क्रूड ऑईल...

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
13 Oct 2015 - 9:35 pm

झाले पाठ सप्त शती चे थकूनं गेला जीव
आता जाई चरावयासी mess वरं हा जीव

रोज रोजची सोयाबीन भाजी खाऊन झाली गोSSSड
जुनाSSssट शेवगा बीजटणकी टाळू वरला फोड

चपात्यांचे रुमाल येती मूळचे पापड भाऊ
मेसवाले फेसं आणिती?तरी किती ते खाऊ!!!? https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ( दुत्त दुत्त! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif )

कोशिंबीरिचि क्षणात भाजी ..भाजीची कोशिंबीर
भातामध्ये सोडा इतुका..दूध घालता खीरं

ना हे अन्न , ना पेट्रोलं, केवळ क्रूड ऑईलं
यंत्र चालते करता करता जिरून ते जाईल

चला गड्यांनो मिटतो पाने दिवस आजचा बंद!!!
थकलो मी या परि-पाठांना तरि तो मुळचा छंद!

झाले आता ऑईल भरुनी कविताहि लिहून झाली
तुमची माझी रोज रोजची गै गै ची वेळ आली!!! ;)

तस्मात्...आता गै गै गै गै गै ... इत्यर्थे Good Night!
===०===०===०===०===०===०===०===०===०===०

आरोग्यदायी पाककृतीहास्यकरुणसंस्कृतीकवितासमाज

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

15 Oct 2015 - 9:30 am | प्रचेतस

नै ओ.
आम्ही रांगेत आहोत. बरीच भक्त मंडळी नंबर लावून उभी आहेत असे कळते.

श्रीरंग_जोशी's picture

15 Oct 2015 - 9:32 am | श्रीरंग_जोशी

ब्रं ब्रं. यील यील, तुमचा बी न्म्बर यील. तोबर पुस्प्गुच घीवून ठीवा.

श्रीरंग_जोशी's picture

15 Oct 2015 - 10:05 am | श्रीरंग_जोशी

तुम्हाला मांडी घालून दुचाकी चालवता यायला हवी.

प्रचेतस's picture

15 Oct 2015 - 10:06 am | प्रचेतस

ते फक्त त्या गुर्जींचाच युएसपी आहे.
आमच्यासारख्या पामरांना ते जमणे नोहे.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Oct 2015 - 11:06 am | अत्रुप्त आत्मा

आणि जमवायला गेलं तर आगोबा त्याच्या पल सर वरुण सरुन बुदुक्कन पडेल! :-D

नाखु's picture

15 Oct 2015 - 9:31 am | नाखु

"प्रतीक्षा यादी पुढे सरकत नाही" असे पुणे कट्ट्यावर चिमण बॅट्याला सांगताना यमनने ऐकले असावे असा पगला गजोधरचा समज आहे अशी कुजबूज अभिजीत (अहलुवालीया नव्हे तर अवलिया) आणि प्रशांत (मिपाचे हाडावैद्य) यांच्यात चालली होती असा काहीसे स गा उर्फ धन्या श्री रा रा ५० फक्त यांना सांगताना आमच्या खास वार्ताहराने सांगीतले.

नंतरच्या खुलाश्याने सर्वांचे र्ह्स्व/दीर्घ शंका निरसन झाले.

ती प्रतीक्षा यादी हॉटेलात जेवणासाठी ताटकळलेल्या बुभुक्षीत जनांची होती हा निव्वळ योगायोग आहे याची नम्र नोंद घेणे.

पैसा's picture

15 Oct 2015 - 9:50 am | पैसा

बिचारे बुवा! आता खरी वैजू आणा एक कुठूनही शोधून!

कंजूस's picture

15 Oct 2015 - 10:01 am | कंजूस

लेखकाची/कवीची प्रत्येक कलाकृती त्याच्या वरच शेकणार असेल तर आपण तो कलाकृती जन्मालाच नाही घालणार आणि आपण त्या आनंदितास मुकु शकतो.-----दिव्य मराठी.

नाखु's picture

15 Oct 2015 - 10:06 am | नाखु

आठवले तो दिव्य आय्डी भूमीगत झाला काय?
बाकी कंजूस काकांचा प्रश्न ही नक्कीच दखलपात्र आहे.
स्वगतः चला शंभरीला हातभार लावल्याबद्दल काकांचे अभिनंदन.

कविटेपेक्षा जास्त लुल्लूलुलु प्रतिसाद वाचून एक मिपाकर म्हणून

..
.
..
.
.
.
.
.
.
लै भारी वाटलं बगा!

जेपी's picture

15 Oct 2015 - 10:48 am | जेपी

शेंच्युरी...
सत्कारात काय देऊ???

एक क्रुड ऑइलचा डबा द्या. खर्च "बुवा फॅन क्लबकडून(मंजूर करुन्)घ्या..

बुवा फॅन क्लब संस्थापक सदस्य...