आशा भोसलेंना मानाचा मुजरा...!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
8 Sep 2008 - 7:52 am

आपल्या अखंड मेहनतीने, जिद्दीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर अक्षरश: हुकुमत गाजवणार्‍या, सूरालयीवर विलक्षण प्रभूत्व असणार्‍या, आश्चर्याने चकित व्हावं अशी गळ्याची फिरत लाभलेल्या, या मराठमोळ्या अवलिया गायिकेला समस्त मिसळपाव परिवारातर्फे ७५ व्या वाढदिसानिमित्त मानाचा मुजरा....!

आशाताई, जियो....!

तात्या.

संगीतसद्भावनाशुभेच्छाअभिनंदन

प्रतिक्रिया

प्राजु's picture

8 Sep 2008 - 8:06 am | प्राजु

गाण्याची परिभाषा
जगण्याची दिशा
वृत्ती ही जिगिषा
म्हणजेच ही आशा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नंदन's picture

8 Sep 2008 - 8:10 am | नंदन

माझ्यातर्फेही हार्दिक शुभेच्छा. परवाच यूट्यूबवर 'प्यार दिवाना होता है'ची आशाबाईंनी गायलेली बंगाली आवृत्ती सापडली. आशाबाईंचा आवाज आणि पडद्यावर तनुजाचा प्रसन्न वावर यामुळे, मूळ गाण्यापेक्षा किंचित अधिकच आवडली. दुवा येथे.

बाकी सप्टेंबर महिना खराच सूरसमृद्धीचा. अजून २० दिवसांनी लताबाईही ऐंशीव्या वर्षात पदार्पण करतील.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्राजु's picture

8 Sep 2008 - 6:59 pm | प्राजु

अरे अतिशय गोड आहे रे हे गाणं. प्रथमच पाहिलं आणि खरंच तू म्हणतोस त्याप्रमाणे ओरिजनल गाण्यापेक्षा अतिशय मधुर वाटलं. आशाबाईंचा विलक्षण आवाज आणि तनुजाचा प्रसन्न वावर यांनी एकदम छान वाटलं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनिल हटेला's picture

8 Sep 2008 - 8:11 am | अनिल हटेला

आशा भोसले !!!!

मराठ मोळी अष्टपैलू गायीका !!!!!

७५ व्या वाढदिसानिमित्त अभिष्टचिंतन !!!!!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मदनबाण's picture

8 Sep 2008 - 8:13 am | मदनबाण

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझं आवडत गाणः-- http://www.youtube.com/watch?v=CKbXQO9v4qw

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

घाटावरचे भट's picture

8 Sep 2008 - 10:57 am | घाटावरचे भट

सर्वांच्या लाडक्या आशाबाईंना आमच्याही हार्दिक शुभेच्छा!!!

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

ब्रिटिश's picture

8 Sep 2008 - 1:41 pm | ब्रिटिश

माजेकरशी पन आश्याबाईंना हार्दिक सुभेच्छा
तेंचा आवाज कदी म्हतारा जालाच नाय

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)