चाय, चिलम, चपाटी : लाझ येई भारत भेटी (३)

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
3 Sep 2015 - 5:56 am

===============================================================
भाग १ ------------ भाग २ ------------- भाग ३ ----------- भाग ४ ----------- भाग ५
================================================================

Hello family!

कुठे सुरूवात करू? ५०० सीसी Royal एन्फ़ील्ड बुलेट मोटरसायकल पासून सांगतो. हिच्यावर हिमालय-दौड करणं यासारखा अप्रतिम अनुभव नाही! बरेचदा थर्ड क्लास रस्ते लागले, पण त्यामुळे थरार आणि भ्रमंतीची मौज तितकीच वाढली.

--

मी आधी म्हंटलं तो आमचा विपश्यना ग्रूप एकत्र झालो, आणि ६ तास दौड करून आम्ही १५० किलोमीटरवरच्या नुब्रा दरी-खोऱ्यात गेलो. पण त्या आधी मला काय झालं ते सांगतो.

मी आदल्या रात्री काहीतरी अबर-चबर खाल्लं असणार, कारण सकाळी निघालो तेंव्हा माझ्या पोटात ढवळून येत होतं. मला वाटलं एकतर मी अंग भरून उलटी करेन, किंवा मला चड्डीतच होईल, पण तसाच निघालो. आणि एक तासाभरातच एक क्षण असा आला की दोन्ही झालं! पण थोडी विश्रांती घेऊन स्वच्छ होऊन हिंमतीने पुढे निघालो. नुब्रा खोऱ्यात आम्ही तीन गावांना भेटी दिल्या - पनामिक, दिस्कीत आणि हुंदार - आणि तिथली ध्यान-गृहं, नैसर्गिक उष्ण-जल-कुंडं आणि वाळूच्या टेकड्या पाहिल्या.

--

.

--

वाळूच्या टेकड्या

--

.

--

.

--

Hot water springs

--

.

--

सूर्यास्त तर अप्रतिम होता! --

आता यापुढे तर आणखी आठवणीत राहील असा प्रवास झाला. अवर्णनीयच, पण प्रयत्न करतो.

आम्ही संध्याकाळी लेहला परतलो, आमच्या पाठ-पिशव्या घेतल्या आणि लगेचच भाड्याच्या गाडीने दक्षिणेकडे असलेल्या स्टोक गावाकडे निघालो. तिथून आम्ही दोन दिवस पायी ट्रेक केला, हिमालयात भटकलो, तंबूंमध्ये रात्री काढल्या आणि स्टोक कांगरी या बेस कँप वर पोहोचलो. इथून पुढे ६००० मीटर्स उंचीवरच्या शिखरावर चढाई करायची होती! आम्ही दुपारचं जेवण केलं आणि ५००० मीटर्सवर असलेल्या टप्प्यावर पोहोचलो. उंचीवर श्वासोच्छ्वासाची सवय व्हावी म्हणून हा टप्पा. इथून खालच्या बेस कँपचं दृश्य फ़ारच विहंगम होतं.

दूर नजर ठरेपर्यंत ढग दिसत होते, आणि ते पर्वतशिखरांकडे ओथंबून येत होते. ढग एखाद्या शिखरावरून पुढे सरकले की ते शिखर पांढऱ्या रंगात झळाळून जायचं. आणि मग अचानक, त्या ढगांनी चाल केली आमच्या शिखराकडे! ठासणीच्या बंदुकीतून शिस्याच्या गोळ्या झाडाव्यात तशा वेगाने गारा पडायला लागल्या. सुरक्षिततेसाठी आम्ही घाई-घाईने धडपडत, घसरत बेस कँपकडे उतरलो आणि तिथल्या उपहारगृहाच्या तंबूत आसरा घेतला.

त्या संध्याकाळी ६ वाजताच जेवून घेऊन आम्ही लवकर झोपी गेलो. आम्हाला मध्यरात्री १२ वाजता उठवण्यात आलं, १ वाजेपर्यंत केळ्यांचं पॉरीज खाऊन, ट्रेकिंगचं सामान पाठ-पिशव्यांत घेऊन आणि डोक्यांवर विजेऱ्या लावून आम्ही पुन्हा चढायला सुरूवात केली. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातील ही एक सर्वात कठीण आणि शक्ती-शोषक अशी चढण होती. सतत ९ तास आम्ही खडक, बर्फाचे सुळे, दगड, भुसभुशीत बर्फ, पुन्हा खडक, पुन्हा बर्फाचे सुळे अशा अडचणींतून मार्ग काढत काढत चढत होतो. जो कुठला हात वर असेल त्या हाताने बर्फात कुदळ रोवायची, खिळे असलेले बूट पायांना आधार देतील याची खात्री करून प्रत्येक पाऊल वर टाकायचं, आणि हे पुन्हा-पुन्हा करत श्वासांची लय सांभाळत चढत रहायचं. बरेचदा घसरायला व्हायचं. मग आम्ही दोन संघांमध्ये विभागून घेतलं, एक आघाडीला जाणारा, आणि एक घसरणाऱ्यांची पाठराखण करायला मागोमाग चढणारा.

मी मागच्या संघात सर्वात खाली होतो. माझ्यासाठी ही परीक्षाच होती, प्रत्येक पाऊल मापून टाकायचं, श्वासावर नियंत्रण, नजर सतत वरच्या गिर्यारोहकाकडे, साथी हाथ बढाना साथी रे! संघ-शक्ति, मैत्री, Leave no one behind! आमच्यातल्या प्रत्येकाने आपलं ११० टक्के कसब पणाला लावलं होतं, प्रत्येक जण मागच्या-पुढच्याला प्रोत्साहन देऊन चढतं ठेवत होता. पण इतकं असून देखील या अत्यंत खडतर चढणीने आमच्यातल्या दोघांना श्वासाचा त्रास होऊ लागला. अतिशय खट्टू मनाने पण अगतिक अश्या त्या दोघांनी पुढे न जाता परतायचा निर्णय घेतला. आम्हाला वाईट वाटलंच, पण हिम-वादळाची शक्यता वाढायला लागल्याने आम्ही उर्वरित गिर्यारोहक त्यांचा निरोप घेऊन घाई-घाईने वरच्या दिशेने चढायला लागलो.

तासाभरानंतर अखेरीस आम्ही शिखरापासून केवळ २०० मीटर्स खाली असणाऱ्या चढाई टप्प्यावर पोहोचलो. आणि मग अचानक हिम-वर्षाव वाढला, पुढचं दिसणं अशक्य व्हायला लागलं. आम्ही आता काय करावं अशा दिग्मूढ अवस्थेत असतांना आमच्या आधी वरती गेलेली एक चढाई तुकडी शिखर जेमतेम सर करून खाली येतांना दिसली. आमच्यापाशी पोहोचल्यावर त्यांनी सांगितलं हिम-वर्षावाच्या आधीदेखील की ते अखेरचे २०० मीटर्स चढणं हे अत्यंत जोखमीचं काम होतं आणि त्यांना तेवढ्या अंतरासाठी तासाहून अधिक वेळ लागला होता. आता तर वादळ-वाऱ्याचा वेग आणि हिमवर्षाव हे दोन्ही वाढत चाललं होतं. आणि आम्हाला उतरून परत जाण्यासाठी निदान चार तास लागणार होते. शेवटी अत्यंत अनिच्छेने आम्ही परतायचा निर्णय घेतला! शिखर सर न करता!

तशाही वादळात आम्ही आठवण म्हणून एकमेकांचे काही Cliffhanger स्टाईल ने फ़ोटो काढून घेतले. मी ते पाठवीनच नंतर.

--

.

--

बेस कँपला पोहोचल्यावर आधी पोहोचलेल्यांनी आमच्या साठी गरम, वाफाळता चहा आणि जेवण आणलं, खूप बरं वाटलं. जेवून मी १३ तास सलग झोप काढली इतका दमलेलो होतो. दुसऱ्या सकाळी आम्ही चालत खाली स्टोक गावात पोहोचलो, तिथून भाड्याची गाडी केली आणि लेहला परतलो. आणि मग श्रमपरिहार म्हणून भरपूर पिझ्झा खाल्ला, बीअर ढोसली आणि आम्ही आयुष्यात कधी ओढली नव्हती इतकी हशीश उपभोगली. एक सांगतो, त्या ट्रेक मधला आनंदाचा, शारिरीक वेदनेचा आणि अभिमानाचा प्रत्येक क्षण मी मनसोक्त उपभोगला!

आज फक्त आराम, शरीर हलकं रहावं म्हणून थोडीशी योगासनं, आणि मग सुरा-पान. आणि हे करता-करता इतर प्रवासी न्याहाळणं. बस! आमचा ग्रूप आता इथे गेले ४ आठवडे आहे, त्यामुळे इथले बरेचसे स्थानिक लोक आम्हाल ओळखायला लागले आहेत. ट्रेकर्स मध्ये आम्ही ज्येष्ठ मंडळी आहोत! उद्या इथे झालेला मित्र कोको आणि मी लेह सोडून श्रीनगर कडे निघू. तिथून मग १० तारखेला मी मुंबईला निघेन.

जाता-जाता: इथल्या एका लोकप्रिय लोकगीताच्या ओळी सांगतो -

Chai, Cheelam, Chapatti! Full power!
36 hours!
No toilet no showers!
Still smells like flowers!

पुन्हा भेटुया!

- लाझ

देशांतरभाषांतर

प्रतिक्रिया

एस's picture

3 Sep 2015 - 8:15 am | एस

मस्त. पुभाप्र.

जेपी's picture

3 Sep 2015 - 8:34 am | जेपी

हा ही भाग आवडला.

इशा१२३'s picture

3 Sep 2015 - 8:58 am | इशा१२३

मस्त मस्त पुभाप्र.

उगा काहितरीच's picture

3 Sep 2015 - 10:26 am | उगा काहितरीच

अप्रतिम छायाचित्रे . गाणं अतिशय आवडलं ! लेख पण मस्तच

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2015 - 12:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त चालली आहे लेखमाला... प्रवाही वर्णन आणि सुंदर प्रकाशचित्रे ! पुभाप्र.

सौंदाळा's picture

3 Sep 2015 - 2:32 pm | सौंदाळा

बहुगुणींचे लिहायचे विषय खरोखरच वैविध्यपुर्ण असतात.
पहिल्या भागापासुन मालिका वाचतोय. भाग छोटे असले तरी पटापट येतायत म्हणुन वाचायला मजा येतेय.
पुभाप्र.

रेवती's picture

3 Sep 2015 - 5:44 pm | रेवती

सुंदर.

यशोधरा's picture

4 Sep 2015 - 5:42 am | यशोधरा

मस्त लिहिलं आहे! आवडतंय.
सद्ध्या प्रचि पाहू शकत नाहीये पण लवकरच पाहीन.

चाणक्य's picture

4 Sep 2015 - 6:30 am | चाणक्य

मजा येतीये वाचायला.

कंजूस's picture

4 Sep 2015 - 7:17 am | कंजूस

भाषांतर?

प्रचेतस's picture

4 Sep 2015 - 7:23 am | प्रचेतस

अप्रतिम लेखमाला होतेय ही. बहुगुणींचे ख़ास धन्यवाद आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल.

फार मस्त सुरु आहे लेखमाला.मजा येतेय वाचायला.

ब़जरबट्टू's picture

4 Sep 2015 - 4:19 pm | ब़जरबट्टू

काय मस्त वर्णन आहे राव..

खरच भारत दुस-याच्या नजरेने बघावा वाटते...

लेह जायचे नक्की आहे, केव्हा तेव्हढे ठरत नाहीये.. :(

पैसा's picture

18 Sep 2015 - 10:45 pm | पैसा

फोटो आणि लिखाण आवडले.

काही प्रकार गोंधळवणारे वाटले. वाळूच्या टेकड्या हिमालयात? आणि हशीश इतके उघड मिळते?