भव्यत्वाची जेथ प्रचिती! वेरूळ..सफर आणि बरेच काहि! १

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
12 Jan 2015 - 2:54 pm

(शीर्षकामुळे आशय बदललाय की काय? किंवा का बदललाय? असं जरूर वाटेल.पण येथले दिव्यत्व त्या भव्यत्वात अनुस्यूतच आहे. अजुनंही अंगावरचे रोमांच हलत नाहीयेत.. )

दहा तारखेला भल्या (थंडिच्या) पहाटे, आमच्या पुण्यपत्तनखाज'गीवहातुकप्रवासीउपकारांकितगतजन्म्पुण्यबॅलन्सनिमित्तेनरिक्षाप्राप्तीअतीशुभयोगा मुळे (हुश्श्श्श्श् :-/ ..काय ती शब्दलालं'सा! =)) ) एकदाचे आंम्ही तिघे म्हणजे मी (उर्फ..स्वआर्तिक्यकुशल! ;) ) धन्या (उर्फ छोटा हत्ती,मंजेच आगोबाचा भाऊ! :-/ का ते पुढे कळेलच ) आणि किसनदेव (उर्फ मुरलीधर महाराज ठाणेकर) असे ३ वारकरी आमच्या त्या उपरोक्त नागरीयोगामुळे ती रिक्षा पहिल्याच फटक्याला मिळवून पुणे ठेसन जवळील मिटींगप्वाइंट वर येऊन थडकलो.नंतर बरोब्बर ५ मिनिटात मागून प्र.गो.त्यांच्या नवरथासह वल्ली (उर्फ..आगोबादिंडी)ला घेऊन आले. (आगोबास दिंडी का म्हटले? यावर लवकरच एक मोठ्ठे खडकखंडकाव्य प्रसवण्यास घेणार आहोत.तेंव्हा ते कळेल..सध्या का हि ही इचारू णये! :-/ ) मग तिथे माझा मनपसंत इराणी चहा चांगला एकाला २/२ कप-मारून आंम्ही वेरुळास प्रस्थान ठेवते झालो. काहि वेळातच आगोबा (आणि संपूर्ण ट्रीपभर मेंदूधुवून माझ्या पाठिस पडलेला. स.गा. उर्फ धन्या उर्फ छोटा हत्ती) माझ्यावर हल्ले करु लागले..पण मी घारापुरीकट्ट्यातील दूर्लक्ष हत्याराचा पुरेपुर उप-योग करून दोघास परस्पर जेरीस आणविले.

प्रगोनी एका बाजुनी गप्पा वेंजॉय करत सहभागी होत सुमाट गाडी हानली..आणि सकाळच्या वेळेचा योग्य सदुपयोग करत आंम्ही ११:३० ला वेरुळात पोहोचलो. सदर संपूर्ण चालकत्वात प्र.गों.नी त्यांचे Go हे क्रीयापद गाडीसह झकास-चालविले. (गर्दी सोडून! ;) ). प्र.Go.चलित.आरामनवरथसुखप्रवासामुळे त्रास असा झालेलाच नव्हता.म्हणून लग्गेच फ्रेश होऊन आंम्ही कैलास लेण्यांकडे दिंडी वळवली. आगोबा ल्हान हत्ती..आपलं ते हे..मुलासारखा उड्या मारत मारत भरभर चालत होता.( =)) ) मी मात्र ,थंडीत आलो हे किती बरं झालं! असा व्यत्यासी विचार करत चाललो होतो. लोकहो..पण हे खरच आहे हो! उन्हाळ्यात त्या संपूर्ण परिसराला वल्लींसारखा खराखुरा गाइड लाभला,तरीही त्या लेण्यांचे "खरे देणे" पाववून घ्यायला,कमीतकमी ५ दिवस लागतील. आणि आपल्या मागे एका ट्रॉलीवर पाण्याचा कॅन(दररोज प्रत्येकी १०लिटर) या हिशोबानी घेऊन फिरावं लागेल.. एरवी क्यामेरा अथवा डोळ्यांनी क्लिकक्लिकाटच करून यायच असेल. तर एक दिवस बास्स!

आता मला इथलं भावलेलं किंवा वाटलेलं वैशिष्ठ्य काय? तर वर म्हटल्या प्रमाणेच दिव्यता अनुस्यूत अशी भव्यता! अगदी अरसिक माणूसंही इथे आल्यावर त्या वेळेपुरता तरी बदलून जाइल. आणि वल्लींसारख्यांकडून माहिती मिळत मिळत पहाण्याचा योग आला,तर गाढव सुद्धा जिज्ञासू होइल.. मग मी कोण ? मी बराचसा कला आसक्त माणूस आहेच...पण त्याहिपेक्षा मला कुठेही अगदी खरिखुरी निर्मिती दिसायला लागली. कि ही कर जुळल्याची भवना निर्माण होते..आणि थक्क होण्यापेक्षा मी बघता बघता त्याचाच भाग होऊन जातो..यावेळीही मला या सगळ्या अफाट कलाकृतीनी एका झटक्यात-वश केलं! आणि हा खेळ अगदी एंट्रीपासूनच सुरु होतो. मला असं वाटलं होतं,की २ दिवसात एव्हढ्या सगळ्या लेण्या पहायच्या मंजे बहुतेक आपली वाट लागणार...पण मला या भव्यतेनी तीच्याच वाटेला ,अगदी काहि क्षणात लावलं ..आणि मला थकणं सोडा ...एकही क्षण कंटाळा सुद्धा आला नाही. शिवाय माझा वल्लीच्या माहितीसह व्हिडिओ शुटिंग करण्याचा मानसंही भरपूर चांगला पूर्ण झाला. शनिवार/रविवार असल्यामुळे (आमच्यासह..)पर्यटक होतेच होते. पण किमान ५/६ शाळांच्या ट्रिपा आलेल्या होत्या...त्यामुळे काहि रसभंग झाला.. पण माझ्या साठी ही ट्रीप म्हणजे वेरूळची सुरवात आहे..ही खुणगाठ आधीच मनाशी बांधलेली असल्याने मला ते सर्व सहज सहन झाले.

असो... आता फार काहि लिहून तुंम्हाला छळत न बसता,थोडी फोटो सफर घडवितो.

डिस्क्लेमरः- मी फक्त माझ्या भावना व्यक्त करत फोटो लावणार आहे..त्याची नाव आणि माहिती हे वल्ली मास्तरांचे काम आहे..त्यामुळे आगोदरच क्षमस्व...म्हणून सुरवात करतो. (यावेळी मी आणि प्र.गो.वल्लीमास्तुरेंकडून सप्तमातृका ओळख परिक्षेत पडत्याकाठावर पास जाहलेलो आहोत! :D किसनदेवांना ५५ टक्के मार्क मिळालेले असावे! ;) असं मला वाटतं..आणि १ उदासीन इद्यार्थी स.गा. हे तर स्वतःला अजुन तिकडे बघा ही म्हणत नसल्यामुळे..त्यांचा यात कुठे प्रश्नच येत नाही..तर ,ते एक असो! ;) )

मी ज्याला भव्यता म्हणतो ती काय? तर..अगदी सुरवातीपासून..
एंट्रीलाच याचा प्रत्यय यायला लागतो.
१) अता ही कैलास लेण्यांच्या सुरवातीची शिल्प पहा.. मध्यभागी-उग्ररूपे प्रकटे तो नर-सिंव्ह...आहे कि नाही एकदम तस्साच!?
https://lh3.googleusercontent.com/-JVZQdpoqUI4/VLNbVWRtqTI/AAAAAAAAGvU/i8GNcPWTZoY/w774-h581-no/verul%2Btrip%2B1%2B005.jpg
असं वाटतं,की त्या कातळात या मूर्जींची बिजं आधिच होती,आणि कलाकारांची कौशल्य व मूर्तीकारांचे हात लागल्यावर त्यांच्याशी बोलत बोलत ह्या कलाकृती बाहेर प्रकट झालेल्या आहेत. हा भास इथे अनेक ठिकाणी होतो.
https://lh4.googleusercontent.com/-hzkLtmHMt2o/VLNbTkddbpI/AAAAAAAAGvM/ZkGQLIJLhGo/w774-h581-no/verul%2Btrip%2B1%2B009.jpg
https://lh3.googleusercontent.com/-ZlpaAEPDMgI/VLNbWdhRiJI/AAAAAAAAGvc/njHtljX1eSI/w774-h581-no/verul%2Btrip%2B1%2B008.jpg
https://lh3.googleusercontent.com/guWgxoGSjX_yg-F6-cg0P3v2Mv_3EgpSBUbtc3x1cpo=w774-h581-no

२) आता काहि काळ आपण स्तंभित होऊ या!
https://lh5.googleusercontent.com/-vJg28yhCE28/VLNdb3WJC3I/AAAAAAAAGwI/fbH_a2_v2wM/w774-h581-no/verul%2Btrip%2B1%2B084.jpg
https://lh6.googleusercontent.com/-asXiKMkeqLI/VLNcz6NyxWI/AAAAAAAAGvw/Ln2lT1J8T2g/w774-h581-no/verul%2Btrip%2B1%2B029.jpg
https://lh4.googleusercontent.com/pSvqmKvE2oLFbsPHdWhVKvN-DgET78tcN6PhmMOEdfg=w774-h581-no
https://lh5.googleusercontent.com/-6iYznYYRjF8/VLNe4AD8CbI/AAAAAAAAGxM/h0UkGhU7IBQ/w774-h581-no/verul%2Btrip%2B1%2B128.jpg
https://lh4.googleusercontent.com/-o4rdcjvsRr0/VLNfl-Y4KdI/AAAAAAAAGxk/p7PAFd7_Mec/w774-h581-no/verul%2Btrip%2B1%2B203.jpg
https://lh3.googleusercontent.com/_pF2329yMhvTaV9xGVIIneGhdhJH0GRkTdBU1Qa4JKk=w774-h581-no
https://lh6.googleusercontent.com/-77VfKJbWP6k/VLNhqbZnS8I/AAAAAAAAGy0/xqWYK0EBNm8/w436-h581-no/verul%2Btrip%2B1%2B344.jpg
३)आता थोडे थक्क होऊ...
https://lh4.googleusercontent.com/JfTQ9HaVEMu5l6JHIieoiHkFSUzkY3S2zvfEG08i9gE=w436-h581-no
https://lh6.googleusercontent.com/AkzKMsOQ6v_KlMdZ_V8m0X-li8BRia6QGrsgUNZLItk=w774-h581-no
https://lh3.googleusercontent.com/-hI3vxJGnncI/VLOGt-UkTxI/AAAAAAAAG0w/NK9UyrvV7Ts/s640/verul%2520trip%25201%2520072.jpg
https://lh4.googleusercontent.com/nHGjoQJBgmpxAUXVZQ6PzBjouf86AmikahJZTyQ_y6Y=w774-h581-no
https://lh5.googleusercontent.com/ejx5hHn0VGxOFv8NhQEMd2klyfSGF63MVtlu27ysxaM=w774-h581-no
https://lh3.googleusercontent.com/-EucDsVXel9g/VLOLuxvE1QI/AAAAAAAAG1Y/oEWRzhOeDzs/s512/verul%2520trip%25201%2520305.jpg
https://lh4.googleusercontent.com/6mc55r1HAPZwL5SJyXk1TsI2PDxvzdqpIdygUPS3upY=w774-h581-no
४) आणि आता....पहातच राहू!
https://lh5.googleusercontent.com/y4LI9fchH0QmodSHqBQh6kRVFFPjiO0kjxN-TYpAvfU=w774-h581-no
https://lh6.googleusercontent.com/-slzb4O_-4YA/VLOQvX7hqHI/AAAAAAAAG2A/WA4AixPVyhI/s640/verul%2520trip%25201%2520199.jpg
https://lh4.googleusercontent.com/-7df1oUE60es/VLORNCo8LhI/AAAAAAAAG2I/qxuHevLafNE/s640/verul%2520trip%25201%2520189.jpg
https://lh5.googleusercontent.com/--WmHBU2QOsE/VLOReZoYG3I/AAAAAAAAG2Q/hDB6PScvGLM/s640/verul%2520trip%25201%2520188.jpg
५)आता... तय्यार रहा!
इथून पुढचे फोटो अंगावर येणार आहेत....
https://lh3.googleusercontent.com/-4KX9bsdrORc/VLNh4T7J2aI/AAAAAAAAGy8/LSz3vvkBrGY/w774-h581-no/verul%2Btrip%2B1%2B350.jpg
ही एका आनंददायक हिप्नोसिसची वेळ आहे...
https://lh6.googleusercontent.com/-JeLXXzMQDfg/VLOMogKIrwI/AAAAAAAAG1k/Xb63RTPfnmQ/s640/verul%2520trip%25201%2520351.jpg
ते तुम्हाला त्यांच्या राज्यात घेऊन जाणार आहेत...
https://lh6.googleusercontent.com/-ocmKX5OIaG4/VLNiHsPPRjI/AAAAAAAAGzE/9sC7XgKMAjs/w774-h581-no/verul%2Btrip%2B1%2B352.jpg
तुंम्ही त्यात आत आत हरवत जाणार आहात...
https://lh5.googleusercontent.com/-Kd5WkDgCH6o/VLOGicggcBI/AAAAAAAAG0s/q-Mo-YHPiL0/s640/verul%2520trip%25201%2520061.jpg
इथून अज्जिबात निघून जायची इच्छा होणार नाहिये...

https://lh6.googleusercontent.com/-oRC3CrrLhQI/VLOO8kts3XI/AAAAAAAAG10/yPBXgtGUnw0/s640/verul%2520trip%25201%2520210.jpg
मन..रोमांचित होत जाणार आहे..
https://lh4.googleusercontent.com/L5a6nubv9oRGENJGeyTek_G1h2azbpSBMUmfx3nZFJ0=w774-h581-no
उरलेल्या जगाचा विसर पडणार आहे...
https://lh6.googleusercontent.com/rlx4ubIeh-HO1vYk6lDS53zG8fqVcw0v9BhHLxHMvLg=w774-h581-no

यू....आर...गोइंग...डी...............प डी............प स्लीप.......
https://lh6.googleusercontent.com/-eNSfu3R4rac/VLOPvh2wpuI/AAAAAAAAG14/9jbJyEhiTns/s640/verul%2520trip%25201%2520208.jpg
====================
क्रमशः..............

संस्कृतीविचारआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

वावावा !छानच लिहिता आहात फोटोही आवडले.

प्रमोद देर्देकर's picture

12 Jan 2015 - 3:50 pm | प्रमोद देर्देकर

खुप छान पण वृत्तांत अजुन पाहिजे. त्यामुळे पुढच्या भा. प्र.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jan 2015 - 4:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वल्ली जेव्हापासुन वेरुळला यायला लागला तेव्हापासून मी वेरुळचं 'व' सुद्धा काढणं सोडलं आहे.
आपल्यासाठी काही शिल्लकच राहीलं नाही. वल्लीसमोर मलाही परिक्षा द्यायला आवडेल.
ही मुर्ती कोणाची, ओळखायचं कसं, वल्लीकडून एकदा हे सर्व शिकुन घ्यायचं आहे.
आपण काढलेले फोटो सुरेख आलेत.

पुभाप्र.

-दिलीप बिरुटे

फोटो आवडले व त्यांची केलेली विभागणी सुद्धा.

पु.भा.प्र.

बॅटमॅन's picture

12 Jan 2015 - 5:54 pm | बॅटमॅन

आवडले!!!!

स्पंदना's picture

12 Jan 2015 - 6:01 pm | स्पंदना

मला पहायच होतं ना वेरुळ आणि कैलास वल्ली बरोबर.

तुम्ही याल तेव्हा सांगा फक्त!! लहान पोरं केक शॉप किंवा आईस्क्रीम पार्लरचं नाव काढलं की हुरळून जातात त्यातला प्रकार होतो वल्लीचा वेरुळ म्हटलं की !!

चौकटराजा's picture

12 Jan 2015 - 6:15 pm | चौकटराजा

वृतांत मस्त पण दगड पाहून कंटाळलेल्या सगो यांच्या भव्य व दिव्य जांभईचा फोटो न टाकल्याबद्द्ल णिषेध.
अगोबांच्या दिंडीसाठी " किती लिटर " गुलाल बुक्का " लागला ? बुवा, फटू मस्त आलेत. तो स्तंभाचा एक भाग पूर्णपणे काळा येतो.त्यात लेव्हल सुधारून सावलीतले तपशील दिसणे शक्य आहे. पण पोस्ट प्रोसेसिंग करावे लागते किंवा एच डी आर हा पर्याय वापरावा लागतो. बाकी सोनेरी कैलास फार मस्त आलेय. देउळ पश्र्चिमाभिमुख असल्याने सांच्या पाच चा सुमार असणार ! बादवे परगो लाईक्स रथ असताना घृष्णेश्च्वर ला गेलेले दिसत नाही भटजीबुवा !

उत्तम आणि खुसखुशित सुरुवात.
ह्यावेळी वेळेचा भरपूर सदुपयोग करुन (मधल्या खादाडीत कमी वेळ घालवल्यामुळे) बर्‍यापैकी वेरुळ बघता आले.
बुवा आणि प्रगोसारखी रसिक माणसे असल्याने लेणी फिरुन बघताना खूपच मजा आली. किसनदेव कैलासपावेतो आमचेसोबत होते पण नंतरच्या रामेश्वर, धुमार, महानवाडा, आणि जैन लेणी बघताना आमचेसोबत न येता धन्यासोबत सुखदु:खाच्या गप्पागोष्टी करत रामेश्वराच्या प्रांगणात बसून राहिले. जैन लेणीतील रंगीत शिल्पे त्यांनी लै मिसली.

धन्याबद्दल काय सांगावं. केवळ मित्रांसाठी तोही वेरूळच्या सतत वार्‍या करत असतो. बिरुटे सरांना पण मात्र हापिसात तातडीचं काम निघाल्यामुळे ह्यावेळी वेरूळला येणं जमलं नाही. त्यांच्याबरोबरच्या गप्पा म्हणजे आइसिंग ऑन द केक.

जाम धमाल आली.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jan 2015 - 7:26 pm | अत्रुप्त आत्मा

चौ.रा.
@सगो यांच्या भव्य व दिव्य जांभईचा फोटो न टाकल्याबद्द्ल णिषेध.>> हा घ्या ..झोपाळूमहाराज धनाजीराव जांभैकर्,मु.पो.पेंगणे.तालुका लोळापूर..जिल्हा :- आळशे ..यांचा (गाडित हळूच मारलेला)फोटू! =))
https://lh5.googleusercontent.com/-ZSvxr6yRb94/VLMFCG0YdlI/AAAAAAAAGuk/4XfpzqLbj1I/w326-h580-no/IMG_20150110_073912959.jpg

पण यावेळी धनाजी यांनी "लेण्यांमध्ये लोकं कशाला (परत परत.. =)) ) येतात?" या विषयावर चक्क साधना केली.
त्यांचे (त्यांच्या साधने'सह =)) ) काहि साधक क्षण!
https://lh3.googleusercontent.com/-j_ll4fwNCCY/VLNdwgrIpKI/AAAAAAAAGwg/ifMNyos1I8o/w774-h581-no/verul%2Btrip%2B1%2B089.jpg
https://lh6.googleusercontent.com/-mK6uD90BxKBw1VmbP9YAI4hdiemJ9uPvB83kLliP_M=w774-h581-no

@अगोबांच्या दिंडीसाठी " किती लिटर " गुलाल बुक्का " लागला ? > पाच किलोमिटर! =))

@बुवा, फटू मस्त आलेत. तो स्तंभाचा एक भाग पूर्णपणे काळा येतो.त्यात लेव्हल सुधारून सावलीतले तपशील दिसणे शक्य आहे. पण पोस्ट प्रोसेसिंग करावे लागते किंवा एच डी आर हा पर्याय वापरावा लागतो.>> ते सर्व तंत्रज्ञ मंडळींचे कसब. मी गाढव आपला गोलवा चुकू नये,आणि पापुद्रे सुटावे..या बेताने रोजच्या पोळ्या लाटाव्या ... तसा फोटू काढणारा..त्यामुळे आमच्या फोटूतून स्थलदर्शन घडले की काम झाले.

@बाकी सोनेरी कैलास फार मस्त आलेय. देउळ पश्र्चिमाभिमुख असल्याने सांच्या पाच चा सुमार असणार ! >> येस..तिच वेळ होती.

@बादवे परगो लाईक्स रथ असताना घृष्णेश्च्वर ला गेलेले दिसत नाही भटजीबुवा!>> गेलो होतो..पण तिथे फोटोंना मनाई आहे. आणि लेण्यांमधले (मूर्तीशिल्पांसह) फोटू-मारण्याचे दवणीय प्रकार पाहू जाता,तीकडे तिचा कळस झाल्यामुळे..सरकारी फर्मान आणून ती(मनाई) केली असेल..अशी मला खात्री आहे.

===========
इथे आलेल्या काहि विदेशी बौद्ध भिख्खूंचा मात्र,अगदी नीट निवांत दर्शन/अभ्यास कार्यक्रम चालू होता.
https://lh3.googleusercontent.com/-jaJYxSivGLo/VLNfXDuKJpI/AAAAAAAAGxU/MLduheh-bDY/w774-h581-no/verul%2Btrip%2B1%2B197.jpg
https://lh4.googleusercontent.com/-tYrDiN2MgEQ/VLNdwMYHfMI/AAAAAAAAGwY/exrHbU7d1m4/w774-h581-no/verul%2Btrip%2B1%2B095.jpg
==========================
आणि हे आपले परोपकारी संत किसन देव!
https://lh4.googleusercontent.com/-xE5DR6s8mVY/VLNdXnR1XVI/AAAAAAAAGwA/Az_WK6MCFpk/w774-h581-no/verul%2Btrip%2B1%2B083.jpg

आणि हे पर*-उपकारी सँट प्र.गो. ;)
https://lh5.googleusercontent.com/-uUr5P2B3StA/VLNe0q6OpAI/AAAAAAAAGww/ZD4UEJQFEo0/w774-h581-no/verul%2Btrip%2B1%2B139.jpg
( *संदर्भः-परतीच्या वाटेवरिल..चंदननगर पुढे असताना घडलेली चर्चा! :D )

आणि ह्यो किसन देवांनी आमचा गुपचूप.कॉम मधे मारलेला एक!
https://lh5.googleusercontent.com/-5IgJGBoIh_A/VLNe1NUYPUI/AAAAAAAAGw0/DDRqICFO6gs/w774-h581-no/verul%2Btrip%2B1%2B140.jpg

आणि हा (चुकून आलेला असला तरी! ;) ) सर्वात महान फोटू! काय योगायोग पहा ना! डाव्या बाजूस छोटा हत्ती उजव्या बाजूस मोठा हत्ती मध्ये लक्ष्मीच्या-नारायणाचे अवतार असलेले किसन देव
आणि मागे शिल्प कोणतं? .. तर ते गजांत लक्ष्मीचं! =))
https://lh6.googleusercontent.com/-HH6jJIJvRBY/VLNbQ2fudNI/AAAAAAAAGu4/_vczKHgGWsc/w774-h581-no/verul%2Btrip%2B1%2B019.jpg

धन्याचा दुसरा आणी तिसरा फटू बघून लै हसलो. :))
बाकी, लुलुलुलू च्या स्मायलि ला ऐति हासिक आधार काय हो?? :प

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jan 2015 - 8:00 pm | अत्रुप्त आत्मा

@लुलुलुलू च्या स्मायलि ला ऐति हासिक आधार काय हो??>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-hysterically-smiley-emoticon.gif

हा घ्या!
ही डिक्टो :-/ स्मायली! =))
https://lh6.googleusercontent.com/-ULPDePd-ZxQ/VLPYy3kbgGI/AAAAAAAAG28/WAnSTtmK9yY/s512/lllllluuu%2520verul%2520smile.jpg
=====================
http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt016.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt002.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt016.gif

चौकटराजा's picture

12 Jan 2015 - 8:39 pm | चौकटराजा

त्याकाळी ( कुठल्या कुणास ठाव नाही काय रे सगा ?) सुद्धा अगोबा व बुवा अशा नामी जोड्या होत्या. अता निरर्थक कोट्या व
दुर्लक्ष पॉलिसी यांचे दगडातील गोत्र सापडते का ते पहा !

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jan 2015 - 8:57 pm | अत्रुप्त आत्मा

@त्याकाळी सुद्धा अगोबा व बुवा अशा नामी जोड्या होत्या.>> =)) आणि येक चाबरट हिरवट्ट म्हा-ताराही होता! =))

टवाळ कार्टा's picture

12 Jan 2015 - 7:45 pm | टवाळ कार्टा

पहिला आणि शेवटचा फटू...लई म्हणजे लईच भारी ;)

दिपक.कुवेत's picture

12 Jan 2015 - 6:48 pm | दिपक.कुवेत

वर्णन आणि फोटो

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jan 2015 - 7:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

बुवा इस्टाइलचं वर्णन आणि प्रचि आवडली ! पुभाप्र.

टीप : वल्लींच्या बरोबर एकदा वेरूळदर्शन केले असल्याने भावना पुरेपूर पोहोचल्या आहेत. :)

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jan 2015 - 8:35 pm | अत्रुप्त आत्मा

और....इस सब के दरमीयान....

लेण्या पाहाणे सुरुच होते. तसे आंम्ही चौघे जण (मी.किसन.वल्ली.प्र.गो.) वल्लीच्या मार्गदर्शनाखाली वन बाय वन सर्व पहात होतो. पण शाळेच्या आलेल्या ट्रिप, मुलांच्या रांगा अगर घोळके घेऊन, आमच्या मधून नॉनस्टॉप कुठूनंही कुठेही प्रचंड चिवचिवाट व गोंधळ करत वळवळत जाणार्‍या आळी सारख्या जात होत्या..याचा त्रास वाटला तरी राग येत नव्हता. पण सगळ्यात महान प्रकार होता तो..पर्यटकांचा! यांना नक्की कळत नाही,का सगळे निरक्षर अडाणी आहेत अशी अनेकदा शंका येत होती.
https://lh6.googleusercontent.com/-b81qeyrVULo/VLPBxsIrRfI/AAAAAAAAG2k/77vMM2__4jU/w326-h580-no/IMG_20141224_175906917.jpg
या पाट्या/बोर्ड यांच्यावर काहिच परिणाम करत नाहित ,हे म्हणण्यासाठी मी हा फोटो दिलेला नाही..उलट इतक्या लख्खपणे हे लिहिण्याची वेळ आली यातच या वागणूकिचा पुरावा आलेला आहे.. हे निदर्शनास आणून द्यायचं आहे.

ही महान लोकं.. त्यांना अवडेल त्या मूर्ती/शिल्पाबरोबर भराभर जागा बदलत फोटू मारण्यात व्यस्त होती. (आणि हे सर्व हौस या प्रकरणाच्या पुढलं प्रकरण आहे.. म्हणून सांगत आहे.) आणि त्यात पुरुष आणि लहान मुलांपेक्षा सर्वाधिक वाटा (वय १५ ते ४०) मुलि/महिलांचा होता. अर्थात या गोष्टींचं सोयर/सुतक बरोबर आलेल्या पुरुषमंडळींनाही नव्हतच! ते ही त्यांना पोझ घ्यायला मार्ग'दर्शन करत होते. एखाद्या बागेत आपण वावरत आहोत..असा या मंडळींचा उत्साह होता.

१)आपण एखाद्या शिल्पासमोर १० /१० मिनिटे फोटोसेशन करत आहोत..इतर आलेली लोकं यामुळे चिडत्/खोळंबत आहेत. याचा त्यांना जाणिव पूर्वक विसर पडलेला होता. अगदी या फोटोत कानातलं-यायचं राहिलं
, म्हणून पुन्हा-ते समोर आणवून-तो फोटो..असे प्रकार सुरु होते.

२) आपल्या आवडत्या हिरोसह फोटू काढायचा दुर्मिळ योगायोग जमून आल्याप्रमाणे त्या कधी शंकर,वरुण, तिर्थंकर्,बुद्ध यांच्या सह आणि विशेष म्हणजे त्यांच्या अंगाखाद्यावर रेलून्/बसून्/लोळून/ कमरेत हात टाकल्याप्रमाणे बिलगून ..असं हे फोटो सेशन चाल्लेलं होतं...

नको..नको... असं मन मलाच म्हणतय..पण तरिही पुरावा म्हणून नाही..तर त्यातली मला आलेली चीड आपल्याला लक्षात यावी, म्हणून हा (एकच) फोटो देत आहे.
https://lh5.googleusercontent.com/-Zvbp1rOnqWU/VLPDpsgDyFI/AAAAAAAAG2w/XmS-7w29cEg/w326-h580-no/IMG_20150110_171503547%7E2.jpg

मूर्त्या हतात हतोडे घेऊन तोडाव्या लागत नाहीत्,त्यांचे आत्मे अश्या असभ्य वर्तनानेही भग्न होत असतात..

अशी पाटी तिथे आंदोलन करून जागोजाग लावावी काय? असा रास्त विचार माझ्या मनात कालपासून येत आहे.. लोकहो...,हा फक्त किंवा केवळ श्रद्धेचा मामला नाही. सांस्कृतीक मूल्य उध्वस्त होणं..त्यांची पातळी खालावणं. हे ही प्रकार यातून समाजात झिरपत जातात. म्हणून ही चिडचिड आहे. हा प्रकार आंम्हाला दोन्ही दिवस सर्वत्र पहायला मिळत होता(अजून...काहि प्रकारांचा तर उल्लेखही करवत नाहिये.)

३) सदर चाल्लेल्या गोष्टी या अत्यंत योग्य आणि रास्त आहेत. अशी देहबोली आणि नजर त्यांनी कमावलेली होती...मुर्त्यांबरोबर सेल्फी काढून गपागप फे.बु.शेअर करणे ही लेण्यात येण्याची त्यांची इतिकर्तव्यता!

४) लेण्यांमधे असलेले सर्कारी रक्षक फक्त मोडतोड होइल अश्या संरक्षित विभागात कोणी जात नाही ना?,, एव्हढ्याच ड्युटीला तत्पर होते. बाकि चाल्लेल्या प्रकारांबाबत ते निर्विकार (झालेले..) होते. त्यांच्या नजरेतून हे इथले रोजचे प्रकार असावेत.असं सहज जाणवत होतं.
------------------------------------------------------------

हे सर्व इथेच काय.. अश्या कोणत्याही ठिकाणी घडण निंदनीय आहे.. ते लोकांसमोर यावं अश्या हेतूनी..सदर घटनांची नोंद म्हणून हे इथे दिले आहे. बाकि कोणताही उद्देश नाही.

एस's picture

12 Jan 2015 - 10:24 pm | एस

मिपावरील तीसहजारी धागा! :-)

एक वर्ष अजिंठा-वेरूळ ला मुक्काम ठोकून चित्रे+छायाचित्रे काढावी म्हणतो! :-)

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jan 2015 - 10:39 pm | अत्रुप्त आत्मा

@तीसहजारी धागा! >>> अरे....! खरच की!

धन्यवाद. :)

फोटो आणि वर्णन नेहमीप्रमाणे जबरी झाले आहे.

शिवाय माझा वल्लीच्या माहितीसह व्हिडिओ शुटिंग करण्याचा मानसंही भरपूर चांगला पूर्ण झाला.

ह्यां खय दिसलां नाय ! टाका बगू !!

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jan 2015 - 12:40 pm | अत्रुप्त आत्मा

@ह्यां खय दिसलां नाय ! टाका बगू !!>>> पुढिल भाग त्यावरच आधारित असणार आहेत. :)

मुक्त विहारि's picture

13 Jan 2015 - 3:34 am | मुक्त विहारि

मस्त व्रुत्तांत.....

अजया's picture

13 Jan 2015 - 9:38 am | अजया

मस्त वृत्तांत!
बुध्दाच्या मांडीवर बसुन फोटो काढण्याच्या पलीकडचा एक उपद्व्याप मी वेरुळलाच पाहिला आहे.तो म्हणजे लहान मुलाला विधी करण्यासाठी थेट मूर्तीच्या पुढ्यातच बसवलं होतं.यावर त्याना काही सांगायला जावं तर लहान मूल हाय ते काय कळतंय त्याला.लागली हितेच,त्याला काय करणार असे णम्र उत्तर मिळाले होते.ते स्वच्छही न करता मंडळी सावकाश निघून गेली!अजिंठ्याइतके रक्षक वेरुळला नाहीत बहुतेक.जे आहेत ते कोणाशी फारसे नादी लागणारे दिसले नाहीत.ठेविले अनंते थाटात तेही इकडेतिकडे करतात जरासं.असो!