जणू काही आज तिच्यासाठी आनंदाचा दिवस होता. (शोकांतिका)

ganeshpavale's picture
ganeshpavale in जनातलं, मनातलं
24 Jul 2015 - 12:05 pm

[पुरुषी मनाला विचार करायला लावणार. बाहेर समाजात वावरणारी स्त्री जिच्यावर अत्याचार होतो, जिला त्रास सहन करावा लागतो, ती तुमची आई, बहिण, बायको, मामी, मावशी कोणीही असू शकते. तेंव्हा स्त्रीचा आदर करा.]

शोकांतिका
*********************

दुनियेचे जीवघेणे इशारे
आणि लचके तोडण्यास सरसावलेले हात
चौफेर वखवखलेली नजर
आणि अंग चोरून चालणारी ती…
दुनियेच्या खोचक कमेंट सहन करत
कानाडोळा करून, रस्ता कापणारी
थोडी घाबरलेली,
मनात असंख्य विचारांचं काहूर घेवून
एकटी घराबाहेर पडलेली ती....
बाभळीच्या काट्यात गुरफटलेली
कावरी - बावरी होवून घुसमटलेली
अनंत यातनांचा महासागर पार करून
नियतीच्या लाटेवर स्वार झालेली ती.....

आज बळी पडली
आपलं सार काही गमावून
निपचित डोळे मिटून, रक्ताच्या थारोळ्यात
तिचा निर्जीव उघडा देह आस्थाव्यस्त पडलेला.

आज सार काही सुन्न होत.

आज तिला कोणी वखवखलेल्या नजरेने पाहत न्हवत
कोणी अश्लील इशारे करत न्हवत,
कोणी हसून खोचक बोलत न्हवत
निष्प्राण देह शांत शांत वाटत होता.
आजूबाजूला गर्दी असली तरी... तिला कशा... कशाचीच भीती न्हवती.…

जणू काही आज तिच्यासाठी आनंदाचा दिवस होता. (शोकांतिका)

© कवी - गणेश पावले
९६१९९४३६३७

मुक्तकसमाजजीवनमानसद्भावना

प्रतिक्रिया

जडभरत's picture

24 Jul 2015 - 12:49 pm | जडभरत

:(
खूप सुन्न करणारी रचना.

निष्प्राण देह शांत शांत वाटत होता.
आजूबाजूला गर्दी असली तरी... तिला कशा... कशाचीच भीती न्हवती.…

खूप वाईट वाटतंय...
काय प्रतिसाद देऊ कळतंच नाही..

प्रियाजी's picture

24 Jul 2015 - 1:50 pm | प्रियाजी

खरेच केवढा विरोधाभास! मरणानेच तिला आनंद मिळावा ना. .

ganeshpavale's picture

24 Jul 2015 - 4:03 pm | ganeshpavale

दुर्दैवी वास्तव

ऋतुराज चित्रे's picture

24 Jul 2015 - 4:33 pm | ऋतुराज चित्रे

देवा रे काय भयानक राक्षसी असतील ही माणसं! असं करवतं तरी कसं यांना?

पैसा's picture

25 Jul 2015 - 5:31 pm | पैसा

काय बोलणार?

मुळातच नैतीक मुल्ये कुचकामी-च असतात, परिस्थीती माणसाला काहिच्या काही बनवु शकते. पोलीओ सारखी एखादि लसच निघायला हवी मानवाकडून विपरीत परिस्थीतीमधेही नैतीक मुल्ये न विसरली जाण्यासाठीची...

बाकी काय बोलणार. चार-दोन निवडक स्त्रिया सोडल्या तर इतकी वाइट अवस्था समस्त स्त्रिजमातीवरच आहे इथे कि बोलता सोय नाही... :(

पद्मावति's picture

26 Jul 2015 - 1:59 pm | पद्मावति

पोलिओ सारखी लस...खरं आहे अगदी....

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jul 2015 - 10:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

:(

एक एकटा एकटाच's picture

26 Jul 2015 - 1:01 pm | एक एकटा एकटाच

एक सामाजीक विकृती फार प्रभावी मांडलीय.

सुधांशुनूलकर's picture

27 Jul 2015 - 2:54 pm | सुधांशुनूलकर

नि:शब्द करणारी वास्तव कविता..

शेवटचं कडवं वाचल्यावर भटसाहेबांच्या ओळी आठवल्या..
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते

शब्दानुज's picture

27 Jul 2015 - 7:55 pm | शब्दानुज

अहो ही तर बोलते होण्याची वेळ आहे
एक फार छान ओळ कुठेतरी वाचली होती. देवाच्या अवतराची वाट पाहू नका स्वताःतील देव जाग्र्ुत करा...

अजया's picture

26 Jul 2015 - 1:21 pm | अजया

मलाही याच ओळी आठवल्या :(

लिहितानाच डोक्याचा भूग्गा झाला होता….
या विषयावर लिहाव कि नाही लिहाव यासाठी खुपदा विचार केला…
आणि मग शेवटी मनातली सल उतरवली शब्दात…

या अत्याचारी जातीचा खूपच तिरस्कार आलाय.
रोजच नवीन नवीन बातम्या मनाचा थरकाप उडवतात

लिहितानाच डोक्याचा भूग्गा झाला होता….
या विषयावर लिहाव कि नाही लिहाव यासाठी खुपदा विचार केला…
आणि मग शेवटी मनातली सल उतरवली शब्दात…

या अत्याचारी जातीचा खूपच तिरस्कार आलाय.
रोजच नवीन नवीन बातम्या मनाचा थरकाप उडवतात

प्रदीप@१२३'s picture

27 Jul 2015 - 2:20 pm | प्रदीप@१२३
सविता००१'s picture

27 Jul 2015 - 5:26 pm | सविता००१

सुन्न

स्रुजा's picture

27 Jul 2015 - 7:01 pm | स्रुजा

:( सुन्न करणारं वास्तव