गेली दोन वर्षं लंडनमध्ये मिपाकरांचा वासंतिक कट्टा होतो आहे, पण त्याचे वृत्तांत आणि फोटो कुठेही लीक होऊ न देण्याची पुरेपूर काळजी घेतली गेली. ;) पण यंदा न्यूयॉर्क आणि रत्नागिरी या जगातल्या आघाडीच्या शहरांमध्ये मिपाकट्टे करायचं घाटत असल्याने तमाम (ग्रेटर) लंडनवासी मिपाकरांच्या हृदयांत कालवाकालव झाली. तसंच ज्येष्ठ आणि तरूण मिपाकर विजुभाऊ यांचं नुकतंच राणीच्या देशात आगमन झालं असल्याने कट्टा करायच्या बेताला पाठबळ मिळालं.
तर आतापर्यंत ठरलेले तपशील असे:
तारीखः १८ जून २०१६
स्थळः ग्रीनिच
ग्रीनिचमध्ये सुप्रसिद्ध ग्रीनिच वेधशाळा तर आहेच, पण सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या सुवर्णदुर्ग किल्ल्याची आठवण म्हणून बांधला गेलेला "सेवेर्नदुर्ग कासल"ही आहे. मालोजीरावांनी त्याबद्दल लिहिलेला लेख येथे मिळेल.
परत बदल होऊन मूळ ठिकाण नक्की झाले आहे.
अनाहिता धरून जवळजवळ दहा तरी लोकांची उपस्थिती असेल असा प्राथमिक अंदाज आहे.
यूकेस्थित मिपाकरांस कट्ट्यास उपस्थित राहण्याची इच्छा असल्यास मला किंवा विजुभाऊंना व्यनि करावा.
कार्य सिद्धीस नेणेस कट्टाप्पा श्रीमुवि समर्थ आहेतच ;)
कळावे, आपला...
प्रतिक्रिया
10 Jun 2016 - 6:57 pm | राघवेंद्र
कट्याला शुभेच्छा !!! सर्व मिपाकर आप-आपल्या देशात कट्टा साजरा करून मिपा कट्टा विशेषांक काढता आला तर अजून छान :)
10 Jun 2016 - 7:48 pm | प्रचेतस
कट्ट्यास शुभेच्छा.
वृत्तांत अवश्य येऊ द्यात.
10 Jun 2016 - 8:56 pm | सानिकास्वप्निल
या ही वर्षी कट्टा हुकणार, सध्या भारतात आहे.
समरमध्ये एखादा कट्टा याॅर्कशायरलाही होऊ द्या :)
10 Jun 2016 - 9:52 pm | यश राज
समरमध्ये एखादा कट्टा याॅर्कशायरलाही होऊ द्या.....
10 Jun 2016 - 9:57 pm | विजुभाऊ
सानिकास्वप्निल नक्की करुया.
11 Jun 2016 - 7:37 am | डॉ सुहास म्हात्रे
कट्ट्याला शुभेच्छा !
भरपूर फोटोंसकट वृत्तांत येऊद्या.
11 Jun 2016 - 7:56 am | अभ्या..
मिपाचे आंतरराष्ट्रीय नेतृत्व मा. श्री. आ. एक्काकाका याणी न्यूयॉर्क हितं मिपाचा आवाज घुमवण्याचा निर्धार केलेला आहे, तसंच या आवाज घुमविकरणाच्या मोहिमेला याटिकानी एकटा टैगर मा. श्री. आ. आदुबाळासाहेब लँटनकर ह्येनी तशाच स्वरूपाचा मेळावा आयोजित केलेला आहे. म्हानुन याटिकानी आपल्या उपेक्षित मराठवाड्याचे बुलंद नेतृत्व मा. श्री. आ. प्रा. डॉ. दिलीपजी बिरुटे सर साहेब यांना आवाहन करतो कि त्याच दिवशी आपल्या कार्यक्षेत्रात असाच एक मेळावा आयोजित करून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना याटिकानी शक्ती परदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.
जय विश्व, जयहिंद, जय महाराष्ट्र, जय मराठवाडा, जय मिपा, जय मराठी, जय मी.
धन्यवाद.
13 Jun 2016 - 4:44 pm | टवाळ कार्टा
जय मी =))
13 Jun 2016 - 5:29 pm | अभ्या..
तो. खीच्च मेरा फोटो, खीच्च मेरा फोटो. ;)
13 Jun 2016 - 6:12 pm | सूड
जय मी साठी एक मँगो मस्तानी देणेत येईल.
13 Jun 2016 - 6:25 pm | अभ्या..
सूडक्या मी फक्त लिस्ट करुनच मरणार दिसतय. आजपावेतो मस्तानीचा रिकामा गलास (ग्लासातच देतेत ना?) पण दिसायला नाही. :(
13 Jun 2016 - 6:28 pm | टवाळ कार्टा
तो पुणेकर व्हायची प्रॅक्टिस कर्तोय...कधी देणार कुठे देणार काही लिहिले आहे का? =))
13 Jun 2016 - 8:07 pm | सूड
टक्या अभ्या कधी येतो आणि कधी जातो ते कळत पण नाही, कधी देणार मस्तानी?
यावेळी येणार होता तेव्हा देईन म्हटलं तर रात्री साडेदहा वाजता आमची जेवणं उरकली तरी अभ्याचा पत्ता नाही.
14 Jun 2016 - 10:27 am | अभ्या..
एका मा. संपादकांना घरी नेऊन आदरसत्कार करण्यात तुम्ही गुंतलेले, आमी म्हणलं "असो. नेष्ट टाईम."
14 Jun 2016 - 12:07 pm | सूड
तुम्हाला काय अडवलं होतं होय तुम्हाला यायला.
20 Jun 2016 - 9:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला, अभ्याच्या प्रतिसादावर ध्यान ठेवा लागन, कुठं कुठं लिव्हित राहतं ते.... मराठवाड्यात सध्या दुष्काळ असल्यामुळे असा कोणताही कट्टा घेण्यात येणार नै असं आमचं म्हणजे माझं अन बाबा योगीराजचं ठरलं आहे. शक्तीप्रदर्शन लवकरच करण्यात येईल. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
20 Jun 2016 - 9:58 am | अभ्या..
चालन वो सर,
आजकाल शक्तीप्रदर्शनासाठी कट्टे आयोजित होतात अशी कुणकुण आली कानी म्हणून म्हणलं. बाकी काई नाई.
समस्त सोलापूर जिल्हा आपल्या पाठीशी आहे अशी ग्वाहि याटिकानी मी देऊ इच्छितो.
परत जय सगळे.
20 Jun 2016 - 10:03 am | नाखु
पिंपरी चिंचवडकडून उभे राहुन अनुमोदन आहे. या भागाची मते प्राडाँनाच जातील अशी हमी धरणे.
23 Jun 2016 - 3:02 pm | महासंग्राम
अखिल भारतीय, शनवार, रविवार, नारायण, सदाशिव, कसबा पेठ शाखा ओंकारेश्वर मित्र मंडळाची मते सुद्धा प्राडॉनाच येतील याचे भरघोस आश्वासन फक्त कट्टा पुण्यात करावा.
11 Jun 2016 - 7:58 am | अजया
कट्टयाला शुभेच्छा.दरवर्षी कट्टा करायचे विसरू नका बरे.पुढच्या एक दोन वर्षात कट्टयाला हजेरी लावण्यात येईल! लोणंदकरणी आमच्या जानी दोस्तीणी आहेत!
13 Jun 2016 - 4:15 pm | विजुभाऊ
अश्वत्थामा च्या काल फोन झाला. तो येतोय.
13 Jun 2016 - 4:27 pm | सूड
शुभेच्छा!!
13 Jun 2016 - 6:04 pm | हाहा
यावेळी जमणार नाही :(
14 Jun 2016 - 12:16 pm | अत्रुप्त आत्मा
ह्ही ह्ही!
मलाही! ;)
13 Jun 2016 - 6:17 pm | पद्मावति
मलाही नाही जमणार :(
कट्टा वृत्तांत आणि फोटो लवकर येऊ द्या. खूप शुभेच्छा.
13 Jun 2016 - 9:49 pm | पीशिम्पी
वेळ काय ठरविली आहे कट्ट्यासाठीची?
13 Jun 2016 - 10:01 pm | आदूबाळ
अजून ठरवली नाही, पण अकराच्या आसपासची ठरवू. (विजुभाऊ, अस्वस्थामा - काय म्हणता?)
17 Jun 2016 - 6:30 pm | लोथार मथायस
व्यनि केला आहे
13 Jun 2016 - 11:13 pm | मुक्त विहारि
युरोप आणि इतर खंड अद्याप आमच्या अर्थिक कक्षेच्या बाहेर असल्याने....
तूर्त फक्त शुभेच्छा.
सोनेरी पेयाच्या सार्थीने कट्टा करणार असाल तर, एक-दोन थेंब आमच्या नावाने पण उडवा.
14 Jun 2016 - 12:50 am | विजुभाऊ
नक्की. तसे नाही केले तर आमाला पचायचे नाही ते.
14 Jun 2016 - 7:30 am | मुक्त विहारि
इतके काही आम्ही दुष्ट नाही.
पण त्या निमित्ताने आमची पण कट्ट्याला सुक्ष्मात राहून हजेरी होईल.
14 Jun 2016 - 12:24 pm | नन्दादीप
जगातल्या आघाडीच्या शहरांमध्ये रत्नान्ग्री चा समावेश केल्यामुळे या कट्ट्याला रत्नान्ग्रीवासीय मिपाकरांकडून लाख लाख शुभेच्छा..
असाच कट्टा करून वृत्तांत व फोटोंसाठी सगळ्याना वारंवार विचारणा करायला लावा...
(अवांतर : मुवि डोंबोलीत पोचले की लगेच सविस्तर वृत्तांत टाकतीलच ही आशा )
14 Jun 2016 - 2:18 pm | विशाखा राऊत
डोन्ट वरी... कट्ट्याला जायला जमले तर एक रत्नागिरीकर म्हणुनसुध्दा हजेरी लावली जाईल
14 Jun 2016 - 2:17 pm | विशाखा राऊत
आज धागा बघितला. कट्ट्याला यायचे आहे पण हा किल्ला खुपच लांब आहे. मी सध्या रहाते तिथुन हा किल्ला जवळपास २.१५ तास अंतरावर आहे. (पब्लिक ट्रान्सपोर्टने). कट्टा करायचा म्हणजे गप्पा, खाणे, मज्जा. हा किल्ला बघायचा तर एकुण प्रवास बघता चालणे खुप जास्त आहे.
मला कट्ट्याला यायचे आहे तर दुसरे ठिकाण ठरवुया का? तसे चालेल जमेल का? मी एकटीच येणार आहे त्यामुळे लंडन सिटी, एखादे पार्क असे असेल तर जास्त सोयीचे होईल. रोज २ तास प्रवास होतोच माझा त्यामुळे निदान सुट्टी दिवशी ५ तास नक्को वाटतेय. :(
जर सर्वांना किल्ला पहायचा असेल तर नो प्रोब्लेम :). धमाल केलीच पाहिजे
14 Jun 2016 - 3:10 pm | प्रभाकर पेठकर
११ ते २० जुलै दरम्यान लंडनमध्ये करणार असाल तर मी सहकुटुंब हजेरी लावू शकेन.
विजूभाऊ निदान आपली तरी भेट व्हावी अशी इच्छा आहे.
बाकी लंडनवासीयांच्या १८ जूनच्या कट्ट्याला मनापासून अनेकानेक शुभेच्छा.
14 Jun 2016 - 4:51 pm | मुक्त विहारि
अजून एक कट्टा करायचा.
आहे काय अन नाही काय?
खरा कट्टेकरी रोज कट्टा करायला पण तयार असतो.
14 Jun 2016 - 6:54 pm | विशाखा राऊत
भेटु परत त्यात काय :)
लंडन मुक्काम कधी ते सांगा आम्हांला
14 Jun 2016 - 7:22 pm | विजुभाऊ
नेकी और पूछ पूछ पेठकर काका?
तुम्हाला कोणत्या शनवारी/रैवारी वेळ आहे ते कळवा. सगळे हजर रहातो.
14 Jun 2016 - 7:49 pm | प्रभाकर पेठकर
१० ते २० जुलै मध्ये लंडन आणि आजुबाजूला मुक्त भटकणे हाच उद्योग आहे त्यामुळे तसा सर्व दिवस मी मोकळाच आहे. १६-१७ शनिवार-रविवार आहे. मला चालेल. चला ठरवुया. आणि भेटूया.
14 Jun 2016 - 8:18 pm | पीशिम्पी
कट्ट्यासाठी अजुन कोणती दुसरी तारीख नाही ठरविता येणार का? १७-१८ फुल्ल आहे आधीच बुकिंग झाले आहे म्हणून विचारतोय. कट्ट्याला यायची खुप ईच्च्छा आहे. किती वाजेपर्यंत असणार आहे प्रोग्रॅम?
16 Jun 2016 - 9:27 am | आदूबाळ
प्रकाटाआ
15 Jun 2016 - 3:06 pm | विशाखा राऊत
मी येणार आता कट्ट्याला :)
नक्की भेटु
17 Jun 2016 - 6:46 pm | विशाखा राऊत
मी नाही येणार.
17 Jun 2016 - 6:25 pm | लोथार मथायस
मी पण येणार
17 Jun 2016 - 8:05 pm | विजुभाऊ
स्वागत आहे लोथारजी.
17 Jun 2016 - 10:46 pm | आदूबाळ
कट्टेकर्यांसाठी:
उद्या दु. १२ वाजता ग्रीनिच वेधशाळेपाशी भेटावे. जवळचं स्टेशन - कटी सार्क (डीएलआर).
हवामानः १५ अंश से. ढगाळ.
http://www.bbc.co.uk/weather/2647937
पार्किंगः ग्रीनिच मेरीटाईम म्यूझियमचं पार्किंग
http://www.rmg.co.uk/plan-your-visit/getting-here-facilities-access/parking
व्हॉट्सअॅप ग्रुप काढला आहे. अनिवासि यांनी आपला मोबाईल क्रमांक व्यनि करावा.
19 Jun 2016 - 2:43 pm | अभ्या..
कट्टा???
फोटो?????
वृत्तांत?????
खादाडी??????
.
ओ लंडनवाले.... फशिवता काय????
19 Jun 2016 - 2:59 pm | पद्मावति
+१
19 Jun 2016 - 3:04 pm | पद्मावति
वृतांत लिहिण्यासाठी सगळे लंडन वाले एकमेकांना पेहेले आप, पेहेले आप करत असतील =)
19 Jun 2016 - 3:59 pm | अभ्या..
ब्रिटीश म्यानर्स सोडा. मिपावरचे ब्रिटीश पण आगरी बोलतेत तस्मात फॉक्कन वृत्तांत टाकावा ही नम्र इनंती. ;)
19 Jun 2016 - 4:14 pm | आदूबाळ
विजुभौंनी वृत्तांत लिहाआ ही नम्र विनंती.
मी हापिसात गेल्याशिवाय फोटो टाकू शकत नाही. :(
19 Jun 2016 - 5:15 pm | खेडूत
जुने दिवस आठवले.
सध्या मी तिथला एक फोटू टाकून ठेवतो...
19 Jun 2016 - 6:14 pm | स्वाती राजेश
Sagale London mi.pa.kar...ajuni tyach dhundit aahet...vijubhau lavakarch yeu det...vrutant..
20 Jun 2016 - 2:59 am | पिलीयन रायडर
ओ कॉपी कॅट कट्टेकरी.. झाला का कट्टा! ;)
21 Jun 2016 - 1:06 am | राघवेंद्र
++१
20 Jun 2016 - 3:44 pm | प्रीत-मोहर
वृ कधी राणीच्या देशातले लोक्स?
लौकर वृ टाकणे.
20 Jun 2016 - 3:50 pm | विशाखा राऊत
लोक्स दमलेत.. परत आल्यापासुन कोणाचे काहीही मेसेज नाहीत :)
22 Jun 2016 - 10:33 pm | एस
कट्टा..... नक्की झाला ना?
22 Jun 2016 - 11:43 pm | आदूबाळ
बिजूभाव इज बिज्जी. सो लेट इन वृत्तांतीन्ग. बट कट्टा वॉज.
23 Jun 2016 - 12:09 am | अभ्या..
यु आर बिकॉज कट्टा वॉज.
अदरवाईज........
.
खरं सांग आदूबाळा हं, झेडपीची नियोजन मीटिंग नाय ना केली फक्त कागदावरची? ;)
23 Jun 2016 - 12:21 am | धनंजय माने
कह्याचा कट्टा आन काय? उगा आपलं ह्ये केलं आन ते केलं. ना बातमी, ना फटु.
आदूबाळ, बुलेट चालवा तुमि. (आठवनार नाय हे पण सांगतो) तद् माताय!
23 Jun 2016 - 12:03 am | जुइ
वृत्तांत आणि फोटो?
23 Jun 2016 - 3:12 am | विजुभाऊ
http://misalpav.com/node/36461