छि _ ल,
पचकन थुंकल्यासारखी ती शिवी त्याने दिली,
एकदा... दोनदा... अनेकदा...
मन भरेपर्यंत.
तिथेच उभ्या असलेल्या मला ते ऐकून अंगावरून काहीतरी गिळगिळीत सरपटत गेल्यासारखं वाटत होतं.
श्रीगणेश चतुर्थीच्या आदला दिवस. रस्त्यांवर भरपूर ट्रॅफिक, गोंधळ. इतर पर्याय नसल्याने आणि
लांब जायचे असल्याने पीएमपीएमएलने प्रवास करावा लागणार होता.
मनपाला बसमध्ये चढले, खचाखच गर्दी. आम्ही ४-५ जणी बसच्या डावीकडील बाजूस लेडीजना उभे राहण्यासाठी
जागा असते तिथे थांबलो होतो, बस थोडी पुढे गेली असेल तोवर मागून तिघांचं एक टवाळ टोळकं धक्काबुक्की
करत पुढे आलं. हिंदी भाषा बोलण्याच्या पध्दतीवरून वरून युपी-बिहारी वाटत होते, त्यातील एकाने भरपूर घेतली
होती (सुवास पसरला होता), त्याला धड सरळ उभंही रहता येत नव्हतं, त्याचं विमान टेक-ऑफ करून ढगांपल्याड
पोचलेलं सहज कळत होतं.
हे लोक सरळ लेडिज जवळ येऊन रेलू लागले, अविर्भाव असा की बसच्या धक्क्यांमुळे चुकून तसं होतंय,
आम्ही अजून डावीकडे सरकत होतो पण आता सरकायला जागाच नव्ह्ती.
तिथल्या एका मुलीने गोडीत त्यांना पुरूषांच्या रांगेत उभे राहण्यास सांगितले, तेवढयापुरतं सरकल्यासारखं
करून पुन्हा त्यांनी तोच प्रकार चालू ठेवला, बळेच धक्के देण्याचा. तो पायलट यात आघाडीवर होता.
इतर लोक नेहमीप्रमाणे सोयिस्कररीत्या बघ्याची भूमिका घेऊन गंमत बघत होते. पुढचे एक आजोबा त्याला
समज देत होते तर तो त्यांनाच बुढ्ढा क्या बक रहा है इ. अचकट विचकट शेरे मारायला लागला.
अशावेळेस स्त्रिया जास्त बोलू शकत नाहीत कारण समोरचा चिडून काय करेल, बोलेल याचा नेम नसतो,
त्यामुळे मी दुर्लक्ष करत होते, त्यांच्याकडे पूर्ण पाठ करून मध्ये बॅग घेऊन उभी राहिले होते.
कुठे झाशीची राणी बनावं आणि कुठे शांत राहून दुर्लक्ष करावं हेही आपल्याला कळलं पाहिजे असं माझं
सरळमार्गी मत. त्या मुलीलाही मी समजावत होते की सांगून सुधारणार्यांपैकी ते लोक नाहीत,
उगीच नादी लागू नको, पण तीही हट्टाला पेटली होती. बोलता बोलताच तिने ओढणी पूर्ण चेहर्याला घट्ट बांधून
घेतली होती, माझाही स्कार्फ होताच.( साध्याशा स्कार्फ मुळेही काहीवेळेस किती आश्वासक, सुरक्षित वाटतं
ते अशा चेहर्यावर स्कार्फ, स्टोल इ. बांधणार्या मुलींना नावं ठेवणार्यांना कसं कळावं.)
तो अजून बरळतच होता, खुदको मिस इंडिया समझती है, ये कोई लडकी है क्या..
काहीही फुटकळ कमेंट्स चालू होते. तीही चिडून त्याला धडा शिकवायच्या इराद्याने काही-बाही सुनावत होती.
तेव्हाच कधीतरी डोकं सटकलेला तो शिवी देऊन मोकळा झाला..
छि _ ल, सा _ !!
................
................
त्यानंतरही अजून काही बोलण्यासाठी, लक्ष वेधून घेण्यासाठी तो माझ्या हाताला स्पर्श करू पहात होता.
मी आपल्याच संयमाची परिक्षा पाहत त्याच्याकडे ढुंकूनही न पाहता स्थितप्रज्ञ उभी..
त्यानंतर मात्र सगळ्यांनी आरडाओरडा सुरू केला आणि कंडक्टरला त्या तिघांना खाली उतरवण्यास भाग पाडले,
एवढा वेळ मजा बघणार्या पब्लिकनेही आता त्यांना पुढे ढकलून उतरवले, एकदाची बस पुढे निघाली.
ती मुलगी शेजारील मुलीला तिने अशा किती लोकांना कसं सरळ केलं त्याचे किस्से सांगू लागली होती.
माझ्या कानात मात्र राहून राहून ती शिवी घुमत होती, अंगावर अॅसिड ओतल्यावर कसं वाटत असेल
तसं काहीसं ते शब्द कानावर पडल्यावर वाटलं होतं..
याआधी फक्त चित्रपट, पुस्तके, टिव्ही इ.वर ऐकलेलं एवढया जवळून प्रत्यक्ष ऐकण्याचा अनुभव पहिलाच.
इतकी वाईट शिवी देण्यामागे तसंच काही कारण असावं तर तेही नव्हतं..
कोणासाठी होती ती शिवी ?
त्याला विरोध करणार्या त्या मुलीसाठी, माझ्यासाठी, बसमधील इतर महिलांसाठी ?
पूर्ण स्त्रीजाती साठीच कदाचित..
काय नव्हतं त्या शिवीमध्ये ?
राग, तिरस्कार, विखार, वासना ?
सगळंच, त्याशिवायही अजून काही..
त्याच्यात आणि बाकी लोकांत असणार्या सामाजिक, आर्थिक, मानसिक, शैक्षणिक सर्वच बाबतीतील
विषमतेमुळे आलेले, वर्षानुवर्षे साठलेले कुठले कुठले गंड त्या एका शिवीतून बाहेर पडले होते.
त्या क्षणी मनात चमकून गेलं ते १६ डिसे, निर्भया प्रकरण. त्या घटनेनंतर, एक व्यक्ति दुसर्या व्यक्तिशी
इतकं निर्दयी, कॄर, भावनाशून्य रित्या कसं वागू शकते हा प्रश्न कायम पडायचा, त्याचं उत्तर थोडंफार
मिळाल्यासारखं वाटलं. दोन्ही घटनांमध्ये इतर काहीही समान नाही, फक्त एकच - मनोवृत्ती.
वर्षानुवर्षे ठाकून ठोकून डोक्यात फिट्ट बसवलेली तीच ती टिपीकल पुरूषी मनोवृत्ती जी अशा लोकांमधे स्त्रियांबद्दल पराकोटीचा तिरस्कार उत्पन्न करते. स्त्रीयांना कायम तुच्छ, कमी लेखणारी, त्यांनी विरोध केलेला जराही न खपणारी मानसिकता. त्यांनी कायम घराच्या चार भिंतींआड रहावं, सदा सर्वकाळ कामाला जुंपून घ्यावं, काहीही बोललेलं,
मारलेलंही चालवून घ्यावं, पुरूषांसमोर आवाज चढवू नये, बाहेर पडू नये, नौकरी करू नये, परपुरूषांशी बोलू नये,
जास्त शिकू नये, जास्त बोलू नये, जास्त विचार सुध्दा करू नये..
एक ना दोन हजार बंधन घालणारी मानसिकता.
अर्थात हे सरसकटीकरण नाही.
समाजातील काही ठराविक वर्गांतील ठराविक लोकांचीच अशी मनोवृत्ती असेल.
त्यावेळी मला अशा समाजात राहणार्या स्त्रियांसाठी वाईट वाटत होतं ज्यांच्यासाठी या आणि याहून वाईट
शिव्या ऐकणे रोजचेच असेल, नेहमीच्याच शिव्या आणि मारहाणीने ज्यांच्या संवेदना बधीर झाल्या असतील.
त्याचवेळी या विचाराने हायसं वाटत होतं की सुदैवाने आपला जन्म एका सुशिक्षित, सुसंस्कृत परिवारात झालाय,
आपण अशा समाजात वावरतो जिथे साधारणपणे अशी प्रवृत्ती लांबपर्यंत दिसून येत नाही,
जिथे आपल्याला हवे तसे जगण्याचे स्वातंत्र्य आहे.
जिथे आपल्याला बर्यापैकी सन्मान मिळतो, कमी लेखलं जात नाही,
जिथे पुरूष स्त्रियांबद्दल टोकाचे वाईट विचार करत नाहीत,
जिथे सामान्यतः नवरे-बायकांना, मित्र-मैत्रिणींना, भाऊ-बहिणींना, पुरूष स्त्रियांना रिस्पेक्ट देतात,शिव्या नाही.
म्हटलं तर ही एक किरकोळ घटना, पण डोक्यात खूप सारे विचार, त्रास, मनस्ताप देऊन गेली.
अर्थात हा काही एकमेव प्रसंग नाही, असे अनेक नकोसे अनुभव येतच असतात,
फक्त त्या एका शिवीमुळे हा अनुभव जास्त जिव्हारी लागला, एरवी चुकूनही कधी मनात येत नाही
तो एक स्त्री असल्याबद्दलचा पश्चात्ताप एका क्षणापुरतं का होईना, जाणवून गेला..
इतकंच..
प्रतिक्रिया
13 Oct 2015 - 2:29 pm | आनंदराव
स्त्रीत्व हा तुमचा प्रमाद नसून ती एक अनमोल देणगी आहे.
१००% सत्यवचन !
(१० महिन्यांच्या मुलीचा बाबा - आनंदराव )
13 Oct 2015 - 4:13 pm | पिलीयन रायडर
अरे वा!!
"काय उपयोग झाला एवढा वाद घालुन" आणि "आता आवरायलाच हवं" वगैरे झालं तेव्हा वाटलं की संपलं असेल...
चालुच आहे की अजुन!
13 Oct 2015 - 4:49 pm | चतुरंग
याचाच अर्थ अजूनही ही समस्या धुमसती आहेच किंबहुना तिची व्याप्ती आता वाढली आहे असे दिसते.
बहुसंख्य भारतीय पुरुषांची मनोवृत्ती ही स्त्रियांसोबत अत्यंत हीन दर्जाची असते हे मी स्वतः अनेकवेळा अनुभवलेले आहे.
७-८ वर्षांच्या मुलींपासून ते ५० वर्षांच्या महिलेपर्यंत कुणालाही कुठेही टार्गेट करायला काहीही न वाटणारे लोक बघितलेत. केस पिकलेले मध्यवयीन पुरुषही यात मागे नाहीत. उलट कित्येकदा वाढत्या वयाचा गैरफायदाच उठवतील! बर्याचवेळा अत्यंत सटल असणार्या गोष्टीतून त्रास दिला जातो. चांगल्या दिसणार्या महिला कर्माचार्याला वारंवार केबिनमध्ये बोलावून घेणे, तिच्या डेस्कजवळ जाऊन सतत बोलणे, तिला काहीतरी फेवर करत राहणे इ. दिवसातल्या दहापैकी सात वेळा असले लोक समोर आले तर सरसकटीकरण होणे स्वाभाविक आहे. मनामध्ये साठत राहिलेला त्रास कधीतरी बाहेर पडणार ना?
घरातून पाऊल बाहेर पडताक्षणीच किंवा कित्येकदा घरापासूनच तुम्हाला असल्या मनोवृत्तीचा सामना करावा लागत असल्याने ताकही फुंकून पिणे याला अनुसरुन सगळेच परके तसे आहेत असे मानणे सोयिस्कर पडू लागते कारण सारखी सारखी विषाची परीक्षा कोण घेत बसणार? या सगळ्याला महत्त्वाचे कारण म्हणजे भारतीय समाजात मुलांना वाढवले जाणे हे अतिशय लिंगभेदाधारित पद्धतीने होते. कंडिशनिंगचा भाग खूप मोठा असतो. स्त्रीचं दुय्यम असणं हे अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून सातत्यानं अधोरेखित होत राहतं. मुलं असं बघतंच मोठी झाली की त्यांना ते नैसर्गिक वाटू लागते. बदलत्या काळानुसार फक्त शिक्षण आणि नोकर्यांचे स्वरुप बदलेले असले तरी मनोव्रुत्ती बदललेली नाही.
शिवाय सेक्सबद्दल असलेला ट्बू आणि त्याचे दमन हा एक वेगळाच आणि गहन कंगोरेदार विषय आहे त्याचाही सहभाग यात आहे.
मी अमेरिकेत गेली कित्येक वर्षात कोणत्याही बिगर अशियाई माणसांना अशा कमेंटा पास करताना ऐकलेले नाही ना माझ्या बघण्यात कधी कोणाला धक्के वगैरे मारलेले दिसलेत. अगदी पब्लिक ट्रान्सपोर्टच्या गर्दीच्या वेळीसुद्धा लोक नीट वागतात. गैर वागणूक दिसली तर बायकाच जाब विचारतील ही खात्री, त्याला लोकांचा सपोर्ट आणि पोलिसांचा बर्यापैकी असलेला वचक याला कारणीभूत आहेच. याचा अर्थ असे प्रकार होतच नसतील का? तर नाही, होत असतीलच परंतु भारतात जेवढे निर्ढावलेपणाने कुठेही आणि कधीही हे घडू शकते तितके तर नक्कीच नाहीत.
तेव्हा बदल घडवायचा असेल तर मुलांमध्ये लहानपणापासून घडवावा लागेत आणि तो नुसता बोलून नाही तर मोठ्यांनी तसे उदाहरण पदोपदी ठेवूनच. शिवाय स्त्रियांचे मानसिक सबलीकरण करणे हेदेखील गरजेचे आहे. अन्यथा हे संपणे जवळपास अशक्य आहे! :(
13 Oct 2015 - 4:56 pm | मीता
++++++++++++१
13 Oct 2015 - 5:12 pm | पिलीयन रायडर
अगदी मनापासुन +१११११११
13 Oct 2015 - 5:14 pm | जातवेद
अगदी बरोबर.
13 Oct 2015 - 5:21 pm | बॅटमॅन
पूर्ण सहमत चतुरंगराव.
13 Oct 2015 - 5:40 pm | बिपिन कार्यकर्ते
+१
:)
13 Oct 2015 - 5:59 pm | नीलमोहर
१००% सहमत
13 Oct 2015 - 9:52 pm | प्रभाकर पेठकर
चतुरंग साहेब,
भारतात गुंडगिरी ही राजकारण्याच्या पाठिंब्यावर जोपासलेली आहे. एक राजकारणी असतो तो अनुयायाच्या जीवावर/संख्येवर शक्तीप्रदर्शन करून तिकिट मिळविणे, निवडणूका लढविणे, निवडून येणे, त्यात काळापैसा वापरून आपल्या कार्यकर्त्यांना 'पोसणे', 'खाऊ-पिऊ' घालणे आदी करीत असतो. तो निवडून आला की त्याला अधिक अधिकार प्राप्त होतात. अफाट पैसा आणि सत्ता हाती आल्यावर ज्यांच्या जिवावर तो निवडून आलेला असतो आणि पुन्हा पुन्हा निवडून यायचं असतं त्या त्याच्या कार्यकर्त्यांना तो खुश ठेवतो. त्यांनी कांहीही केले तरी, त्यांना पोलीसांचा उपसर्ग होणार नाही ह्याची काळजी तो घेतो. खंडण्या वसूल करणे, आपापल्या एरियात दादागिरी करणे (लोकं आपल्याला घाबरतात ही सुखावह भावना असते), छोटेमोठे गुन्हे करूनही पकडले न जाता (राजकिय नेत्याच्या पाठिंब्यावर) उजळ माथ्याने वावरणे ह्याने त्या कार्यकर्त्याला 'माझ्या एरियात माझीच सत्ता आहे' असा कैफ निर्माण होतो. असे कार्यकर्ते अजून गुंड पाळतात त्यांचा समाजाला भयंकर त्रास होतो. स्त्रीयांना तर अपरिमित त्रास होतो. अशा वेळी कोणी पुरुषही मदतीला पुढे येऊ शकत नाही, कारण बाईवर हात टाकणं अजूनही गंभीर गुन्हा आहे. सरकारला, पोलीसांना जनक्षोभाला सामोरे जावे लागते. पण पुरुषाला भर रस्त्यात लाथाबुक्क्यांनी झोडपणे, प्रसंगी चाकूने भोस़कणे किंवा किमान त्याच्या घरच्या स्त्रीयांना त्रास देणे, त्यांचे जगणे कठीण करणे असे उपाय योजले जातात. त्यातून आवश्यक इतका जनक्षोभ निर्माण होत नाही. पोलीस, सरकार ह्या घटनांकडे दुर्लक्ष करतात. ह्या सर्वाला घाबरून पुरुषही आतुन कितीही उसळला तरी कृती करायला डगमगतो. (कारण ह्या गुंडांना असलेले पोलीसांचे आणि राजकिय कार्यकर्त्याचे पाठबळ).
ही असली राजकारण्यांनी पोसलेली दुर्जनांची जमातही तुम्ही तिथे पाहिली नसेल. आपल्याकडेही ह्या राजकारण्यांवर, पोलीसांवर कडक कारवाई झाली तर इथेही चित्र बदलू शकेल.
बाकी घरचे संस्कारही महत्वाची भूमिका निभावतात हेही तितकेच खरे.
13 Oct 2015 - 9:55 pm | मांत्रिक
+११११ पेठकर बुवा!!!
13 Oct 2015 - 11:03 pm | किसन शिंदे
https://youtu.be/6hoLR4dE2iE
द डे आफ्टर एव्हरीडे! अनुराग कश्यपने दिग्दर्शित केलेली शाॅर्टफिल्म आठवली.
14 Oct 2015 - 10:24 am | कैलासवासी सोन्याबापु
मी आधी स्वतःहून मदत करीत असे स्त्रियांस आजकाल पुर्ण बंद केले आहे! काही काही खुप कडु अनुभव घेऊन, कोणी मागितली मदत तरच करतो आजकाल!
14 Oct 2015 - 10:46 am | तर्राट जोकर
दुसरी बाजूही येऊ द्या समोर बापुसाहेब...
14 Oct 2015 - 11:18 am | कैलासवासी सोन्याबापु
थोड़े थेट शब्द लिहितो आहे,माफ़ी असावी विशेषतः अनाहिता भगिनी मंडळ
दिल्ली एअरपोर्ट ची आहे घटना (बहुदा मी आधी ही जालावर ही घटना मांडली आहे ती कुठल्या संस्थळावर ते आठवेना म्हणुन परत मांडतो आहे)
माझी नुकती इंगेजमेंट झाली होती, अन मी सिक्किम ला परत निघालो होतो तेव्हा मला एअरपोर्ट ला सोडायला माझी वागदत्त वधु सुद्धा होती (माझ्यासोबत सुद्धा एक स्त्री होती) दिल्ली एअरपोर्ट ला ग्राउंड लेवल (डोमेस्टिक टर्मिनल) ला एकठिकाणी टॅक्सी थांबवली आम्ही कारण तिथून लाउन्ज जवळ पडत असे , इथे आमच्या समोर एक 25शी ची स्त्री किंवा मुलगी एका टॅक्सी मधुन उतरली , तिने टॅक्सी वाल्याला पैसे दिले तेव्हा त्याने बहुतेक तिला स्पर्श केला, तर ती घाबरुन ओरडली, माझा स्वाभाव काम अन एकंदरित संस्कार पाहता अन बायको (होणारी) सोबत असल्या कारणे मी तड़क तिथे धावलो, त्या विसिबली घाबरलेल्या स्त्री ला मी म्हणले
"मॅम आप प्लीज डरिये नहीं, please if u can stick with us we'll help you to the upper level"
ह्यावर त्या सबले ने मला दिलेले उत्तर आजही कान गरम करते
she said (exact words)
"mind your own business you motherfucker and stop getting into my pants"
mentioned here की मी तेव्हा माझ्या यूनिफार्म मधे होतो, (केमोफ्लाज नाही प्रॉपर फॉर्मल यूनिफार्म), माझ्यासोबत माझी बायको ही होती, अश्या परिस्थितीत what was wrong in my offer to escort a visibally distressed lady to a relatively safer environment that Too when I was accompanied with another young woman!
तेव्हापासुन ही उमेदवारी मी सोडली, अपल्याकडून जनरलायझेशन होऊ नये म्हणुन स्वतः आजही ओपन आहे मदतीला फ़क्त आता एकच कंडीशन आहे THE LADY HAS TO ASK.
कारण फ्रैंकली मी एक साधा माणुस आहेच मला ही माझी इज्जत प्यारी आहे, त्या बाई ने ओरडून वरची दिव्य वाक्ये बोलल्यावर आजुबाजूच्या लोकांच्या नजरा त्या टॅक्सी ड्राईवर चे कुत्सित हसु मी कधीच विसरु शकणार नाही , नशीब माझ्यासोबत बायको होती! नाहीतर काय काय ऐकावे पहावे झेलावे लागले असते ह्याच्या कल्पनेनच कसंतरी होतं राव
14 Oct 2015 - 11:26 am | तर्राट जोकर
खरंच संतापजनक आहे. प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला आणी डोक्यात तिडीक गेली....
14 Oct 2015 - 11:36 am | नाखु
सहमत
तरी बाप्पू धाग्याचा अभिनिवेश सगळे पुरुष मेले वाईट्टच ( बघे मेले,@@@@,&&&&,$$$$)
याच वेळी आपल्या भावाला/वडीलांना/नवर्याला (असला तर्)/मित्राला बाप्पूंच्या प्रसंगातून जावे लागले तर नक्की काय वाटेल ते वाचायला नक्कीच आवडेल.
बाप्पूच्या प्रतीसादाचाही पंखा
अनुभवी नाखु
14 Oct 2015 - 11:33 am | पिलीयन रायडर
अनुभव वाईटच आहे.. आणि त्यामुळे तुमची ही प्रतिक्रिया समजु शकते.
पण असं बोलु शकणारी बाई.. ते ही वर्दी मधल्या माणसाला.. डोक्यावर पडलेली असावी. सिरियसली..
त्याबाईच्या वतीने मी सॉरी म्हणते.. पण अशाही बायका आहेत.. त्यामुळे जेन्युइनली ज्यांना मदत हवी आहे त्यांना ती मिळत नाही..
14 Oct 2015 - 11:44 am | कैलासवासी सोन्याबापु
अहो तै ,
तुम्ही कश्याला सॉरी म्हणता आहात, मी बोललो न जनरलायझेशन मी तरी करणार नाही तस्मात् हे असले काही नकोच,माझा मुळ मुद्दा वेगळा आहे थोडा
मी हे ही मानेल एकवेळ की ती स्त्री ऑलरेडी कुठल्यातरी एंग्जायटी मधे असेल, होते असे वर्किंग वीमेन सोबत, पुरुषांस प्रॉब्लम हा होतो की (किंवा वैयक्तिक मला म्हणा आजकाल) स्त्री ला मदत करायला जावी तर तिने जेन्युइन ऑफर मधे असले काही शोधता पंचायत व्हायची, शिवाय उमेदवारी करताना टाइम क्रिटिकल असतो कारण शुद्ध हरपलेले बेवड़े किंवा संस्कारहीन लोक इम्पल्स मधे काय करतील ह्याची शाश्वती नसते, अश्यवेळी मला पर्सनली मॉरल डाइलेमा होतो मधे पडावे तर वरती उल्लेखलेले कडु घोट ही मिळू शकतात न पडावे तर सामाजिक सौजन्य नसणे अन नाकर्तेपणा चा शिक्का बसायची भीती! असे काहीसे, ह्यात परत एकदा प्लीज तुम्ही माफ़ी वगैरे नका मागु
14 Oct 2015 - 12:56 pm | प्रीत-मोहर
काय बाई आहे म्हणजे होती. !!!!
वर्दीवाला माणुस बघितलाच की आधी रिस्पेक्ट्च येतो डोळ्यात त्या माणसासाठी.
14 Oct 2015 - 11:47 am | पैसा
असे नमुने सगळ्याच कॅटेगरीत असतात. आपण कोणाला शक्य असेल आणि विनंती केली तरच मदत करावी हे मलाही पटलेले आहे. बरेच प्रसंग सांगू शकेन.
मात्र अनाहिता भगिनीमंडळाची माफी मागायची गरज नाही! आम्ही जे चूक ते चूकच म्हणतो.
14 Oct 2015 - 11:51 am | कैलासवासी सोन्याबापु
गो ताय,
शिवराळ भाषा अन शिव्यारत्नमंडीत प्रतिसाद होता न हा, तो साधारण संकेतास अनुसरुन नाही माझ्यामते म्हणून माफ़ी मागितली!
14 Oct 2015 - 11:57 am | पैसा
भाषा तिने वापरली. इथे सांगायचे तर लिहावे लागणारच ना! पिरा म्हणते तसेच, युनिफॉर्ममधल्या माणसाला असली भाषा लोक वापरू शकतात हे नाहीतर आम्हाला कसे कळणार होते? पण प्रसंग दिल्लीतला. तेव्हा काय बोलावे? सगळ्यात एक्स्ट्रीम नमुने दिल्लीतच भरलेले असावेत.
14 Oct 2015 - 12:08 pm | उदय के'सागर
खरंच संतापजनक अनुभव.
माझाही असाच एक सौम्य अनुभव, अर्थात तुमच्या इतका तिखट/तीक्ष्ण नाही.
एकदा सोसायटीच्या लिफ्ट मधून बाहेर पडलो तर एक मुलगी तिचं मोठ्ठं लगेज म्हणजे त्या टिपीकल २३ किलोच्या २ बॅग्ज लिफ्टच्या जवळच्या पायऱ्यांवरून चढवत होती लिफ्ट मधे ठेवण्यासाठी. पण त्या जड बॅग आणि त्यात लिफ्टचं सारखं बंद होणारं दार ह्यामुळे तिची तारांबळ उडत होती, चिडचिड होत होती. ते पाहून मी लगेच तिच्याजवळ जाऊन तिला मदत करावी म्हंटलं. अर्थात मी विचारलंही नाही मदत करु का असं, डायरेक्ट म्हणालो 'वेट अ मिन, आय विल हेल्प यु'.. पण बाईंचा इगो जाम दुखावला. ती लगेच माझ्याकडे संतापाने पाहून मला हातानेच मी आहे तिथेच थांबायचा इशारा देऊन 'आय विल मॅनेज' म्हणाली आणि लगेच पुन्हा तिच्या कामात मग्न झाली. मला तेव्हा इतका राग नव्हता आला पण त्यानंतर ती पुन्हा एक-दोनदा दिसली सोसायटीत तर तिची नजर वॉज लाईक "मवाली कुठला..." ...आय वॉज लाईक....व्हॉट द फक????
त्यामुळे, तुम्ही म्हणता त्याच्याशी सहमत :
पण निलमोहर ह्यांनी जो अनुभव शेअर केला आहे लेखात, त्या बस मधे मी असतो तर नक्कीच त्यांची किंवा इतर मुलींची परवानगी न घेता, विचार न करता त्या पुरुषांना समज दिली असतीच आणि वेळपडल्यास एक तरी सणसणीत लगावलीच असती. आणि हे सगळं गाडीतल्या स्त्रीयांना त्रास होतोय म्हणून किंवा त्या प्रतिकार क्षमतेवर शंका घेऊन हे नक्कीच केलं नसतं, मला ते पटलं नसतं आणि त्याचा त्रास झाला असता म्हणून मी ते केलं असतं (आणि अन्यायाविरुद्ध अशी हिंसक भूमिका अनेकदा घेतलेलीही आहे).
14 Oct 2015 - 12:22 pm | पिशी अबोली
सोन्याबापू,
अतिशय चीड आणणारा प्रसंग आहे. पिराताईने म्हटल्याप्रमाणे हे असं वागणारी मुलगी डोक्यावर पडलेली असली पाहिजे. असे अनुभव आलेले लोकही स्वतःहून मदत करण्यापूर्वी दहा वेळा विचार करत असतील हे नक्कीच पटलं. ती मुलगी माझ्यासोबत माझी मैत्रिण म्हणून असती तर मला तिच्या वागण्याची प्रचंड शरम वाटली असती आणि तिला तिथल्यातिथे सुनावलंही असतं. अतिशय हीन वृत्ती आहे ही.
14 Oct 2015 - 7:48 pm | असंका
फारच धक्कादायक अनुभव .... वाचून फारच वाईट वाटलं. काय भावनेने आपण काय करायला जातो आणि काय घेऊन परत येतो!! अकल्पित आहे सगळं....
शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
( मिपावर या असल्या शिव्या वाचून जरा धक्काच बसला. पण मग तुम्ही ते माफी त्याच्याचसाठी मागितल्याचा उल्लेख आला. त्या शिव्या नसत्या तर नक्की किती घाणेरडा प्रकार घडला ते लक्षात आलंच नसतं हे पण खरं.)
14 Oct 2015 - 10:57 am | बिपिन कार्यकर्ते
"कोणी मागितली मदत तरच करतो"
हे केवळ स्त्रियाच नव्हे तर एकंदर सर्वांकरताच करावे.
14 Oct 2015 - 12:46 pm | वेल्लाभट
असे अनुभव धक्कादायकच. पण तरीही मदत करताना माझ्याकडून तरी ठरवून केली नाही असं होत नाही. मला वाटल्यास माझ्याकडून ती क्रीया होते. सहज. जसं एक दिवस जेंव्हा एका मुलीची स्कूटर घसरली आणि आजूबाजूने १० गाड्या जाऊनही एकही थांबली नाही तेंव्हा मी आपसुक तिथे गेलो आणि मदत केली.
पण असे अनुभव येतच नाहीत असं नाही. साधी गोष्ट; अगदी रस्ता क्रॉस करताना व्यक्ती दिसल्यावर गाडी थांबवून जायला दिलं तरी १० पैकी ७ जण अॅक्नॉलेज करतात पण ३ जण का कोण जाणे 'कस्सा थांबवला' असे आविर्भाव चेह-यावर आणून बघतात. चालायचंच.
14 Oct 2015 - 11:37 am | प्रसाद गोडबोले
माझा अणुभव : एकदा पुण्याला चाललो होतो गिरीजा सोबत कात्रजच्या बस मधे प्रचंड गर्दीत ! जवळपास माझ्या आई वडीलांच्या वयाचे एक जोडपे माझ्या शेजारी येवुन उभे राहिले , मी स्त्रीदाक्षिण्य म्हणुन लगेच उठायला लागलो तर शेजारच्या सीटवर बसलेल्या गिरीजाने लगेच ऐकवले , " उठु नकोस , तुझी सीट रीझरव्ह्ड नाही !" मी आश्चर्यचकित झालो पण तरीही स्वतः उठुन त्या काकुंना बसायला जागा दिली.
पुढच्या स्टॉपवर त्यांच्या शेजारी बसलेली व्यक्ती उठुन गेली म्हणुन मी परत सीट वर बसावे म्हणुन पुढे सरकलो तर त्या काकु लगेच त्यांच्या नवर्याला म्हणाल्या "ओ बसा बसा लगेच बसा , नाही तर कोण तरी बसेल " , काका लगेच पडत्या फळाची आज्ञा घेत सीट वर घुसले ! आणि दोघे काकाकाकु माझ्या कडे पाहुन फिदी फिदी हसत होते !
मी परत एकदा आश्चर्य चकित झालो ! तसेही वडीलांच्या वयाचा माणुस पाहुन मी जागा दीली असतीच की ! पण ज्याने स्वतः उठुन आपल्याला जागा दीली त्याला किमान विचारायची कृतज्ञता ही त्या काकुंनी दाखवली नाही !
स्त्रीदाक्षिण्य वगैरे सगळा भोंदुपणे आहे , अनाहिता काय अन सनावृता काय , शेवटी सगळी माणसेच ! सगळ्यांचे पाय मातीचेच !!
असो .
गिरीजा माझ्याकडे पहात अन हसत म्हणाली " आय टोल्ड यु , द पीपल , द वर्ल्ड इस अग्लीयर दॅन व्हॉट यु अॅन्टिसिपेट" !!!
14 Oct 2015 - 11:42 am | अभ्या..
प्रगो आणि गिरीजाशी सहमत.
हा अनुभव लैच वेळा आलेला आहे.
14 Oct 2015 - 7:34 pm | स्रुजा
तुम्ही दिलेला अनुभव हा एक सामाजिक असहिष्णुतेचा दाखला आहे. यात अनाहितांचा काय संबंध आहे? का तुम्ही स्त्री दाक्षिण्य अनाहितांच्या बाबतीत दाखवुन थकलात असा काही तुमचा रोख आहे? आणि सनावृत्ता शब्दाचा अर्थ जरा समजावुन सांगाल का प्लीज. कुणी ही सांगावा. मला नीटसा अर्थ कळलेला नाहीये.
14 Oct 2015 - 7:38 pm | बॅटमॅन
जसा अनाहिता हा ग्रूप आहे तसाच सनावृत्ता हाही एक ग्रूप आहे असे कळते.
बाकी निव्वळ अनाहिताचे नाव आले म्हणून लगेच पवित्रा घेतला गेल्याची मज्जा वाटली.
14 Oct 2015 - 7:41 pm | स्रुजा
कुठे आहे सनावृत्ता ग्रुप? पवित्रा तुम्ही घेतलाय , मी नाही. माझा एक साधा प्रश्न आहे की या अनुभवाशी अनाहिताचा काय संबंध? यावर काही मजेमजेत उत्तर आहे तुमच्याकडे?
14 Oct 2015 - 7:48 pm | बॅटमॅन
सनावृत्ता ग्रूप वत्सप्पवर आहे असे कळते.
प्रगो यांच्या अनुभवात उल्लेख आल्याने एकदम भांडायच्या पवित्र्यात प्रश्न विचारलेला पाहून खरेतर हसूच आले तरी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. अनाहिता ग्रूपमध्ये फक्त स्त्रिया असतात तर तूर्तास सनावृत्ता ग्रूपवर पुरुष आहेत. त्यामुळे स्त्री काय किंवा पुरुष काय असे म्हणायचे असावे असे वाटते.
14 Oct 2015 - 8:13 pm | स्रुजा
अहो, प्रश्न कुणाला, तुम्हाला काय कामं धामं नाहीत वाटतं ? मला आहेत त्यामुळे तुमचं पवित्रा म्हणजे काय याविषयी संबोधन करणं मला शक्य असलं तरी फारसं गरजेचं वाटत नाही. प्रगोंनी सांगावं की वरील अनुभवात अनाहितांचा काय संबंध आहे.
सनावृत्ता नावाचा पुरुषांचा ग्रुप आहे का? बर बर, असेल हो असेल. पण तरी "शब्दाचा अर्थ काय" याचं "तो ग्रुप आहे" हे एक हास्यास्पद उत्तर का आलं असेल बरं? हां पवित्रा म्हणजे काय हे नेमकं सुधरत नसेल तर असं होत असावं.
अजुन एक प्रश्न अनुत्तरीत आहे च, वरील अनुभवात अनाहितांचा काय संबंध? संबंध नाही तर मग अनाहिताचा उल्लेख का हा साधा प्रश्न आहे, त्या प्रश्नाला बगल देत तुम्ही माझा पवित्रा काय, मी भांडतेच आहे असले तुमच्या भाषेत "वैयक्तिक उल्लेख" करताय. पण मुद्द्याला मुद्द्याने उत्तर नाही देता आलं की तुम्ही भांडताय, तुम्ही उसळताय, तुमचा पवित्रा पाहुन हसु आलं असे गुद्दे मारणार्याला काय म्हणायचं ? वैयक्तिक हल्ला नाही हा, नाही का? हां तुमचा वैचारीक पवित्रा असेल !! कशाला वाद वाढवताय? मी सरळ प्रश्न विचारला होता, तिरका सूर तुमचा लागला तो ही दुसर्याच कुणाला तरी विचारलेल्या प्रश्नासाठी. हां, आणि माझी काळजी तुम्ही करताय? वाह !! हसायचं असतं का अशा " पवित्र्यासाठी " ? नाही, तुम्ही एक्स्पर्ट दिसताय म्हणुन विचारते.
14 Oct 2015 - 9:51 pm | प्रसाद गोडबोले
हेच म्हणायचे होते !
आधी हा अर्थ पाहु :
http://shabdkosh.raftaar.in/Meaning-of-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A4...
http://dict.hinkhoj.com/words/meaning-of-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%...
अनहित ह्या शब्दाचा अर्थ An ill disposed person असा होतो , शेवटी आकारान्त प्रत्यय लावल्याने त्यातुन स्त्री भाव दाखवला जातो , अर्थात अनाहिता म्हणजे कुटील वृत्तीची दुत्त दुत्त स्त्री , मला भेटलेल्या त्या बस मधील काकु ह्या अशाच कुटील वृत्तीच्या होत्या म्हणुन अनाहिता हा शब्द वापरला .
प्लीज नोट : हा शब्द मी बनवलेला नाही अनेक अगदि ऐतिहासिक काळा पासुन हा शब्द वापरात आहे . अनाहिता ही एक इराणियन पर्शियन देवी होती आणि आपल्या कडे पर्शियन लोकांना असुर मानतात .
https://en.wikipedia.org/wiki/Anahita
अनाहिता ही एक कोळ्यांचीही एक किळसवाणी प्रजाती आहे हे पहा : Anahita punctulata

https://en.wikipedia.org/wiki/Anahita_(spider)
त्या वाईट वागणार्या कुटील काकुंचा उल्लेखही मी सौजन्याने करावा अशी अपेक्षा आहे काय ? मिपा सारख्या सुसंस्कृत स्थळावर शिविगाळ करायला नको म्हणुन त्यातल्या त्यात कमी वाईट शब्द वापरला !!
असो .
हा प्रतिसाद उद्या पर्यंत टिकला तर सनावृता ह्या शब्दाचा अर्थ समजावुन सांगेन ;)
14 Oct 2015 - 10:08 pm | प्रीत-मोहर
माझ्या अल्पमतीप्रमाणे अनहित ला आकारान्त प्रत्यय लावल्यास अनहिता होते अनाहिता नाही .
जाणकार कन्फर्म करतील काय?
14 Oct 2015 - 10:12 pm | पैसा
हेच लिहायला आले होते. प्रतिसादासाठी प्रगो यांना एक पूस्प्गूच. आणि खूप शुभेच्छा!
14 Oct 2015 - 10:16 pm | प्रीत-मोहर
आणि आपल्याकडे एक काना असल्याने / नसल्याने शब्दांचे अर्थ वेगळे होतात.
अनाहिता ही अनाहिता ही एक इराणियन पर्शियन देवी आहे .आणि wikipedia म्हणतो
Only Arədevī (a word otherwise unknown, perhaps with an original meaning "moist") is specific to the divinity. It might have been derived from Arya devi[1] The words sūra and anāhīta are generic Avestan language adjectives,[3] and respectively mean "mighty" and "pure" [4][5] (or "immaculate").[1] Both adjectives also appear as epithets of other divinities or divine concepts such as Haoma[6] and the Fravashis.[7] Both adjectives are also attested in Vedic Sanskrit.[8]
14 Oct 2015 - 10:38 pm | टवाळ कार्टा
कर्माने म्येलास अता =))
14 Oct 2015 - 10:44 pm | टवाळ कार्टा
14 Oct 2015 - 12:54 pm | पिलीयन रायडर
मला एक गोष्ट इथे सिरीयसली सांगायची आहे.
स्त्री काय पुरुष काय.. नमुने सगळीकडेच असतात. चांगले वाईट अनुभव हे येणारच. अब्जावधी लोकांचे दोन सरसकट ग्रुप नाहीच करु शकत आपण. त्यामुळे सोन्याबापु किंवा अधाशी उदय ह्यांना जसे अनुभव आले, तसे अनुभवही अत्यंत सर्रास येतात. जसं पुरुषाला चटकन "आया बहिणी आहेत की नाहीते.." हा प्रश्न विचारला जातो.. तसंच स्त्रीलाही अनेकदा आपला "बाप..भाउ.." अशा प्रसंगातुन जाउ शकतो ह्याची जाणीव असते.. असायला हवी.
पण आपल्या समाजात अजुन तरी स्त्रियांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. वर चतुरंग आणि पेठकर काका इ. च्या प्रतिसदातुन ते व्यवस्थित मांडलेले आहे. अशाने स्त्रिया आधीच तलवारी काढुन फिरत असतात. आणि त्याला पर्यायही नाही. कुणावर विश्वास ठेवायची सोय नाही हे खरंय. परवा मी कॅब करुन घरी आले तर एक तर सतत कुणाला तरी फोन लावला होता, बाकी वेळ हातात मोबाईल वर १०० डायलर मध्ये टाईप करुन ठेवलं होतं. त्या मनुष्यानी मला व्यवस्थित सोडलं. पण सतत सावध रहाणं ही माझीही गरज होऊन बसली आहे. आजुबाजुच्या घटनांनी माझी मनस्थिती तशी केली आहे त्याला माझ्याकडेही पर्याय नाही.
पण असे असताना, समाजात चांगले पुरुषही आहेत ह्याची आम्हाला जाणीव नाही असं अजिबात नाही. पैसाताईने वर म्हणल्या प्रमाणे चुक गोष्टीला आम्ही चुकच म्हणतो. अनाहिताचा मोटो हा सरसकट स्त्रियांना विदाऊट क्वश्चन पाठिंबा देत रहाणे हा नाहीचे.. अनेकांचा असा गैरसमज असला तरीही..
ह्यानिमित्ताने मला चतुरंग, बिका, सोन्याबापु, तर्राट जोकर आणि इतर अनेक पुरुषांना धन्यवाद द्यावे वाटतात की जिथे जिथे एखाद्या स्त्रीला केवळ एखाद्या प्रसंगी मदतीचीच नाही तर एक स्त्री म्हणुन तिचे सामाजिक प्रश्न जाणुन घेण्याचीही गरज होती.. तिथे तुम्ही आम्हाला मदत केलीत. आजकाल केवळ कुणी हे मुद्दे समजुन घेतले तरी पुष्कळ झालं असं वाटतं. आम्हाला त्यावर उपाय काढायचे नाहीचे आणि केवळ कुणीतरी आमच्या व्यथा ऐकुन आम्हाला नुसता सहान्भुतीचा खांदा द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे असं कुणाला वाटत असेलही.. पण अर्थात तो त्यांचा गैरसमज आहे हे नम्रपणे नमुद करते.
सर्वसाधारणपणे स्त्रिचा स्वभाव हा लहान सहान मुद्द्यांमध्ये गुंतुन रहाण्याचा असला तरी प्रश्नांना उत्तर शोधायची गरज तिला वाटत नसती तर आजही आम्ही चुल आणि मुल ह्यामध्येच अडकुन पडलो असतो. त्यामुळे अशी काही विधानं करुन प्लिस स्त्रियांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करु नका. त्यांच्या पद्धती तुमच्यहुन वेगळ्या असल्या तरी निरुपयोगी निश्चित नाहीत.
इथल्या सर्वांनी मतभेद असुनही का होईना, समस्या आहे हे मान्य केलं आणि त्यावर विचार तरी केला. त्याबद्दल धन्यवाद!
14 Oct 2015 - 3:27 pm | बिपिन कार्यकर्ते
भापो! :)
_/\_
14 Oct 2015 - 2:09 pm | आनंदराव
पिरा यांच्या या प्रतिसादामधे लेखाचे आणि चर्चेचे सार सामाव्वले आहे
14 Oct 2015 - 2:50 pm | तर्राट जोकर
माझ्या प्रतिसादांतून अनावधनाने काही चुकीचे लिहिले गेले असल्यास मनापासून क्षमस्व. कुणाच्याही बुद्धीमत्तेची, सामाजिक सन्मानाची, कष्टांची खिल्ली उडवण्याचा खरोखर उद्देश नव्हता.
एखादी परिस्थिती आत्ता आहे त्यामागे शेकडो वर्षांचा इतिहास, करोडो माणसांचे कर्म कारणीभूत असते. त्या प्राप्त परिस्थितीवर तात्कालिक विनोदी संदर्भाने पाहिले तर, लगेच, तो शेकडो वर्षांचा इतिहास उकरून काढून, 'पहिले अंडं कि पहिले कोंबडी'चे वाद आरंभणे निरर्थक आहेत असं माझं मत आहे. माणुस अशाने डीनायल मोडमधे जातो, जबाबदारी घेत नाही, परिस्थिती बदलण्यास तयार होत नाही. फक्त 'ते विरुद्ध आम्ही'चे अनुत्पादक वाद उभे राहतात.
आज जे असंख्य बाबतीत आपण पाहतो ते की, सतत कुणीतरी आमच्यावर अन्याय/अत्याचार केला चे पालुपद आळवत असतात. दलित-सवर्ण, बहुजन-ब्राह्मण, हिंदू-मुस्लिम इत्यादी नेहमीचे वाद. स्त्रीयांचा प्रश्नही यातलाच. या वादांना शेकडो वर्षाची पार्श्वभूमी आहे, पण हे वाद उगाळत बसायचे की वर्तमान खूपच सुधारलेल्या परिस्थितीला आधार बनवून भविष्यकालिन योजना मांडून सगळ्यांचेच आयुष्य कसे सुखी होइल यावर चर्चा-विनिमय करायचा याबद्दल एवढा बुद्धीमंत म्हणवून घेणारा मनुष्यप्राणी निर्णय घेऊ शकत नाही तेव्हा वैषम्य वाटतंच. 'काहीच बदलणार नाही' याच्यावर बहुसंख्यांचा ठाम विश्वास दिसतो, पण त्याच बहुसंख्यांनी 'बदललेच पाहिजे'चा विश्वासही तेवढाच ठाम दाखवला तर...? कि 'काही बदलूच नये' असे बहुसंख्यांना स्वतःलाच मनातूनच वाटत असते का हा प्रश्नही मनात उभा राहतो. असे तर नाही. मग घोडे अडते कुठे?
काही प्रसंगांतून लोक कच खातात, काही उदाहरणांतून, ऐकीव अनुभवांतून 'नकारात्मक परिस्थितीच कशी मेजॉरिटीमधे आहे' याचाच सतत प्रसार लोक करत असतात. ते आपल्या कमकुवतपणाचं, नाकर्तेपणाचं समर्थन करण्यासाठी तर अशी ढाल बनवत नसावेत ना असाही विचार मनात येतो. कारण तुल्यबळ सकारात्मक उदाहरणेही आजूबाजूला घडत असतातच. पण त्यापासून प्रेरणा घेऊन काही सकारात्मक करण्यापेक्षा 'न-करणे' सोपे असते. मग 'न-करण्याचे' समर्थनही आलेच.
पुरुषांनी आपला दृष्टिकोन बदलणे सर्वात आवश्यक आहे हे सर्वानुमते सिद्ध झाले आहे. याची जबाबदारी दोन्ही पक्षांवर आहेच. स्त्रिया मुलांना जन्मतःच त्यादृष्टीने घडवणे सुरु करू शकतात. असे त्यांनी केले का? तर नाही. पुरुषांना स्त्रियांवर अत्याचार करण्यास पोटेन्शियल वातावरण मिळूच नये यावर दोन्ही पक्ष विचारविनिमय करून धोरण आखू शकतात. असे होते का? तर नाही. बहुसंख्य घरांतून आयाच मुलांना मुलींपेक्षा चांगले समजतांना, वागवतांना पाहिले आहे. मुलगा असणे पुरुषांसकट स्त्रियांनाही गौरवाचे वाटते हेही पाहिले आहे. सासवा स्वतःच्या नातींचा दुस्वास करतांना बघितल्यात. वैताग येतो हो हे सगळे बघून. परत यांची अशी मानसिकता 'पुरुषप्रधान व्यवस्थेमुळेच आहे' हे सिद्ध करून त्यावर सकारात्मक बदल घडवून आणण्याची जबाबदारी सोयीस्करपणे टाळली जाते. हे सर्वात जास्त दु:खदायक आहे. स्त्रियांनी 'आम्ही रोजच्या कष्टाने, अत्याचाराने पिचून गेलोय, परिस्थिती बदलण्याचे आमच्यात त्राण उरले नाही, वेळ नाही' असे जर स्वतःच कबूल केले तर 'उचित सामाजिक सन्मान, सुरक्षित आयुष्य' ही तुमची प्राथमिकता नाही का? असा प्रश्न विचारावा वाटतो. नसेल तर मग ही सततची कुरबुर का? असेल तर तोच प्राधान्यक्रम रोजच्या आयुष्यात का नाही? बहुसंख्य बायकांच्या आयुष्यतला प्राधान्यक्रम आजकाल 'कुठल्या मालिकेत आज काय होइल?' हा असतो हेही बघितले आहे असो.
असो. असे सगळे बघून स्त्रियांना बदल व्हावा असे 'खरंच' वाटते का असा प्रश्न उभा राहतो. उपलब्ध परिस्थिती बघता याचे उत्तर सकारात्मक येत नाही असे खेदाने म्हणावे वाटते. याच विचारातून माझा 'बायको बोलते' हा प्रतिसाद उद्भवला होता.
जाता जाता: असे अजिबात नाही की काहीच बदल होत नाहीये. बदल होत आहेत, वेगाने होत आहेत. पण ज्या प्रमाणात, ज्या स्केलवर झाले पाहिजे ते होत नाही. दहा फूट पुढे शंभर फूट मागे असा प्रकार सुरू आहे. पण स्त्रियांनी जर शंभरफूट पुढे जायचे ठरवले तर कित्येक सोन्याबापुंना आपल्या इज्जतीचा फालुदा झाला तरी वाईट वाटणार नाही याचा एक पुरुष म्हणून भयंकर विश्वास आहे.
माझ्या बाजूने पूर्णविराम. मिपावरच्या चर्चांचे फलित सकारात्मक, विधायक विचारांमधेच होवो अशी नेहमीच इच्छा राहील.