मूलांची शेती....भाग ३...मुलांची ओळख...

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
1 Jul 2012 - 2:22 pm
गाभा: 

आधीचा भाग : http://www.misalpav.com/node/22123

मनोगत आणि आढावा..

मनोगत

१. इथे मी एका "बापाचा" द्रुष्टीकोन मांडत आहे.माझी भगिनी समाजाला विनंती आहे, की, त्यांनी पण "आईची" भूमिका मांडावी.
२. माझे विचार जर चूकत असतील तर , जरूर सांगा, कारण , मला माझ्यातील "ग"ची बाधा टाळायची आहे.
३. हा लेख लिहीत असतांना. मनात बरीच खळबळ माजली होती. (छगनलाल त्रास देत होते) म्हणून , लेख टाकण्यापूर्वी , एका मिपा-सभासदाकडून , चेक करून घेतला. (त्यांनी व्याकरणांतील दोष दूर करायला मदत केली..त्या सभासदाचे नांव , शेवटच्या लेखांत देईन.)
========================================================

आढावा आणि पाया

मागील भागात आपण "स्व ओळख" करुन घेतली.मला जाणीव आहे, की , एक वेळखावू प्रोसेस आहे.(मला माझ्यातील "व्यवस्थापक" बाहेर काढायला १५ वर्षे लागली.)अजूनही ती थांबलेली नाही.माझ्यात अजून्ही काही सुप्त गूण असतील, ते शोधणे अजून चालू आहे. पण ही एक अशी सवय आहे, की , ती , आपले अधःपतन होवू देत नाही.

आजचा भाग , सर्वात महत्वाचा आहे, स्वतःला ओळखायला जर १०-१२ वर्षे लागतात, तर मुलांना ओळखायला किती लागत असतील?

========================================================

काही मूलभूत गोष्टी लक्षांत ठेवा.थोडे कठोर पणे सांगत आहे, राग नका मानू.

१. काही काही गोष्टी, देव , आपल्या पदरांत टाकतो.त्या आनंदाने , हसत खेळत स्वीकारा. तूमचे मुल , हा पण त्याचाच एक भाग आहे.तूम्हाला "बाप" व्हायचे होते, तूम्ही झालांत, ते स्वतःहून काही आले न्हवते, त्याच्या जन्माला, तूम्ही कारणीभूत आहात.

एकदा तूमच्या मनांत , ही गोष्ट ठसली, की आपले बरेचसे काम , सुकर होते.

२.जेव्हढा जमेल तेव्हढा वेळ काढा आणि तो मुलांच्या बरोबर घालवा.आज जेव्हढा वेळ तुम्ही त्याच्या बरोबर घालवाल , तो सगळा वेळ सत्कारणी लागेल.गेली २ वर्षे, मी घरा बाहेर आहे.घरात मी फार कमी वेळ असतो, तरी पण घराचे नियम मुले पाळतात कारण , मी सत्कारणी लावलेले त्यांच्या बरोबरचे क्षण.

३. सहज जमले, तर "इंटरनेट" घ्या. मुलांना त्यांचे प्रोजेक्ट पूर्ण करायला ह्याची खूप मदत होते. पण ह्याचे तोटेही खूप आहेत.संगणकाला पासवर्ड प्रोटेक्शन देणे, स्वतः त्याच्या बरोबर बसणे,१/२ ते १ तासच बसणे, गेम थोड्यावेळ खेळणे इ.उपाय करा.

माझी मूले , मराठी माध्यमात असल्याने , मला इंटरनेटचा फायदा झाला.मुलांनी इंग्रजी वाचायची सवय लागली.

४. जर सहज शक्य झाले, तर , टि.व्ही. नावाच्या राक्षसाला बाहेर काढा. ३ वर्षे , माझ्याकडे "केबल" न्हवती. हे "टि.व्ही. महाराज" होते.पण त्याचा रिमोट माझ्या हातात होता. डि.व्ही.डी. , प्लेयर होता.. दर शनिवारी किंवा, मुलांना वेळ असेल त्या प्रमाणे सिनेमे आणायचो आणि एकत्र बघायचो.त्या सिनेमावर चर्चा करायचो.आपसूकच मुले मोकळी होत गेली.

(ह्या ३ वर्षांत , माझ्या बायकोने मला, मनापासून साथ दिली.)

गेल्या ३५- ३६ वर्षांत (आमच्या कडे टि.व्ही., १९७५ साली आला.) मी अजून पर्यंत एकदाही , बातम्या बघितल्या नाही आहेत.सरकार कूठलेही येवो, माझी उन्नती , माझी मीच करून घेतली.इंदिरा गांधींच्या काळात पण तेच "गरीबी हटाव" धोरण होते आणि आज पण तेच आहे.काश्मीर प्रश्न नेहरूंच्या काळात पण होता आणि अजून तो ५० वर्षे पण असाच राहील.त्यावर चर्चा करत आपला वेळ घालवण्यापेक्षा मी इतर ठिकाणी तो वापरला आणि त्याचा मला फायदा पण झाला.

मी हा वेळ वापरला तो. नाटके बघण्यात, सिनेमा एंजॉय करायला आणि वाचन करायला.ह्याच ३ माध्यमांमूळे, मला मुलांची शेती करता आली.

========================================================

प्रथमत: ,

मू.वि. स्वतः त्यांच्या मुलांना ओळखतात का?, तर नाही... मला अजून त्यांचे सगळे गूण समजलेले नाही आहेत, पण जे काही समजले , ते त्यांनाच सांगीतले आणि त्याचा त्यांना फायदा झाला.

तरी पण , मी एक अर्धा-मूर्धा बाप असून पण मी हे का सांगत आहे?तर मला ह्या सगळ्या प्रोसेसला १५-१६ वर्षे लागली.त्यातून मला ४/५ गूण मिळाले.
========================================================

कूठलाही "शेतकरी". आपले शेत कसे आहे आणि बियाणे कसे आहे ते बघून मगच, ते कसे पेरता येइल ते बघतो.सामन्यतः घाटावर, आंब्याची झाडे, बांधावर लावली जातात , तर कोकणांत , त्याचेच मुख्य पिक घेतल्या जाते. आपला मुलगा कुठल्या जातीत बसतो ते ओळखा.

देवाने सगळे आंबेच पाठवलेले असतात आणि वेळ वाया घालवणारे आई-वडील त्यांना समजून न घेता , कच्चेच ठेवतात.

मूलांना ओळखायला मी एकच "टीप" वापरत आहे.माझ्या मुलांचे काही गूण समजले तर काही डेव्हलप होत आहेत.आम्ही सगळेच अजूनही त्यात १००% यशस्वी न झाल्याने, ते लिहीत नाही आहे.योग्य वेळ आल्यास टाकीन.गैर समज नसावा.पण माझ्या माहितीतले एक छान उदाहरण देत आहे.कारण मी पण ह्याच उदाहरणाला फॉलो करत आहे.

मुलांचे पाय पाळण्यांत दिसतात,,,, १०० % खरी गोष्ट.... पण कूणासाठी ? जर तो मुलांबरोबर असेल त्यांच्या साठी.माझे आजोबा "हे" गूण ओळखण्यांत एकदम एक्सपर्ट होते.माझ्या मावशीच्या ३ही मुलींना त्यांनी वेगळी-वेगळी शिक्षणे घ्यायला लावली..

अ) एकीचा अभ्यासू पणा, चिकाटी आणि एकाग्रता बघून तिला फिजिक्स घ्यायला सांगीतले, आज ती एम.एस्सी. करून अमेरिकेत आहे.

ब) दूसरीला , तिची गाण्याची आवड बघून, गाणे शिकायला सांगीतले, ती नंतर, प्रभा अत्रे, ह्यांच्याकडे गाणे शिकत होती.आज ती पण गाण्याचे क्लासेस घेते.(मूलतः ही बहीण एकपाठी होती.गाणे आणि बी.एस्सी, त पहिला वर्ग एकाच वेळी पूर्ण केले)

क) तर तिसरीला, तिचे कला गूण ओळखायला , मावशीला मदत केली.आज ती पण तिच्या क्षेत्रात पुढे आहे.

आजोबा बसले, गप्पा मारल्या आणि १० मिनिटांत निकाल दिला, असे झाले नाही. त्यांनी ७/८ वर्षे लावली, हे गूण ओळखायला.मावशीला सांगीतले.आजी-आजोबा, मावशी व काका ह्यांनी विचार-मिनिमय केला.काही प्रयोग केले आणि मग त्या शिक्षणाचा पाया मजबूत केला.

हे सगळे का जमले? तर आजोबा दिवसांतले १०-१२ तास त्या मुलींबरोबर होते.त्यांना बराच अनूभव असून पण इतका वेळ लागला...

मी खाली काही, मूलभूत कल्पना मांडत आहे...त्याच खर्या असे समजून चालू नका...एका दिवसांत किंवा ३ महिन्यांत ह्या निकालाची अपेक्षा धरू नका..तूमच्या निरीक्षणाला इतरांच्या निरिक्षणाची जोड द्या.

अ) मुल अभ्यास कसा करत आहे ते बघा.त्याला तो आवडत आहे का? आज १० मिनिटे , उद्या १५ मिनिटे आणि नंतर ३० मिनिटे, असा बसत आहे का? नविन प्रश्न विचारत आहे का?
ब) गायला आवडत आहे का? चांगल्या गूरूला दाखवा.बरेच जण फक्त पैशांसाठी, खोटे बोलतात.त्यांना टाळा.
क) नक्कल करायला आवडत आहे का? पाठांतर आहे का? माणसांचे अवलोकन करत आहे का?
ड) स्वैपाक करायला आवडते का? (आमच्या सगळ्या फॅमिलीला स्वैपाक येतो.आम्हा सगळ्या भावंडांना तो करायला आवडतो.)
इ) वाचायला आवडते का? ( आमच्या घरांत मुले , संगणकाचा वापर करून वाचतात.)
ई) चित्रे काढायला आवडतात का?(मोठ्या, मुलाचा हा गुण, तो ९वीत असतांना लक्षात आला.पण तो "डेव्हलप" पुढे-मागे , त्याचा तोच करेल)

ही खूप मोठी वेळ खावू प्रोसेस आहे.

बी कूल & हॅव पेशन्स
========================================================

पूढचा भाग ह्या कवितेवर आधारीत आहे...

" खिळ्या परी नाल गेली.
नालेपरी स्वार गेला
स्वारा परी राज्य गेले
एव्हढा अनर्थ "खिळ्याने" केला"

सगळ्या शेतीचे तत्वज्ञान , ह्या ४ ओळींत सामावले आहे.तूमचे घर, हे तूमचे राज्य आहे, त्यात तूमचा मुलगा, हा राजकुमार आहे.तुमच्या एका छोट्याशा चूकीचे परीणाम त्याला भोगायला लागतील... तेंव्हा सावधान, वेळीच जागे व्हा.

प्रतिक्रिया

शेवटची कविता तर फारच सुंदर आहे. त्या कवितेमुळे आशय ध्वनित होण्यास मोलाची मदत होते. हा लेखदेखील खूप आवडला. मूवि आपल्याला एक विचारायचे आहे - "आपली मुले उद्या फेसबुक वापरु लागली तर आपण फेसबुकवर त्यांचे मित्र म्हणून जाल का?" गेल्यास का न गेल्यास का नाही? कालच मी पुढील - मॉम आय लव्ह यु बट प्लीज डोन्ट फ्रेन्ड मी ऑन फेसबुक लेख वाचला.
त्यातील हे वाक्य - one large aspect of feeling like a truly independent adult is getting to control how much we let people in. When a parent makes that friend request, there's an implicit feeling like we're losing some of that control. (स्वैर भाषांतर : एक स्वतंत्रव्यक्ती बनणे हे अनेक घटकांवर वलंबून असते पैकी एक घटक असतो तुम्ही इतर लोकांना व्यक्तीगत जीवनात किती शिरकाव करु देता. पण जेव्हा पालक फेसबुक रिक्वेस्ट पाठवतात तेव्हा या घटकाशी तडजोड करावी लागल्याने मूळ व्यक्तीस्वातंत्र्याच्या कल्पनेवर गदा येते)
__________________
माझ्या मुलीचे आणि माझे म्हणाल तर आम्हा दोघींना हसायला आणि बोलायला खूप आवडते. गप्पा-गप्पा-गप्पा-हसणे हे सहज होते. आम्ही क्वचित भेटतो कारण मी नोकरीनिमित्त दूर रहाते. त्यामुळे ती उदाहरणातून शिकावयाच्या गोष्टींना मुकते आणि मी तर तिच्या सहवासाला अतोनात मुकते. पण मी तिला काही बेसिक (मूळ) मूल्ये/संस्कार देण्याचा प्रयत्न करते.

मुक्त विहारि's picture

1 Jul 2012 - 8:27 pm | मुक्त विहारि

मला आवडलेल्या , व्यक्त्तींची ओळख, मी माझ्या बायकोला करून देतो. आम्हा दोघांचे बरेच कॉमन मित्र आहेत.तसेच मुलांच्या बाबतीत पण आहे. मुळात , इंटरनेटचे , लोकेशन असे आहे, की, कोण काय वाचत आहे, ते सगळ्यांना दिसते..

माझे, इथले लेख पण माझी बायको वाचते.मुले पण वाचतात. काही लेखांवर आम्ही चर्चा पण करतो.

माझे जवळ जवळ सर्व नातेवाइक फेबु वर आहेत.
मी माझी बायको (मझी मुलगी), माझे आई वडील, माझे भाउ , माझे सासरे, काका मामा.. लीस्त खुप मोठि आहे..
आम्ही सर्वच फेबु वापरतो..
जीओग्राफिकली जरी आपण दुर असलो तरि अन्तरजालावर आपण सर्व खुप जवळ असतो..(भासतो)