गेले काही दिवस मला एक प्रश्ण मनात घर करून आहे: मुलांना शाळेत न घालता त्यांना बाहेरून परीक्षा देता येऊन, कायदेशीर रित्या 'शालेय शिक्षण' पूर्ण करता येतं का? पहिलीपासून किंवा त्याही आधीपासून ते दहावी पर्यंतचे शिक्षण, हे मला या इथे अभिप्रेत आहे.
असं करता येत असेल तर त्यासाठी काय पर्याय आहेत? कुठल्या formalities त्यासाठी पूर्ण कराव्या लागतात? आणि तसंच, असं करता यावं यासाठी काही पात्रतेचे निकष आहेत का? हे सगळं मी महाराष्ट्रात रहाणार्या मुला-मुलींंच्या बाबत विचारतोय. परंतु अशी व्यवस्था महाराष्ट्राबाहेरही उपलब्ध असल्यास त्याचीही जरूर माहिती द्या अशी मी मिपावरील जाणकार मंडळीना विनंती करतो.
हे असं करणं उचित आहे की नाही किंवा असं करावसं वाटण्यामागची कारणे काय आहेत या चर्चेत शक्यतो मला सहभागी व्हायचं नाहीये. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्णांचं माझ्याकडून उत्तर नाही आलं तर प्रश्णकर्त्यांनी कृपया वाईट वाटून घेऊ नका. कुणासही दुखावण्याचा किंवा दुर्लक्षण्याचा माझा हेतू नाही.
प्रचलित शिक्षणपद्धतीशिवाय (त्यापलीकडे किंवा त्यातच) काही अजून पर्याय आहेत का याचा मी शोध घेत आहे. असे इतरही काही पर्याय कुणास माहीत असतील (उदाहरणार्थ Military Schools) तर जरूर मार्गदर्शन करा.
धन्यवाद!
प्रतिक्रिया
3 Jul 2015 - 3:38 pm | जडभरत
मी पहिला.
भाऊ ओपन युनिव्हर्सिटीचा सर्च करून बघा नेटवर, ते नक्कीच हा पर्याय देत असतीळ. बादवे, माझा मिपावरचा सगळ्यात पहिली क्मेंंट
3 Jul 2015 - 3:48 pm | ऋतुराज चित्रे
अहो, जडभरतभाऊ त्यांनी पहिलीपासून किंवा त्याही आधीपासून ते दहावी पर्यंतचे शिक्षण, हे मला या इथे अभिप्रेत आहे, असे म्हटले आहे.
3 Jul 2015 - 3:40 pm | अस्वस्थामा
होम स्कुलिंग या विषयावर इथेच बर्यापैकी चर्चा झालीय आधी. मला वाटतं "मुलांची शेती" या लेखमालेदरम्यान. लिंका सापडल्या तर देतो (नैतर रंगा भौ हैच). बाकी चर्चा होईलच. :)
5 Jul 2015 - 10:34 pm | श्रीरंग_जोशी
मुविंनी लिहिलेले मूलांची शेती....भाग १, २, ३, ४ वाचनीय आहेत.
धागाकर्त्याला शुभेच्छा!!
5 Jul 2015 - 10:04 pm | आनंदी गोपाळ
३ नंबरच्या लिंकेत छगनलालांचे सापळे आलेत..
5 Jul 2015 - 10:35 pm | श्रीरंग_जोशी
धन्यवाद. दुरुस्ती झालेली दिसत आहे.
4 Jul 2015 - 2:44 am | पाटीलअमित
ज्यांचे शिक्षण नाही झाले ते form १६ भरून दहावी होऊ शकता असे ऐकलेय बा
4 Jul 2015 - 11:31 am | खटपट्या
फोर्म क्र. १७ आहे बहूतेक
4 Jul 2015 - 2:46 am | पाटीलअमित
उसने 9 साल की उम्र में दसवीं पास की। 10वें साल में बीएससी पास की। 12वें साल में फीजिक्सय में एमएससी। 21वें साल में इंडियन इंस्टीट्यूट साइंस (आईआईएससी), बंगलुरु से क्वां टम कंप्यूटिंग में पीएचडी किया। अब 22 बसंत में पांव रखने वाले तथागत अवतार तुलसी इंडियन इंस्टीपट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, मुंबई में असिस्टेंट प्रोफेसर बनने जा रहे हैं। इसी के साथ बिहार का पटना का यह सपूत शायद सबसे कम उम्र में असिस्टेंट प्रोफेसर बनने का खिताब भी हासिल कर लेगा।http://www.janatantra.com/news/2010/07/14/dr-tathagat-tulsi-is-joining-i...
4 Jul 2015 - 5:58 am | होकाका
जडभरत, ऋतुराज चित्रे, अस्वस्थामा, श्रीरंग_जोशी, आणि पाटीलअमित: सर्वांचे मनःपूर्वक आभार. मूलांची शेती चे भाग या विकान्तात वाचून काढेन.
4 Jul 2015 - 6:54 am | नगरीनिरंजन
शाळा नको म्हटलं की मेंढरं वळायला जायचं का असं आमचे वडिलधारे आमच्या लहानपणी म्हणायचे. राजकारणात घाला शाळा नको असेल तर. :-))
4 Jul 2015 - 12:38 pm | धर्मराजमुटके
हो, पण तिथे तावडे भाऊंसारखा डिग्रीचा वाद उफाळणार नाही याची काय गॅरंटी ?
6 Jul 2015 - 3:36 am | स्वाती२
आजकाल भारतातही पालक होम स्कूलिंगचा पर्याय स्विकारताना दिसतात. पुणे, बंगलोर वगैरे ठिकाणी पालकांचे सपोर्ट ग्रुपही आहेत. इंडिया होमस्कुलिंग असे गुगल केल्यास नेटवरील फोरम वगैरे माहिती मिळेल. स्वशिक्षण म्हणून साईट आहे- http://homeschoolers.in/ त्यांच्याकडे चौकशी करु शकता.
तुम्ही मिलीटरी स्कूल बद्दलही चौकशी केली आहे. त्यांचा अभ्यासक्रम चांगला आहे मात्र ते स्ट्रक्चर सगळ्यांनाच रुचेल असे नाही. होमस्कुलिंगमधील मुक्तपणा तिथे नाही.
तुम्हाला शुभेच्छा!
6 Jul 2015 - 6:47 am | dadadarekar
मिलिटरी स्कूल हे होम स्कूलिंग नाही.
मायबोलीवरही चर्चा झालेली आहे.
6 Jul 2015 - 10:44 am | _मनश्री_
माझ्या भावाने दहावीची परीक्षा बाहेरूनच दिली
७ वी नंतर डायरेक्ट १० वी ची परीक्षा दिली
७ वी ची परीक्षा झाल्यावर १ वर्ष छान आराम केला ,व्यायाम ,चित्रकला,अवांतर वाचन ,भरपूर खेळ ,हिंडण फिरणं
ह्यामुळे तो खूपच फ्रेश आणि उत्साही झाला
नंतर दहावीची पुस्तक आणून घरीच अभ्यास केला
फक्त गणिताचा क्लास लावला बाकी सगळा अभ्यास त्याने घरीच वेळापत्रक आखून केला
छान मार्क मिळाले त्याला दहावीला ,आणि बारावीची परीक्षा सुद्धा त्याने अशीच दिली
बारावीला त्याला अकाउन्टिंग आणि maths साठी क्लास लावला होता।
आता तो लॉ करतोय ,आता कॉलेजला जातो
घरी अभ्यास केल्यामुळे त्याला काहीच प्रॉब्लेम आला नाही
सातवी पास झाल्यानंतर सुद्धा दहावीची परीक्षा देता येते
दहावीची परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्याचे वय १४ पूर्ण असावे लागते
s.s.c. बोर्डात जाऊन दहावीसाठी प्रवेश घ्यावा लागतो ,
बरोबर शाळा सोडल्याचा दाखला आणि जी इयत्ता पास झाला त्याच गुणपत्रक न्याव लागत
साधारण जुलै च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रवेश चालू असतो
तिथे जाऊन १७ नंबरचा फॉर्म भरून द्यायचा
फॉर्ममध्ये शाळांची यादी दिलेली असते
त्यातली तुम्हाला सोयीस्कर असणारी शाळा निवडायची
तिथे वर्ष भरात फ़क्त ५ - ६ वेळा जाव लागत
तोंडी परीक्षा देण्यासाठी ,प्रयोगवही जमा करण्यासाठी आणि बोर्डाच्या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी
हॉल तिकीट शाळेतूनच मिळत
माझ्या भावाने ४ वर्षापुर्वी परीक्षा दिली तेव्हा ३ हजार रुपये शुल्क होत ,आता पाचेक हजार असेल
आणि शाळेत कसलिहि फी भरावी लागत नाही
6 Jul 2015 - 8:19 pm | होकाका
मनरंग, धन्यवाद.
6 Jul 2015 - 10:19 pm | होकाका
मनरंग, मोबाइलवर टाईप केलेला प्रतिसाद उमटू शकला नाही. थोड्या वेळाने मग आपल्या खरडवहीत प्रतिसाद दिला तो व्यवस्थित उमटला. ख.व.वर म्हटल्याप्रमाणे, मनापासून आभार. मी काही कालावधितच आपल्याशी संपर्क करेन.
6 Jul 2015 - 8:34 pm | होकाका
१) स्वाती२, धन्यवाद. अजून एक (कदाचित अज्ञानपूर्ण) प्रश्ण: सैनिकी शाळा या फक्त मुलग्यांसाठीच असतात की मुलींनाही तेथे प्रवेश मिळू शकतो?
२) dadadarekar, धन्यवाद. मायबोलीच्या धाग्याचा इष्टदुवा मिळू शकेल का?
6 Jul 2015 - 8:36 pm | होकाका
धर्मराजमुटके, नगरीनिरंजन, धन्यवाद.
6 Jul 2015 - 9:41 pm | स्वाती२
>>सैनिकी शाळा या फक्त मुलग्यांसाठीच असतात की मुलींनाही तेथे प्रवेश मिळू शकतो?>> काही शाळा मुलींसाठीही आहेत. उदा. महाड जवळची रायगड मिलिटरी स्कूल . बहुतेक ठिकाणी प्रवेश परीक्षा असते आणि शाळा निवासी . त्यामुळे आई-बाबांशिवाय राहायची तयारी हवी.
खरे तर होमस्कुलिंग आणि मिलीटरी स्कूल ही स्पेक्ट्रमची दोन टोकं आहेत. दोन्ही पर्याय चांगले आहेत. तुमच्या पाल्यासाठी काय योग्य ते पहा. मिलीटरी स्कूलला प्रत्यक्ष भेट देवून माहिती घ्या. बरेचदा त्यांचे सुट्टीचे प्रोग्रॅम्स असतात. अशा छोट्या कालावधीच्या कोर्सवरुन आपल्या मुलाला काय रुचतेय याचा अंदाज बांधता येइल. होमस्कुलिंग ग्रुपला संपर्क करुन त्यांच्याशी देखील बोला. ही एक लाइफस्टाइल आहे. चौथी-पाचवी पर्यंत पालकांना बर्यापैकी वेळ द्यावा लागतो. मुलाला हसत खेळत शिक्षण देताना रोजच्या व्यवहारातल्या गोष्टींमधून शिकवायची आवड हवी आणि घरी राहून शिकणे मुलालाही रुचायला हवे.
6 Jul 2015 - 10:25 pm | होकाका
स्वाती२, खूप उपयुक्त माहिती आणि सल्ला सुद्धा. खरं आहे. मला दोनही (विरुद्ध / दोन टोके) पर्यायांची माहिती करून घ्यायची आहे. सुट्टीचे प्रोग्रॅम्स हा चांगला पर्याय आहे - मुलांचा कल समजून घेण्यासाठी. निर्णय हा बर्याच अंशी मुलांचा कल आणि उपलब्ध पर्याय याच निकषांवर (त्यांचे विश्लेषण करूनच) घ्यावा असं मला वाटतंय.
7 Jul 2015 - 11:12 am | dadadarekar
http://www.maayboli.com/node/17132
http://www.maayboli.com/node/31406