क्षमा परमो धर्म: - राजा कुशनाभच्या मुलींची कथा

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
7 Mar 2015 - 10:52 am

क्षमा दानं क्षमा सत्यं क्षमा यज्ञाश्च पुत्रिकाः I
क्षमा यशः क्षमा धर्मः क्षमया विष्ठितं जगत्II

(वाल्मीकि रामायण बाल कांड ३३/८)

क्षमा दान आहे, क्षमा सत्य आहे, क्षमा यज्ञ आहे, क्षमा यश आहे, क्षमा धर्म आहे. क्षमेवरच हे सर्व जगत् टिकून आहे." ॥ ८

रामधारी सिंह यांनी आपल्या कवितेत लिहिले आहे:

क्षमा शोभती उस भुजंग को
जिसके पास गरल हो
उसको क्या जो दंतहीन
विषरहित, विनीत, सरल हो।

क्षमा हे माणसाचे भूषण आहे. दुर्बल माणूस अन्याय सहन करतो, तो क्षमा करू शकत नाही. किंवा त्यांनी केलेल्या क्षमेला कोणी महत्व ही देत नाही. शक्तिशाली माणसाने दुर्बलांना क्षमा करावी हीच अपेक्षा. कारण क्रोधाग्नित कधी-कधी सर्वच नष्ट होते. जगाच्या कल्याणासाठी क्षमा करणे आवश्यक असते. म्हणूनच क्षमा धर्माच्या १० लक्षणां पैकी एक लक्षण आहे.

धर्मात्मा राजा कुशनाभच्या कन्या धर्मानुसार आचरण करणाऱ्या आणि तपोबलानी युक्त होत्या. तरी ही त्यांनी आपल्यावर अन्याय करणाऱ्या वायुदेवाला क्षमा केली. कारण त्यांनी वायुदेवाला श्राप दिला असता तर जगाचे संतुलन बिघडले असते. धर्मात्मा मुलींचे क्षमाशील आचरण पाहून महर्षि वाल्मीकिनी रामायणात राजा कुशनाभच्या मुलींचे गुणगान केले आहे.

सोन नदीच्या तीरावर असलेल्या महोदय या नगरात धर्मात्मा राजर्षि कुशनाभ राज्य करत होता. घृताची अप्सरे पासून त्याला १०० कन्यारत्न प्राप्त झाले. त्या मुली आपल्या पिता प्रमाणेच धर्म आणि सत्य मार्गावर चालणार्या होत्या. वयात आल्यावर त्या अप्सरे समान सुंदर दिसू लागल्या.

एकदा वायुदेवाने त्यांना पहिले. कामांध झालेल्या वायुदेवाने त्यांना म्हंटले, मुलीनो तुम्ही सर्व माझ्यासंगे स्वर्गात चला, माझ्या भार्या बना. स्वर्गात स्वर्गीय सुख भोगायला मिळेल. शिवाय तुमचे यौवन ही अक्षत राहिलं. त्या मुलींने वायुदेवाला नम्रतापूर्वक म्हंटले, आम्ही राजा कुशनाभच्या कन्या आहोत. आमचे पिता जिवंत आहेत आणि आम्ही त्यांच्या आज्ञेत आहोत. अत: उचित हेच आहे, तुम्ही आमच्या पित्या जवळ जाऊन आमचा हात मागा, जर आमच्या पित्याने आमचा हात तुमच्या हातात दिला तर आम्ही तुमच्या होऊ.

कामांध माणसाची विवेक बुद्धी नष्ट झालेली असते. त्याला धर्म-अधर्म, उचित-अनुचित काहीच कळत नाही. या तुच्छ मानवीय मुलींची माझ्या इच्छेचा अनादर करण्याची हिम्मत झाली कशी झाली? वायुदेवाला वाटले त्यांच्या इच्छेचा अनादर करून मुलींनी त्यांचा अपमान केला आहे. वायुदेव क्रोधीत झाले. त्यांनी सर्व मुलीनां कुब्जा होण्याचा श्राप दिला.

त्या मुली तपोनिष्ठ होत्या, मनात आणले असते तर त्यांनी वायुदेवाला श्राप दिला असता. पण त्यांना वायुदेवावर क्रोध आला नाही. त्यांनी वायुदेवाला क्षमा केले. घरी जाऊन त्यांनी घडलेले सर्व प्रकार आपल्या पित्याला सांगितला. कुब्ज्या झालेल्या आपल्या मुलींना पाहून धर्मात्मा राजा कुशनाभला अत्यंत दुख झाले. तरी तो आपल्या मुलींना म्हणाला, क्षमाच मानवाचे आभूषण आहे, देवतांना ही दुष्कर अशी क्षमा तुम्ही, वायुदेवाला केली. असे करून तुम्ही कुळाच्या मर्यादेची रक्षा केली आहे.

पुढे त्या सर्व मुलींचे लग्न काम्पिल्या नगरीच्या महातेजस्वी राजा राजर्षि ब्रह्मदत्त सोबत झाले. लग्नाच्या वेळी राजाचा हात हातात घेताच त्या मुलीं पहिल्या सारख्या निरोगी आणि सुंदर झाल्या. इति.

इतिहासवाङ्मयकथाआस्वाद

प्रतिक्रिया

त्या कामांध वायुदेवाच्या नानाची टांग!

अवतार's picture

7 Mar 2015 - 12:16 pm | अवतार

वायुदेव गेला उडत :)

अत्रुप्त आत्मा's picture

7 Mar 2015 - 8:57 pm | अत्रुप्त आत्मा

=))

वायुदेवाला बायकांचा नाद होता की काय ?

चित्रगुप्त's picture

7 Mar 2015 - 11:41 pm | चित्रगुप्त

मुलींचे यौवन अक्षत ठेवणार्‍या वायुदेवाला कामांध कसे काय म्हणता येईल ? हल्ली अमेरिकादि देश जसे अन्य देशातील गुणी लोकांना त्यांची सिटिझनशिप देऊ करतात, किंवा अलिकडे बॉलिवुडवाल्यांनी सनी लेओनीला पाचारण करणे, या प्रकारची ऑफर वायुदेवांने त्यांच्या सौंदर्यामुळे दिलेली दिसते. बरे, मुलींनाही तो प्रस्ताव मंजूर होतासे दिसते, फक्त वडिलांची अनुमती हवी होती.

वायुदेवाला श्राप दिला असता तर जगाचे संतुलन बिघडले असते.

.... म्हणजे नेमके काय झाले असते?
'धर्मात्मा राजर्षि कुशनाभ राजाला घृताची अप्सरे पासून १०० कन्यारत्न प्राप्त होणे' यात काही गैर नाही ना? मग वायुदेवाची चूक काय ? त्याने बलात्काराने हरण तर केले नाही ना ?
प्राण, अपान, समान, उदान, व्यान या पाच प्रकारच्या वायुंशी या वायुदेवाचा संबंध काय आहे ? या कथेचा काही योग वा अध्यात्माच्या दृष्टीने अर्थ लावता येतो का?

अर्थात, 'वायुदेव' म्हणजे फक्त 'वारा' असे म्हटले, तर असल्या काल्पनिक गोष्टी फारश्या सीरीयसली घेण्याचे काही कारण दिसत कारण नाही.

योगी९००'s picture

8 Mar 2015 - 7:48 am | योगी९००

कामांध झालेल्या वायुदेवाने त्यांना म्हंटले, मुलीनो तुम्ही सर्व माझ्यासंगे स्वर्गात चला, माझ्या भार्या बना. स्वर्गात स्वर्गीय सुख भोगायला मिळेल.
सॉलिड हसलो. कामांध झालेल्याने मुलींनो अशी हाक मारावी? निदान बायांनो असे तरी म्हणावे..

बाकी हाच वायूदेव "ब्रम्हचारी हनूमानाचा" पिता होता ना? (केसरी हा हनुमानाचा पिता की वायुदेव?)

संदीप डांगे's picture

9 Mar 2015 - 1:22 am | संदीप डांगे

केसरी पन नाय आन वायुदेव बी नाय. पुराणात सांगितल्यालं का विष्णूचं मोहिनी रूप आन शिवाचं रौद्र रुप यांच्या मिलनाचं फलित म्हणजे हनुमान. वायुदेवाने तो असाच्या असा वाहून नीऊन अंजनीच्या पोटी घातला मंतात. मंजे बगा अंजनी वाज सरोगेट मदर आप हनुमानजी. उसके खरे मां-बाप ओ रिकाम-टवळे इस्णू अन संकर है...

(क्काय... विदा? हेल्लो, .... ऐकू येत नाय... हल्लो... कट झाला वाटतं. अर्रर्र.. रेंजबी गेली. ओ गन्या..... काय करून र्‍हायला बे?)