मिसळपाव वरचा हा पहिलाच लेख... तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा!!
----------------------------------------------------------
कजग्जझगजड़कन!!शजसब्दक,ण्डजकसब्.जस:जबसहस्जबक्स.
धस्खड्ज्ज्सब
शजसजशब्सज्जश्
ज्जज्जबजशीजशहीह्ह्ज्झह...
तो नुकताच वाचायला शिकला आहे.
रोज रात्री चौकातल्या सायकल पंक्चरच्या दुकानात जाऊन तो पेपर वाचत आहे.
वाचायला यायला लागलं अन तो आनंदला. वाचलं. कर्जमाफी होणार. अन तो आनंदला.
तो मजूर, त्याला स्वत्:चं शेत नाही.
त्याला वाचायला येतं म्हणून तो आनंदला. कर्जमाफीला नाही.
जाहिरात आहे. संतूर साबनासोबत 10 रूपयाचं कोलगेट फ्री. अन तो आनंदला.
त्याची बायका लेकरं सगळी राखेनच दात घास्तात किंवा दारातल्या लिंबाच्या काडीनं. घरी भयानक गरीबी आहे.
पण तरीही तो आनंदला. त्याला आता वाचायला येतं. काहीतरी फ्री मिळतय म्हणून नाही.
तिसऱ्या पानावरच्या खालच्या बाजूच्या निधन वार्ता त्याने तशाच हसरा चेहरा कन्टीन्यू ठेवूत वाचल्या. चिकलीचे पांडुरंग आबा वारले. त्याला वाचता आलं म्हणून हे दहाव्या दिवशी तरी समजलं. वाचता आलं म्हणून तो आनंदला.
(ते वारल्याचं दुःख तो नंतर करेन.)
विदेश बातम्यात त्यानं बोट फिरवत तीनदा पाहीलं. ग्रीसची कर्जमाफीची मागणी मान्य झाली आहे. ग्रीस यूरोज़ोन मधेच राहील. त्याला यातलं काहिच कळालं नाहीय. पण तरी तो आनंदला. कुणाची कसली तरी- "मागणी मान्य झाली" एवढंच त्याला समजलं. हे त्याला वाचता आलं. इथं बसून ग्रीसचं कळालं. तो खरोखर आनंदला.
सरकारने नवी घोषणा केली आहे. 65 वयापुढच्या ज्येष्ठ नागरिकांना महीना 2000 पेन्शन मिळेन. त्यासाठी फ़क्त नाव नोंदवायचं आहे. मजूरी करूनही उपाशी रहावं लागणाऱ्या त्याला 2000 मिळणार म्हणजे --डोंगर घरात आल्यासरखं वाटलं. तो आनंदला. बापाचं नाव लगेच द्यावं म्हणून उठला. एका क्षणात गर्भगळीत होऊन पुन्हा खाली बसला. गेल्या पंधरवाडयातच आपला 78 च्या आसपासचा बाप वारला. आपला बाप वारला. नुकतंच वारलेलं जवळचं माणूस 'वारलंय' -- हे सत्य, काही अतिआंनद किंवा अतिदुखाच्या वेळेला लक्षात राहत नाही.
त्याच्यासाठी हा क्षण तोच होता.
विसरत चाल्लेला आपला बाप त्याला या क्षणी आठवला. वाचता आल्यानं हे झालं. वाचता आल्यानं तो या क्षणापुरता दुःखी झाला.
-------------
खेड्यातल्या, रात्रीच्या रस्त्याकडेच्या कुत्र्यांच्या भुकन्याचा आवाज कानाबाहेर ठेवत तो तंद्रीत घरी पोचला. उरलेली कोरभर खाऊन चुळ भरून झोपल्या लेकराला पोटाशी धरून, भिंतीवरच्या वारलेल्या बापाच्या फ़ोटोकडं पाठ करून तो कढत झोपी गेला.
प्रतिक्रिया
6 Aug 2015 - 11:12 am | मिसळलेला काव्यप्रेमी
शैली आवडली.
मिपावर स्वागत..
6 Aug 2015 - 11:13 am | सस्नेह
छान प्रयत्न ! लेखनात दम आहे तुमच्या.
शुद्धलेखन जरा नीट असावे.
6 Aug 2015 - 11:35 am | टवाळ कार्टा
:(
6 Aug 2015 - 11:37 am | सुधांशुनूलकर
मिपावर स्वागत.
चांगलं लिहिलंय.
पुलेशु.
6 Aug 2015 - 12:07 pm | तुडतुडी
:-( झोपलेलं लेकरू त्याचं कोण हाय ?
6 Aug 2015 - 12:08 pm | एस
छान लिहिलंय! अजून दमदार लिहू शकाल. पुलेशु.
6 Aug 2015 - 2:39 pm | निर्धार
मस्तच लिहिलय तुम्ही...
लिहीत रहा...
6 Aug 2015 - 2:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
लिखाणाची शैली आवडली ! असंच लिहीत रहा.
6 Aug 2015 - 2:56 pm | सनईचौघडा
मिपावर स्वागत.. लेखन आवडले.
6 Aug 2015 - 2:58 pm | मधुरा देशपांडे
छान लिहिलंय. आवडलं.
6 Aug 2015 - 3:10 pm | अविनाश पांढरकर
छान लिहिलंय.
6 Aug 2015 - 6:18 pm | जडभरत
छान लिहिलंय!
+१
6 Aug 2015 - 6:19 pm | मृत्युन्जय
सुंदर लेख. शशकच्या भाऊगर्दीत हरवुन गेल्यामुळे तुम्हाला योग्य पोच मिळत नाही आहे पण असेच सकस लेखन येत राहिल्यास मिपाकर नक्कीच दाद देतील. पुलेशु.
6 Aug 2015 - 6:22 pm | प्यारे१
अगदी असेच.
सुन्दर लिहिताय.
7 Aug 2015 - 5:17 am | बहुगुणी
लेख आवडला!
6 Aug 2015 - 6:38 pm | जेपी
+100
6 Aug 2015 - 9:53 pm | चाणक्य
दम लगता है. पुलेशु
6 Aug 2015 - 9:53 pm | चाणक्य
दम लगता है. पुलेशु
6 Aug 2015 - 10:00 pm | उगा काहितरीच
पहिलाच प्रयत्न ? छे विश्वास नाही बसत ! अतिशय सकस लिखाण . मिपावर मनापासून स्वागत .
6 Aug 2015 - 10:13 pm | स्रुजा
सुरेख ! छान लिहीताय. असंच लिहीत राहा.
6 Aug 2015 - 10:29 pm | ऋतुराज चित्रे
फारच छान लेखन.
7 Aug 2015 - 2:21 am | राघवेंद्र
लेख आवडला.
7 Aug 2015 - 7:10 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
मिपावर स्वागत. लेखन आवडलं. लेखनामधे ताकद आहे तुमच्या. लिहित रहा.
7 Aug 2015 - 2:03 pm | अर्थहीन
पहिल्याच लेखाला तुम्हा सर्वांच्या या उत्स्फूर्त प्रतिक्रिया पाहून आनंद झाला.. येत्या काही दिवसात अजून काही शेअर करायला आवडेन...
धन्यवाद "मिसळलेला काव्यप्रेमी" मिसळपावच्या या अफाट दुनियेत मला घेऊन आल्याबद्दल...
7 Aug 2015 - 2:39 pm | नीलमोहर
छान वेगळा विषय घेऊन खूप सुंदर लिहीलंय..
7 Aug 2015 - 3:46 pm | gogglya
असेच लिहित रहा...
7 Aug 2015 - 11:03 pm | आनन्दा
आवडले
7 Aug 2015 - 11:40 pm | श्रीरंग_जोशी
जोरदार सुरुवात केली आहे मिपाकर म्हणून. लेख खूप भावला.
पुलेशु.
7 Aug 2015 - 11:55 pm | पद्मावति
खूप छान लिहिलय. लिखाणाची शैली आवडली.
लिहित राहा.
8 Aug 2015 - 12:24 am | अत्रुप्त आत्मा
आवडलं लेखन आणि शैलिही.