===============================================================
भाग १ ------------ भाग २ ------------- भाग ३ ----------- भाग ४ ----------- भाग ५
================================================================
भारतभेटीला प्रथमच येणार्या एका परदेशस्थ व्यक्तीला आपला देश कसा वाटला हे आपण शक्य तितक्या अलिप्तपणे अनुभवावं, म्हणून हा प्रयत्न. माझा शेजारी असलेल्या मॅनीच्या लाझ नामक दूरच्या भाच्याची ही संक्षिप्त भारत भ्रमण-कथा.
*****************
Hello family,
गेल्या आठवड्यात आम्ही white water rafting केलं. खूप धमाल आली. आम्ही झन्स्कार नदीतून २८ किलोमीटर गेल्यावर आम्हाला २ क्लास ३ चे rapids लागले (जलद खळाळ?). अशा खळाळांतून तराफा नेणं हे किती सांघिक काम आहे याची मलाआधी कल्पना नव्हती! मी आमच्या संघातला जास्त धष्टपुष्ट, त्यामुळे तराफ्याच्या पुढच्या भागात बसण्यासाठी माझी निवड झाली! नाट्य-प्रयोगाच्या पुढच्या रांगेतलं तिकिट! नदी इथे एका दरीतून जाते, त्यामुळे दोन्ही बाजूला अगदी जवळून उंच खडक! आणि त्या खडकांचे रंग तरी किती विविध! पिवळे, लाल, जांभळे… आणि आम्ही तिथून अति-वेगाने जाणार असल्याने नीट निरखून पहायला वेळ मिळणार नव्हता हे अपेक्षित होतंच, त्यामुळे मी go pro चं फुटेज घेतलं आहे ते आता एकदा शांतपणे निरखून बघेन.
विपश्यना मला आव्हानात्मक वाटली. शांत राहुन ध्यान करणं तितकंसं अवघड नव्हतं, पण दिवसातले सात तास ध्यानस्थ बसणं प्रचंड कठीण गेलं! माझं मन किती अशांत, अस्थिर आहे त्याची मला जाणीव झाली. आमचे गुरूजी मला म्हणाले, "तुझं मन म्हणजे माकडाचं मन आहे, अति-अचपळ!" मला पहिल्याच दिवसानंतर विपश्यना सोडून द्यावीशी वाटली, पण मी चिकाटीने ती चालू ठेवली. विपश्यनेत मला भेटलेले नवीन मित्र - त्या चार दिवसांत आम्ही एकमेकांशी जवळ-जवळ बोललेलेच नसलो तरी देखील- माझे चांगले मित्र झाले होते, आणि आम्ही जवळ-जवळ अविभाज्य झालो होतो. एक प्रकारचा कौटुंबिक अनुभव वाटला मला तो.
मी लेह ला परतल्यावरही विपश्यना सुरू ठेवली. यासाठी मी लेह च्या माथ्यावर वसलेल्या शांती-स्तूपात जायचो आणि तिथल्या ध्यान-कक्षात ध्यान करायचो.
रोज सकाळी न्याहारीच्या आधी मोटरसायकलने जायचं, आणि ४० मिनिटे जप करायचा. दिवसाची सुरुवातच अशी शांततेत करणं हा एक फार आल्हाददायक अनुभव होता. संपूर्ण दिवसासाठी मन रि-चार्ज झाल्यासारखं वाटायचं. (फिफो: तू माझ्याबरोबर असतास, तर तुला त्या रस्त्यांवर असं मोटरसायकल फिरवणं प्रचंड आवडलं असतं.) तिथले काही रस्ते इतके सुंदर आहेत की बास! दोन्ही दिशांना दूर-दूर पर्यंत हिमाच्छादित शिखरं आणि मधून-मधून दिसणारी ध्यानगृहं. एकदा तुम्ही पर्वतांमध्ये पोहोचलात की मात्र रस्ते कठीण होतात, किंबहुना, त्यांना रस्ते म्हणणंच चुकीचं आहे. आता उन्हाळ्यात हिम-शिखरं वितळताहेत आणि त्या पाण्याचे झरे आणि छोट्या नद्या होऊन रस्त्यांच्या मधून वाहू लागतात. मग तुम्हाला दोन पर्याय असतात, एक तर तुम्ही मार्ग सोडून जिथे असे जलमार्ग टाळता येतील अशा पायवाटा शोधायच्या, नाहीतर मोटारसायकल फर्स्ट गियर मध्ये टाकून पाणी कापत सगळीकडे फवारे उडवत जायचं. आम्ही अर्थातच बरेचदा दुसरा पर्याय निवडतो. मोटरसायकल हेलकावत, दगड-गोट्यांवरून उड्या मारत जातांना तोल सावरत न पडता असे जलमार्ग पार करण्यात मजा येते!
आम्ही Pangong lake पहायला ५० किलोमीटर मोटरसायकलवर गेलो. हा खाऱ्या पाण्याचा जगातील सर्वाधिक उंचीवरचा तलाव आहे.
४५% टक्के तलाव भारतीय हद्दीत येतो तर उर्वरित तलाव चिनी हद्दीत. त्यामुळे हा तलावाचा भाग भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे, त्यांच्या परवानगीशिवाय तुम्हाला तलावाजवळ जाता येत नाही. आणि कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला आंतर्देशीय हद्दीजवळ जाऊ देत नाहीत. आम्ही तलावावर दोन रात्री आणि तीन दिवस काढले, सूर्यास्त पाहिले, सूर्योदय उपभोगले आणि १० डिग्री सेल्सियसच्या थंड पाण्यात पोहण्याचा आनंद घेतला. दिवसभर आमचा एक मित्र गिटार वाजवत असे, आणि आम्ही इतर लोक गात असू, खूप मजा आली.
आम्ही तलाव पाहून परत आल्यावर कळलं की हा जगातील सर्वात अवघड रस्ता होता! आम्ही सुखरूप परत आलो हे नशिबच म्हणायचं! एकच तंगडं तुटण्यावर निभावलं, आणि ते माझं नव्हतं हा आणखी आनंद!
पुढचे दोन आठवडे नुब्रा दरी-खोरे पहाणार, आणि भारत-पाकिस्तान सीमेपर्यंत जाऊन येणार, अर्थात मोटरसायकल्सवर. चार - पाच दिवसांचा ट्रेक असेल. आणि मग नंतर मी लेह सोडेन, श्रीनगरला जाण्यासाठी. तिथून विमानाने मुंबई.
Miss you all.
Love,
- लाझ
वेळेअभावी हाही भाग लहानच आहे. क्षमस्व!
प्रतिक्रिया
2 Sep 2015 - 5:12 am | स्पंदना
सुंदर भाषांतर बहूगुणी, ते तंगड तुटने तर मस्तच!!
एकूण भारताच्या समृय्द्ध भागाकडे हा लेख लक्ष्य वेधतो नाही का?
पहिलं नदिच छायाचित्र तर अंगावर रोमांच उठवुन गेलं.
2 Sep 2015 - 6:25 am | रेवती
सफर छान चाललिये.
2 Sep 2015 - 7:46 am | यशोधरा
वाचते आहे.. ह्या भागात जायचं आहे मलाही. कधीतरी जाणार.
2 Sep 2015 - 8:02 am | श्रीरंग_जोशी
लाझ यांचे अनुभवकथन आवडत आहे. फोटोजही उत्तम आहेत.
पुभाप्र.
2 Sep 2015 - 10:00 am | उगा काहितरीच
वाचतो आहे. पुभाप्र
2 Sep 2015 - 10:26 am | मना सज्जना
आशे अनुभव शेआर केल्याबद्दल धन्यवाद. बारा का
2 Sep 2015 - 10:48 am | मांत्रिक
सुंदरच आहे. मजा येऊ लागलीये वाचायला. फोटो तर अप्रतिम. तो एक विदेशी मुलगा निवांत बसून एका शहराकडे पहातो आहे. ते कुठलं शहर? किती नशीबवान असतील इतक्या निसर्गसुंदर जागी रहाणारे लोक्स!
2 Sep 2015 - 11:06 am | असंका
ट्रॅवल ब्लॉग ची आठवण झाली.....
धन्यवाद...!
2 Sep 2015 - 1:49 pm | पद्मावति
वाह, मस्तं चाललीय सफर.
अत्यंत अनोखे प्रवासवर्णन आणि तुम्ही अनुवाद अगदी छान ओघवता केलाय त्यामुळे वाचायला मजा येतेय.
त्या लेक चा फोटो फारच सुंदर आहे.
2 Sep 2015 - 2:26 pm | इशा१२३
सुंदर फोटो आणि अनुवाद.आवडला हा भाग.
2 Sep 2015 - 2:47 pm | खटपट्या
मस्त !!
पहील्या भागाची लींक मिळेल का ?
2 Sep 2015 - 4:36 pm | बहुगुणी
पहिल्या भागाचा दुवा सुरूवातीच्या अवतरणात दिला होता पण तो दुवा फारच बारीक अक्षरात आहे, क्षमस्व!
2 Sep 2015 - 4:49 pm | यशोधरा
वर पण ते दुव्याचे "हा" हे अक्षर बोल्ड करता येते का, पहाल का?
2 Sep 2015 - 4:53 pm | बहुगुणी
मला स्व-संपादन करता येत नाही, पण संपादकांना विनंती करतो.
2 Sep 2015 - 5:15 pm | सूड
पुभाप्र
2 Sep 2015 - 6:12 pm | मदनबाण
सुंदर... :)
पुढच्या भागाची वाट पाहतो... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Halke Gaadi Haako... { Folk Fusion by Neeraj Arya's Kabir Cafe - Official Video }
15 Sep 2015 - 4:48 pm | पैसा
मस्त!
15 Sep 2015 - 5:16 pm | द-बाहुबली
लेह लद्दाख , वाटर स्पोर्ट व चार दिवसाची विपश्यना म्हणजे भारत न्हवे....