धर्मांतर....आपल्या सर्वांचं घडून गेलेलं !

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
17 Feb 2015 - 9:53 pm

मला जाणवत असलेल्या विविध गोष्टी (संकीर्ण संग्रह म्हणा हवं तर) इथे एकत्रित लिहितो आहे.
कुणाला काही दुरुस्ती सुचवायची असल्यास, मूळ मुद्द्यांत भर टाकायची असल्यास(किंवा लेखाला छानपैकी
शिव्या घालायच्या असल्या तरी) स्वागत आहे.
.
.
हे अमुक पुरेसे "आधुनिक " नाहित; ते तमुक आधुनिक आहेत; असं येतं बोलण्यात कधी कधी.
" आधुनिक " ह्या शब्दाखाली जे जे काही येतं; त्यावर अमेरिकन आचार-विचार-संस्कृतीचा मोठाच पगडा दिसतो.
शिवाय "आंतरराष्ट्रिय" , "जागतिक" ह्या शब्दाचा खरा अर्थ खूपदा "अमेरिकेच्या कानावर पडलेली गोष्ट" असा असतो.
"अमुक अमुक माणसाच्या कार्याची आंतरराष्ट्रिय सतरावर दखल घेतली गेली " म्हणजे अमेरिकास्थित/स्पॉन्सर्ड संस्थेने दखल घेतली असा अर्थ वाटतो.
अमुक विद्या, तमुक शास्त्र, अभ्यास-व्यायाम पद्धती, मार्शल आर्ट्स,योगशास्त्र, अध्यात्मविचार ,स्वयंपाक पद्धती ,आहार शैली आंतरराश्ट्रिय स्तरावर
पोचली म्हणजे अमेरिकेतील निदान काहिंनी त्याची दखल घेतली असा होतो.
अमेरिकेची मान्यता म्हंजे जगाची मान्यता!
जागतिकीकरण म्हणजे अमेरिकीकरण.
तुमची पद्धत अमेरिकेत सामावली गेली पाहिजे किंवा अमेरिकन पद्धत तुमच्यात सामावली गेली पाहिजे.
आपण आपल्याही नकळतपणे त्या प्रवाहात जोरात खेचले गेलेलो आहोत.
(असं खेचलं जाणं चूक अथवा बरोबर, ह्यातील काहीही आमचे म्हण्णे नाही. तो मुद्दा नंतरचा.)
विचारही त्यांच्याच पद्धतीचा केला जावा, अशी आपली आपल्याचकडून अपेक्षा असते.
.
.
अमेरिकनिझम हा नवा धर्मच उदयास आलेला आहे. आपण एखाद दोन पिढ्यांपूर्वीच त्यात सामील झालेलो आहोत.
जे व्हायचे बाकी आहेत; तेही लवकरच होतील हे नक्की. पण हे होताना त्यांनाही कळेलच असे नाही.
.
.

अमेरिकनिझम हा मायावी आहे तो ह्याच साठी.
ते तुम्हाला प्रेषित दाखवत नाहित. नवा ईश्वर/गॉडही दाखवत नाहित.
पण तुमच्या वागण्या-बोलण्यात , अगदि विचार करण्यापासून ते आचरणापर्यंत ते तुम्हाला बदलवून टाकतात.
पण "आम्ही तुम्हाला बदलत आहोत" अस प्रचार न केल्यानं आणि नवा प्रेषित समोर न दिसल्यानं आधीच्या धर्मातले लोक तितके खवळून उठतच नाहित.
कुणाचं म्हण्णं असेल की :-
"

कोणी काय करावं हे न सांगता विलिंगली लोक फॉलो करतात व फॉलो करताना त्यांचे विकल्प काढूनही घेतले जात नाहीत. जे चाललय ते स्वेच्छेनं होतय.
तुझ्या लिहिण्यातून "मुक्त विचार" हाच कॉन्स्पिरसी आहे असे ध्वनित होतेय.

"

कॉन्स्पिरसी किंवा काय आहे ते नेमके सांग्ता यायचे नाही.
खूपशे लोक स्वेच्छेने सामील होताहेत हे खरे आहे.
("भुलवणे" हा शब्द इथे वापरता येइल का ?
भुलवण्याच्या क्रियेतही भुलवली गेलेली बाजू स्वेच्छेनेच निवड करताना दिसते.)
हे जे काही होतय ते खूपसं उत्स्फूर्तपणे होतय हे १००% मान्य.
.
.
पण जे तसे नाहित; त्यांची ज्या पद्धतीनं खिल्ली उडवली जाते; त्यातून न्यूनगंड वाढीस लागण्याची शक्यता.
मग न्यूनगंड असलेलेही एखादेवेळेस अधिक समर्थ होण्यासाथी तुमच्यासारखेच होण्याचा प्रयत्न करतात.
ही पण एक बाजू आहे.
.
.
माझ्या मित्रानं मागे कुणाचंतरी एक नेमकं वाक्य ऐकवलं होतं.
we all are wanna be americans!
अमेरिकन(किंवा पाश्चात्त्य) विजयाचं ह्याहून भारी वर्णन करता येणं अशक्य आहे.
ते थेट डेमोग्राफी म्हणजेच लोकसंख्येचा तोल बदलू पहात नाहित.
तुमच्या भूमीत येउन तुम्हाला मारुन बहुसंख्य होण्याची स्वप्नं आता तेपाहात नाहित.
कत्तल करीत सुटत नाहित. "तुझं धर्मांतरच करतो भडव्या" म्हणत नरड्या धरत नाहित.
तुमच्याही नकळत तुमचा माइंडसेटच बदलतात. (ह्याला ब्रेनवॉश म्हणता यावं का ? )
.
.

मला अमेरिका आवडते की ह्याच साठी की त्यांनी प्रत्यक्षात सोयीस्कर मुक्त विचार, आधुनिकता वगैरे वगैरेचा जप करत अमेरिकनिझम हा नवीन धर्म अस्तित्वात आणला आहे.
तो इतका मायावी आहे की तो वेगळा असा जाणवतही नाही. त्याचा प्रचार हा प्रत्यक्षात त्याचा प्रचार म्हणूनही होतच नाही.
"आधुनिकतेचा प्रचार" नावाची गोळी लोकांच्या गळी उतरवली की झालं.
शिवाय तुम्ही तुमचा आधीचा धर्म explicitly सोडूनच इकडे यावं असं बंधन नाही.
ही प्रोसेस इतकी हळूवार आणि अल्लाद होते (पाणयत उकळल्या जात असलेल्या बेडकासारखे) की आधीचा धर्म तुम्ही कधी सोडलात हे तुम्हालाच कळत नाही.
नावाला तुम्ही जुन्याच धर्माचे असता.
प्रत्यक्षात अमेरिकनिझमचे आचरण करत असता.
काही प्रमाणात हे हिंदू नावाच्या धर्मासारखच आहे.
माणूस हिंदू बनला तरी त्याला तो हिंदू बनल्याचा पत्ताच नस्तो.
.
.

कॉन्स्पिरसी म्हण्णे किंवा चांगले-वाईट असे मी काहिच म्हणत नाहिये.
सध्या जे जसं दिसतय, ते जमेल तितकं तस्सच समजून घेण्याचा प्रयत्न करतोय.
.
.

ह्यांच्या प्रभावाखाली येण्यापूर्वी आणि आल्यानंतरही तुम्ही -- तुमचं शरीर तेच राहिलं असलं तरी मन बदललेलं असतं.
शरीर हे निव्वळ हार्डवेअर. त्यावरचं सॉफ्टवेअर -- तुमचं मन, राहणी-विचारसरणी -- वागण्या बोलण्याची पद्धत --एकूणच संस्कृती हे त्या हार्डवेअरवर चालणार सॉफ्टवेअर. हे सॉफ्टवेअरच आमूलाग्र बदललं जातं ह्या माअर्ह्तात्र्थात्न
.
.
चार -दोन टाळकी मिळून बसली आणि "आता हे मिशन सुरु करु. हा प्रपोगेंडा करु" असे म्हणून अंतिम टार्गेट ठरवून बसलित असं वाटत नाही. हे काहीतरी वेगळय. सतत उत्क्रांत होत जाणारं वेगळच कॉक्टेल आहे.

--मनोबा

समाजजीवनमानविचारमत

प्रतिक्रिया

टिवटिव's picture

17 Feb 2015 - 10:12 pm | टिवटिव
अन्या दातार's picture

17 Feb 2015 - 10:48 pm | अन्या दातार

हम्म. मनोबा लिहिते झाले हा त्या अमेरिकनिझमचा फायदाच म्हणावयास हवा

प्रचेतस's picture

17 Feb 2015 - 11:02 pm | प्रचेतस

काय बे मनोबा

संदीप डांगे's picture

18 Feb 2015 - 12:27 am | संदीप डांगे

आपले विचार फार फार जुळतात.... समविचारी भेटल्याचा आनंद झाला.

जे जे अमेरिकन लोकांना आवडतं किंवा पटते तेच योग्य आणि सर्वोत्तम असं निदान भारतात पाहीलंय..

संदीप डांगे's picture

18 Feb 2015 - 1:05 am | संदीप डांगे

या धाग्याच्या निमित्ताने एक दोन प्रश्न विचारून घ्यावे असं म्हणतोय…

अमेरिकन गाणी, रॉक, पॉप, इत्यादी सर्व प्रकारच्या अमेरिकन संगीताची आणि संगीतकारांची इत्थंभूत माहिती ठेवणाऱ्या आपल्या पब्लिकला कोणी असे अमेरिकन माहिती आहेत का जे तेवढ्याच उत्कटतेने आनंद शिंदेंचे गाणी ऐकतात…?

अमेरिकन सिनेमांचा आणि त्यांच्या सगळ्या अभिनेते, अभिनेत्र्यांच्या लफड्या-कुलंगड्या आणि काळ्या गोऱ्या दत्तक मुलांची अद्ययावत माहिती ठेवणाऱ्या पब्लिकला असा कोणी अमेरिकन माहिती आहे का ज्याने 'कुंकू' बघितला?

असं नाही आहे हे माहित आहे पण असं का आहे कुणी सांगेल का?

पिवळा डांबिस's picture

18 Feb 2015 - 1:20 am | पिवळा डांबिस

दोन्ही प्रश्नांचं उत्तरः कुणीही नाहीत.
पण हेच प्रश्न जर दक्षिण-पश्चिम मुंबईत विचारलेत तरीही हेच उत्तर येईल!! :)
बाय द वे: बर्‍याच अमेरिकनांना ऐश्वर्या राय माहिती असते!! ;)

संदीप डांगे's picture

18 Feb 2015 - 1:35 am | संदीप डांगे

चला, म्हणजे ऐश्वर्या दिसायला येक्दम झ्याक आहे असे मानायला आम्ही मोकळे. :-)

दक्षिण-पश्चिम मुंबईत विचारलेत तरीही हेच उत्तर येईल!!

तिथे तर ठाण्याला राहतो असं म्हटले तरी 'how far it is from here?' असं इचार्नारे हायेत... :-)

अहो एकदा ठाण्यातच राहणार्‍या फक्त अमेरिकन रॉक ऐकणार्‍या एका आपटे आड्नावाच्या कलीगला पु.लं.बद्दल काहीतरी विचारले तर "ते कोण?" असा विचारता झाला. मला घेरी यायची बाकी होती फक्त... :-)

पिवळा डांबिस's picture

18 Feb 2015 - 10:14 am | पिवळा डांबिस

अहो एकदा ठाण्यातच राहणार्‍या फक्त अमेरिकन रॉक ऐकणार्‍या एका आपटे आड्नावाच्या कलीगला पु.लं.बद्दल काहीतरी विचारले तर "ते कोण?" असा विचारता झाला. मला घेरी यायची बाकी होती फक्त...

भले! आनंद आहे!!
:)

अप्पा जोगळेकर's picture

18 Feb 2015 - 8:27 pm | अप्पा जोगळेकर

छान छान. अशा गोष्टींची सवय झाली आहे. पु.ल. देशपांडे, लोकमान्य टिळक, सुधीर फडके, ग, दि. माडगूळकर,पेशवे, पानिपतची लढाई इ. इ. माहीत नसणारे असंख्य मराठी लोक गेल्या ७-८ वर्षांत भेटले. त्यामुळे आता सवय झाली आहे. शिवाजी कोण होता असे विचारल्यावर 'द बॉस' असे उत्तर अजून तरी मिळले नाही. तेही मिळेल लवकरच.

हाडक्या's picture

18 Feb 2015 - 10:26 pm | हाडक्या

आमच्या वर्गात एक मराठीच्या प्राध्यापकांचा सुपुत्र होता ज्याला "ज्ञानेश्वरी" माहीत नव्हती. असे डोके सरकले होते तेव्हा. त्याला सांगितले की घरी जाऊन तुझ्या पप्पांना विचार आता. *aggressive*

विकास's picture

19 Feb 2015 - 2:27 am | विकास

एका मराठमोळ्या मित्राने खात्री करून घेण्यासाठी विचारले होते, "तो सिंहाच्या 'शेप' चा गड आहे, तोच ना?"

मी अजून अशा सिंहगडाच्या शोधात आहे! :(

श्रीरंग_जोशी's picture

18 Feb 2015 - 10:49 pm | श्रीरंग_जोशी

काही वर्षांपूर्वी नवसह्याद्री सोसायटीमध्ये राहणार्‍या एका नातलगांचे घर शोधत होतो. त्यांचा फोन लागत नव्हता म्हणून जवळच्या वाण्याकडे चौकशी केली. चौकशी करताना त्यांच्या घराशेजारी ज्यांचा बंगला आहे अशा प्रसिद्ध व्यक्तीच्या नावे चौकशी केली.

त्यावर त्या वाण्याने प्रतिप्रश्न केला...

कोण श्रीराम लागू?

पिवळा डांबिस's picture

18 Feb 2015 - 1:16 am | पिवळा डांबिस

मला अमेरिका आवडते की ह्याच साठी की...

वा, वा, क्या बात है!
मनोबा, मुक्तपीठ वाचतोस ना तू? मग आता हो तयार!! :)

अरुण मनोहर's picture

18 Feb 2015 - 8:15 am | अरुण मनोहर

दुसरी बाजू देखील तशीच आहे.
अनेक (गो-या) अमेरिकन्सला जग म्हणजे फक्त अमेरिका असेच वाटते.
आणि टेक्सन अमेरिकेन्सला फक्त टेक्सास म्हणजे अमेरिका वाटते.

खटासि खट's picture

18 Feb 2015 - 11:32 pm | खटासि खट

मागच्या जन्मी असे सर्व अमेरिकन्स भारतातल्या त्या एका विशिष्ट शहरात जन्माला आलेले असणार

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Feb 2015 - 10:24 am | कैलासवासी सोन्याबापु

ह्याच अनुषंघाने "ज्या देशात मॅकडोनाल्डस आहे त्या देशाने आजवर एकदा ही अमेरिका विरोधी कारवाया न केल्याचे वाचनात आल्याचे स्मरले

अत्रुप्त आत्मा's picture

18 Feb 2015 - 10:31 am | अत्रुप्त आत्मा

आबाबा!!!!!!! मनोबा !

मराठी_माणूस's picture

18 Feb 2015 - 10:34 am | मराठी_माणूस

मस्त लेख
त्यामुळेच आपल्याला बर्‍याच झैरती वाचायला मिळतात
"पुढच्या वेळी भारतात आल्यावर ...."
"फॉल सिझन ला ह्या वेळी...."
"मुलांनी हॅलोवीन ला...."
"ईस्टकोस्ट्ला जाताना..."
"मागच्या वेळेस एलए ला गेलो तेंव्हा....."

अमेरिकनिझम हा मायावी आहे तो ह्याच साठी.
नारायण ! नारायण ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वर

अप्पा जोगळेकर's picture

18 Feb 2015 - 8:22 pm | अप्पा जोगळेकर

अमेरिकेत आशियाई आणि विशेषतः भारतीय, चीनी लोकांची गर्दी खूप झाली आहे. सबब अमेरिकेचेच मोठ्या प्रमाणात आशियाईकरण होत आहे.

पिवळा डांबिस's picture

18 Feb 2015 - 10:56 pm | पिवळा डांबिस

पूर्वीची अमेरिका राहिली नाही, पूर्वीची अमेरिका राहिली नाही!!!
:(

विकास's picture

19 Feb 2015 - 2:31 am | विकास

पूर्वीची अमेरिका राहिली नाही, पूर्वीची अमेरिका राहिली नाही!!!

म्हणून आम्ही "तसल्या" भागांपेक्षा, न्यू इंग्लंड मधे राहणे पसंद करतो... ;) (आता पळतो!)

पिवळा डांबिस's picture

19 Feb 2015 - 10:03 am | पिवळा डांबिस

बॉस्टन मॅरेथॉन बॉम्बिंगचा इतक्यातच विसर पडलेला दिसतोय!!!
:)

अर्धवटराव's picture

18 Feb 2015 - 11:11 pm | अर्धवटराव

एक मेल्टींग पॉट, जे केवळ पैशाची भाषा समजते, आणि येन केन प्रकारेण सुखोपभोग हेच जिथे जीवन विषयक सूत्र आहे ( भाई, ऐकताय ना...) त्याची भूरळ याच गोष्टी प्रच्छन्न मार्गाने मिळवण्याचा खटाटोप करणार्‍या लोकांना पडली तर त्यात वावगं काय आहे ?

हुप्प्या's picture

18 Feb 2015 - 11:14 pm | हुप्प्या

जगाचा हाच नियम आहे की जो जास्त गबर आणि पराक्रमी त्याचेच जग गुण गाते आणि त्याचेच अनुकरणही केले जाते.
प्राचीन काळी रोमन साम्राज्य होते तेव्हा त्यांची संस्कृती आणि लॅटिन भाषा तमाम युरोपावर प्रभाव टाकून होती. आजही इंग्रजीतल्या लॅटिनमधून आलेल्या शब्दांची संख्या प्रचंड आहे. जेव्हा भारतावर मुगलांचे राज्य होते तेव्हा पर्शियन संस्कृती मग त्यात भाषा, कला, अन्नपदार्थ ह्यात सगळ्या बाबतीत भारतातील स्थानिक संस्कृती मोठ्या प्रमाणात मिसळली गेली. ह्यात काही भाग लादण्याचा असला तरी काही लोकांनी आपणहून स्वीकारला होता. पेढे, बर्फी, जिलबी, कलाकंद, गुलकंद, सामोसा हे पदार्थ आणि त्यांची नावे ही फारसीतून आले आहेत हे आज खरेही वाटणार नाही. भारतातील अनेक भाषांत फारसी शब्द मोठ्या प्रमाणात आहेत. तेव्हा मिसळपाव असते तर तिथे लोकांनी ह्या भेसळीला नाके मुरडली असती. पण आज ते शब्द त्या त्या भाषेत पार मिसळून गेले आहेत.

इंग्रजांचे साम्राज्य जेव्हा भरात होते तेव्हा भारतात इंग्रजी भाषा, वेषभूषा, रहाणी, स्वागत करताना, निरोप घेताना वापरायचे शब्द हे इंग्रजी असले की लोकांना कसे उच्च वाटायचे.
आजच्या घटकेला अमेरिका ही महासता आहे. त्यामुळे त्यांच्या गोष्टींचे अनुकरण केले जात आहे. अमेरिकेतील तमाम गोष्टी मग तो कोकाकोलासारखे जंक पेय असो, म्याकडॉनल्डचे नि:सत्त्व अन्न असो. अर्थात सगळेच अमेरिकन टाकाऊच असते असे नाही. मायक्रोसॉफ्टचे पीसी, गुगलचे सर्च नि अँड्रॉईड, फेसबुक व अन्य उत्पादने पूर्णपणे त्याज्य आहेत असे कोणी म्हणणार नाही मी तरी नाहीच.
अर्थात आज अमेरिकेचे प्रस्थ आहे म्हणून सगळ्या जगाचे अमेरिकी धर्मांतर झाल्यासारखे वाटत आहे. पण इतिहासाकडे पाहिले तर चिरंतन टिकणारे प्रस्थ कुणाचेही नसते. कधी ना कधी ते लयाला जाणारच. मग त्या नव्या फॅडाकडे लोक वळतील ह्याची खात्री असू द्या.

पिवळा डांबिस's picture

19 Feb 2015 - 1:20 am | पिवळा डांबिस

म्याकडॉनल्डचे नि:सत्त्व अन्न असो

फास्ट फूड्मध्ये तुलना करायची झाली तर समोसा (उत्तर भारत), बटाटावडा (मध्यभारत), आणि डोसा (दक्षिण भारत)यांच्या तुलनेत बर्गर नि:सत्व कसा?

अत्रुप्त आत्मा's picture

19 Feb 2015 - 9:37 am | अत्रुप्त आत्मा

+++१११

हुप्प्या's picture

19 Feb 2015 - 10:24 am | हुप्प्या

म्याकमधे लोक जेवायला जातात असे एक गृहितक आहे. जेवताना बर्गर, फ्राईज खाणे आणि कोक वा तत्सम फसफसे पेय पिणे हे नि:सत्त्व आहारात मोडते. सामोसे, बटाटेवडे हे जेवण म्हणून कुणी जेवत असेल तर ते अर्थातच जास्त वाईट पण तसे होत नसावे असा माझा अंदाज आहे. डोसा हा कसा बनवला आहे ह्यावर त्याचे अन्न म्हणून चांगुलपण ठरते. तो अत्यंत आरोग्यकारकही बनवता येतो. आणि अशा डोशाचे जेवण म्याकपेक्षा नि:संशय उजवे ठरते.

थोडक्यात म्याकपेक्षाही नि:सत्त्व जेवण करता येईल का? नक्कीच येईल पण म्हणून म्याकचे अन्न सकस ठरत नाही.

अमेरिकन म्याकबद्दल बोलायचे तर त्यातला मुख्य पदार्थ हॅमबर्गर. दोन गोलाकार पावाच्या चकत्या, मधे बीफ, मेयो आणि काही भाज्या. त्यातली बीफची चकती ही अत्यंत स्वस्तातल्या मांसाची बनवलेली असते. ज्या गुरांना मारून ते मांस काढले असते ती गुरे अत्यंत बंदिस्त जागेत कोंडलेली असतात. त्यांना स्वस्तात मिळणारे धान्य म्हणजे मका आणि मकाच खायला दिला जातो. गवत वगैरे नाही. अशा प्राण्यांचे मांस जास्त चरबीयुक्त असते कारण त्यांना ती चरबी खर्च करायला वावच नसतो. पावामधे मोठ्या प्रमाणात शर्करा असते (हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप). त्यामुळे तो पाव जास्त टिकतो आणि हे सिरप अत्यंत स्वस्तात मिळते म्हणून परवडते. जर त्या सँडविचमधे चीज असेल तर तेही असेच बंदिस्त गाईंच्या दुधाचे असते. गाईंना अन्नातून हार्मोन्स, प्रतिजैविके दिली जातात आणि ती दुधात उतरतात.
ह्या सँडविचमधे घातल्या जाणार्‍या अल्पशा भाज्या ह्या शीतकरण करून टिकवलेल्या असतात. त्यातला लेट्यस हा पाणचट आईसबर्ग जातीचा असतो ज्यात मुख्यतः पाणी आणि फायबर असते बाकी सत्त्वे नाहीत.
फ्राईज करण्याकरता बटाटा वापरतात तोही गोठवलेला. लागेल तसा गरम करुन तळायचा. त्याला चव यावी म्हणून विविध प्रकारची रसायने आणि अर्क त्यावर ओतलेली असतात. विविध ठिकाणहून येणारा बटाटा शेवटी सारख्याच चवीचा लागावा म्हणून हा उपद्व्याप. ह्यात अन्नाची सकसता हा मुद्दा अत्यंत गौण आहे. किंमत, टिकाऊपणा आणि चव ह्या गोष्टींना प्राधान्य असते. कोका कोला आणि तत्सम द्रव्याबद्दल काय बोलावे? पाण्यात चार पाच चमचे साखर विरघळवून त्याला फेस आणून ती पोटात सारणे! जेवताना तोंडी लावायला दोन वाट्या साखर नुसती खाल्ली तर कसे वाटेल त्यातला प्रकार!
असो. अमेरिकेचे खूळ हा विषय आहे म्हणून सांगतो. अमेरिकेत बहुतांश लोकांचे ह्यावर एकमत आहे की म्याक हे जंक अन्नाचे दुकान आहे. ह्याचा परिणाम ह्या रेस्टराँना जाणवू लागला आहे. त्यांचे उत्पन्न चांगलेच घटत आहे. त्याला पर्याय म्हणून अन्य काही फास्ट फूड आऊटलेटे लोकप्रिय होऊ लागली आहेत.

मराठी_माणूस's picture

19 Feb 2015 - 10:52 am | मराठी_माणूस

सर्वात महत्वाचे म्हणजे मॅक चे मिठ , खाल्ल्या मिठाला जागयचे शिकवते

पिवळा डांबिस's picture

19 Feb 2015 - 11:15 am | पिवळा डांबिस

सर्वप्रथम तुम्ही तुमच्या प्रतिसादात फक्त बर्गरचा उल्लेख केला होतात आणि त्याला नि:सत्व म्हणाला होतात. तेंव्हा भारतीय कार्ब ठासलेल्या पदार्थांच्या तुलनेत बर्गर हा नि:सत्व कसा हा माझा प्रश्न होता.

आता तुम्ही त्यात फ्राईज आणि कोक वगैरे आणताय. मुळात मॅकमध्ये बर्गर घेतल्यावर तुम्हाला फ्राईज वा कोक घेण्याची मुळीच सक्ती नसते. नुसता बर्गर तुम्ही खाऊ शकता, अनेक लोकं खातात. कोकच्या ऐवजी तिथे अ‍ॅपलज्युसही मिळतो, फुकट पाणीही मिळतं...

तुम्ही काहीही म्हंटलंत तरी अमेरिकेत तरी मॅक किंवा तत्सम बर्गर हा फास्ट फूड म्हणूनच गणला जातो. अन्य देशात जरी लोक जेवायला वा सणासुदीला जाऊन खात असले तरी! अमेरिकेत जर जेवण घ्यायचं असेल तर अनेक जेवणाची रेस्टॉरंटस आहेत जिथे (अगदी अस्सल अमेरिकन जेवण घ्यायचं असेल तर) मीटलोफ, स्टेक, पॉटपाय, स्ट्यू वगैरे प्रकार उपलब्ध असतात, जशी भारतात हॉटेलांमध्ये थाळी उपलब्ध असते त्याप्रमाणेच. बर्गर हे समोसा, वडा वा डोश्याप्रमाणेच खायचं झटपट फास्ट फूड आहे. म्हणूनच तर त्याला ड्राईव्ह इन विंडो असते जी जेवण पुरवणार्‍या रेस्टराँन्टसना नसते...

आता पदार्थांच्या क्वालिटीची तुलना. समोसा, वडा, डोसा या पदार्थांत जे जिन्नस वापरले जातात, ज्या तेलात ते तळलेले असतात, जी स्वच्छता पाळली जाते त्याचा विचार करता तुम्ही मॅकच्या (किंवा अन्य) बर्गरवर टीका करावी हे अत्यंत धाडसाचं आहे. विशेषतः अमेरिकेतली मॅक्स तरी त्यांच्या स्वच्छतेबद्दल (त्यांच्या बाथरूमसकट) प्रसिद्ध आहेत. किंबहुना लांबच्या प्रवासाला जातांना इतर पर्याय उपलब्ध असले तरी मॅक निवडलं जातं ते त्यांच्या स्वच्छतेबद्दल आणि त्याच्या प्रॉडक्ट कन्सिस्टंसीबद्दल. व्हॉट यू ऑर्डर इज व्हॉट यू गेट ही त्यांची स्लोगनच आहे!

पण म्हणून बर्गर हे पूर्णान्न आहे का? तर नाही. पण कार्ब (पाव), प्रोटीन (मीट पॅटी) आणि भाज्या (कांदा, टोमॅटो, लेटस)त्यात आहे. चीज हवं तर घ्यावं नाहीतर ते नको म्हणून सांगायची सोय आहे. त्यामुळे वर उल्लेखलेल्या कार्ब आणि कार्ब असलेल्या पदार्थांच्या मानाने बर्गर नि:सत्व निश्चितच नाही.

डिस्क्लेमर १: आम्हालाही समोसा, वडा आणि डोसा हे पदार्थ अत्यंत आवडतात. त्यामुळे त्यांच्याशी आमचं काहीही शत्रूत्व नाही.
डिस्क्लेमर २: आमची मॅक वा अन्य बर्गर विकणार्‍या चेनची फ्रॅन्चायझी नाही. आम्ही मॅकचे शेअरहोल्डरही नाही!

अत्रन्गि पाउस's picture

19 Feb 2015 - 3:14 pm | अत्रन्गि पाउस

औट साईड दि ऑफ स्ट्म्प बॉल ला स्क़्वेअर कट मारायचा ...त्याची आठवण आली ....

हुप्प्या's picture

19 Feb 2015 - 8:24 pm | हुप्प्या

म्याकमधे निव्वळ हॅम्बर्गर सँडविच नक्कीच घेता येते. पण त्यांचा मेनू पाहिला आहे काय? त्यात मील डील म्हणजे जेवण ह्या नावाखाली काय विकले जाते? कुठलेसे सँडविच, फाईज आणि कोकसदृश पेय. ह्याला ते मील म्हणतात आणि लोकांच्या डोळ्यात भरेल अशा पद्धतीने त्याची जाहिरात करतात. (शिवाय निव्वळ ५० सेंट जास्त द्या आणि आपले मील सुपरसाईझ करा हेही आत्ताआत्तापर्यंत होते. म्हणजे काय? तर सँडविचबरोबर प्रचंड आकाराच्या फ्राईज आणि कोकने भरलेले एक पिंप मिळवा. प्रत्येक विक्रेता ऑर्डर दिल्यानंतर आपल्याला सुपरसाईज करून हवे आहे का असे नम्रपणे विचारायचा) तेव्हा त्यांना लोकांच्या आरोग्याशी देणेघेणे नसते. त्यांना जास्तीत जास्त फायदा होणारा पदार्थ म्हणजे कोक व फ्राईज हे लोकांच्या गळ्यात मारायचे असते. त्यांच्या सँडविचमधील भाज्या ह्या दीर्घकाळ साठवल्यामुळे त्यातील सत्त्व गमावलेल्या असतात.

फास्ट फूड हे जेवण म्हणून खाल्ले जाते. बरेचसे बनलेले असते आणि गोठवलेले गरम करायचे असते म्हणून ते वेगात मिळते. पण आपण कुठल्या म्याकमधे डोकावून पाहिलेत तर जास्तीत जास्त गर्दी कधी असते? सकाळचे जेवण अर्थात लंच आणि संध्याकाळचे अर्थात डिनर ह्या वेळातच. ह्यात काडीचाही संशय नाही की हे बहुसंख्यांचे जेवणच असते.

म्याकच्या स्वच्छतेबद्दल वाद नाही. पण नियम कडक असल्यामुळे अमेरिकेतील बहुतेक मोठ्या भोजनालयी साखळ्या स्वच्छतेच्या बाबतीत काटेकोर असतातच. त्यात विशेष नाही. मात्र भारतातील म्याकशी पुरेसा परिचय नाही.

पुन्हा एकदा सांगतो, कुठलाही सामोसा वा बटाटेवडा हा माझा सकस अन्नाचा मापदंड नाही. इडली, डाळभात, पोळीभाजी असे जास्त सकस पर्याय उपलब्ध आहेत. म्याकपेक्षा निकस अन्न कुठेतरी मिळते म्हणून म्याक सकस हे तर्कशास्त्र अजब आहे.

पिवळा डांबिस's picture

20 Feb 2015 - 2:45 am | पिवळा डांबिस

एकदा बर्गरबरोबर फ्राईज किंवा सोडा घ्यायची सक्ती नसते हे सांगितल्यावर तुमच्या पहिल्या परिच्छेदाला अर्थ उरत नाही. ते काहीही मेन्यु लावतील वा अ‍ॅडव्हर्टाइझ करतील, सक्ती तर करत नाहीत ना? उडप्याकडेही शंभर पदार्थ त्यांच्या मेन्यूबोर्डावर असतात म्हणून काही कुणी सगळे ऑर्डर करत नाही, आपल्याला हवं तेच ऑर्डर करतात! आणि जगातला कुठलाही हॉटेलवाला लोकांच्या आरोग्याची वाढ व्हावी या महत्वाकांक्षेने धंदा करत नाही. कमीतकमी खर्चात (पण लोकांना आजारी न पाडता), चविष्ट पदार्थ विकून जास्तीत जास्त फायदा व्हावा हाच हेतू असतो. तेंव्हा मॅक त्याबातीत वाईट आणि इतर (उदा. भारतातले हॉटेलवाले) चांगले असं काही नाही.
मॅकच्या स्वच्छतेबद्दल तुम्हाला काही वाद नाही. चला, बरं झालं. पण रेस्टॉरंटामधल्या स्वच्छतेत तुम्हाला 'विशेष काही' वाटू नये याचं आश्चर्य आहे! विशेषतः बर्‍याचश्या देशी रेस्टॉरंटसच्या तुलनेत!
आता तुम्ही इडली, डाळभात, पोळीभाजी वगैरे नवे पर्याय काढलेत. त्यातली इडली सोडली तर डाळ्भात आणि पोळीभाजी हे पदार्थ वारंवार हॉटेलांमध्ये जाऊन खायचे असतात हे माझ्यासाठी नवीनच आहे. यावर आता मी जर हॉटेलांमधे मिळणार्‍या थाळीची चिकित्सा केली तर तुम्ही म्हणणार की हॉटेलांमधली नसेल पण माझ्या मातोश्रींनी केलेला डाळभात/ पोळीभाजी जगात सर्वात सत्ववान! म्हणजे या चर्चेला काही अंतच नाही जर फाटेच फोडायचे असतील तर...
मूळ मुद्दा हा तुमच्या 'बर्गर नि:सत्व असतो' या विधानाबद्दल आहे. त्यावर माझं म्हणणं की इतर काही समतुल्य देशी पदार्थांच्या तुलनेत ते विधान असत्य आहे. बर्गर हे फास्ट फूड आहे हे माझं, जगभरातल्या फूड इंडस्ट्रीचं, आणि खुद्द मॅकडॉन्ल्डसचं देखील मत आहे. पण तुम्हाला ते मान्य नाही. याचा अर्थ आपलं कधीही मतैक्य होणे नाही. कारण मी इगतपुरीला जाणार्‍या गाडीत आहे तर तुम्ही पुण्याला जाणार्‍या! (पुणेकरांनो, नो ऑफेन्स इंटेंडेड!!)
तेंव्हा तुम्ही डाळभात खा, मी बर्गर खातो. मी डाळभाताला नांवं ठेवत नाहिये, तुम्ही तुम्हाला बर्गर नको असेल तर खाऊ नका पण उगाच बर्गरला नांवं ठेवून देशी झेंडा मिरवण्यात काहीही तथ्य नाहीये...

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Feb 2015 - 8:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

कारण मी इगतपुरीला जाणार्‍या गाडीत आहे तर तुम्ही पुण्याला जाणार्‍या! (पुणेकरांनो, नो ऑफेन्स इंटेंडेड!!)

छ्या ! पुण्याबद्दलचा ऑफेन्स टाळला तरी इतका मस्त संवाद कुठल्या गाडीत बसून ऐकावा... आपलं वाचावा... असा प्रश्न पडला आहे ;) :)

हुप्प्या's picture

2 Mar 2015 - 9:55 am | हुप्प्या

भांडवलशाहीवर आधारित अर्थव्यवस्थेमधे सक्ती कधीच नसते. पण म्हणून हुरळून जाण्याचे कारण नाही. म्याक आणि अन्य किरकोळ विक्रेत्यांमधला फरक म्हणजे म्याककडे असणारे भक्कम आर्थिक पाठबळ. लाखो डॉलर खर्च करून लोकांना भुरळ पाडण्याकरता ते जाहिराती तयार करत असतात. लोकांची मानसिकता, त्यांचे कमकुवत दुवे हेरून ते वापरून जाहिरातबाजी करून ते आपला निकृष्ट माल लोकांच्या गळी उतरवत असतात. इतक्या मोठ्या प्रमाणात एकसारखा दर्जा देण्याकरता जी सव्य अपसव्ये करावी लागतात ती गिर्‍हाईकाच्या आरोग्याला प्रधान मानण्यापेक्षा आपण कुठे कचाट्यात अडकत नाही ना हे बघण्याकडे प्राधान्य देतात. पूर्वी सिगरेट विकणार्‍या कंपन्या ज्या प्रकारच्या डर्टी ट्रिका वापरायच्या तशाच म्याकसारख्या कंपन्याही वापरतात. आणि त्याला उत्तर सक्ती करत नाहीत म्हणून आनंदाने हुरळून जाणे हे नव्हे. तर जनजागृती करणे हे आहे. रस्त्यावर डोसा वा इडली विकणारा टिव्हीवर जाहिरात करेल काय? टाइम्स वा अन्य पेपरात जाहिरात करेल काय? लहान मुलाला वेड लावण्याकरता खेळणी वा अन्य प्रलोभनांचा सढळ हस्ते पैसे ओतून वापर करेल का? नाही.
मी कुठलेही फाटे फोडलेले नसताना उगाच मातोश्रीच्या हातचे जेवण वगैरे फाटे आपण फोडत आहात.
आपणास डाळभाताचे वावडे असेल तर उपमा वा पोहे चालतील काय? ते पर्याय उपलब्ध आहेतच.
थोडक्यात म्याकचा बर्गर हा अन्य बर्गर पेक्षा वा अन्य पदार्थांपेक्षा निकृष्ट असतो ह्या मुद्द्यावर मी ठाम आहे. आपल्याला ते आरोग्यकारक आणि हितकारक वाटत असेल तर रोज ते जेवणात खा. म्याकच्या भांड्वलशाहीप्रमाणे माझीही सक्ती नाहीच. लोकांनी आपल्या परीने विचार करावा. निदान दोन्ही बाजू पारखून काय तो निर्णय घ्यावा ही माझी इच्छा आहे. असो.

मराठी_माणूस's picture

2 Mar 2015 - 2:01 pm | मराठी_माणूस

सहमत

हुप्प्या's picture

19 Feb 2015 - 8:30 pm | हुप्प्या

पण हामेरिकनांनाही आता इंडियन पदार्थांची चांगली ओळख व्हायला लागलीये. तुम्ही म्हणाता तसं एका बाजूनंच कसं असेल? प्रमाणात कमीजास्त आहे म्हणजे फक्त हामेरिकन गोष्टीच चालतात असे कसे? जौदे! टंकाळा!

अमेरिकाच असं नाही, बळी तो कान पिळी!

- (अमेरिकनिझम चालवून घेणारा) सोकाजी

धागाकर्ता कधी येणार धाग्यावर?

मन१'s picture

30 Jan 2016 - 12:42 pm | मन१

सर्व वाचक प्रतिसादकांचे औपचारिक आभार.

मुद्द्यांबद्दल, प्रतिसादांमधील जमेल तितक्या मुद्द्यांबद्दल अधिक लिहितो.