बिहारी कणा .. (कुसुमाग्रजांची क्षमा मागून)

उपटसुंभ's picture
उपटसुंभ in जे न देखे रवी...
15 Sep 2008 - 1:07 pm

पहचाना क्या बगुवा हमको दारात आला कोणी.
कपडे होते कर्दमलेले, डोळ्यामध्ये पाणी,

क्षणभर बसला, नंतर हसला बोलला वरती पाहून,
राजभैय्याची माणसं परवा गेली स्टॉलवर येऊन.

गणपतीच्या मिरवणुकीसारखी चार भिंतीत नाचली.
मोकळ्या हाती जातील कशी, घरची मात्र वाचली.

गाडी फुटली, चूल विझली, होत्याचे नव्हते झाले.
तिकिटासाठी म्हणून थोडे पैसे बाकी ठेवले.

कारभारणीला घेऊन संगे, बघा आता पळतो आहे.
उद्याच तिकीट काढतो आहे आणि बिहार गाठतो आहे.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला.
पैसे नकोत पण थोडा एकटेपणा वाटला.

मोडुन पडलाय संसार आणखी मोडू नका कणा.
म्हटलं, "मग सोडा युपी दिन, 'जय महाराष्ट्र' म्हणा..!"

-- अभिजीत दाते

विडंबनप्रकटनमत

प्रतिक्रिया

केवळ_विशेष's picture

15 Sep 2008 - 1:15 pm | केवळ_विशेष

लै भारी भावड्या!!!

ऋषिकेश's picture

15 Sep 2008 - 1:38 pm | ऋषिकेश

भावना पोचल्या.
मात्र कविता मधे मधे चालीत (वृत्तात) मार खातेय असे वाटले

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

अनिल हटेला's picture

15 Sep 2008 - 2:23 pm | अनिल हटेला

लढ बापू ~~~~~

बाकी मतीतार्थ आवडला~~~~

लै भारी.............................
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विसोबा खेचर's picture

15 Sep 2008 - 3:11 pm | विसोबा खेचर

वा!

लै भारी कविता....!

फटू's picture

16 Sep 2008 - 6:49 am | फटू

इथल्या मातीत राहून, इथल्या मातीत उगवणारं अन्न खाऊन त्याच मातीशी बेईमान होणा-यांना अशीच "पळता भुई थोडी" केली पाहीजे...

सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

ग्रीष्म's picture

17 Sep 2008 - 2:06 pm | ग्रीष्म

पहचाना क्या बगुवा हमको दारात आला कोणी.
कपडे होते कर्दमलेले, डोळ्यामध्ये पाणी,

क्षणभर बसला, नंतर हसला बोलला वरती पाहून,
राज ठाकरेची मराठी पोर गेली स्टॉलवर येऊन.

गणपतीच्या मिरवणुकीसारखी नाच नाच नाचली.
मोकळ्या हाती जातील कशी,माझी बायको मात्र वाचली.

गाडी फुटली, चूल विझली, होत नव्हत गेले .
तिकिटासाठी म्हणून हातावर थोडे पैसे त्यांनी दिले.

कारभारणीला घेऊन संगे, बघा आता पळतो आहे.
उद्याच तिकीट काढतो आहे आणि बिहार गाठतो आहे.

हात ज़रा वर जाताच हसत हसत उठला.
अजुन नको मार मला एक प्रश्न मणी दाटला .
आपण सगळे भारतीय मग आमचा काय गुन्हा ?

मोडुन पडलाय आता संसार आणखी मोडू नका कणा.
म्हटलं, "मग सोडा युपी दिन,छट पूजा "
निकशुन सांगा तुमच्या नेत्याना
तुम्ही तिकडे यूपी अन बिहार मधे तुमची आय घाला!!!!!!
इथे तुमचे काय काम नाय
आन जोर जोरात रोज
'जय महाराष्ट्र' म्हणा..!" फक्त 'जय महाराष्ट्र' म्हणा..!"