सदाहरित खाद्यजत्रा -- आज कुठे नि काय खाल्लंत

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
17 Jun 2015 - 5:09 pm

आपण मिपाकर्स आद्य खाद्यप्रेमी आहोत. तेव्हा जिथे जाऊ तिथे खाऊ खाऊ करत असतो. सगळ्या खाद्य-खासियती आम्हा ठावकी.
तर इथे आपण कुठे काय मस्त मस्त चमचमीत हादडले ते साग्रसंगीत सांगायचंय आणि तोंपासु फोटो पेस्टवायचे आहेत.
..चला तर मग ईनोचं दुकान खोलूया.
मी आज दुपारी कोल्हापुरात एस्टी दत्तासमोर मस्त कटवडा चापला ! पण हाय ! फोटो काढायला दम धरवेना !
तो हो ज्जाव सुरू !!!

पाकक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

हा फक्त मावळ, पुरंदर इत्यादि ठिकाणच्या दुकानांतच मिळतो का? मुंबईपुण्याकडे कुठे मिळेल का? मॉल्समधे वगैरे नेहमी शोधतो, पण इंद्रायणी तांदूळ असं काही दिसलं नाही.

कपिलमुनी's picture

24 Jun 2015 - 5:49 pm | कपिलमुनी

साधारण पुणे जिल्ह्यात सर्वत्र मिळतो पण माव़ळात शेतकर्‍याकडून डायरेक्ट घेतलेला अनपॉलिश्ड तांदूळ सर्वात उत्तम आणि खात्रीच असतो.

मोहनराव's picture

24 Jun 2015 - 6:08 pm | मोहनराव

इंद्रायणी भाताची चव जिभेवर तरंगत राहते.

एक किलो अगदी शेतकर्‍याकडनं घेऊन खाल्ला. काही विशेष वाटलं नाही हो. शिजवायची पद्धत वेगळी असते का?

इंद्रायणी भात माझाही आवडता आहे.

स्नेहानिकेत's picture

20 Jun 2015 - 11:32 pm | स्नेहानिकेत

आज चिवण्या खाल्ल्या.मस्त गाभोळी होती प्रत्येक चिवणि मधे.चिवणि हा मासा फक्त पावसाळ्यातच मिळतो भाताच्या शेतात किंवा खाडीत.चवीला मस्त पण साफ़ करायला चिकट असल्यामुळे त्रासदायक.

कपिलमुनी's picture

24 Jun 2015 - 4:17 pm | कपिलमुनी

म्हणजे पोटामधली अंडी ना ?

अरेरे ! अशामुळे माशांची पैदास कमी होते . या सीझनला तरी माशांना सोडा

रेवती's picture

21 Jun 2015 - 6:43 am | रेवती

आज आईस्क्रीम खाल्ले.

सस्नेह's picture

21 Jun 2015 - 7:05 am | सस्नेह

फोटू ???

रेवती's picture

21 Jun 2015 - 7:38 am | रेवती

हाणलं का मला!

एस's picture

21 Jun 2015 - 8:15 am | एस

आज (पण) आम्ही (हिचे) टोमणे खाल्ले. चविष्ट होते. थोड्या वेळाने इडली मिळणार आहे, म्हणून (नेहमीप्रमाणेच) शांतपणे खाऊन घेतले. इडली फस्त करून झाल्यावर जमल्यास (आणि उरल्यास) फोटो टाकतो.

श्रीरंग_जोशी's picture

21 Jun 2015 - 8:47 am | श्रीरंग_जोशी

आमच्या शहरातल्या पॅराडाइझ बिर्यानी पॉइंट या उपहारगृहात लंच बुफे खाल्ला. तिथले दक्षिण भारतीय पदार्थ रुचकर असल्याने उत्तर भारतीय पदार्थांकडे पाहिलेही नाही.

नावाला थोडेसे चाट, इडली सांभर व चटणी, एकदम खुसखुशीत मेदूवडे, थोडेसे पोरियाल, पुरी भाजी अन दहीभात.

त्यानंतर इथल्या सर्वात मोठ्या भारतीय वाणसामानाच्या दुकानातून खरेदी केली. दुर्दैवाने हापूस आंबे यायला अजुन एक आठवडा लागणार आहे असे कळले. त्या दुकानाबाहेर ताजा उसाचा रस मिळतो आजकाल.

तेव्हा प्राशन करणे शक्य नसल्याने टू गो करून घरी आणला व निवांतपणे पिला.

उसाचा रस.

टवाळ कार्टा's picture

24 Jun 2015 - 6:12 pm | टवाळ कार्टा

१०० झाल्यानिमित्त से स्नेहांकिता तैंचा सत्कार भविष्यात होणार्या तांदूळ मोहोत्सवात एक फ्लेक्ष लावून करणेत येईल हे आश्वासन देउन करणेत येत आहे

- शुभेच्छूक
अखिलमिपातांदूळवाडीमित्रमंडळ

मोहनराव's picture

24 Jun 2015 - 6:28 pm | मोहनराव

१ किलो दावत बासमती पाठवुन द्या की!

त्यापेक्षा इंद्रायणीच द्या !
उद्या पावट्याच्या मोडाचा रस्सा भाताबरोबर ओरपणार !

पावट्याच्या मोडाचा रस्सा भाताबरोबर ओरपणार !

आय हाय..काय त्रास आहे..यांचे खाते गोठवा रे.

सस्नेह's picture

25 Jun 2015 - 12:20 pm | सस्नेह

तुम्ही मटण-भात लपक लपक करत खायचा आणि आमची खाती गोठवायची होय ..?
हम्म....

सस्नेह's picture

27 Jul 2015 - 10:54 am | सस्नेह

पावट्याच्या मोडाच रस्सा अन इंद्रायणी भात !
अ

अ

मोहनराव's picture

24 Jun 2015 - 6:26 pm | मोहनराव

आज अंडाभुर्जी खाल्ली. फोटो काढायच्या आत संपली.

काळा पहाड's picture

24 Jun 2015 - 6:34 pm | काळा पहाड

तुम्हाला नक्की किती हात आहेत हो?

मोहनराव's picture

24 Jun 2015 - 6:36 pm | मोहनराव

थांबा हं मोजतो...

पद्मावति's picture

24 Jun 2015 - 9:35 pm | पद्मावति

आज आमचा कुठेतरी बाहेर लंच चा प्लान बनला. साऊथ इंडियन खाण्याचा मूड होता म्हणून south croydon च्या नवरत्न रेस्टोरेंट मधे गेलो होतो. गेल्यावर तेथील माणसाने आमचे अगदी प्रसन्न हसून स्वागत केले आणि आज कुठले कुठले पदार्थ उपलब्ध नाहीत याची लिस्ट पटापटा म्हणून दाखवली.

त्याच्या नन्नाच्या लिस्ट मधे लिस्ट मधे वडा नाही, गोडामधे गुलाबजाम नाही, पेयामधे फिल्टर कॉफी नाही वगैरे वगैरे. आता वडा नाही म्हणजे वडा-सांबार, रसम वडा, दही वडा हे सगळे प्रकार कॅन्सल. मग डोसा आणि इडली ऑर्डर केली. डोसा मात्र अप्रतिम. इतका छान डोसा मी तरी अजुन पर्यंत खाल्ला नव्हता. इडली सुद्धा मस्तं.

.
.

पद्मावति's picture

24 Jun 2015 - 10:06 pm | पद्मावति

अरे आताच तर फोटो दिसत होते. कुठे गायब झाले काही समजत नाही....पुन्हा फोटो टाकते...

पद्मावति's picture

24 Jun 2015 - 10:10 pm | पद्मावति

.
.

श्रीरंग_जोशी's picture

24 Jun 2015 - 10:43 pm | श्रीरंग_जोशी

फोटो पाहून तोंडाला पाणी सुटले :-) .

रेवती's picture

24 Jun 2015 - 11:37 pm | रेवती

भारी फोटू.
त्याने नन्नाचा पाढा वाचला तरी तुमच्या हाती काहीतरी लागलं म्हणायचं! ;)

तो डोसा काय कुरकुरीत दिसत आहे. असाच उचलून खावासा वाटतोय!

मोहनराव's picture

25 Jun 2015 - 2:42 am | मोहनराव

वा छान!

सुबोध खरे's picture

24 Jun 2015 - 11:50 pm | सुबोध खरे

आज जेवायला मस्त कांदा भजी होती. भरपूर हादडली. कारण बाकी जेवायला भेंडीची भाजी, आमटी आणि पोळी होती.
नंतर बायकोला कटकट केली इतकी भजी छान झाली होती त्यामुळे फार खाल्ली आता पोटात जागाच नाही आणि हळूच जेवणाला फाटा मारला.

अभिरुप's picture

25 Jun 2015 - 12:50 pm | अभिरुप

गवि...
मी बर्‍याचदा हा तांदूळ मुंबईत अपना बाजार मध्ये खरेदी केला आहे. तसेच थेट वाशी मार्केटमधून सुद्धा मिळतो.

अपना बाझार अजून आहे हे माहीत नव्हतं. आता शोधतो आणि मिळवतो.

कपिलमुनी's picture

25 Jun 2015 - 12:58 pm | कपिलमुनी

मुंबई पुणे प्रवासात एकदा तळेगावला या. चांगला जुना तांदूळ घेउन देतो.
मस्त कट्टा करू :)

अभिरुप's picture

25 Jun 2015 - 12:56 pm | अभिरुप

काल कामानिमित्त अ‍ॅंटॉप हिल ला गेलो होतो तेव्हा जवळच सरदार नगर मध्ये सरदार पाया हाऊस मध्ये पाया अन बटर राईस विथ चिकन सुर्वा चापला. खूप फेमस आहे हे ठिकाण. अप्रतिम चव..फटु काढता आले नाहीत त्या बद्दल क्षमस्व.

फटु काढता आले नाहीत त्या बद्दल

फटु काढता आले नाहीत त्या बद्दल आभार..!! ;)

आता तिथे जाणे आले.

दुर्गविहारी's picture

27 Jun 2015 - 11:08 am | दुर्गविहारी

डोम्बिवलीतील मिसळीची ही बातमी म. टा. मध्ये आलेली आहे
डोम्बिवलीतील मिसळीची