लोकशाही : एक व्याख्या

हरिप्रसाद's picture
हरिप्रसाद in जनातलं, मनातलं
19 Nov 2007 - 8:46 pm

आलेल्या मेल मधुन साभार ..........
थोडी अश्लिलता आहे असे वाटल्यास पटकथेची गरज म्हणुन चु. भु. द्या. घ्या.

दररोज शिस्तीचा भाग म्हणुन पेपर वाचणार्‍या बंड्याने त्याच्या बाबांना विचारले " बाबा, शासन व्यवस्था म्हणजे काय हो ? "

" त्याचे असं आहे - " बाबा विचार करत म्हणाले, " हे बघ , मी घरात पैसे कमवुन आणतो , म्हणजे मी भांडवलदार ; तुझी आई हा पैसा कसा आणि कुठे खर्च करयचा ते ठरवते म्हणजे ती सरकार ; आपल्या घरात मोलकरीण काम करते ती झाली कामगार ; तु सामान्य नागरिक व तुझा लहान भाऊ म्हणजे भावी पिढी. समजलं "

बंड्या विचार करत झोपी गेला. रात्री लहान भाऊ रडायला लागल्यावर त्याला जाग आली. अंथरुण ओले केल्यामुळे तो रडत होता. बंड्या आईला ऊठवायला गेला. ती गाढ झोपली असल्याने तो मोलकरीणीला ऊठवायला गेला तर तिच्या खोलीत बंड्याचे बाबा झोपलेले होते.

सकाळी बाबांनी बंड्याला विचारले " काय बंडोपंत, कळली का लोकशाही ?"

बंड्या म्हणाला " कळलं बाबा, जेव्हा भांडवलदार कामगारांचे शोषण करत असतात तेव्हा सरकार गाढ झोपलेले असते . देशाची भावी पिढी मुलभूत प्रश्नांसाठी रडत असते आणि या सर्व गोष्टींचा त्रास सामान्य नागरिकाला सहन करावा लागतो.

विनोदमुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

20 Nov 2007 - 12:16 pm | विसोबा खेचर

बंड्या म्हणाला " कळलं बाबा, जेव्हा भांडवलदार कामगारांचे शोषण करत असतात तेव्हा सरकार गाढ झोपलेले असते . देशाची भावी पिढी मुलभूत प्रश्नांसाठी रडत असते आणि या सर्व गोष्टींचा त्रास सामान्य नागरिकाला सहन करावा लागतो.

कथेचे तात्पर्य आवडले! :)

आपला,
(बाहेरख्याली) तात्या.