किती लौकर आज उजाडलं बाई
कानडाऊ योगेशू यांच्या या रचनेत रोमांचीत कल्पना आहे. सजणप्रेमाने व्याकूळ झालेली विव्हलता रेखाटली आहे. कुणाचे प्रेम रांगडे असते जसे एखादा जव्हेरगंज "जीव नांगरटीला आलाय" म्हणून हक्काने मागून घेतो किंवा एखादा अल्लड प्रेमाने भारून आपल्या प्रियतमेचे प्रियाराधन करण्यास संकोचतो.
कानडाऊ योगेशूंच्या काव्यातल्या एका प्रतिसादामध्ये प्रचेतस यांनी माझी आठवण जागवली. त्या आठवणीत माझ्या जुन्या आठवणी आठवल्या आणि त्यांच्या आठवणीस जागतांना खालील काव्य लिहीता झालो.
किती लौकर आज उजाडलं बाई
सजणाच्या प्रितीला काळवेळ नाही
काल रातीला असाच आला तो द्वाड
येळी अवेळी यायची त्याला लई खोड
गुलूगुलू बोलत हात हातामधी धरला
हाय....
गुलूगुलू बोलत हातामधी हात धरला
अंगाअंगी रोमांच थरथरला
डोळ्यामधी तो रोखूनी पाही
किती लौकर आज उजाडलं बाई
साडी भरजरी ल्याले मी अंगा
कुंकू कपाळी केले मोती भांगा
कानी कुडी नथनी नाकात
गळा सर ठुशी वाकी दंडात
कमरी पट्टा अन पैंजण पायी
दरएक दागीना (सजण) उतरत जायी
किती लौकर आज उजाडलं बाई
किती हसावं किती पुसावं
गोड गुपीत मुक्यानं कसं सांगावं
अवचिंद पावसानं मन मोर व्हावं
धरती भिजावी पेर्यात रानं पिकावं
मिठीत त्याच्या अंगा शिरशिरी येई
ओठी आठवांचे ठसे राही ठाईठाई
किती लौकर आज उजाडलं बाई
- पाभे
प्रतिक्रिया
21 May 2016 - 6:10 am | प्रचेतस
क्या बात है पाभे...!!!
बेस्ट.
21 May 2016 - 8:06 am | मुक्त विहारि
छान शृंगारिक काव्य...
21 May 2016 - 8:41 am | नाखु
लिहिते झाल्याबद्दल अभिनंदन
आणि त्यांना उद्युक्त केल्याबद्दल कायो आणि प्रचु @@@@ यांचे खास आभार.
पाभे लेखन पंखा
नाखु
21 May 2016 - 8:52 am | प्रचेतस
अवघड आहे.
21 May 2016 - 9:25 am | अत्रुप्त आत्मा
21 May 2016 - 11:52 am | टवाळ कार्टा
इथे ब्रेच जाणकार हैत....काहि औघड वाट्ले त्र विचारा त्यांना =))
21 May 2016 - 12:17 pm | चौकटराजा
काही बरेच हिरवे पारवे जाणकार काही नुकतेच जाणकार झालेले .. तर काही........
21 May 2016 - 12:19 pm | प्रचेतस
आले, हिरवट काका आलेच. :)
21 May 2016 - 9:24 am | अत्रुप्त आत्मा
वाह्ह! लाजव्वाब!
21 May 2016 - 10:29 am | चौकटराजा
मी म्हणतो काही द्वाड मंडळी रहातात त्या भागातून जाताना हे काव्य सुचलं का..... ? भन्नाट आहे.
शब्दबंध छान आहे पण काही जागी धरबंध सुटला आहे. गोड गुपीत मुक्यानं कसं सांगावं या ओळीत
श्लेषबंध चान चान वापरला आहे.
21 May 2016 - 10:33 am | प्रचेतस
लोलबंध.
21 May 2016 - 11:42 am | चतुरंग
पावसाळा आलाच आहे लावणीच्या दिवसात लावणी व्हायलाच हवी पाभे! :)
(लावणीप्रेमी)रंगा खेबूडकर
21 May 2016 - 12:26 pm | चांदणे संदीप
प्रतिसादाच्या प्रेमापोटी,
पाभेंनी, हात धरूनी यावे
बहारदार काव्य बैठकी
रचूनी सादर व्हावे
रसिकसख्यांच्या संगतीने
मन भारूनी जावे!
Sandy
21 May 2016 - 1:00 pm | कानडाऊ योगेशु
माझी कविता निमित्तमात्र ठरली ह्याचा आनंद आहेच.पण केवळ अप्रतिम लिहिले आहे पा.भे साहेब तुम्ही.!
8 Jun 2016 - 12:44 pm | प्रसाद गोडबोले
खुपच सुंदर षृंगारिक कविता !
मस्तच पाभे !
आपला जुना फॅन
प्रगो