डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम
मुस्लिमांचे शत्रू किंवा द्वेष्टे म्हणुन नाही - तर त्यांचे हितचिंतक म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इस्लाम धर्माची चिकित्सा केली आहे . धर्म चिकित्सेशिवाय प्रगती अशक्य आहे. हि चिकित्सा तटस्थ भूमिकेतून आहे - त्यामुळे ती चींतनिय आहे. प्रत्यक्ष बाबासाहेबांच्याच शब्दात त्यांची इस्लाम धर्म विषयक मते या लेखात पाहूया . आणि मुस्लिम समाजाच्या हितासाठी - प्रगतीसाठी घटनाकारांनि काय उपाय सांगितले ते हि पाहूया.
[(८ - ३२०) हा संदर्भ ८ व्या खंडातील ३२० वे पान असा वाचावा .प्रस्तुत लेखनासाठी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या समग्र आंबेडकर वाङ्ग्मयातिल खंड आधार म्हणुन वापरले आहेत . या प्रकाशन समितीत रा सु गवई , आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे. बरेचसे मुळ खंड इंग्रजीत असल्याने भाषांतर करताना अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे इंग्रजी शब्द जसेच्या तसे (English) मध्ये कंसात दिले आहेत. ]
इस्लाम मध्ये समता आहे का ?
पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया या आपल्या सुप्रसिद्ध ग्रंथात बाबासाहेबांनी या विषयावर एक पुर्ण प्रकरण लिहिले आहे. त्या प्रकरणाचे नाव आहे सोशल स्टेग्नेशन . या प्रकराणाच्या पहिल्या पानावरचे त्यांचे वाक्य असे आहे .
"केवळ हिंदुत सामजिक वैगुण्ये आहेत आणि मुस्लिमात नाहीत हा भ्रम आहे . असा कोणता सामजिक दुर्गुण आहे जो हिंदुत आहे आणि मुस्लिमात नाही ? " ( ८ -२२५)
बालविवाह इत्यादी सामाजिक दुर्गुण हिंदु आणि मुस्लिम अशा दोघातहि आहेत हे त्यांनी सांख्यिकी आधाराने दाखवले आहे. इस्लाम धर्मातील विषमता , गुलामी आणि जातिव्यवस्था याबद्दल बाबासाहेब लिहितात :
" इस्लाम बंधुत्वाचि भाषा करतो. सर्वाना वाटते कि जणु इस्लाम मध्ये गुलामी नाही …. आज गुलामी जगभरातून गेली असली तरी जेंव्हा गुलामी होती तेंव्हा तिच्या समर्थनाचा प्रारंभ इस्लाम धर्म आणि इस्लामिक देशातून झाला होता . " ( … support was derived from Islam and Islamic Countries) ( ८- २२८)
इस्लाम धर्मात गुलामी आणि विषमतेची मुळे आहेत यावर चर्चा करताना आंबेडकर म्हणतात , " गुलामांना माणुसकीने वागवा असे प्रेषित कुराणात म्हणतो पण त्याना मुक्त करा असे म्हणत नाही . इस्लाम धर्मानुसार गुलामाना मुक्त करण्याचे बंधन मुस्लीमावर नाहि. गुलामाला चांगले वागवत (!) गुलाम ठेवणे हा उल्लेख आंबेडकरांनी जाणीवपूर्वक केला आहे. धर्मातली विषमता हि वेगवेगळी रूपे घेत टिकून राहते - इस्लाम धर्मात गुलामी असल्याने ती विषमतेच्या रूपाने टिकून राहिली आहे , हे दाखवून देत बाबासाहेबांनी मुस्लिमातील जातींचे भलेमोठे कोष्टक पानभर दिले आहे . (८-२२९)
मुस्लिम समाजात त्रैवर्णिक व्यवस्था असून अश्रफ , अजलफ आणि अर्जल अशी त्या वर्गांची नावे आहेत . मुस्लीमातल्या अर्जल वर्गाला बाबासाहेबांनी डीग्रेडेड क्लास - पददलित म्हणुन संबोधले आहे . सेन्सस सुप्रिटेंडंट चे दाखले देत बाबासाहेब म्हणतात " मुस्लिमात जातीबाहेर लग्नाला प्रतिबंध आहे , व्यवसायावर जाती निर्धारण आहे. " (८-२२९,३०) त्यापुढे जाउन आंबेडकर लिहितात :
नक्कीच , हिंदुप्रमाणे मुस्लिमातहि सर्व वाइट चाली आहेत आणि काही हिंदुहुन अधिक वाइटहि आहेत . अधिकच्या वाइट चालीपैकी एक म्हणजे बुरखा : डॉ आंबेडकर (८-२३०)
.
मुस्लिम स्त्री हा एक दयनीय प्राणि आहे . इस्लामी धार्मिक जुलमाचे ते प्रतिक आहे अशी बाबासाहेबांची मांडणी दिसते. व्यक्तिस्वातंत्र्याचा बळी जेंव्हा धर्म घेतो तेंव्हा - त्याची चिकित्सा करताना - डॉ. आंबेडकरांच्या लेखणीला वेगळीच धार येत असे . धर्म चिकित्सा करताना बाबासाहेब निर्भिडपणे - सर्व धर्मांची चिकित्सा करत असत . हा गुण दुर्दैवाने आज लोप पावला आहे . आज भारतात इस्लाम चिकित्सा केली जात नाही हे सत्य आहे. तटस्थ , द्वेष रहित पण धारधार चिकित्सेची प्रेरणा बाबासाहेबांपासुन घेतली पाहिजे . डॉ आंबेडकर बुरख्याबद्दल लिहितात : -
" रस्त्या वर चालणार्या बुरखाधारी स्त्रिया हे भारतातील एक भीषण आणि गलिच्छ दृश्य आहे . (most hideous site ) बुरख्याचे आरोग्यावर गंभिर दुष्परिणाम होतात . मुस्लिम स्त्रियात अनिमिया , टीबी आणि पायोरीया सारखे रोग जास्त प्रमाणात आहेत. अनेकांची शरीरे क्षतिग्रस्त , हात पाय व्याधीग्रस्त , हाडे बाहेर आलेली आणि कणे वाकलेले आहेत . पेल्व्हिक आजार आणि हृदयरोग यांचे प्रमाणही अधिक आहे. बुरखा - मुस्लिम स्त्रीचे शारीरिक आणि मानसिक पोषण होऊ देत नाही " ( ८ - २३० , २३१)
पडदा पद्धतीच्या उगमाची आणि परिणामाची चर्चा करताना बाबासाहेब लिहितात - " बुरख्याची कारणे लैंगिक साशंकतेत आहेत. त्याचे मुस्लिम स्त्रिया आणि पुरुषांवर गंभिर परिणाम झाले आहेत. मुस्लिम पुरुषांचा घराबाहेरील स्त्रियांशी स्वच्छ मोकळा संपर्क बाधित झाला आहे. अशाप्रकारची बंधने पुरुषांच्याहि नितीमात्तेवर घातक परिणाम करतात. स्त्री - पुरुषांचा संपर्क तोडणारी अशी समाजव्यवस्था वाइट प्रवृत्तीस जन्म देते हे सांगायला कोण्या मानसशास्त्रज्ञाची गरज नाही . अशा धार्मिक बंधनांमुळे लैंगिक अतिवासना आणि इतर अनैसर्गिक रोगट सवयिंचा प्रादुर्भाव या समाजात होतो . बुरख्यामुळे हिंदु मुस्लिम संवादात हि बाधा येते कारण - अतिशयोक्त वाटले तरी- हिंदुचे म्हणणे खरेच आहे कि - एका बाजूचे स्त्रीपुरुष आणि दुसर्या बाजूचे फक्त पुरुष यांचा निर्भिड संवाद होणार तरी कसा ? " (८- २३०, २३१)
जातीय स्तर आणि स्त्री / पुरुष अशा दोन्ही प्रकारची विषमता मुस्लिमात आहे आणि त्याचे समर्थन / प्रारंभ इस्लामी धर्मशास्त्रात आहे असा बाबासाहेबांचा निष्कर्ष दिसून येतो.
बौद्ध धर्माचा विनाश का झाला ?
सर्व धर्मांची चिकित्सा करून झाल्यावर बाबासाहेबांना बुद्धाचा मार्ग योग्य वाटला होता. बुद्ध धम्मा च्या ऐतिहासिक उदय आणि अस्ताची त्यांनी तपशीलवार मिमांसा केली आहे. अनेक ठिकाणी त्याची वेगवेगळी कारणे दिली आहेत . माझे सर्वात शेवटचे मत प्रमाण मानावे असे त्यांनी अनेकदा आपल्या अनुयायांना निक्षुन सांगितले आहे . त्यामुळे या विषयावर त्यांनी सर्वात शेवटी दिलेले भाषण पाहूया. साहेबांच्या महानिर्वाणापुर्वि सहा महिने २३ जून १९५६ रोजी अखिल भारतीय बौद्धजन समितीच्या दिल्लीतल्या सभेत ते म्हणाले : -
" मुसलमानांनि या देशावर आक्रमण करून बौद्ध विहारांचा नाश करून , बौद्ध मूर्ती फोडल्यामुळे त्याना बूत शिकन म्हणजे मूर्ती फोडणारे असे म्हटले जाते. बूत हा मुर्तिसाठीचा शब्द म्हणजे बुद्ध या शब्दाचे (अपभ्रंश ) रूप आहे. मुस्लिमांच्या बौद्ध धर्मावरील आक्रमणाबाबत मी एक पुस्तक लिहित आहे.….मुसलमानांनि बौद्ध व हिंदु धर्मावर आक्रमण केले होते . दोघांची मंदिरे उध्वस्त केली होती … . बर्याच बौद्ध भिक्कुची कत्तल झाली आणि काहींनी देशाटन केले. त्यामुळे बौद्ध अनुयायांना आपण कोणाचे अनुसरण करावे ? हेच कळेनासे झाले . बौद्ध अनुयायी अंध:कारात चाचपडत राहिले " ( खंड १८ -३ पान : ४८० , ४८१ )
अगदी असेच मत १० जून १९५० च्या जनता पत्रातील लेखातही व्यक्त केले आहे . ( खंड १८ -३ पान : २१५)
दुर्दैवाने घटनाकारांचे लवकरच महानिर्वाण झाले. या विषयावर ग्रंथ लिहणे जमले नाही . पण आयुष्याच्या शेवटी आंबेडकर अशा निर्णयाप्रत आलेले दिसतात कि, - मुस्लिमांकडुन विद्वान भिक्कुंचि कत्तल झाली वा त्यांना देशत्याग करावा लागला . मार्गदर्शन न मिळालेले बौद्धजन आता कोठे जातील ? तिकडे बोलघेवडे ब्राम्हण पुरोहित जन्मजात आयते तयार होत होतेच ! त्यासाठी भिक्कू प्रमाणे कठिण प्रशिक्षण - संस्काराची गरज नव्हती . इस्लामी आक्रमणामुळे वैचारिक नेतृत्व हरवलेला बौद्ध समाज पुढे ब्राम्हणी धर्माच्या तोंडप्रचारी तडाख्यात अडकला असा निष्कर्श बाबासाहेबांनी काढला आहे. आणि इस्लामी आक्रमण हे बुद्ध धर्माच्या नाशाचे एक महत्व पुर्ण कारण मानले आहे. ( खंड १८ -३ पान : ४८० , ४८१ )
मुस्लिम इतिहासाचे आंबेडकरी आकलन :
मुसलमान भारतात का आले ? त्यांच्या येण्या मागची कारणे - राज्य स्थापनेचे हेतू आणि भविष्यातील धार्मिक योजना याचे मुद्देसूद विवेचन घटनाकारांनि केलेले आहे. बाबासाहेब लिहितात : -
भारतातील मुस्लिम प्रवेश हे केवळ जमीन आणि लुटमार यासाठी नाहीत . आर्थिक - राजकीय कारणाप्रमाणे भारतात इस्लामचा प्रसार करणे हे धार्मिक कारणही आक्रमणा मागे महत्वाचे आहे. ( ८-५५). बाबासाहेबांनी मुस्लिम आक्रमणाचा धार्मिक हेतू सिद्ध करण्यासाठी अनेक मुस्लिम इतिहासकारांचि अवतरणे उधृत केलेली आहेत. उदा : तैमुर बादशाहाची बाबासाहेबांनी उधृत केलेली वाक्ये आहेत :
" माझ्या हिंदुस्थान वरील आक्रमणाचा हेतू काफ़िरांविरुद्धचि मोहीम चालवून त्यांना अल्लाच्या धर्मात आणणे हा आहे. प्रेषित मुहम्मदाच्या आज्ञेनुसार काफिरी श्रद्धांचे भंजन करून , सर्वदेवता समभावाचे उच्चाटन करून , देवळे आणि मुर्त्या यांच्यापासून हिंदुस्थान मुक्त केला तर मला गाझी आणि मुजाहिद म्हटले जाइल ." (८-५६)
भारतात मध्ययुगात हिंदु मुस्लिम एकता वगैरे अजिबात अस्तित्वात नव्हती. अगदी १८५७ चे बंड हा मुस्लिमांनी केलेला ब्रिटिश विरोधी जिहाद होता. सहाशे वर्ष मुसलमान या देशाचे मालक म्हणुन वावरत होते . ब्रिटिश राज्यात त्यांना हिंदुच्या समान नागरी दर्जा मिळाला हे मुस्लिमांच्या दृष्टीने अपमानास्पद होते. म्हणुन त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला . १८५७ साली भारताला दार उल इस्लाम करण्यासाठी मुस्लिमांनी केलेला तो जिहाद होता. असे आंबेडकरांचे मत होते (८-४९, २९५)
मुस्लिम हल्ल्यांमागच्या धार्मिक हेतूचे विवेचन करताना बाबासाहेब लिहितात "इस्लामी धर्माने जगाची वाटणी दोनच भागात केली आहे …. दार उल हरब म्हणजे शत्रूभूमिचे रुपांतर - दार उल इस्लाम मध्ये करण्यासाठी … जिहाद करणे हे मुस्लिमाचे धार्मिक कर्तव्य आहे. " येथे बाबासाहेबांनी अनेक जिहादी युद्धांचे संदर्भ दिले आहेत. (८-२९५, २९६)
मुस्लिम आक्रमण - राज्य स्थापना - कर पद्धती यामागचे हेतू हि धार्मिक होते असे बाबासाहेबांचे मत आहे . हे मत सिद्ध करण्यासाठी आंबेडकर कटाक्षाने मुस्लिम इतिहासकार किंवा बादशहा यांचेच संवाद आपल्या पुस्तकात पुन्हा उधृत करताना दिसतात .
झिजीया कर लादण्यामागचा हेतू स्पष्ट करण्यासाठी त्यांनी अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याच्या काझी चा संवाद संपुर्ण पणे उधृत केला आहे . हा संवाद पुरेसा बोलका आहे .
" अल्लाह सांगतो कि हिंदुना हीन गुलामीत (धीम्मी ) ठेवणे हे आपले धार्मिक कर्तव्य आहे . कारण ते आपल्या प्रेषीतांचे कडवे शत्रू आहेत. आणि प्रेषीतांनिच आपल्याला आज्ञा केली आहे कि , हिंदुना इस्लामी बनवा नाहीतर ठार मारा , बंधक बनवा , त्यांची मालमत्ता लुटा . …. आपण सज्जन हनिफी मुस्लिम असल्यामुळे त्यांना झिजीया घेऊन सोडतो तरी.… हनिफी सोडुन इतर पंथात झीजियाचा पर्याय नाही. हिंदुपुढे दोनच पर्याय आहेत - " इस्लाम किंवा मृत्यू " (८-६३)
या उधृता नंतर निष्कर्ष काढताना आंबेडकर म्हणतात : मुहम्मद गझनी पासून अहमदशहा अब्दाली पर्यंतचि ७६२ वर्षांची कालकथा हि अशी आहे. (८-६३)
पाकिस्तान का बनले ?
डॉ. आंबेडकर फाळणीचे पुरस्कर्ते होते. हिंदु आणि मुस्लिम यांचे सहजीवन अवघड आहे . भारत अखंड राहिला तर धार्मिक संघर्ष इतके जास्त होतील कि हिंदुंचा सामजिक सुधार अशक्य होऊन बसेल त्यामुळे फाळणी करावी असे त्यांचे मत होते . पाकिस्तान बाबतीतले इस्लामी धर्म शास्त्र उलगडून सांगताना ते म्हणतात :
"मुस्लिमांच्या दृष्टीने हिंदु काफिर आहेत .काफ़िरांचि लायकी मान सन्मानाची नाही . इस्लाम नुसार काफिर जन्मानेच नीच (low born ) आणि दर्जाहीन (without status) असतात. काफिर शासित देशाला दार उल हरब असे म्हणतात. हे सर्व पाहता मुसलमान लोक हिंदु सरकारचे आदेश पाळणार नाहीत हे सिद्ध करायला आणखी पुराव्यांची गरज नाही . "( ८ - ३०१)
पाकिस्तानवरील पुस्तकाचे एक प्रकरण राष्ट्रीय फ़्रस्ट्रेशन नावाचे आहे . त्यातील ३२८ -३३० या पानांवर बाबासाहेबांनी हिंदु मुस्लिम प्रश्नाची चिकित्सा केलेली आहे . बाबासाहेब लिहितात " ब्रिटिशांच्या फोडा आणि झोडा या नीतीमुळे हिंदु मुस्लिम संबंध बिघडले हे खरे नाही . ब्रिटिशांच्या पूर्वीपासून भांडणे होतीच. (८-३२८) हिंदु आणि मुस्लिमातील राजकीय भांडण हा ऐतिहासिक, धार्मिक , सांस्कृतिक आणि सामजिक घटक परस्पर विरोधी ( Antipathy) असल्याचा परिणाम आहे. (8-229) . अकबर आणि कबीर या सुधारकांच्या कार्याचा इष्ट परिणाम झालेला नाही . " (८-३३०) याचे अधिक विश्लेषण करताना आंबेडकर लिहितात : -
" इस्लामी बंधुत्व हे सर्व मानवांसाठी नाही. ते फक्त मुस्लिमांपुरतेच मर्यादित आहे. मुस्लिम बंधुसंघा ( Corporation) साठी सर्व प्रेम व फायदे आहेत . जे मुस्लिम बंधुसंघाबाहेर आहेत त्यांकरता घृणा आणि शत्रुत्व याशिवाय काहीही नाही ..... भारताला आपली मातृभूमी आणि हिंदुना बांधव मानण्याची परवानगी - इस्लाम धर्म सच्च्या मुस्लिमाला देत नाही . " (८-३३०)
अशा धार्मिक कारणांमुळे हिंदु मुस्लिम ऐक्य अशक्य आहे म्हणुन बाबासाहेबांनी फाळणीला पाठींबा दिला होता.
फ़ाळणिपुर्वि १ ९ ४ ० साली आंबेडकर म्हणाले होते - " जर फाळणी झाली नाही तर भारत हे एक, परिणामशुन्य राज्य बनेल- जणु जिवंत प्रेत, न पुरलेला मृतदेह " (८-३४०)
फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५ साली - बाबासाहेब म्हणाले होते. --
" पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती . " (१-१४६)
त्यावेळच्या अखंड भारतातले मुस्लिम लोकसंख्येचे ३५% हे प्रमाण लक्षात घेतले तर आंबेडकरांच्या लेखनाची खोली लक्षात येते आणि तत्कालीन कोन्ग्रेस किंवा हिंदुसभेला हि गोष्ट कशी कळली नाही ? याचेही आश्चर्य वाटते .
त्यापुढे जाउन बाबासाहेब असेही म्हणतात कि - " जेंव्हा फाळणी झाली तेंव्हा मला वाटले कि परमेश्वराने या देशावरील शाप काढुन घेतला असून हा देश एकसंघ , महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे " (१-१४६)
इशारा : हिंदु अधिक आक्रमक होत जातील
बाबासाहेबांनी ७५ वर्षा पुर्वी दिलेला इशारा आज महत्वाचा ठरताना दिसतो आहे . बाबासाहेब लिहितात :-
"मुसलमान राजकारणात गुंडगर्दि आणत आहेत .या दंगली त्याचे पुरावे आहेत. मुसलमान मुद्दाम सुटेडन जर्मन नाझिंचे अनुकरण करत आहेत. (झेक बाबतचे) . जोपर्यंत एकटे मुस्लिम आक्रमक होते तोवर हिंदु मार खात होते. भूतकाळ गेला आणि आज हे सत्य राहिले नाही . हिंदु लोक प्रतिकार शिकाले आहेत (learned to retaliate ) आणि मुस्लिमाना भोसकण्यात त्याना लाज वाटत नाही . गुंडगर्दिचा विरोध सवाई गुंडगिरीने करणे हा हिंदुचा नवा चष्मा बिभत्स आहे. ( ugly spectacle ) (८-२६९)
" मुस्लिम अतिरेक हा (native endowment) अंगभुत आहे, हिंदुपेक्षा जुना आहे आणि त्यांच्या संस्कृतीचे अंग आहे.. हिंदुचा अतिरेक हा आजकाल नव्याने प्रतिक्रिया म्हणुन तयार होतो आहे. आज या बाबतीत मुसलमान पुढे असले तरी हे असेच जर चालू राहिले तर…. कदाचित भविष्यात हिंदु त्याना मागे टाकतील . " (८-२४९)
हे दोन समाज अशाच प्रमाणे धर्मावरून भांडत राहिले तर, भारताचे काय होईल याचे चित्र बाबासाहेब आपल्यासमोर १९४० साली उभे करतात . आज फाळणी होऊन गेली आहे. काही वर्षाच्या शांततेत भारताने पाकिस्तान आणि बांग्लादेश च्या तुलनेत दैदिप्यमान प्रगती केलेली दिसते. मात्र हिंदु मुस्लिम संघर्ष राजकीय आणि धार्मिक स्वरूपात सुरूच आहे . त्यामागच्या राजकारणाची आंबेडकरांनी केलेली चिकित्सा अवश्य पाहिली पाहिजे .
धार्मिक राजकारणाचा आंबेडकरी अन्वयार्थ
हिंदु मुस्लिम राजकारणाच्या फियास्कोसाठी आंबेडकर हिंदु महासभा आणि कॉंन्ग्रेस या दोघांना जवाबदार ठरवतात . बाबासाहेब लिहितात "भाबड्या मनाच्या हिंदु सभेच्या देशभक्तांना वाटते कि हिंदुनि हिंसक पावित्रे घेतले कि मुसलमान सरळ होतील…. खरे तर हिंदु महासभा संवादाच्या प्रगतीच्या मार्गातला अडथळा आहे कारण त्याना एकता नकोच आहे. उदाहरणार्थ : ( ३५ % मुस्लिम असलेल्या अखंड हिंदुस्थानाच्या वास्तवात ) " हिंदुस्थान हिंदुचा ! " अशी घोषणा हिंदु सभेच्या अध्यक्षांचि आहे . वास्तव स्थिती पाहता हि घोषणा अतिशय अहंकारी आणि अक्षरश : अर्थहिन आहे . " (८-२७०)
कोंग्रेसच्या मुस्लिम अपिसमेंट मुळे हिटलरचे चोचले पुरवणार्या युरोप प्रमाणे हिंदूची परिस्थिती अवघड होऊन बसेल . : डॉ आंबेडकर
कॉंग्रेसचेहि मुस्लिम / इस्लाम बाबतीतले धोरण पूर्णपणे चुकलेले आहे असा आंबेडकरांचा आरोप आहे. कोंग्रेसच्या धार्मिक राजकारणाला आंबेडकरांनी मुस्लिमांचा अनुनय / लांगुलचालन (Appeasement ) असे विशेषण वापरले आहे. अशी विशेषणे पाकिस्तान वरील पुस्तकात कोन्ग्रेस साठी शेकडो वेळा वापरली आहेत . एकट्या पान २७० वर लांगुलचालन (Appeasement ) हा शब्द सहा वेळा आलेला आहे. आंबेडकर लिहितात : -
" कॉंंग्रेसला अपिसमेंट आणि सेटलमेंट यातला फरक सुद्धा कळत नाही. अपिसमेंट - अनुनय म्हणजे लांगुलचालन! आक्रमकाचे हृदय जिंकण्या साठी त्यांनी केलेल्या खून, बलात्कार आणि निष्पापांच्या लूटमारी कडे दुर्लक्ष करणे हि कोङ्ग्रेसि अपिसमेंट ची नीती आहे. त्याला कोणत्याही मर्यादा नाहीत .. सेटलमेंट म्हणजे दोन्ही बाजू समाधानी होतील अशी मर्यादित तडजोड होय. मुस्लिमाना धार्मिक आधारावर सवलती दिल्यास त्यांची आक्रमकता वाढीस लागलेली दिसते या सवलतिंचा अर्थ हिंदुचा भ्याडपणा (defeatism) असे मुस्लिम मनास वाटते. कोंग्रेसच्या अपिसमेंट मुळे हिटलरचे चोचले पुरवणार्या दोस्त राश्ट्रांप्रमाणे हिंदूची परिस्थिती अवघड होऊन बसेल . " (८ - २७०)
सवाई गुंडगिरिचि आक्रमकता किवा लांगुलचालन यापैकी कोणत्याही मार्गाने हिंदु मुस्लिम प्रश्न सुटणार नाही असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे.
समस्येवरील दोन उपाय
वकिली कायदे आणि सेटलमेंट करून हिंदु मुस्लिम प्रश्न हाताळावा लागतो - अपिसमेंट अथवा गुंडगिरी करून नाही - याची प्रचीती अजून भारतीय राजकारणाला झालेली नाही. फाळणी घडून भूतकाळात जमा झाली . आजच्या भारतातील हिंदु आणि मुस्लिमाना सहजीवन अपरिहार्य आहे . जुन्या मानसिकता जुने प्रश्न आजही तसेच्या तसे जिवंत आहेत . मुस्लिमांचा धार्मिक उन्माद , आक्रमकता, हिंदूची सवाई गुंडगिरी वा सवाई लांगुलचालन आजही तसेच आहे .
१) सेक्युलारीझम : यावर बाबासाहेबांनी सुचवलेला उपाय सेक्युलारीझम हा आहे . सेक्युलारीझम हा सर्व धर्म समभावाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे . त्यात धर्माचे स्थान फक्त पारलौकिक श्राद्धेपुरते मर्यादित असते. इहलोकात कसे वागावे ? किती विवाह करावेत ? बुरखा घालावा का ? याचे कोणतेच धार्मिक स्वातंत्र्य मिळत नाही . सर्व गोष्टी कायदा आणि शासनाच्या अखत्यारीत येतात . बाबासाहेबांची घटना आणि त्यातील कलमे सेक्युलर आहेत . त्यात कोणत्याहि धर्मास फाजील स्वातंत्र्य नाही . मात्र दुर्दैव असे कि याच घटनेत अनुसृत्य असणारा समान नागरी कायदा अजूनही होत नाही . कोंग्रेसच्या नाही - भाजपाच्या राज्यातही नाही .. शासन सेक्युलर रहात नाही . तलाक पिडीत मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी समान नागरी कायदा केला जात नाही .
२) धर्म सुधारणा : मुस्लिम समाजात समाज सुधारणा आणि धर्म सुधारणा करण्याची प्रोसेसच अस्तित्वात नाही. धर्म चिकित्सा हा विषय त्याज्य मानला गेला आहे . जी काही लाहान सहान सुधारक मंडळे आहेत ती कुराणाच्या परीभाषेबाहेर जात नाहीत . बुद्धीवादाचे समर्थन करण्यासाठी हदीस मधली पैगंबर वचने शोधली जातात. त्यामुळे मुस्लिमांचे प्रचंड नुकसान होणार आहे. विज्ञान निष्ठा आणि बुद्धिवाद याचा मुस्लिम समाजात प्रसार करणे बाबासाहेब आवश्यक मानतात. त्यासाठी त्यांनी रेनन ला उधृत केले आहे :
" इस्लाम विज्ञानाला सततच शत्रू समजत आला आहे. हे त्या धर्माचे एकनिष्ठ एकमेव सातत्य आहे . पण हे सातत्य धोकादायक आहे. इस्लामच्या दुर्दैवाने इस्लामला यश मिळत आले. विज्ञानाचा - बुद्धीवादाचा वध करून खरे तर इस्लामने स्वत:चाच वध केला आहे. जगाचे शाप घेतले आहेत आणि हीनत्व पत्करले आहे " ( ८ - २३५)
मुस्लिमांनी विज्ञान निष्ठेचा, बुद्धिवादाचा , आणि धर्म चिकित्सेचा स्वीकार केल्याशिवाय त्यांचे भले होणार नाही इतरांचेही भले होणार नाही असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे .
समारोप
हिंदुच्या भल्यासाठी त्यांची धर्म चिकित्सा आणि प्रबोधन अत्यावश्यक आहे. पण मुस्लिमाना यापासून वंचित ठेवण्याचे काही कारण नाही. इस्लामची चिकित्सा केली तर हिंदुत्व वाद्यांना फायदा होतो या भ्रमातून आता बाहेर पडायला हवे. आणि इस्लाम हा मुक्तिदाता, समतेचा, शांततेचा धर्म आहे या कम्युनिस्टांनि पसरवलेल्या अंधश्रद्धेतुन हि मुक्त झाले पाहिजे. कम्युनिस्टांचे प्लेन आणि डोकी अभ्यासू असली तरी पुरोगामी वा संविधानिक निश्चित नाहीत. आपण आपले मेंदु कम्युनिस्टांकडे गहाण टाकण्याची गरज नाही. या विषयावर बाबासाहेबांचे विचार अभ्यासले पाहिजेत.
बाबासाहेबांनी इस्लामची कठोर चिकित्सा केली. त्या धर्मात समता नाही - सहिष्णुता नाही - आधुनिकता नाही - असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे. मुस्लिम बांधवांना धार्मिक दलदलीतून बाहेर काढणे हे आंबेडकरांचा अनुयायी म्हणुन मला माझे कर्तव्य वाटते. विज्ञान आणि विवेक याच्या प्रचारा शिवाय हे अशक्य आहे. इस्लाम धर्म चिकित्सा अटळ आहे. आपल्याला चिकित्सक बुद्ध्यांक वाढवावा लागणार आहे. बाबासाहेबांच्या Thoughts on Pakistan च्या मुळ आवृत्तीतल्या पहिल्या पानावरचे कोटेशन होते :
"“More brain, O Lord, more brain! or we shall mar
Utterly this fair garden we might win.”
―George Meredith
मेंदू दे देवा, मेंदु दे - बुद्धी दे देवा, बुद्धी दे
अन्यथा
मरेल विजयाची - सुनिश्चित आशा !
- डॉ. अभिराम दिक्षित
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
[(८ - ३२०) हा संदर्भ ८ व्या खंडातील ३२० वे पान असा वाचावा .प्रस्तुत लेखनासाठी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या समग्र आंबेडकर वाङ्ग्मयातिल खंड आधार म्हणुन वापरले आहेत . या प्रकाशन समितीत रा सु गवई , आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे. बरेचसे मुळ खंड इंग्रजीत असल्याने भाषांतर करताना अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे इंग्रजी शब्द जसेच्या तसे (English) मध्ये कंसात दिले आहेत. ]
संदर्भ ग्रंथांचे तपशील :
(1) - Volume 1. Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989)
(८ )- Volume 8. Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 8. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989)
(१८-३) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे : खंड १८ भाग ३ (मराठी ). उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन (२००२)
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
22 Jul 2015 - 12:03 pm | अनुप ढेरे
हे तेच आहेत.
22 Jul 2015 - 2:00 pm | रुस्तम
लेखात नाव लिवलय की...
- डॉ. अभिराम दिक्षित
21 Jul 2015 - 4:24 pm | अमोल मेंढे
डॉ. माफ करा मी राजघराणं या आयडी चे डीटेल्स न बघता प्रतिसाद दिला.
22 Jul 2015 - 12:45 pm | dadadarekar
मेननच्या फाशीवर धागा कढा.
22 Jul 2015 - 2:13 pm | काळा पहाड
अतिरेकी हितेश, तुम्हाला मेमन म्हणायचंय का?
22 Jul 2015 - 2:27 pm | अनुप ढेरे
वैयक्तिक हल्याचं कारण?
22 Jul 2015 - 2:54 pm | संदीप डांगे
अतिरेकी म्हणजे काय?
22 Jul 2015 - 3:38 pm | अनुप ढेरे
मला इथे तात्विक वाद घालायचा नाही. वरील शेरा हा त्या सदस्याच्या इस्लाम प्रेमावरून आलेला आहे. आणि त्यावरून एखाद्याला अतिरेकी/दहशतवादी म्हणणं हे वैयक्तिक शेरेबाजीचं उदाहरण आहे. काळा पहाड हे अनेकदा असे वैयक्तिक शेरे मारताना दिसतात.
22 Jul 2015 - 3:54 pm | काळा पहाड
अतिरेकी मेमनच्या फाशीबद्दल ज्याला वाद घालावा वाटतो, अशा माणसाला अतिरेकी म्हणण्याबद्दल मला काही चुकीचं वाटत नाही. उगीच शब्दांचे घोळ घालायला मी काही सेक्युलर नाही.
22 Jul 2015 - 5:06 pm | dadadarekar
त्या केसचे माहिती मिळावे यासाठी होत.
30 Jul 2015 - 12:52 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सेक्युअलर णै ओ. स्युडो सेक्युलर मंत्यात त्याला. सेक्युलरचा अर्थ निधर्मवाद असा आहे. एका विशिष्ट धर्माविषयी चाटुगिरी करणार्यांना आणि सरसकट हिंदुंना तुच्छ लेखणार्या ह्या वैचारिक सुंता झालेल्या लोकांच्या कुठं नादाला लागता?
30 Jul 2015 - 1:09 pm | संदीप डांगे
तात्विक वादाचा मुद्दाच नाही. एखादी व्यक्ती सारासार विवेकाचा उपयोग न करता एकांगी विचार करून आपले तेच खरे असे बंदूक म्हणा किंवा शब्द म्हणा या माध्यमातून रेटत असेल तर त्याला अतिरेकी हाच शब्द बरोबर आहे. इथे मुस्लिम या विशिष्ट धर्माचा काय संबंध? उलट 'त्याच्या मुस्लिम प्रेमामुळे अतिरेकी म्हटलंय' असा आरोप करून आपणच याला धार्मिक रंग देताय असं होत नाही आहे का?
हितेशचे मिपावरचे वागणे अतिरेकी नाही तर अजून काय आहे? प्रश्न धर्माचा नाहीच. याच निर्बुद्धपणे कुणी हिंदू धर्माची टकळी इथे वाजवली असती तर त्यालाही अतिरेकीच म्हटले असते.
30 Jul 2015 - 4:36 pm | कपिलमुनी
बरेच जण बर्याच गोष्टींची टाकळी वाजवत असतात त्यांना काय म्हणणार ?
30 Jul 2015 - 7:36 pm | संदीप डांगे
अतिरेकीच. अजून काय म्हणणार? तोंडाला फडके बांधून निष्पापांना गोळ्या घालणार्या बिनचेहर्याच्या लोकांना अतिरेकी म्हणायची फॅशन आहे म्हणून मूळ अर्थ तर बदलत नाही ना?
30 Jul 2015 - 10:27 pm | सुबोध खरे
अतिरेकी आणि दहशतवादी हे समान अर्थी शब्द नाहीत
30 Jul 2015 - 10:43 pm | संदीप डांगे
बरोबर. म्हनुन अतिरेकी म्हटलं.
22 Jul 2015 - 4:34 pm | सुधीर
साधारण याच विषयावर कुरुंदकरांनी जागर आणि शिवरात्र मध्ये चांगले विचार मांडले आहेत. य. दि फडक्यांचे पण एक पुस्तक आहे. "धर्म आणि राजकारण" नावाचे. बाजारात मिळाले नव्हते. वाचायच्या यादीत नोंद करून ठेवली आहे.
22 Jul 2015 - 4:59 pm | बाळ सप्रे
एका घटनाकाराच्या मते असलेला सेक्युलॅरिझमचा मूळ अर्थ एकाही राज्यकर्त्याला नीट न समजल्याने (अथवा मतांसाठी समजून न समजल्यासारखे केल्याने) धर्म आणि धर्मांधता वाढीस लागली आहे..
22 Jul 2015 - 5:23 pm | संदीप डांगे
फक्त मुस्लिमच धर्मांध आहेत का? बुरखा हा शब्द आहे म्हणून बाबासाहेबांचे वरील विधान फक्त मुस्लिमांना उद्देशून आहे का?
किती विवाह करावे, कसे वागावे हे कायदा ठरवतो तर हिंदूंना चालेल का? आताच रस्त्यावर मंडप घालू नये, दहिहांडीबद्दल चे कोर्टाचे आदेश पायदळी तुडवले. डीजे चे आवाज, धार्मिक मिरवणुका, वर्गण्या वैगेरे प्रकार बंद करावेत आधी धर्माभिमानी हिंदूंनी मगच समान नागरी कायद्याच्या गोष्टी कराव्या. तेव्हा लगेच हे हिंदू राष्ट्र आहे, इथे हिंदू मेजॉरीटी आहे हे आठवते. हिंदूंना आपल्या धर्माचरणाला आडकाठी करणारा कायदा रूचेल काय? मंदीरं-मस्जिद-गुरुद्वारा-चर्चेस तोडावी, यात्रा-जत्रा बंद कराव्या, जे जे म्हणून धर्माशी संबंधीत आहे ते कुठल्याही धर्माचे असो नष्ट करावे असा काही सेक्यूलरीजमचा अर्थ आहे काय? कायदा नेमका काय काय ठरवू शकतो आणि त्याचे काय पडसाद उमटतात याचे उदाहरण आपण नुकतेच गोमांसबंदी मधे बघितले. एका समाजास रूचत नाही म्हणून दुसर्या समाजाचे अन्न काढुन घेणे हाच सेक्युलरिजमचा अर्थ असावा बहुतेक.
प्रत्येकाला आपआपल्या धर्मानुसार आचरण करण्याची मुभा आहे. मग त्यात व्यावहारिक चालीरितींमधे कायदा कुठे आणि धर्म कुठे लागू करावा हे हिंदूंनीच आधी ठरवून घेतलेले उत्तम., तरच इतरांना समान नागरी कायदयाची बाळगुटी पाजता येण्याची पात्रता निर्माण होईल. कारण हिंदूंना सारखे मशिदींचे भोंगे, नमाजाच्या रांगा आणि मोहर्रमच्या मिरवणुकी खुपतात. पण वर्षभर चालणारे आपले ३३ कोटी उद्योग अजिबात दिसत नाहीत. ह्यालाच सेक्युलरिजम म्हणत असावेत.
22 Jul 2015 - 5:31 pm | टवाळ कार्टा
पटले
23 Jul 2015 - 3:48 pm | बाळ सप्रे
फक्त मुस्लिम धर्मांध असं तुम्हाला का वाटलं कोणास ठावूक ?
बहुतेक उदाहरणात फक्त बुरख्याचा उल्लेख खटकलेला दिसतोय.. आता उदाहरणातपण प्रत्येक धर्म कव्हर करा हो "राजघराणं"
धर्मांधता सर्व धर्मांना लागू होते.. फक्त मुस्लिम नव्हे!!
एकदा ध्वनिप्रदूष्णासाठी आवाजाची पातळी ठरवली की मशिदीचा भोंगा असो वा मिरवणूकीतला डीजे असो एकच नियम..
यात ध्वनिची मर्यादा ही कायद्याच्या अंमलात असावी.. धर्मग्रंथाच्या अंमलात नव्हे..
याप्रमाणे जीवनातील इतर बाबी या धर्माच्या अखत्यारीत न येता कायद्याच्या अखत्यारीत याव्या असे आंबेडकरांचे मत आहे हे या लेखावरून कळले..
22 Jul 2015 - 6:18 pm | प्रसाद प्रसाद
मला काही प्रश्न पडले आहेत, हे प्रश्न दुर्गा भागवत यांच्यावरील ऐसपैस गप्पा दुर्गा बाईंशी (लेखिका – प्रतिमा रानडे) हे पुस्तक वाचल्याने पडले आहेत. दुर्गाबाईंनी पाली भाषेचा अभ्यास केला आहे, त्यांनी बुद्धाचे विचार सांगितले आहेत, चांगले तसेच न पचणारे..... त्या सांगतात की बुद्धाने बौद्ध धर्म स्थापन केला तेंव्हा त्याला बौद्ध धर्मात स्त्रिया नको होत्या, हा धर्म फक्त भिक्षुंसाठी असावा असे त्याचे मत होते नंतर बुध्दाच्या आत्याला बौद्ध धर्म स्वीकारायचा होता, तेंव्हा बुध्दाच्या निकट शिष्याने बरीच रदबदली केली तेंव्हा बुद्ध स्त्रियांना बौद्ध धर्मात घ्यायला तयार झाला, पण अतिशय कडक निर्बंध त्याने स्त्रियांवर लादले. त्यापैकी एक म्हणजे स्त्री (भिक्षु) कितीही वयाची असो, तिच्या समोर कितीही लहान भिक्षु आला तर तिला उभे राहून त्याला अभिवादन करावे लागेल. बुद्धाचे असेही स्पष्ट मत होते की स्त्रिया कधीच बुद्ध होऊ शकणार नाहीत. इथे बुद्ध होऊ शकणार नाहीत म्हणजे निर्वाण पद त्यांना कधीच प्राप्त होणार नाही.
पुढे त्या डॉ. आंबेडकरांवर काहीशी कडवट टीका करतात त्यात त्या खरेच डॉ.आंबेडकरांनी बौद्ध धर्माचे पाली भाषेतील काही वाचले होते का असे विचारतात कारण त्यांच्या मताप्रमाणे डॉ. आंबेडकरांना पाली भाषा येत नव्हती. दुर्गाबाई पुढे सांगतात डॉ. आंबेडकरांचा बौद्ध धर्म आणि बुद्धाने सांगितलेला (स्थापन केलेला) बौद्ध धर्म यात केवळ नावाखेरीज काहीच साम्य नाही. दीक्षा हा प्रकार ही बुद्धाने खूप वेगळा सांगितला आहे. मग डॉ. आंबेडकरांनी स्वीकारलेला बौद्ध धर्म कोणता? (हा माझा प्रश्न)
(वरील मते माझी नसून दुर्गा भागवतांनी अभ्यासाने कमावलेली मते आहेत, वर उल्लेखलेले पुस्तक आत्ता समोर नाही जे आठवते त्यावर हे लिहिले आहे)
22 Jul 2015 - 6:21 pm | प्रसाद प्रसाद
वरील प्रतिसाद खटास खट यांची प्रतिक्रिया वाचून लिहिला आहे, योग्य ठिकाणी पोस्ट झाला नाही.....
22 Jul 2015 - 6:39 pm | अर्धवटराव
आंबेडकर बुद्धाच्या विपश्यनेतुन निर्वाण फिलॉसॉफीने किंवा भिक्कु संघटन/आचारविचार संचलनाने प्रभावीत झाले नव्हते. हिंदु धर्मातल्या काहि जाचक रुढी आणि विचारसरणी एका मोठ्या जनसमुदायाला ऐहीक आणि ( त्या अनुषंगंनाने, इच्छा असल्यास ) पारमार्थीक कल्याण साधायला मज्जाव करत होत्या. मुख्य म्हणजे तत्कालीन हिंदु धुरीण आणि राजकारणी याबद्दल उदासीन दिसत होते. त्यामुळे बाबासाहेबांनी धम्माच्या पर्यायावर विचार केला असावा.
22 Jul 2015 - 11:11 pm | खटासि खट
प्रसाद प्रसाद
विषय बाबासाहेबांच्या काठीने इस्लामचा साप मारणे असा आहे. त्यामुळे बाबासाहेबांची मतं नेमकी काय आहेत याची झलक द्याविशी वाटली. त्याच ग्रंथाची संपूर्ण लिंक इथे दिलेली आहे, जेणेकरून काय गाळलं गेलंय आणि काय ठेवलंय हे कळून येईल. या संदर्भात दुर्गा भागवतांचा संबंध कुठे येतो ? तुम्ही बाबासाहेबांची बौद्ध धर्मावरील मतं कशी चुकीची आहेत असा वेगळा धागा खुशाल काढावात.
22 Jul 2015 - 11:29 pm | विकास
विषय बाबासाहेबांच्या काठीने इस्लामचा साप मारणे असा आहे.
कुणालाही असे साप म्हणणे हे गैर वाटते, इतके येथे नमुद करू इच्छीतो.
23 Jul 2015 - 1:35 am | खटासि खट
ब्वार ! म्हण बदलू हा.
बाबासाहेबांच्या काठीने इस्लामचा विकास मारण्याची...
-------------------------------------------------------------------------------
स्वाक्षरी सुरू
आमचा उडवलेला प्रतिसाद तुमच्या हार्ड डिस्कला चांगलाच कोरल्या गेल्या आहे.
23 Jul 2015 - 5:59 am | dadadarekar
कुणी साप म्हणा कुणी चूक मणा... इस्लामला फर्क पडत नाही.
स्वामीनी लिहिले होते .... बूडाला औरंग्या पापी . म्लेंच्छ्संहार जाहला .
काय फरक पडला ?
23 Jul 2015 - 9:05 am | अर्धवटराव
+१
फरक केवळ औरंग्यावर नाहि तर अक्ख्या मुघल सल्तनतीवर पडला. औरंग्या स्वतःबरोबर सल्तनतीचं भविष्य घेऊन बुडाला...पण त्याचं काहि विशेष नाहि. आबाद करायचा वकुबच नसेल तर बुडण्याची लाज तरी का बाळगावी.
23 Jul 2015 - 6:31 am | खटासि खट
हे हे हे हे
अहो ते जुनी खुन्नस काढण्यासाठी म्हणींचा शब्दशः अर्थ काढून अनर्थ काढत आहेत, त्यांना म्हणीतला साप शब्द खटकलाय पण अजून काय काय उल्लेख झालेत त्याकडे लक्ष गेलेलं दिसलं नाही. खोलवर घाव बसलेला असावा.
तुमचा काय प्रॉब्लेम आहे ?
चालू द्या..
23 Jul 2015 - 6:45 am | dadadarekar
माहीत आहे.
24 Jul 2015 - 5:14 pm | तुडतुडी
@संदीप डांगे
धर्माभिमानी हिंदूंनी मगच समान नागरी कायद्याच्या गोष्टी कराव्या.>>
धर्माभिमानी असणं वेगळं . आणि धर्माचा माज असणं वेगळं . इतर धर्मीय लोक (केवळ हिंदूच नाही ) इतर लोक आपला धर्म स्वीकारत नाही म्हणून त्याची मुंडकी उडवा , त्यांच्या बायकांना भ्रष्ट करा, लुटमार करा असं सांगत नाही .
प्रत्येकाला आपआपल्या धर्मानुसार आचरण करण्याची मुभा आहे. >>>
हे मुसलमानांना कुठं कळतंय ? जग काय फक्त मुसलमानांसाठी आहे का ?
मुस्लिमांचा अतिरेकी धर्मवाद , इतर धर्मियांना अत्यंत क्रूर पद्धतीने नष्ट करण ह्याचे ऐतिहासिक संदर्भ तुम्हाला तुम्हाला माहित नसले तरी वर्तमानात काय चाललंय ह्याचं तरी भान असावं अशी आशा आहे . जगाला इस्लामिक बनवण्याच्या नादापायी काय भयानक क्रूर अत्याचार चाललेत (इसीस वाल्यांचे ) हे तुम्ही सध्या ऐकत वाचत आहात अशी अशा करूया . खरं तर भारतातले ७०% मुसलमान हे पूर्वीच्या मुस्लिम आक्रमकांनी धर्मांतरित केलेले हिंदूच आहेत .
14 Mar 2019 - 11:35 am | बाप्पू
वंचित आघाडी या नावाखाली काहीबाही बोलून आपले राजकीय अस्तित्व टिकवू पाहणाऱ्या प्रकाश आंबेडकर नावाच्या अडाण्याने वाचावा असा लेख.