाराष्ट्रीय मुख्यमंत्र्याने राज्यपाल भवनाला जाहीरपणे सोन्याच्या पिंजर्याची उपमा दिली. ऐषो आराम अगदी सहजपणे पायाशी आणून टाकला तरीही मुक्तता नसेल तर नकोसे होते तरीही बहुतेक लोक हाती आहे ते गमावले जाऊ नये म्हणून आपापल्या पारतंत्र्याशी अथवा बंधनांच्या जोखडांशी तडजोडकरत जगत असतात. खरेतर स्वातंत्र्य हे संस्कृती सिद्ध असते ते सिद्ध करावे लागते प्रसंगी सोन्याचा पिंजरा सोडण्याची तयारी असावी लागते.
लग्नसंस्थेचा पिंजरा ज्याच्यावर धर्मसंस्थेचा पगडा असतो कितीही आकर्षक दिसला तरीही स्त्रीयांना त्याच्या आत न जाण्याचे अथवा त्याच्या आत गेल्या नंतर बाहेर पडण्याचे पर्याय फार मर्यादीत असतात आणि अगदी शंभर वर्षापुर्वी पर्यंत स्त्री साठी हि गोष्ट फारच कठीण होती. इतिहास काळात मुक्ततेचा विचार करणेही शक्य नसावे, अशा काळात धर्मसंस्थेचाच आधार घेऊन वळसा घालण्याचा अजब मार्गाचा शोध घेतला गेला तो म्हणजे मंदिरातील देवाशी किंवा अगदी धर्मग्रंथाशीच विवाह करणे. अर्थात या दोन्हीचा शेवटी पुरुषप्रधान संस्कृतीने पिळवणूकीसाठी उपयोग करुन घेतला त्यामुळे गेल्या पन्नासवर्षात कायदे आणि जन जागृती करून या प्रथा अनिष्टतेच्या प्रवेशामुळे बंद कराव्या लागल्या. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील धर्मग्रंथाशी विवाहप्रथा तर गेल्या पाच सात वर्षापूर्वी पर्यंत चालू होती. अर्थात मोठ्या प्रमाणात असे विवाह इश्वरभक्ती पेक्षा परिस्थितीच्या रेट्यामुळे होत असावेत.
अगदी परिस्थितीचा रेटा नसतानाही निव्वळ इश्वर भक्ती तेही इश्वराला प्रियकर किंवा अगदी पती समजून केली गेल्याची राधा, पार्वती सारखी पौराणिक उदाहरणे आहेतच पण राजस्थानातील मीरेसारखी कवियत्री बंड करत इश्वर हाच माझा सखा सांगत संतपद प्राप्त करती झाली. खरेतर संत मीरेच्या तब्बल चार शतके आधिचे उदाहरण महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात होऊन गेले ते म्हणजे 'अक्का महादेवी' यांचे. राधा खरोखर होऊन गेली की नाही माहित नाही पण संत मीरेने कृष्णाची वैष्णव भक्ती करत राधेस शोभेल अशा भक्ती साहित्याची निर्मिती केली असेल तर 'अक्का महादेवी'ने सुद्धा चेन्न मल्लिकार्जून स्वरुपातल्या शंकराची भक्ती करत अगदी पार्वतीस शोभेल अशा भक्ति साहित्याची निर्मिती केली असे म्हणावयास हरकत नसावी. (अनुषंगिक संदर्भ)
संत मीरा आणि अक्का महादेवी दोघीही त्यांच्या तत्कालीन बंडखोरीमुळे माहित असल्या तरीही अक्का या शब्दाचा अर्थ जसा ताई होतो तशी अक्का महादेवी केवळ काही शतकांनी थोरली नाही तर कृतीनेही थोरलीच. मीरे प्रमाणेच बालपणापासून चेन्न मल्लिकार्जून म्हणजे महादेवावर निरतीशय प्रेम करणार्या अक्का महादेवीनेही राजा असलेल्या कौशिकाला सोडताना त्याची केवळ संपत्तीच अव्हेरली असे नाही अगदी अंगावरची वस्त्रेही त्याला वापस करत संन्यास घेऊन चालती झालीच पण आपल्या दिगंबरावस्थेची किंचीतही क्षिती न बाळगता आजच्या स्त्रीवाद्यांनाही सहज जमणार नाही असे आपल्या कृतीचे तेवढ्या कर्मठ काळात समर्थन केलेच तत्कालीन संतमंडळींशी व्यासपिठावर शास्त्रार्थ करण्यातही यशस्वी झाली त्यांनी तीला अक्का म्हणजे मोठी बहीण म्हणून स्विकारले, पुरुष संतांना जशी संत शिष्यांची प्रभावळ असते तशी प्रभावळ अका महादेवीनेही निर्माण केली.
कन्नड साहित्याला तिच्या अनमोल वचनांनी समृद्धही केले. एवढ सगळंकरून संतज्ञानेश्वरांची समकालीन कन्नड विदूषिही वयाच्या २० व्या वर्षी निरोप घेती झाली.
अक्का महादेवींच्या काही वचनांचे इंग्रजी अनुवाद खाली देतोच आहे, पण वेळ देता आल्यास जिज्ञासूंनी विनय चैतन्य यांच्या Songs for Śiva: Vacanas of Akka Mahadevi या गूगल बूक्सवरील पुस्तकातून त्या क्रमाने वचने वाचल्यास कन्नड साहित्याच्या ठेव्याचा अप्रतिम आस्वाद की संत साहित्याच्या प्रसादाचा लाभ होऊ शकेल.
People,
male and female,
blush when a cloth covering their shame
comes loose
When the lord of lives
lives drowned without a face
in the world, how can you be modest?
When all the world is the eye of the lord,
looking everywhere, what can you
cover and conceal?
या कवितेचा सुबोध मराठी अनुवाद अरुंधती नावाच्या ब्लॉगवर दिसतो आहे.
***
Coins in the hand
Can be stolen,
But who can rob this body
Of its own treasure?
The last thread of clothing
Can be stripped away,
But who can peel off Emptiness,
That nakedness covering all?
Fools, while I dress
In the Jasmine Lord's morning light,
I cannot be shamed-
What would you have me hide under silk
and the glitter of jewels?
***
म्हशीला एक काळजी असते -
चांभाराला दुसरी काळजी असते,
पुण्यवंताला एक काळजी असते -
तर पापीव्यक्तीला वेगळी काळजी असते,
मला माझ्या स्वतःच्या काळज्या आहेत -
आणि तूला तुझ्या वासनांची काळजी पडली आहे !
नाही, अरे वेड्या, जाऊ देत माझ्या अंगावरचे कपडे जाऊ देत
मला काळजी पडलीए -
जाईसारखा शुभ्र चेन्न मल्लिकार्जून माझ्यावर प्रसन्न होणार नाही.
(हे पतीराजाला निरोप देतानाचे काव्य वाटते आहे, उपरोक्त ओळी विनय चैतन्य यांचा अनुवाद आधारास घेऊन अनुवादीत केल्या आहेत मूळ कन्नड काव्य आणि कन्नड येत नसल्या मुळे चुका असू शकतात चुभूदेघे)
***
लिंगामुळे मी शरीराच्या वेदना पार करू शकले,
ज्ञानामूळे मनाच्या वेदना पार करू शकले
शिवाच्या अनुभूतीतून हरवलेले स्वत्व शोधू शकले,
प्रकाशाचेच कपडे घालून -
अवयवांचा अंधःकार नाहीसा करू शकले,
तुमच्या तारुण्यात तुमचे डोळे जे काही पाहताहेत
ती केवळ जळालेल्या कामदेवतेची राख आहे
हे, जाई सारख्या नाजूक चेन्न मल्लिकार्जूना
तू कामदेवतेला मारलस, आणि तरीही त्याला
मनात जन्मू दिलंस
मी त्याचा शेवट केला आहे
(उपरोक्त ओळी विनय चैतन्य यांचा अनुवाद आधारास घेऊन अनुवादीत केल्या आहेत मूळ कन्नड काव्य आणि कन्नड येत नसल्या मुळे चुका असू शकतात चुभूदेघे)
***
For hunger, there is the village rice in the begging bowl,
For thirst, there are tanks and streams and wells
For sleep temple ruins do well
For the company of the soul I have you, Chenna Mallikarjuna
***
"Listen, oh, Mother! I love Him,
He is the one, the only one.
He knows no birth and death.
He is unchained by caste or clime.
He is boundless, changeless, formless;
He is beautiful beyond comparison,
All others fade away and die at last.
I will have none of them.
My Lord shall forever be
Other men are thorn
under the smooth leaf.
I cannot touch them,
go near them, nor trust them,
nor speak to them confidences.
Mother,
because they all have thorns
in their chests,
I cannot take
any man in my arms but my lord
white as jasmine.
* संदर्भ
* Akka_Mahadevi इंग्रजी विकिपीडिया
* Holy People of the World: A Cross-cultural Encyclopedia, Volume 2
* http://www.karnatakaholidays.com/uduthadi.php
* The Naked Saint
* http://sacred-songs.blogspot.in/2007/06/mahadeviyakka.html
* दैनिक नवशक्तीतील संजिवनी खेर यांचा लेख आणि एका कवितेचा अनुवाद
* बसवेश्वरांचा लिंगायत धर्म - दैनिक प्रहार
कन्नड वचनांचे इंग्रजी अनुवादक
* या पुस्तकात २ वेगळ्या वचनांचे अनुवाद दिसतात
* The Bhakti Movement and the Status of Women: A Case Study of Virasaivism
प्रतिक्रिया
16 Jul 2016 - 1:35 am | गणामास्तर
सुलभ मराठी भाषांतर दिले असते तर बरं झालं असतं.
16 Jul 2016 - 2:10 am | माहितगार
कुणी करण्यात मदत करत असेल तर जोडेन तेथे. काही वचनांच्या अनुवादाचा प्रयत्न करतोय पण मलाच कॉन्फिडन्स वाटत नाहीए. आत्ता डिझायर या शब्दाचा अनुवाद काय करावा असा पडला दुसर्या वचनात कामदेवतेचा उल्लेख येतो म्हणून डिझायरसाठी कामदेवता शब्द योजला त्यात रिस्क कमी होती पण अध्यात्मिक गोष्टीत मूळ टेक्स्ट माहित नसताना जड जाते तरीही कुणी मदत केल्यास जोडणे नक्कीच आवडेल कारण कवियत्रीची वचने खासच आहेत.
16 Jul 2016 - 9:58 am | अभ्या..
अक्कमहादेवीची वचने सोलापुरात बर्याच प्रौढ वीरशैव भाविकांना मुखोद्गत असतात. दै. संचारमध्ये डॉ
श्री. विरेश स्वामी किंवा अजून कुणी रोज एका वचनाचा मराठी रसाळ अनुवाद करत असत. जास्त माहिती सिध्देश्वर मंदिरात जाऊन मिळू शकते. ओनलाईन लिंक वगैरे काही नाही देऊ शकत. क्षमस्व.
16 Jul 2016 - 10:00 am | प्रचेतस
होयसळ काळातली का?
16 Jul 2016 - 10:07 am | अभ्या..
आपल्या ज्ञानोबा माऊली ना समकालीन. बसवेश्वरांच्या अनुभवमंटपात त्यांचे अस्तित्व होते. मग तो काळ तू ठरव.
16 Jul 2016 - 10:08 am | प्रचेतस
बसवकल्याण?
मग बहुधा काकतीय.
16 Jul 2016 - 10:20 am | अभ्या..
इल्ला, श्रीशैल
16 Jul 2016 - 11:11 am | माहितगार
या ब्लॉगवर आणि या लेखात काही कवितांचे सुलभ मराठी अनुवाद उपलब्ध दिसतात.
16 Jul 2016 - 8:58 am | चंपाबाई
जाऊ दे. न वाचलेलेलेच बरे! न पटणार्या गोष्टी आहेत.
16 Jul 2016 - 10:31 am | राका
नकाच वाचू आणि तोंड घेऊन इथे येऊ पन नका घाण करायला..
16 Jul 2016 - 4:14 pm | चंपाबाई
मला तर कै बै कळतच नै.
संसार ही मोहमाया आहे.
वासना हे पाप आहे.
...
जर या संतांच्या पप्पा मम्मीनी असाच विचार केला असता तर हे संत संतिणी जन्माला आले असते का ?
16 Jul 2016 - 5:00 pm | माहितगार
कर्नातकाच्याच मार्गारेट नावाच्या विदुषीं आत्मच्रित्रातून काही माहिती उघड करत असल्याची वृत्ते आहेत, त्यात राज्यकर्त्यांच्या वासनेच्या दुष्परिणामाची माहिती स्वल्प प्रमाणात उघडी होण्याची शक्यता दिसते आहे. इथे या लेखात राण्यांची ओळख आहे की ज्यांच्या पायाशी सगळी सुखे लोळत असताना सर्वसंग परित्यागाची तयारी होती, आज राजकारणातल्या राजकर्त्यांची स्थिती पाहिल्यावरही तुम्हाला असेच वाटते याचे कौतुकच.
16 Jul 2016 - 9:45 am | स्पा
भाई आखिर केहना क्या चाहते हो
16 Jul 2016 - 10:29 am | विवेकपटाईत
भारत कोश मधून हि माहिती मिळाली
अक्का महादेवी हिचा जन्म 12वीं शताब्दी दक्षिण भारत के कर्णाटक राज्य में 'उदुतदी' नामक स्थान पर हुआ। वे एक महान शिव भक्त थीं। 10 वर्ष की आयु में ही उन्हें शिवमंत्र में दीक्षा प्राप्त हुई थी। अक्का महादेवी ने अपने सलोने प्रभु का सजीव चित्रण अनेकों कविताओं में किया है। उनका कहना था कि वे केवल नाम मात्र को एक स्त्री हैं, किन्तु उनका देह, मन, आत्मा सब शिव का है।
16 Jul 2016 - 2:04 pm | एस
छान ओळख.
16 Jul 2016 - 10:02 pm | राही
अक्क महादेवी यांच्यावरचा अरुणा ढेरे यांचा एक सुंदर लेख वाचला होता.
16 Jul 2016 - 10:06 pm | रातराणी
कविता आवडल्या.
17 Jul 2016 - 8:59 am | साती
या पानावर तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल.
इथल्या सगळ्या मंदिरांत अक्कमहादेवींचे चित्र असतेच असते.
त्यात त्या केवळ केसांनी आपले अंग आच्छादून आहेत असेच दाखविलेले असते.
कल्याणमंदिराच्या म्हणजेच या पानावर जो अल्लमप्रभूंचा असेंब्ली हॉल म्हणून सांगितला आहे त्या गावात राहूनही मी कधी गेले नाही. पण सध्या या धर्माविषयी आणि त्यातल्या प्रसिद्ध ठिकाणांविषयी /व्यक्तींविषयी माहिती करून घ्यायचा माझा प्रयत्न चालू आहे. (नवरा वीरशैव आहे)
अक्कमहादेवींच्या वचनांवर इथे बर्याच जणांनी पि एच डी केलेल्या आहेत.
अजून खास संदर्भ मिळाले तर नक्की देईन.
पण मला केवळ नविन कन्नड समजते. हळेकन्नडा किंवा १२-१३ व्या शतकातले कन्नड लिहा- वाचायला अजून २-३वर्षे अभ्यास करावा लागेल.
17 Jul 2016 - 2:04 pm | पैसा
उत्तम ओळख