आपण मिपाकर्स आद्य खाद्यप्रेमी आहोत. तेव्हा जिथे जाऊ तिथे खाऊ खाऊ करत असतो. सगळ्या खाद्य-खासियती आम्हा ठावकी.
तर इथे आपण कुठे काय मस्त मस्त चमचमीत हादडले ते साग्रसंगीत सांगायचंय आणि तोंपासु फोटो पेस्टवायचे आहेत.
..चला तर मग ईनोचं दुकान खोलूया.
मी आज दुपारी कोल्हापुरात एस्टी दत्तासमोर मस्त कटवडा चापला ! पण हाय ! फोटो काढायला दम धरवेना !
तो हो ज्जाव सुरू !!!
प्रतिक्रिया
17 Jun 2015 - 5:13 pm | काळा पहाड
तै, आमाला पोळी भाजी आमटी भातच खायला लागतो डेली. काय फोटो टाकणार आमी?
17 Jun 2015 - 5:16 pm | मुक्त विहारि
(कोणे एके काळी तिन्ही-त्रिकाळ खिचडी खाणारा) मुवि...
17 Jun 2015 - 5:36 pm | काळा पहाड
ते दु:ख तर आहेच. त्यातून तै कोल्लापूरचे चविष्ट पदार्थ टाकणार. ते मिळणारैत का इथं? आमी फक्त जिभल्या चाटायच्या. जौ दे झालं.
17 Jun 2015 - 5:51 pm | मुक्त विहारि
एक जालीम उपाय आहे.....
जे कुणी असे पदार्थ टाकतील, त्यांच्याशी मैत्री करा. आणि त्यांच्याच घरी जावून ते पदार्थ ओरपा.
आमच्या घरी (मध्यवर्ती ठिकाण - डोंबोली), पुरणपोळी खायला कधी पण या. त्यासाठी मैत्रीची अट नाही.फक्त १-२ तास आधी कळवलेत तरी चालेल.
17 Jun 2015 - 6:02 pm | कपिलमुनी
मुवि ,
तुम्ही चिरोट्यांची पाकृ टाका बर :)
17 Jun 2015 - 6:23 pm | टवाळ कार्टा
पुरणपोळी लक्षात ठेवली आहे :)
17 Jun 2015 - 6:29 pm | रेवती
काय हो मुवि, ती ढेमश्याची भाजी कुठे आहे?
17 Jun 2015 - 6:57 pm | सूड
आणि तंबीटाचे लाडू आजीबाई?
17 Jun 2015 - 8:41 pm | रेवती
देते बाबा देते. एकदाचे ते लाडू वळून तुझ्या नि गविंच्या चरणाशी अर्पण केले की मी मोकळी तिर्थयात्रेला जायला!
18 Jun 2015 - 2:57 pm | टवाळ कार्टा
आज्काल डोळे नै मिटत कै? =))
18 Jun 2015 - 3:44 pm | कपिलमुनी
डोळे कधी ( एकदाचे) मिटतात यासाठी टपलेला कार्टा
18 Jun 2015 - 4:21 pm | टवाळ कार्टा
डोळे मिटो हमारे (म्हणजे मेरे और रेवतीआज्जी के) दुश्मन
18 Jun 2015 - 6:45 pm | के.पी.
हे ढेमशे आणि तंबिटा म्हणजे काय असतं?
18 Jun 2015 - 11:56 pm | रेवती
केपी दादा/तै,
ढेमसे ही भाजी आहे. हिरव्या रंगाची पेरूसारखी दिसते. हिंदी लोक्स टिंडा म्हणतात.
तंबिट हे एकप्रकारचे लाडू असतात.
19 Jun 2015 - 12:36 am | गवि
...ओह.अच्छा..!!
19 Jun 2015 - 12:54 am | रेवती
सहा महिन्यांपूर्वी मी भारतातून फोटू काढून आणलेत. अजून कृतेए आणि फोटू दोन्ही दिले नाहीये हे मला माहितिये.
19 Jun 2015 - 9:38 am | के.पी.
अच्छा धन्स!
दोन्ही नावं पहिल्यांदाच ऐकलेली आणि तुमच्यामुळे समजली.
19 Jun 2015 - 1:43 pm | इरसाल
इज गोल भेंडी इन शुद्ध मराठी.
19 Jun 2015 - 1:49 pm | मधुरा देशपांडे
आँ?? हे पहिल्यांदाच ऐकतेय. पण ढेमसे आणि भेंडीत साम्य काहीच नाही तसे.
@मुविकाका, ढेमशाची भाजी द्या की लवकर. किती वर्षात खाल्ली नाहीत, निदान फोटोंवर समाधान.
19 Jun 2015 - 2:04 pm | इरसाल
खान्देशात ढेमसे म्हणजे गोल भेंडी, लेडी फिंगर बरोबर आकार उकाराची तुलना नका करु
19 Jun 2015 - 2:14 pm | मधुरा देशपांडे
ओक्के. मराठवाड्यात बहुधा (खात्री नाही) दिलपसंद पण म्हणतात.
20 Jun 2015 - 2:18 am | मुक्त विहारि
ढेमश्याच्या भाजीची पाकृ टाकली आहे.
http://www.misalpav.com/node/31712
24 Jun 2015 - 4:45 pm | काळा पहाड
यावर प्रतिसाद द्यायचं राहूनच गेलं. थॅन्क्स मुवि. मुख्य म्हणजे आल्यावर त्याची कृती समजावून घेईन म्हणतो. पुरणपोळी हा एक अतिशय अवघड प्रकार आहे असा अनुभव आहे.
17 Jun 2015 - 7:57 pm | सस्नेह
का प , या की वो मग कोल्लापूरला !
मिस्सळ, कटवडा, तांबडा अन पांढरा, सगळे नमुने खिलवू ! हाकानाका
17 Jun 2015 - 9:22 pm | मुक्त विहारि
पुर्वीचे कोल्ल्पुरकर राहिले नाहीत आता.
(नाराज/हतबल्/पडलेल्या चेहर्याचा) मुवि
17 Jun 2015 - 9:46 pm | सस्नेह
कट्ट्याला यायचं नै आणि म्हणे पूर्वीचं...
18 Jun 2015 - 10:16 am | मुक्त विहारि
आमच्या चोराच्या उलट्या बोंबा, तुम्ही वेळीच ओळखून, आमचेच दात आमच्या घशात घातलेत.
ह्यावेळी , कट्ट्याला येवू शकलोकट्टा, त्याबद्दल क्षमस्व.
24 Jun 2015 - 4:42 pm | काळा पहाड
स्नेहातै, पुढच्या वेळी नक्की. घरी जेवणारच नै बघा.
17 Jun 2015 - 5:14 pm | मुक्त विहारि
त्या निमित्ताने, बायकोच्या हातच्या मऊसूत पुरण-पोळ्या, साजूक तुपात बुडवून खाल्ल्या.
आमच्या हिच्या हातच्या पुरण-पोळ्यांची सर कश्शा-कश्शाला येत नाही.
17 Jun 2015 - 5:14 pm | स्पा
मिपाचे मायबोलीत रुपांतर
17 Jun 2015 - 5:16 pm | टवाळ कार्टा
खिक्क...डायरेक्ट संपादकांच्या धाग्यावर हल्लाबोल =))
17 Jun 2015 - 5:17 pm | मुक्त विहारि
फक्त ते तिकडच्या अवतारी मंडळींचा अवगूण नको.
17 Jun 2015 - 5:26 pm | सस्नेह
सोच अपनी अपनी...
17 Jun 2015 - 5:58 pm | अत्रुप्त आत्मा
@मिपाचे मायबोलीत रुपांतर>>
पांडुचे अस्सल मिपा प्रतिसादांतर! ![http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif](http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif)
17 Jun 2015 - 6:04 pm | कपिलमुनी
अगदी माबोचा फिल येइल असे सदाहरीत बातम्याचे , खादाडीचे धागे याय्ला लागले आहेत.
17 Jun 2015 - 5:35 pm | अद्द्या
सध्या चिकन मसाला आणि घी रोटी खातोय
17 Jun 2015 - 5:43 pm | मोदक
रोजच्याप्रमाणे "संत्रे चहापान" सुरू आहे.
ऑरेंज स्पायसर फ्रुट इन्फ्युजन - झक्क्कास चवीचा चहा आहे.
18 Jun 2015 - 10:08 am | कवितानागेश
हा बावळट चहा तुला झक्कास वाटतो? ;-)
18 Jun 2015 - 10:28 am | मोदक
सोच अपनी अपनी... ;)
Copyright - स्नेहांकिता
17 Jun 2015 - 6:30 pm | रेवती
अगं स्नेहा, आम्ही बाहेर काय खाणार? तरी संधी मिळताच फोटू काढीन.
17 Jun 2015 - 6:59 pm | सूड
दुपारी फ्लॉवरची रस्साभाजी, पालक, पोळ्या, वरण-भात. मुवींनी पुरणपोळ्यांची आठवण काढल्याने त्या करायचा मोह होतो आहे.
17 Jun 2015 - 7:58 pm | सस्नेह
करा, करा आणि ईकडेपण पार्सल करा...
17 Jun 2015 - 7:04 pm | कंजूस
अरारारा जरा दहा मिनीटे अगोदर धागा पाहिला असता तर------ भजाचे (आमच्याकडे नवीन प्रकार ) फोटो टाकले असते. बाहेर मस्त पाऊस पडतोय,खिडकीतून गम्मत पाहात चहा गरमागरम भजी खाल्ली. मग मिपाची आठवण झाली -पहिलाच हा धागा. चला पाकृती तरी घ्या- -एक वाटी तांदुळाच्या कण्या दुपारी भिजत घातल्या होत्या.त्या मिक्सरमध्ये वाटून घेतल्या. -ओलं खोबरं ,दोन तीन चमचे बेसन ,दोन चमचे रवा मिळून एक वाटी. -थोडे मिरे आणि धने.चवीला मिठ. -थोडी चिरलेली कोथिंबीर. या पिठाची गोल भजी तळली. श्रेय- (-इ टिव्ही/कलर्स टिव्ही गुजराती) एका मंगळुरी मित्राच्या मुलाच्या मुंजित "बिस्किट अंबाडा" नावाचा प्रकार खाल्ला होता त्याची आठवण झाली.ते लोक गावाकडे इडली डोशिचे पीठ आंबवण्यासाठी ताडी वापरतात.ताडी नाही मिळाल्यास निरा एक दिवस ठेवून वापरायची.
17 Jun 2015 - 7:53 pm | एस
कैच्याकै धागा... कैच्याकै प्रतिसाद... बॅन करा. धागा हो!
(उपाशी) स्वॅप्स...! :-(
17 Jun 2015 - 8:00 pm | सस्नेह
पुण्यात राहून उपाशी ?
कोल्लापूर बरं की मग +D
17 Jun 2015 - 10:33 pm | एस
ढ्र्र्रृक्क्क्... (ढेकर दिल्याचा आवाज).
हां, या आता मैदानात.
18 Jun 2015 - 10:42 am | सस्नेह
ल्लूल्लूल्लूल्लूऊऊऊऊ....
18 Jun 2015 - 12:58 pm | एस
ह्या ल्लूल्लूल्लूल्लूऊऊऊऊ चं काय उत्तर द्यायचं असतं बरं?
जाऊ द्या, माघार घेतो. बुवांना पाठवतो. बुवा, पुण्याची बाजू लढवा!
:-) अब तुम्हारे हवाले....
18 Jun 2015 - 1:38 pm | अत्रुप्त आत्मा
@ बुवा, पुण्याची बाजू लढवा!
:-) अब तुम्हारे हवाले....>> :-D आपण त्याच्या चारपट ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊ करायचं! :-D
18 Jun 2015 - 1:26 pm | मृत्युन्जय
फक्त कोल्हापुरचे नाव काढता तुम्हाला ढेकर आला यातच सर्व आले.
18 Jun 2015 - 1:33 pm | सस्नेह
ढॅSSSSSट्स इट !!!
18 Jun 2015 - 2:06 pm | एस
एक ल्लूल्लूल्लूल्लूऊऊऊऊ
दोन ल्लूल्लूल्लूल्लूऊऊऊऊ
तीन ल्लूल्लूल्लूल्लूऊऊऊऊ
चार ल्लूल्लूल्लूल्लूऊऊऊऊ
18 Jun 2015 - 2:27 pm | अत्रुप्त आत्मा
ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या!!! =))
17 Jun 2015 - 10:37 pm | गणामास्तर
कुणी तरी खात्रीपुर्वक सांगा रे एकदाचं की कोल्हापुरात नक्की चांगलं काय आणि कुठे मिळतं खायला. प्रसिद्ध म्हणून भेट दिलेली आजपर्यंतची सगळी ठीकाणं एकजात गंडलेली निघालीयेत्.
17 Jun 2015 - 11:09 pm | वगिश
कोल्हापुरात जाऊन मिसळ खाऊ नये,कोल्हापुरी मिसळ कोल्हापुरच्या बाहेरच चांगली मिळते.(अनुभवावरून)
17 Jun 2015 - 11:12 pm | सूड
आम्ही कोल्लापूरात सन्मानमधला बटाटेवडा खायचा राहून जाणार नाही असं बघतो. कट्ट्याच्या वेळी त्या येष्टीवाल्यान् माती खाल्लंन्. नायतर तेव्हा पण चुकला नसता!!
18 Jun 2015 - 2:29 pm | सस्नेह
घाटी दरवाजासमोरची दत्त मिसळ खा.
...पाणीपण मागू शकणार नै ;)
18 Jun 2015 - 2:57 pm | टवाळ कार्टा
आयला...डायरेक्ट खच्याक????
19 Jun 2015 - 3:26 pm | गणामास्तर
कुठंशीक आलं हे सन्मान?
19 Jun 2015 - 5:50 pm | सूड
म्हाद्वार रोड (?) वर अंबाबैच्या देवळाकडं तोंड करुन हुबारला का नै, डाव्या हाताला हिंदुस्तान बेकरीच्या लायनीतच अलीकडं सन्मान हाय!! ;)
18 Jun 2015 - 12:21 pm | मृत्युन्जय
काय नाय तर ठिकठिकाणी मिळणारा गोटी सोडा, राजाभाऊची भेळ आणि खासबागची मिसळ हे मस्ट. मला पर्सनली फडतरे मात्र अजिबात म्हणजे अजिबात म्हणजे अजिबातच आवडले नाही. त्यापेक्षा बरी मिसळ पुण्यातल्या कुठल्याही गल्लीत मिळेल. फार पुर्वी मी जेव्हा कोल्हापूरात रहायचो त्यावेळेस रंकाळ्यावर कुठलेसे दुकान होते तिथे मिळणारी भेळ केवळ अप्रतिम तशी अजुन कुठे खायला मिळाली नाही. गांगावेशेतल्या मेघदूत मध्ये खाल्लेली अंडाकरी सुद्धा अजुन विसरलेलो नाही (आता मेघदूत आहे की नाही ते माहिती नाही). मंदिराजवळच मिळणारी तिखटजाळ मिसळ देखील अशीच मामलेदारच्या तोडीस तोड होती (दुकानाचे नाव आठवत नाही). बाकी सोळंकीचे आइसक्रीम खाल्ले. चांगले होते पण काही विशेष असे वाटले नाही.
बाकी ते पांढरा / तांबडा प्रकरण पूअर व्हेज असल्याने आम्हाला पुर्ण वर्ज्य आहे. त्यामुळे त्याबाबत काही माहिती नाही.
19 Jun 2015 - 3:24 pm | गणामास्तर
मला पर्सनली फडतरे मात्र अजिबात म्हणजे अजिबात म्हणजे अजिबातच आवडले नाही. त्यापेक्षा बरी मिसळ पुण्यातल्या कुठल्याही गल्लीत मिळेल.
हज्जारदा सहमत. मला खासबाग.फडतरे, बावडा वा आहार यांपैकी कुठलीचं मिसळ आवर्जुन खाण्यालायक वाटली नाही.
बाकी पांढरा / तांबडा रस्सा सुद्धा कोल्हापुरा बाहेरचं चांगला मिळतो असे निरीक्षण नोंदवतो.
18 Jun 2015 - 9:46 am | कंजूस
कोल्लापुरातल्या मिसळीत पंचगंगेचच शुद्ध जल वापरले जाते खडकवासल्याचं नाही.
18 Jun 2015 - 10:37 am | बबिता बा
घाटकोपर स्टेशन पू .... दारात मसाला पापड मिळतो.
18 Jun 2015 - 1:17 pm | अत्रुप्त आत्मा
हल्ली अधिक महिन्यामुळे सकाळ सकाळच्या वख्ताला जगताप हास्पिटल जवळ लागणाय्रा एका अण्णाच्या गाडीवर डोसे उत्ताप्पे उडवण्याचा कार्यक्रम सुरु केलेला आहे. सकाळि 6 च्या पुढे एकदिड तासच असते ही गाडी. पण एकदम फ्रेश्श माल असतो. चुरचुरीत गरम.
आणि त्येचा कटाळा आला ,तर संतोष बेकरित भट्टी फ़्रेस्स प्याटिस , क्रिमरोल, आणि माझा तिथला आवडता हनीकेक ..
18 Jun 2015 - 3:56 pm | स्वाती दिनेश
आपटे रोड वरची संतोष बेकरी ना.. तिथले पॅटिस लै भारी.. हिंदुस्तानच्या पेक्षाही मला संतोषचे पॅटिस जास्त आवडतात, आणि क्रिमरोल्स.. वावा, काय आठवण काढलित..
स्वाती
18 Jun 2015 - 4:18 pm | अत्रुप्त आत्मा
बेकरी तीच. फ़क्त सिंहगड रोडवरचि. संतोष हॉल चौकातली.
18 Jun 2015 - 3:57 pm | लव उ
एरोली सेक्टर १९ मध्ये म्हाळसा हाईट्स मधे एक बिस्मिल्ला कॅट्रिंग दुकान आहे. तिथे मिळ्णारा चिकन समोसा आणि चिकन शवर्मा एकदम मस्त असतो.
18 Jun 2015 - 4:46 pm | इरसाल
भारी ना, तुम्हाला सेपरेटली लु ऊ ऊ ऊ ऊ करावे लागत नसणार.
18 Jun 2015 - 8:51 pm | अत्रुप्त आत्मा
=))
18 Jun 2015 - 9:11 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
वरणफळं खातोय तुप घालुन स्वतः केलेली.
18 Jun 2015 - 11:13 pm | स्नेहानिकेत
आज ताजी ताजी पाप्लेट् खाल्लीएत मस्तपैकी तळून आणि कालवण करुन.
19 Jun 2015 - 12:24 am | बॅटमॅन
आज आलू पराठा विथ कांद्याची चटणी खाल्ला, बरी होती टेस्ट. पराठा बनवायचा अस्मादिकांचा पहिलादुसराच प्रयत्न असल्याने लै खास झाला नै, पण उम्मीद पे दुनिया कायम है.
19 Jun 2015 - 7:49 am | मुक्त विहारि
https://www.youtube.com/watch?v=I8dwCXCYdHE
बादवे,
आमचा आजचा मेन्यु :
नाश्ता : इडली-चटणी-सांभार
जेवण : चिकन बिर्याणी + टोमॅटो-सोलकढी
दुपारी : कांदे-पोहे (लग्न झाले आहे)
रात्री : कढी-खिचडी
19 Jun 2015 - 8:25 am | कंजूस
खाद्यजत्रेत खाऊन झाल्यावर हात धुवून फक्त बातमी द्यायची आहे का प्रत्येकाने ?फोटो बिटो कोणीच देत नाहीयै. पुढच्या वेळेस बुवांना मिसळ खायला घालून रीतसर मुहुर्ताची फुलांची आरास करून सुरुवात करा.
19 Jun 2015 - 11:35 am | गवि
.घ्या..खेड शिवापूर.जगदंबा हॉटेल.
.इंद्रायणी भात आणि मटणरस्सा.परमानंदम..हा भात वेगळाच आहे..मुंबई वगैरे साईडला हा तांदूळ मिळाला तर वाह.
19 Jun 2015 - 2:23 pm | कपिलमुनी
लै भारी हॉटेल आहे .
मटण हंडी तर लाजबाब
19 Jun 2015 - 1:12 pm | एस
ते मोबाईलवरून फोटो कसे चढवायचे मिपावर याची टिप द्या ना इथेपण.
19 Jun 2015 - 1:21 pm | मधुरा देशपांडे
कंजूस काकांनी इथे सांगितले आहे.
19 Jun 2015 - 5:36 pm | प्रशांत हेबारे
Highway la आहे का हे हॉटेल
19 Jun 2015 - 10:56 pm | रेवती
आज घरातच जेवले, जसे आपण नेहमी जेवतो तसे. आता पोळी आणि रेड चार्डच्या भाजीचा फोटो नाही काढला. शेजार्यांनी चिकन पाठवलेय. ते खाल्ले नाही.
20 Jun 2015 - 12:12 am | मुक्त विहारि
आमच्याकडे पाठवा.....
(कोंबडी-बोकड-शेळी-मत्स्य-अंडी प्रेमी) मुवि
20 Jun 2015 - 12:15 am | रेवती
जरूर.
20 Jun 2015 - 12:23 am | मुक्त विहारि
ढेमस्याच्या भाजीची रेसीपी टाकतो...
आत्त्ता लिहीत आहे.
20 Jun 2015 - 12:32 am | रेवती
आँ? अहो मुवि, ती ओळ मी लिहून नंतर डिलिटली होती..........दिव्यदृष्टी वगैरे लाभलीये का?
आमच्याकडे दुपार आहे म्हणून मी येती जाती आहेच पण तुम्ही जागरणे करून काही लिहित बसू नका.
20 Jun 2015 - 12:44 am | मुक्त विहारि
भाजीचे फोटो हरवले होते.आज काही मिळाले.
आमच्या जादूच्या घरात परत फोटो मिळतील न-मिळतील, तेंव्हा आजच पा.कृ. लिहीतो.
20 Jun 2015 - 2:19 am | मुक्त विहारि
ढेमश्याच्या भाजीची पाकृ टाकली आहे.
http://www.misalpav.com/node/31712
20 Jun 2015 - 2:39 pm | अभिरुप
इंद्रायणी भात हा मुख्यत: खेड शिवापूर तसेच भोर खोरे आणि पुरंदर खोर्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पिकतो.
मटण रश्श्याबरोबर इंद्रायणी भात म्हणजे स्वर्गानुभवच. चवीला अप्रतिम असूनसुद्धा फक्त चिकट होत असल्या कारणाने खूप कमी लोक हा भात प्रेफर करतात.
बाकी छान धागा.
शुभेच्छा...
21 Jun 2015 - 12:02 am | धडपड्या
ह्याचा फोडणीचा भात अप्रतिम लागतो...
24 Jun 2015 - 4:13 pm | कपिलमुनी
ओ भौ ,
मावळ प्रांत विसरला काय ?
इंद्रायणी आमच्या मावळामधलाच एक नंबर !
बाकी आजकाल चांगला आंबेमोहोर मिळत नाही . म्हणून इंद्रायणीचा भाव वाढला आहे .