भिंगार्‍या

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
27 Aug 2015 - 10:57 pm

अंधारायला आलं होतं.
लंगडा भिंगार्‍या वैरण घेउन आला.
आण्णा नांगरटीला गेला होता .
मंजु भाकर्‍या थापत होती .
लंगडा भिंगार्‍यानं वैरण कापून गुरांना टाकली .
पोरं पडवीत शाळेतला गृहपाठ करत होती .
वैरण टाकून भिंगार्‍या दिवसभराचा थकवा काढायला अड्यावर गेला .
दोन गलास रिकामे करुन पुन्हा झोकांड्या खातच घरी आला.
मंजुनं त्याला भाकर कालवण दिलं.
त्यानं ते पडवीत बसून खाल्लं.
भिंगार्‍या एका पायान लंगडा असला तरी रेड्यासारखं काम करायचा.
चार गुरांचा चारा एका खेपेत आणायचा.
माजघरातील सतरंजी उचलून तो व्हरांड्यात येऊन पसरला.
त्याची नेहमीची गौळत म्हणत तसाच पडून राहिला.
तो गौळणी कुठे शिकला देवजाणे.
एकदा किक बसल्यावर त्याच्या गौळणी रात्र रात्र चालायच्या.
" लय माज आलाय का भिंगार " गोठ्यात बैलं बांधताना मालकाचा आवाज आला.
मालक कधी आलं त्याला कळलंच नाही .
" न्हाय आण्णा, जरा पडलू हुतु" म्हणत तो आणखी सावरून झोपला.
मालकापुढं त्याची चांगलीच टरकायची.
मालक त्याला गुरासारख कामाला लावायचा. तो निमुटपणे करायचा. शेवटी भाकर तुकडूयाचा सवाल होता.
गारगारं वार्‍यात त्याचा डोळा लागला.
राती कधीतरी त्याला जाग आली.
आतल्या खोलीतनं खाटेची खडखड कानावर आली.
मंजु रत होतं होती. मालक पण लयबद्ध होता.
भिंगार्‍याला हे नेहमीचं होतं.
एकदा तर मंजुच पाय त्यानं मालकाच्या गळ्यात बघितले होते.
तेव्हा डोक्यात कितीतरी वेळ भुंगा भुणभुणत होता. आज जरा कमीच.

मागल्या पावसाळ्याची रात्र त्याला कधीचं विसरायची नव्हती .
बैलाचं शिंग बरगडीत घुसलं, म्हणून मालक हप्ताभर दवाखान्यात होता.
पाऊसाच्या पिरपिरीमुळं तो घरातचं झोपला होता.
त्या रात्री मंजु तरटावली होती.
तिचं सुचनचं बंद झालं होतं.
भिंगार्‍यासंग ती रत झाली होती.
भिंगार्‍याचं आभाळचं फाटलं होतं.
तो धो धो कोसळत होता.
त्याच्या डोक्यातले अनंत भुंगे आसमंतभर उडत होते.
काळोख्या रातीत त्याला शरीराचा नवा अर्थ गवसला होता.
मंजुन त्याला परत कधीच जवळ केलं नाही.
तशी वेळचं आली नाही.
तो हि कधी संधीच्या शोधात नव्हताच.
किती निरक्त राती त्यानं अशाच भळभळत घालवल्या होत्या.
पण अश्या रातींचे तिचे हुकार त्याच्या डोक्यातल्या भुंग्याना जागवायचे.
आणि त्यांना पुन्हा आसमंतभर उडवायची स्वप्ने
रंगवत तो तसाच झोपी जायचा.

कथामौजमजाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

28 Aug 2015 - 12:59 am | उगा काहितरीच

कथा आवडली! त्या रात्री पाऊस होता या चित्रपटातला संभाजी आठवला एकदम !

अविनाश पांढरकर's picture

28 Aug 2015 - 2:18 am | अविनाश पांढरकर

मस्त कथा.

मांत्रिक's picture

28 Aug 2015 - 7:25 am | मांत्रिक

छान आहे. अगदी दमदार लेखन आहे. कुठेही बिभत्सपणा येऊ न देता लिहिलंय.

जव्हेरगंज's picture

28 Aug 2015 - 9:13 pm | जव्हेरगंज

प्रतिसाद महत्वाचा वाटला.
खुप धन्यवाद.

खूप छान लिहिलेय. शुद्धलेखन अजून सुधारण्यास वाव आहे असे वाटले. 'भिंगर्‍या' मधील 'र्‍या' हे जोडाक्षर Ryaa असे टंकायचे.

जव्हेरगंज's picture

28 Aug 2015 - 9:11 pm | जव्हेरगंज

धन्यवाद स्वॅप्स.
मोबल्यावरुन टंकल्यान चुक लक्षात आली नाही.
google input hindi आत्ताच घेतले.
ऱ्या लिहिता येतय .
पण लेखात सुधारणा कशी करायची माहीत नाही.

कथेतील पात्रांची आगतिकता खुपणारी पण तितकीच वास्तविक वाटते.

जेपी's picture

28 Aug 2015 - 3:40 pm | जेपी

चांगल लिहीलय.

पगला गजोधर's picture

28 Aug 2015 - 4:04 pm | पगला गजोधर

क्रमशः लिहायचे राहिले कांय ?

अस्वस्थामा's picture

28 Aug 2015 - 4:19 pm | अस्वस्थामा

आनंद यादवांचं "गोतावळा" आठवलं.. फार पूर्वी वाचलं होतं. आता औट ऑफ प्रिंट आहे बहुतेक.

चरका काही बसायचा रहात नाही.

जव्हेरगंज's picture

28 Aug 2015 - 6:18 pm | जव्हेरगंज

धन्यवाद.
थोडी धाकधुक वाटत होती कशी घ्याल म्हणून.
क्रमश टाकायचा विचार आहे, बघू कसं जमतयं ते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2015 - 10:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान लिहिले आहे. जरूर लिहा पुढचा भाग.