मागच्या आठवड्यात नायागारा येथे गेलो होतो.
नायागारा नदीची खोल दरी कॅनडा आणि संयुक्त राज्य(यू एस) यांना विभागते. तरी या दरीवर अनेक बळकट टिकाऊ पूल आहेत.
इंद्रधनुष्य (रेनबो) पूल
दरीत धबधबा अशा काही कोनात पडतो की कॅनडाच्या तीरावरूनच त्याला पूर्णपणे एका नजरेत बघता येते. मात्र सं.रा.च्या तीरावर एक उंच मनोर्याच्या गच्चीवरून धबधब्याचे दोन्ही भाग बघण्यासाठी चांगला "पॉइंट" आहे.
मनोरा आणि प्रेक्षकांसाठी गच्ची
तिथून धबधबे असे दिसतात.
अमेरिकन धबधबा (डावीकडे) आणि कनेडियन (अथवा 'घोड्याची नाल') धबधबा दूरवर उजवीकडे
(तोच तोच फोटो वाचकांनी कित्येकदा बघितला असेल. क्षमस्व. पण हा धबधबा पुन्हापुन्हा बघितला तरी मन भरत नाही.)
पूर्वी अमेरिकन धबधब्याच्या अगदी पायथ्याशी जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी पायर्या होत्या. आता एका बाजूची वाट बंद केलेली आहे.
पायर्या
कित्येक पर्यटक थेट तुषारांच्या धुक्यात जाण्यासाठी एका बोटीतून धबधब्याच्या पायथ्याशी जातात.
"धुंद कन्यका" (मेड ऑफ द मिस्ट) बोटीवर चढायचा धक्का
कित्येक पर्यटक मात्र या रम्य वातावरणात मधुचंद्राकरिता येतात.
रम्य ठिकाणीही लक्ष एकमेकांतच गुंतलेले जोडपे
पर्यटकांची हीऽऽ गर्दी असूनही रोमहर्षक आणि रोम्यांटिक अशा दोन्ही भावनांचा मेळ घडू शकणारी थोडीच स्थळे आहेत - पैकी हे एक.
नायागारा!
प्रतिक्रिया
31 Aug 2008 - 3:54 am | मदनबाण
छान..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
31 Aug 2008 - 4:11 am | विकास
छान फोटू आलेत. दोन आठवड्यांपूर्वी आम्ही देखील नायगाराला गेलो होतो...
जाताना न्यूयॉर्क राज्यात टोर्नेडोचा दिसतो तसा "फनेल क्लाऊड" समोर आला आणि काही कळायच्या आत दिड-दोन इंच व्यासाच्या गारा कोसळू लागल्या. किमान पाच एक मिनीटे बाजूला शांत बसून होतो (मनातून धास्तावलो होतो :) ) पण सुदैवाने काही झाले नाही.
नंतर पाचच्या सुमारास पोचल्यावर लगेचच "मेड ऑफ दी मिस्ट" ची सहल घेतली. वेळ सुदैवाने जमल्यामुळे सूर्यप्रकाश होता आणि इंद्रधनुष्य छान दिसले! ते चित्रफितीत पण आले आहे. नंतर जमल्यास "तू नळी" वर घालेन...
31 Aug 2008 - 6:27 am | ईश्वरी
सर्व फोटो सुरेख. आवडले.
ईश्वरी
31 Aug 2008 - 5:53 am | प्रियाली
मेड ऑफ मिस्टचा पुढे जाण्याचा शेवटचा स्पॉट. यानंतर ती माघारी वळते.
31 Aug 2008 - 6:05 am | पक्या
सर्व फोटो छान. विकास यांचे पण आवडले.
मेड ऑफ द मिस्ट ला धुंद कन्यका म्हणण्याऐवजी 'धुक्याची राणी ' कसे वाटेल ?
31 Aug 2008 - 10:27 am | संदीप चित्रे
'धुक्याची सेविका' (मेड ऑफ दि मिस्ट) हे जास्त योग्य नाही का?
31 Aug 2008 - 6:34 am | सर्वसाक्षी
चांगली चित्रे. पाकळ्यांचा पोत सुरेख टिपला आहे.
मात्र इंद्रधनुष्य पूल संपूर्ण पाहायला आवडला असता, तसेच धबधब्याच्या चित्रात पाण्यापेक्षा भूभाग अधिक वाटला.
31 Aug 2008 - 7:41 am | सहज
सगळ्यांचे नायागारा फोटो खास!
धनंजय यांचे वर्णन नेहमीसारखे भारी.
31 Aug 2008 - 8:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>सगळ्यांचेच नायागारा फोटो खास!
धनंजय यांचे वर्णन नेहमीसारखे भारी.
>>कित्येक पर्यटक मात्र या रम्य वातावरणात मधुचंद्राकरिता येतात.
वैराग्याची सुरुवात इथूनच होते वाटतं ;)
31 Aug 2008 - 8:02 am | मनीषा
सुंदर फोटो..
अमेरिकन धबधब्याच्या खाली जाण्यासाठीच्या पाय-या म्हणजेच "Cave of Winds " का?
"मेड ऑफ दि मिस्ट" पण सुंदर
संध्याकाळी तेथेअमेरिकेच्या बाजूच्या धबधब्यावर, कॅनडाच्या बाजूने रंगीत प्रकाश झोत टाकतात.. तो सुद्धा नजारा बघण्यासारखा असतो
31 Aug 2008 - 8:06 am | शितल
नायागारा आहेच मस्त किती ही पाहिले तरी डोळ्याचे पारणे फिटत नाही.
:)
31 Aug 2008 - 8:51 am | यशोधरा
सर्व फोटो एकदम मस्त!
31 Aug 2008 - 9:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त फोटो ... आणि वर्णनही!
(स्वगतः अमेरीकेत/कॅनडात कोणती काँन्फरंस आहे पाहिलं पाहिजे! ;-) )
31 Aug 2008 - 9:19 am | प्रभाकर पेठकर
सर्व फोटो मस्ऽऽऽऽऽतच आहेत.
कित्येक पर्यटक मात्र या रम्य वातावरणात मधुचंद्राकरिता येतात.
म्हणजे 'नायग्रा' पाहायला जाताना खिशात 'व्हायग्रा' ठेवली पाहीजे.
31 Aug 2008 - 9:57 am | विकास
अमेरिकन फॉल आणि हॉर्स शू फॉलच्या मधे अजून एक धबधबा आहे त्याला ब्रायडल फॉल म्हणतात. खालील चित्रात तो उजवीकडे लहानसर दिसत आहे.
कॅनेडियन बाजूने हे धबधबे मस्त दिसतात. आम्ही रात्री पाहील्याने त्यावरील रोषणाई दिसली पण छायाचित्रे घेऊ शकलो नाही.
31 Aug 2008 - 3:04 pm | नंदन
छायाचित्रे आणि वर्णन. हा मी 'केव्ह ऑफ द विंड्ज' च्या पायथ्याशी उभं राहून काढलेला फोटो -
बाकी, मेड ऑफ द मिस्टला पुलंनी 'धुक्याची पोर' असे जावे त्यांच्या देशा मध्ये म्हटल्याचे आठवते. हे नाव पडण्यामागची नेटिव्ह अमेरिकन दंतकथा येथे आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
31 Aug 2008 - 3:44 pm | विसोबा खेचर
वा! संपन्न देश, संपन्न मंडळी!
तात्या.
31 Aug 2008 - 5:37 pm | धनंजय
तशी हे चित्रे छा.चि. टीकेसाठीही टाकली होती, सर्वसाक्षी यांनी त्या दृष्टीने प्रतिसाद दिलाच आहे. (अर्ध्या पुलाचा फोटो त्याच्या वरील वाक्याच्या वक्रोक्तीला चित्रित करतो. पूर्ण पुलाचा सुंदर फोटो विकास यांच्या चित्रसंचात आहे. धबधब्यांचा फोटो तर लेखात द्यायलाच नको होता...)
धबधब्याच्या आजूबाजूच्या दृष्यांची कुठल्या वेगळ्याच कोनातून काढलेली चित्रे गुंफण्याचा प्रयत्न होता. (नंदन यांचे जिन्याच्या पायथ्याचे चित्र, जसे.) - माझे ते एक धबधब्याचे पॅनोरामा चित्र "वेगळ्याच कोनातले दृष्य" या चौकटीत बसत नाही, तरी मोह आवरला नाही. थोडा संयम पाळून ते चित्र मूळ लेखात द्यायला नको होते.
प्रतिसादांमध्ये सर्वांची सुरेख चित्रे बघून डोळे सुखावले. फारच "फोटोजेनिक" प्रपात आहे.
(तसा आमचा गोव्याचा दूधसागरही - अगदी भराभरा लक्ष न देताही क्लिकगणिक लोभस चित्रे उमटतात.)
विकास यांच्या चित्रांत दिसते की अमेरिकन धबधब्याच्या 'या' बाजूचा जिनाही बंद केलेला नाही. त्यामुळे लेखातील कृष्णधवल चित्रावर मी दिलेला तपशील चुकलेला आहे. 'त्या'बाजूचा जिना विंड्स""केव्ह ऑफ द विंड्स"चा जिना - बरोबर आहे, मनीषा.
31 Aug 2008 - 10:49 pm | ऋषिकेश
वा! जुन्या आठवणी जाग्या झाल्या. चांगले फोटो
नायगरा हे माझं आतापर्यंतचं सर्वात आवडतं ठिकाण!! फोटो चांगले आहे आहेत. तुषारकन्यकेत बसला नाहितसे दिसते.
नायगाराचं मला जमेल तसं केलेलं वर्णन इथे अमेरिकायण! मधे वाचता येईल.
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
1 Sep 2008 - 3:25 pm | स्वाती दिनेश
सगळेच फोटो परत परत पाहिले तरी मन भरले नाही..फार सुंदर.. आणि ऋषिकेशाचे अमेरिकायणही परत वाचले.प्रियालीच्याही नायाग्रावरच्या एका सुंदर जुन्या लेखाची आठवण झाली,
स्वाती
1 Sep 2008 - 3:35 pm | लिखाळ
सर्वच चित्रे सुंदर..
मजा आली पहायला..
--लिखाळ.
1 Sep 2008 - 9:09 pm | राघव१
धनंजयराव, प्रियालीताई, विकास सगळ्यांचे फोटोज छान आहेत... येथे लिंकवल्याबद्दल धन्यवाद!
ऋषिकेशरावांनी दिलेला दुवाही वाचनीय (अर्थात् सगळे वाचून नाही झालेले अजून!! :D ).
हे सगळे वाचून-बघून येथे बसल्या-बसल्याच नायगारा फिरून आल्यासारखे वाटले :) शुभेच्छा!
राघव
2 Sep 2008 - 1:10 pm | अनिल हटेला
क्या बात है !!
सर्व फोटो एकदम मस्त !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..