मी बाई होते म्हणुनी - भाग -१०

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
27 Jun 2016 - 6:15 am

मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४ http://misalpav.com/node/24073
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०५ http://misalpav.com/node/35964
मी बाई होते म्हणुनी .. भाग - ०६ http://misalpav.com/node/36166
मी बाई होते म्हणुनी .. भाग - ०७ http://misalpav.com/node/36252
मी बाई होते म्हणुनी . . भाग - ०८ http://misalpav.com/node/36339
मी बाई होते म्हणुनी . . भाग - ०९ http://misalpav.com/node/36429

‘ तुम्हांला दोहींना महाराजांनी बोलावलं आहे,’ दासीच्या आवाजानं दोघीही एकदमच भानावर आलो, अंगावरची वस्त्रं सावरुन लगेच काकांच्या कक्षाकडं निघालो, जाताना मांडवी अन् श्रुतकिर्ती देखील आमच्या बरोबरच होत्या .
काकांच्या दालनात न नेता आम्हाला राजसभेच्या मोठ्या दालनात बोलावलं होतं, याचा अर्थ आता जे बोलणं होणार आहे ते वैयक्तिक किंवा कौटुंबिक नव्हतं तर त्यापेक्षा जास्त मोठे असं काही होतं. आम्ही सगळ्याजणी जेंव्हा तिथ्ं पोहोचलो, तेंव्हा तिथ्ं आई, बाबा, काका, काकु आणि काही म्ंत्रि व आमचे कुलगुरु बसलेले होते. आमच्या साठी आसनं राखुन ठेवलेली होतीच, आम्ही बसताक्षणीच, काकांनी बोलायला सुरुवात केली,‘हे कुलगुरु आणि मंत्रिगण,सितेचं स्वयंवर संपन्न झालं, अयोध्येचा राजकुमार रामाबरोबर तिचा विवाह निश्चित झाला आहे, त्याचवेळी राजा दशरथांनी एक प्रस्ताव ठेवला आहे, तो प्रस्ताव या तिघींच्या संदर्भात आहे’
शेवट करताना काका आमच्या आसनांजवळ् आले होते.. त्यांनी मंत्रिगणांपैकी एक, स्वधत्वांना पुढे बोलायला सांगितले, त्यांनी राजा दशरथांचा प्रस्ताव आम्हां समोर मांडला, आणि पुन्हा आसनस्थ् झाले..
‘ विवाह हा एक अतिशय वैयक्तिक् निर्णय आहे प्रत्येक् स्त्री साठी, त्या बद्दलच्या प्रस्तावाची चर्चा अशी राजमंत्र्यांचा समोर का करण्यात येते आहे, याचं कारण विचारु शकतो का आम्ही ? मी माझा प्रश्न विचारला. आईचं माझ्याकडं पाहणं मला अजुनही आठवतं, किंचितसा धाक आणि बरंच कौतुक होतं तिच्या बघण्यात..
काका आता माझ्या आसनाच्या मागंच आले होते, तेंव्हा स्वधत्वांना काही बोलायचं होतं, पण काकांनी हात वर करुन त्यांना बसायला सांगितलं, ‘उर्मिले, हा प्रश्न मला फक्त तुझ्याकडुनच अपेक्षित होता अन तु माझा अपेक्षाभंग केला नाहीस. होय, विवाह संबंध हा वैयक्तिकच निर्णय आहे तुमच्यासाठी, नव्हे सर्वांसाठीच पण राजा दशरथ आणि त्यांच्या मंत्र्यांनी जी शंका उपस्थित केलेली आहे, त्या शंकेचं उत्तर शोधण्यासाठी किंवा तिचं निराकरण करण्यासाठी त्यांनीच हा प्रस्ताव् मांडला आहे, आणि हे इतक्या कमी वेळात झालं आहे, याचा अर्थ या प्रस्तावावर त्यांनी इथं येण्यापुर्वीच विचार केलेला आहे. सहज सुचलेला असा हा उपाय नाही. या प्रस्तावावर आपण जो काही निर्णय देउ त्याचे बरेच साद पडसाद फक्त सितेच्या किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावरच पडतील असे नाही तर आपल्या राज्यावर, राजकारणावर देखील पडु शकतात्.’
‘ ते काय असतील याबाबत आज दिवसभर मी आणि तुझ्या बाबांनी आपल्या मंत्रिसभेसोबत आणि सेनाध्यक्षांसोबत् विचार केलेला आहे, तसेच दिवसभर तुझी काकु आणि आई ह्या कुलगुरंसोबत याबद्दलच्या शास्त्र आणि धर्मग्रंथाच्या संदर्भाने चर्चा करत होत्या. या दोन्ही बाजुंनी विचार केल्यास हे चारही विवाह होणं हे आपल्या राज्याच्या सुरक्षेच्या आणि भविष्यातील प्रगतीच्या दुर्ष्टीनं उपयुक्त आहेच, आणि शास्त्रांनी देखील अशा विवाहांना मान्यता नाकारलेली नाही.’
‘ आता प्रश्न उरला तुमच्या आयुष्याच्या जोडिदाराची निवड तुम्ही करण्याबाबत, .. आईनं उठुन आमच्या बाजुला येत बोलायला सुरुवात केली. ‘ अयोध्येच राज्य आणि तिथला राजवंश हे काही उत्क्रुष्ट राजसंस्थांपैकी एक आहेत, राजा दशरथांचे चारही पुत्र शारिरीक, बौद्धिक आणि भावनिक कसोट्यांवर उत्तम उतरु शकतील याबाबत आपल्या गुप्तहेरांनी खात्री दिलेली आहे, आणि आपल्या आयुष्यभराच्या सहचराबद्दल अशा उत्तम क्षत्रिय कुळात जन्मलेल्या पराक्रमी पुरुषांपेक्षा तुमची अपेक्षा फार वेगळी नसेल असं आम्हांला वाटतं’
आणि हे सुद्धा लक्षात घ्या, जर हा प्रस्ताव आमच्या पैकी एकालाही योग्य वाटला नसता, तर या चर्चेसाठी तुम्हाला बोलावण्यात आलंच नसतं, तुमचं मत विचारलं गेलंच नसतं. आता हा प्रस्ताव स्विकारणं किंवा नाकारणं हेचं तुमचं स्वयंवर आहे असं तुम्ही समजु शकता..

क्रमशः

समाजजीवनमान

प्रतिक्रिया

लोथार मथायस's picture

27 Jun 2016 - 6:33 am | लोथार मथायस

वा कथा छान पकड घेते आहे. पुलेशु

यशोधरा's picture

27 Jun 2016 - 6:55 am | यशोधरा

वाचते आहे..

प्रचेतस's picture

27 Jun 2016 - 8:36 am | प्रचेतस

त्रोटक. पण छान लिहिलंय.

किसन शिंदे's picture

27 Jun 2016 - 8:40 am | किसन शिंदे

वाचतोय हो मालक