भ्रमणगाथा-१ म्युनस्टर वारी

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
25 Aug 2008 - 12:06 am

सहलीचा सविस्तर व सचित्र वृतांत
मिसळपाव जर्मनी कट्ट्याच्या निमित्ताने आम्ही एकत्र जमायचे ठरवले.आम्ही दोघं फ्रांकफुर्ट, केसु डार्मस्टाट, लिखाळ व त्यांची सौ. म्युनस्टर आणि विपिन डॉर्टमुंडला राहणारे.. ही मोट बांधायची कशी?आणि कुठे? शेवटी भूगोलतज्ज्ञांनी डॉर्टमुंड सोयीचे पडेल असा निर्णय दिला. त्याप्रमाणे शुक्रवारीच आम्ही दोघं आणि केसु विपिनकडे डॉर्टमुंडला डेरेदाखल झालो.डॉर्टमुंड ते म्युनस्टर अवघा तासाभराचा तर गाडीचा प्रवास, त्यामुळे शनिवारी सकाळी लिखाळकडे जायचा बेत आखला. त्यात आणखी आमच्या जर्मन आजीने म्युनस्टर पाहूनच या असा प्रेमाचा सल्ला दिला होता.

छोटेसे टुमदार गाव आणि तिथले विद्यापीठ म्हणून म्युनस्टर प्रसिध्द आहेच. सायकलींचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या म्युनस्टरच्या मुख्य स्टेशनात ३०००च्या वर सायकली पार्क करायची व्यवस्था आहे. हॉलंडची सीमा इथून जवळ असल्याचा बहुदा हा परिणाम असावा. साडेनऊच्या सुमाराला आमची टोळी लिखाळच्या दारात हजर! आमच्या पैकी काही जण प्रत्यक्ष प्रथमच भेटत असले तरी औपचारिकपणाची झूल पहिल्या पाचेक मिनिटातच गळून पडली आणि वाफाळत्या चहाबरोबर खिदळणं सुरू झालं , जोडीला बुटरमिल्शकुकन होतंच आणि 'मिसळपावची ताजी तेज तर्रीही'! एवढ्या घाऊक प्रमाणात मराठी भाषक आणि तेही मिपाकर एकत्र आल्यावर मनसोक्त गप्पा रंगल्या आणि त्यातूनच भ्रमणमंडळाची सुपीक कल्पना निघाली. सौ.लिखाळांनी केलेल्या मटकीची उसळ,पोळ्या,भात,टोमॅटोचं अप्रतिम सार आणि गुलाबजामना (पाकासकट) न्याय देत पुढचे बेत सुरू झाले.
लिखाळच्या घराच्या मागे मोठ्ठाली शेतं आहेत,दोबाजूला हिरवीगार सावली असलेली पायवाट आणि मध्येच दिसणारे एखादे 'खेड्यामधले घर कौलारू'! त्या पायवाटेने बसच्या थांब्यावर जायला निघालो. तिथल्या शांततेला छेद देत आमचं खिदळणं चालूच होतं पण एका क्षणी मात्र सगळ्यांनाच ती शांत हिरवाई हवीशी वाटली. वार्‍याच्या एखाद्या मंद झुळूकेने होणारी पानांची सळसळ सोडली तर कसलाच आवाज नव्हता.ती शांतता वाचत असतानाच बस आली.

आ-से म्हणजे आ सरोवरापाशी पोहोचलो. समोर हंसे कलकलाट केला.. असे दॄश्य! अनेक काळ्याकरड्या पाणकोंबड्या,बदकांच्या घोळक्यात तो काळाभोर,लालबुंद चोचीचा,गुंजेच्या डोळ्यांचा राजहंस शोभून दिसत होता. (आधी राजहंस त्याच्या नावाप्रमाणेच रुबाबदार! त्यात काळा राजहंस पांढर्‍यापेक्षाही जास्त रुबाबदार दिसतो असं टोकिओत जेव्हा अगदी पहिल्यांदा काळा राजहंस पाहिला तेव्हाच मला वाटलं होतं त्याला आता इतरांकडूनही रुकार मिळाला.)त्या तळ्यात दूरवर एक प्लास्टीकचा भलामोठा हंस डोलताना दिसला. लिखाळने त्याची कहाणी सांगितली. ह्या खर्‍या राजहंसाची ती प्रेमिका आहे. जेव्हा तो प्लास्टिकचा हंस सरोवरातून काढून टाकला तेव्हा या प्रेमवीराने खाणेपिणे सोडले आणि तो झुरू लागला. ते पाहून परत तो प्लास्टीकचा हंस त्या तळ्यात सोडण्यात आला आणि एका शुभ्र हंसिनीलाही आणले.तीच आता त्याची प्रेमिका झाली आहे. त्या सार्‍या करड्या बदकांच्या कळपात ही राजबिंडी जोडी उठून दिसत होती. लगेचच 'कोचरेकरमास्तरांना' प्राणीमात्रांमध्ये वर्णभेद नसल्याची जाणीव झाली आणि त्यांनी तशी आपल्या डायरीत नोंद केली. सरोवराभोवतालच्या हिरवळीत बसून रहावं असा मोह फार होत होता पण ..त्या हिरवळीवरच्या भल्या थोरल्या गोलकांखाली आमची छबी काढली आणि पुढे निघालो.

( डावीकडून : स्वाती,सौ. लिखाळ, दिनेश, केशवसुमार, विपिन आणि लिखाळ )

जसं आपल्या गोव्यातल्या कोणत्याही देवळापुढे तळं आणि दीपमाळ असतेच असते तसं युरोपमधल्या कोणत्याही गावात चर्च,कथीड्रलच्या प्राचीन इमारती,त्यात कोरलेली प्रस्तरचित्रे आणि काचांवरचे नक्षीकाम असतेच असते.पण तरीही प्रत्येक ठिकाणचा वेगळेपणा,तिथल्या चर्चमधली शांतता अनुभवावीशी वाटते.दुसर्‍या महायुध्दात संपूर्ण उद्ध्वस्थ झाल्यावर कोणाला त्या पडझडीची शंकाही येऊ नये इतकं बेमालूम जोडकाम जवळजवळ सर्वच ठिकाणी केलं आहे, कलोनच्या कथीड्रलमध्ये,म्युनशनच्या चर्चमध्ये आणि इथल्या सेंट पॉल कथीड्रलमध्येही ! ह्या कथीड्रलचे अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे इस. १४०८ पासूनचे आजही चालू असणारे 'ऍस्ट्रॉनॉमिकल क्लॉक'( खगोलशास्त्रीय घड्याळ?).प्राचीन काळापासून जर्मन तंत्रज्ञान किती प्रगत होते ह्याची साक्ष म्हणजे हे घड्याळ आहे.

कथीड्रलमधल्या काचांवरची रंगीत चित्रनक्षी प्रकाशात आणखीच उजळून निघाली होती. ती मनसोक्त पाहून आणि फोटो काढून मुख्य चौकात गेलो. पूर्वीच्या काळी जेव्हा दळणवळणाची फारशी साधने नव्हती तेव्हा पाठीवर सामान लादून गावोगाव मालाची विक्री करत हिंडणारे वस्तूविक्ये असत.अशाच एका वस्तूविक्याचा प्रातिनिधिक पुतळा पाहून राटहाऊसकडे निघालो.
राट हाऊस (टाउन हॉल) अर्थात आपल्या मामलेदार कचेरीसारखा कारभार जिथून चालतो ती इमारत इथे प्रत्येक गावातच असते आणि जुन्या, प्राचीन,ऐतिहासिक संदर्भ असलेल्या इमारतीत राट हाऊस वसलेले असते. फ्रांकफुर्ट मधले 'बोलोंगारो पलास्ट' म्हणजेच 'बोलोंगारो पॅलेस' मध्ये असलेले राट हाउस तिथे नेपोलियन एक रात्र राहिला होता हे मिरवत असते. इथल्या राट हाऊसलाही ऐतिहासिक संदर्भ आहेच.१४ व्या शतकातला हा भक्कम 'पीस ऑफ वेस्टफालिया' लक्ष वेधून घेतो तिथे असलेल्या पोलादी हातामुळे आणि त्या हातातली तलवार सांगत असते , कायद्याविरुध्द वागलात तर गाठ माझ्याशी आहे..

सेंट लांबार्ट चर्च च्या कळसाजवळचे तीन भलेमोठे पिंजरे कुतुहल तर वाढवतातच पण त्या पिंजर्‍यांमागचे कारण समजले की थरकाप होतो.लायडनच्या जॉन ह्या डच व्यक्तीने आणि त्याच्या सहकार्‍यांनी १६व्या शतकात तत्कालीन धर्मसत्तेविरूध्द बंड केले त्याची शिक्षा म्हणून त्याला आणि सहकार्‍यांना मारून पिंजर्‍यात ठेवले आणि ते पिंजरे लांबार्ट चर्चच्या वर बांधले.त्यांच्या मृत शरीरांचीही विटंबना झाली. ती तिथेच तशीच सडली,कुजली. पन्नासेक वर्षांनी त्या पिंजर्‍यातल्या अस्थी बाहेर काढल्या परंतु ते पिंजरे मात्र आजही तिथेच लटकलेले आहेत. धर्म आणि सत्तेचा हा खेळ फार जुना आणि सगळ्या जगभरच आहे हे पाहून मन सुन्न झाले. अजूनही त्यांच्या पुण्यतिथीला तेथे मेणबत्त्या लावून अभिवादन केले जाते. कदाचित जर्मनीत प्रोटेस्टंट पंथी जास्त असल्याचा हा परिणाम असावा.
म्युनस्टरच्या त्या दगडी रस्त्यांवरून हिंडताना वारंवार म्युनशनची (इंग्रज साहेबाच्या भाषेत म्युनिक) आठवण येत होती.वास्तविक म्युनशन दक्षिणेला,आल्प्सच्या कुशीत तर म्युनस्टर उत्तरेला! दक्षिण आणि उत्तर जर्मनीतल्या गावांमधल्या घरांची,रस्त्यांची रचना, भौगिलिक परिस्थितीही खूपच वेगळी असताना हे 'साम्य' वेगळे वाटले.तिथल्या गल्लीबोळातून थोडा वेळ निरुद्देश भटकलो तरी कुतुहल काही नवे दाखवत होतेच. घड्याळाचा काटा पुढे सरकताना डॉर्टमुंडला जाणार्‍या गाडीची आठवण करून देत होता. त्यामुळे नाइलाजाने स्टेशनच्या दिशेने चालू लागलो.
गाडीत बसतानाच केसुंनी "रात्री पावभाजी मी करणार.." असे जाहीर केले आणि विपिनच्या घरी पोहोचल्यावर आम्हाला दोघींना किचन मध्ये फिरकूही न देता त्यांनी ए वन पावभाजी केली.

अशा मस्त पावभाजीनंतर चॉकलेट आईसक्रीम खात उद्या सकाळी सहाची बस आहे,लवकर उठायला हवं असं म्हणत म्हणत एक वाजेपर्यंत गप्पा चालूच होत्या..

(ब्रुसेल्स वृतांत- पुढील भागात.)

प्रवासलेखबातमी

प्रतिक्रिया

टारझन's picture

25 Aug 2008 - 12:24 am | टारझन

स्वाती तै .. मजा करतात राव लोक ... मस्त आहे .. आनंद झालेला आहे... तो राजहंस जरा मोठ्या साइझ मधे लटकवता आला तर पहा ना !! तुमची गँग पण मस्त .. कमी सभासद असून धमाल केलेली दिसते .. अभिनंदन

आन्दो आगेका लेख लवकरच

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

बेसनलाडू's picture

25 Aug 2008 - 12:46 am | बेसनलाडू

पुढचा भाग विनाविलंब येऊ देत.
(उत्सुक)बेसनलाडू

सहज's picture

25 Aug 2008 - 6:53 am | सहज

असेच म्हणतो.

सुरेख, पुढचा भाग वाचायला उत्सुक!

रेवती's picture

25 Aug 2008 - 2:24 am | रेवती

स्वातीताई,
प्रवासवर्णन संगतवार व चवदार लिहीले आहे. मीही मनाने प्रवास करायला सुरुवात केली आहे (अर्थात खादाडीतही सहभाग असेलच). पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहे.

रेवती

प्रियाली's picture

25 Aug 2008 - 3:58 am | प्रियाली

धर्म आणि सत्तेचा हा खेळ विशेषतः कॅथलिक चर्चेसचा पाशवी आहेच. आठवा, कोपर्निकस, गॅलेलिओ आणि इतर शास्त्रज्ञांची केलेली गळचेपी परंतु ते पिंजरे अद्याप तेथे आहेत हे वाचून खेद झाला.

असो, वृत्तांत आवडला.

अवांतर १:
सौ. लिखाळ गोड आहेत. आवडल्या

अवांतर २:
केसु प्रत्यक्ष पाककृतींचे विडंबन करत नाहीत हे लेख वाचल्यावर कळून चुकले ;) प्लेटेतली पावभाजी सह्ही दिसते आहे.

भडकमकर मास्तर's picture

25 Aug 2008 - 1:20 pm | भडकमकर मास्तर

परंतु ते पिंजरे अद्याप तेथे आहेत हे वाचून खेद झाला.
मलाही सुरुवातीला असेच वाटले पण कदाचित हा काळा इतिहास लोकांपुढे सतत असावा आणि त्यातून शिकायला मिळावे ( की काय आपल्याला कधीच करायचे नाही) म्हणून ते लटकावले असतील अजून तिथेच...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

लिखाळ's picture

25 Aug 2008 - 7:45 pm | लिखाळ

अवांतर एक बद्दल तिकडे कळवतो. धन्यवाद :)

मास्तरांच्या पिंजर्‍यांबाबतच्या मताशी सहमत.

--लिखाळ.

वैशाली हसमनीस's picture

25 Aug 2008 - 8:04 am | वैशाली हसमनीस

लेख आवडला.दिवस मस्त गेलेले वाटत आहेत.पिंजरे बघून मन खिन्न झाले.थोर माणसांचा शेवट नेहेमी असाच कां होतो,असा प्रश्न नेहेमी पडतो.धर्म आणि सत्ता यांचा खेळ सदैव पाशवीच ठरतो हे खरे!

वैशाली हसमनीस's picture

25 Aug 2008 - 8:04 am | वैशाली हसमनीस

लेख आवडला.दिवस मस्त गेलेले वाटत आहेत.पिंजरे बघून मन खिन्न झाले.थोर माणसांचा शेवट नेहेमी असाच कां होतो,असा प्रश्न नेहेमी पडतो.धर्म आणि सत्ता यांचा खेळ सदैव पाशवीच ठरतो हे खरे!

प्राजु's picture

25 Aug 2008 - 8:38 am | प्राजु

तुझी एकूणच वर्णन करण्याची हातोटी इतकी सुरेख आहे ना.. मग ते प्रवास वर्णन असुदे नाहीतर कट्टा वर्णन!.
सुंदर लेख. त्या पिंजर्‍यांचा इतिहास काळजाचा चरे पाडतो गं!! पुढचा लवकर लिहि वृत्तांत. फोटोंमुळे एकूण लेख अतिशय सुंदर झाला आहे.
के.सु चा हा गुण माहीती नव्हता. आता बहुतेक पेठकर काकांना प्रतिस्पर्धी आला असे म्हणावे लागेल.. ;)
आवांतर : ती पावभाजी म्हणजे पेठकाका स्पेशल पावभाजीचे विडंबन तर नव्हते ना?? (ह्.घ्या.) :?
(स्वगत : प्राजु... मार खायची लक्षणं मेली सगळी ही!! शांत बैस ना..)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

केशवसुमार's picture

27 Aug 2008 - 3:21 pm | केशवसुमार

प्राजुताई,
स्वातीताईंनी लेख पावभाजी खाऊन लिहीला आहे.. म्हणजे विडंबन नक्की नसावे..
पेठकरकाकांच्या जवळ पास पण जाण्याची आमची लायकी नाही.. उगाच त्या हत्तीशी या डुकराची स्पर्धा लावू नका..
(शेफ)केशवसुमार

लिखाळ's picture

27 Aug 2008 - 3:53 pm | लिखाळ

आपले नाव नक्की काय? पावभाजी मस्तच झाली होती आणि इतक्या सर्वांसाठीची भाजी एकट्याने केली. :)
-- लिखाळ.
केसु ष्टाईल स्वगत : अरे हे हल्ली चाललंय काय? हत्ती, डुक्कर, मॅमॉथ, ससे, बोके..मिपावर कोणकोण येते? ;)

ऋषिकेश's picture

25 Aug 2008 - 9:37 am | ऋषिकेश

खूप वाट बघायला लावल्यानंतर म्हटल्याप्रमाणे भ्रमणगाथा सुरु केल्याबद्द्ल आभार :)
प्रवासवर्णन लिहिण्यातील तुमच्या उस्तादीला अगदी साजेसे वर्णन.. खुप जिवंत.. मस्त... पुढील भागाची वाट पाहतोय..

केसुची पावभाजी फक्लास! (फक्त तो ब्रेड का असा चिवडलाय ;) )

बाकी पिंजरे पाहून मनाला होणारा क्लेश ते पिंजरे तिथे लटकवण्याच्या उद्देश सफल करतो

लिखाळाला मी वयाने बराच मोठा समजत होतो.. आता त्याला अहो -जाओ बंद ;)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

लिखाळ's picture

25 Aug 2008 - 7:49 pm | लिखाळ

>>(फक्त तो ब्रेड का असा चिवडलाय )<<
थाळी येवढ्या मोठ्या आकाराचा ब्रेड येथे मिळतो. अनेक प्रयोगाअंती तोच ब्रेड पावभाजीच्या भाजीसोबत खाण्यालायक आहे असा स्वातीताईचा अनुभव आहे.
त्या ब्रेडचे चैकओनी तुकडे करुन तेच भाजीबरोबर खायला घेतले होते.

>>लिखाळाला मी वयाने बराच मोठा समजत होतो.. आता त्याला अहो -जाओ बंद :)<<
स्वागत आहे. मला सुद्धा अहो-जाहो आवडतच नाही.

--लिखाळ.

मुक्तसुनीत's picture

25 Aug 2008 - 10:17 am | मुक्तसुनीत

ज्यांची आतापर्यंत उत्तमोत्तम पोस्टस वाचली त्या स्वातीताई , लिखाळ यांना प्रत्यक्ष पाहिले . खूप आनंद झाला ! आणि साक्षात केसु ! गुरुमाऊली ! काय हा चमत्कार !! ;-) दर्शनमात्रे मनकामनापूर्ती ! :-)

वृत्तांत सुबद्ध सुद्धा झालाय .....आणि खमंगही ;-) नवीन छान माहिती मिळाली. (स्वातीताई त्याबद्दल फेमस आहेतच ! )

असो. असेच वृत्तांत येवोत ही सदिच्छा !

विकास's picture

25 Aug 2008 - 8:23 pm | विकास

ज्यांची आतापर्यंत उत्तमोत्तम पोस्टस वाचली त्या स्वातीताई , लिखाळ यांना प्रत्यक्ष पाहिले . खूप आनंद झाला ! आणि साक्षात केसु ! गुरुमाऊली ! काय हा चमत्कार !! दर्शनमात्रे मनकामनापूर्ती !

वृत्तांत सुबद्ध सुद्धा झालाय .....आणि खमंगही नवीन छान माहिती मिळाली. (स्वातीताई त्याबद्दल फेमस आहेतच ! )

असो. असेच वृत्तांत येवोत ही सदिच्छा !

एकदम पटले. छायाचित्रांसमवेत लेख लिहील्याबद्दल धन्यवाद!

विसोबा खेचर's picture

25 Aug 2008 - 10:26 am | विसोबा खेचर

सर्व मिसळपाव जर्मनी कट्टेकरींचे हार्दिक अभिनंदन...

मिपाधर्म वाढवावा, अवघा हलकल्लोळ करावा!

स्वाती, भ्रमणगाथा छान जमली आहे. ब्रुसेल्स वृत्तांत येऊ द्या लवकर.
केशवाची पाभा लै भारी.... :)

सौ.लिखाळांनी केलेल्या मटकीची उसळ,पोळ्या,भात,टोमॅटोचं अप्रतिम सार आणि गुलाबजामना (पाकासकट) न्याय देत पुढचे बेत सुरू झाले.

वरील लेखातील सर्वात सुंदर वाक्य! :)

मिपा कर्मन कट्टेकरींचे फोटू पाहून आनंद वाटला.... :)

तात्या.

अनिल हटेला's picture

25 Aug 2008 - 12:01 pm | अनिल हटेला

मस्त च !!!

येउ देत पुढील भाग लवकर !!!!

केसु प्रत्यक्ष पाककृतींचे विडंबन करत नाहीत हे लेख वाचल्यावर कळून चुकले

हाहाहा!!!!!!!!!!!!!!!!!!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

पद्मश्री चित्रे's picture

25 Aug 2008 - 12:37 pm | पद्मश्री चित्रे

आणि फोटो दोन्ही सुन्दर.
पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत

मनीषा's picture

25 Aug 2008 - 12:44 pm | मनीषा

भ्रमणगाथा आवडली...
दोन महायद्धात राख होउन परत भरभराटीस आलेला देश म्हणून त्या देशाबद्दल एक कुतुहल वाटत.
तुमची वर्णन करण्याची शैली फारच छान आहे.

भडकमकर मास्तर's picture

25 Aug 2008 - 1:22 pm | भडकमकर मास्तर

मस्त वृत्तांत आहे...
फोटो आणि माहिती उत्तम...
तुम्ही एकूण भरपूर फिरलात म्हणजे...
...येउद्यात पुढील भाग लवकर
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्रभाकर पेठकर's picture

25 Aug 2008 - 2:57 pm | प्रभाकर पेठकर

मस्त धावते वर्णन. फोटो जरा मोठे टाकले असते तर जास्त मजा आली असती. काही हरकत नाही पुढच्या लेखात ह्या विनंतीची दखल घ्यावी.

सखी's picture

25 Aug 2008 - 5:46 pm | सखी

भ्रमणगाथा आवडली, पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Aug 2008 - 6:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जर्मन कट्ट्याची सफर आवडली. कोणत्याही स्थळाचे वर्णनाची आपली प्रतिभा, शब्दांची नजाकत वाचण्यासारखी असते.
पिंजर्‍याच्या इतिहास वाचून वाईटच वाटले, भ्रमनगाथाच्या पुढील भागाच्या प्रतिक्षेत...!!!

स्वाती मॅडम ,सौ. लिखाळ, दिनेश, केशवसुमार, विपिन आणि लिखाळ यांच्या दर्शनाने आनंद वाटला.

विसोबा खेचर's picture

25 Aug 2008 - 6:28 pm | विसोबा खेचर

मिपाच्या मुखपृष्ठावर पाभाचा फोटू चढवण्याकरता जर्मनी कट्टेकरींची आणि केशवाची परवानगी गृहीत धरली आहे! :)

तात्या.

स्वाती दिनेश's picture

25 Aug 2008 - 6:32 pm | स्वाती दिनेश

बाय ऑल मीन्स!
स्वाती

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Aug 2008 - 7:08 pm | बिपिन कार्यकर्ते

स्वाती ताई, वृत्तांत मस्त. तो काळ्या राजहंसाचा मोठा फोटो आहे का? क्लोजअप वगैरे... भारीच दिसतोय...

बिपिन.

चतुरंग's picture

25 Aug 2008 - 7:32 pm | चतुरंग

मस्तच आहे भ्रमणगाथेची सुरुवात! सर्व सदस्यांना चित्रात पाहून खरेच खूप छान वाटले. :)
स्वातीताई, आपली वर्णनशैली खरोखरच सुंदर, अतिशय अकृत्रिम आणि ओघवती त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला!
काळा हंस खरोखरच अप्रतिम आहे. गोलांवरच्या ग्राफिटीने जरा हिरमोड झाला. घड्याळाचा चमत्कार वाखाणण्याजोगा.
पिंजरे आणि त्यामागची कथा उद्वेगजनकच पण ते अजूनही तिथे आहेत त्यामागे लोकांनी वाईट इतिहास विसरु नये हाच उद्देश वाटातो.
आणि पाकशालेत साक्षात गुरुवर्यांना पाहून मनातल्या मनात कपाळाला हात लावला :S पण इथे ते केसुशेठ नसून अनिरुद्ध अभ्यंकर असतात #:S असे पावभाजीच्या डिशकडे आणि तुम्ही केलेल्या वर्णनाकडे बघून लगेच समजले! B)

चतुरंग

लिखाळ's picture

25 Aug 2008 - 7:54 pm | लिखाळ

स्वातीताई,
मस्त लेख ! आपल्या भ्रमणमंडळाची सुरुवात तर छानच झाली. आता ब्रुसेल्स बद्दल वाचायला उत्सुक आहे. :)

वरील चित्रात आहे तोच नाही पण माझ्या घराच्या जवळच्याच एका तळ्यातला काळा राजहंस आणि पिलू.


-- लिखाळ.

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Aug 2008 - 8:55 pm | बिपिन कार्यकर्ते

जबरा... मस्तच आहे काळू, पिल्लू पण गोड आहे. धन्यवाद रे लिखाळा...

बिपिन.

चंबा मुतनाळ's picture

30 Aug 2008 - 9:42 pm | चंबा मुतनाळ

बाबा काळ्यांचे गोरे पिल्लू ~X( @#$@#$@#
असो, कट्टयाचे वर्णन खासच.
माझी आणी केसुंची जरा चुकामुकच झाली गेल्या महिन्यात, बघुया सप्टेंबरमधे जमतय का ते!

- चंबा

रामदास's picture

25 Aug 2008 - 8:02 pm | रामदास

सुंदर वृत्तांत लिहीला आहे.आण्खी पुढच्या लेखांची वाट बघतो आहे.
कवि दिसतो कसा?पूर्वाश्रमीचे केसु कसे दिसतात याची उत्सुकता होतीच. पूर्ण झाली.
मिपाच्या निमीत्ताने बघा किती माणसं एकत्र येत आहेत.

केशवसुमार's picture

27 Aug 2008 - 3:29 pm | केशवसुमार

रामदासशेठ,
काय शिंगे किंवा शेपुट शोधत होता का..?
(पूर्वाश्रमीचा)केशवसुमार
मिपाच्या निमीत्ताने बघा किती माणसं एकत्र येत आहेत.
रामदासशेठ अगदी खरं बोल्लात..कोण कुठले..अता अगदी बालपणीचे साथीदार वाटतात..
(कोण कुठला)केशवसुमार

वैद्य's picture

25 Aug 2008 - 9:51 pm | वैद्य (not verified)

मुख्य म्हणजे नेहमीप्रमाणे नुस्ते कट्ट्याचे वर्णन नसून, नवनवीन माहितीही मिळते आहे.

अभ्यंकरांना जर्मनी मानवलेली दिसते (;-) दर दोन आठवड्यांनी स्वातीताईंकडे जाऊन भरपेट हादडण्याचा परिणाम असावा (ह. घ्या.)

-- वैद्य

केशवसुमार's picture

27 Aug 2008 - 3:35 pm | केशवसुमार

अभ्यंकरांना जर्मनी मानवलेली दिसते ( दर दोन आठवड्यांनी स्वातीताईंकडे जाऊन भरपेट हादडण्याचा परिणाम असावा (ह. घ्या.)
सर्किटशेठ,
एकदम खरे बोल्लात..;) जळ्याचा वास पण आला... :P
(गरगरीत)केशवसुमार
स्वगतः तरी बरं हा वैदु 'ये राम गड वाले कोनसे चक्की का आटा खाते है..' अस काही नाही म्हणाला.. :B

मनस्वी's picture

26 Aug 2008 - 11:51 am | मनस्वी

भ्रमणगाथा १ आवडली. स्वातीताई, वर्णन खूप छान केले आहे. फोटो सह्हीच आहेत सगळे.
भ्रमणमंडळाच्या भ्रमणवारी २ साठी शुभेच्छा. भ्रमणगाथा २ लवकर येउदेत.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

नंदन's picture

26 Aug 2008 - 12:06 pm | नंदन

सचित्र वृत्तांत आणि वर्णन आवडले. काळा राजहंस आणि पावभाजी यांचे फोटोजही मस्त. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सुनील's picture

26 Aug 2008 - 12:59 pm | सुनील

लेख आणि फोटो दोन्ही आवडले

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

धमाल मुलगा's picture

26 Aug 2008 - 3:01 pm | धमाल मुलगा

स्वातीताई,
फोटो आणि भ्रमणमंडळाचा हा वृत्तांत छान :)

बाकी, हे 'काळा राजहंस' पहिल्यांदाच ऐकलं आणी पाहिलं बॉ.

अवांतरः पावभाजी नक्की कोणी केली होती? अनिरुध्द ह्यांनी की केसु ह्यांनी? नाही म्हणजे ओरिजिनल पावभाजी होती की तिचं विडंबन ते समजुन घ्यायला बरं.
(स्वगतः केसुशेठची विडंबन निवृत्ती ही फक्त कवितांपुरती मर्यादीत होती का?)

केशवसुमार's picture

27 Aug 2008 - 3:42 pm | केशवसुमार

स्वतीताई,
लेख एकदम झकास...
पटेल स्नॅप च्या नादात चुकलेली/ न ऐकलेली माहिती पण मिळाली
केसु पटेल.. L)
पुढचा भाग लवकर टाका..
(आतुर)केशवसुमार
स्वगतः केश्या तुझा ठेरपोटा फोटो त्या चौघांपैकी कोणी काढला शोधायला हवे.. X(

यशोधरा's picture

30 Aug 2008 - 10:04 pm | यशोधरा

स्वातीताई, मस्त वर्णन आणि फोटो :) भाग २ कधी लिहितेस?
लि़खाळ, तुम्ही टाकलेला राजहंसाचा आणि पिल्लाचा फोटोही खास आहे! पिल्लू तर भलतंच क्यूट!

मदनबाण's picture

31 Aug 2008 - 5:20 am | मदनबाण

ताई.. ब्रुसेल्स वृतांताची वाट पाहतो आहे..

मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

स्वाती दिनेश's picture

2 Sep 2008 - 1:14 am | स्वाती दिनेश

भ्रमणमंडळाच्या वतीने सर्व मिपाकरांना मनापासून धन्यवाद,
आमचा ब्रुसेल्स वृतांत इथे पहा.त्यात फोटोंचा आकार वाढवला आहे पेठकर. आणि बाकीच्यांच्या शंकांना लिखाळ आणि केसुंनी उत्तरे दिली आहेतच.
स्वाती