आयआयटीत मराठी ऐट!

एडिसन's picture
एडिसन in जनातलं, मनातलं
9 Aug 2008 - 7:22 pm

कालच आयआयटी मुंबईचा ४६वा पदवीदान समारंभ पार पडला. आपल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या मुख्य अतिथी होत्या. या समारंभात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे आयआयटीतील मराठी विद्यार्थ्यांचे वाढते प्रमाण! आजच्या मटामध्ये आलेली ही बातमी पण हेच सांगून जाते.
विशेष म्हणजे २००८-०९ या शैक्षणिक वर्षात बी.टेक्.,एम्.टेक्.,ड्युअल डिग्री आणि पी.एच्.डी. या सर्व अभ्यासक्रमांना विविध विद्याशाखांमध्ये प्रवेश घेणार्‍या मराठी विद्यार्थ्यांची एकूण संख्या २२५ च्या घरात जाते. मराठी पाऊल असेच जग पादाक्रांत करो हीच सदिच्छा!

समाजशिक्षणबातमीमाध्यमवेध

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

10 Aug 2008 - 1:43 am | भडकमकर मास्तर

आणि एडिसनसाहेब,
आपणसुद्धा आय आय टी मध्ये कार्यरत राहून मराठी माणसाची कॉलर ताठ ठेवत आहातच की... :)
....
या निमित्ताने आपले सुद्धा अभिनंदन... :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Aug 2008 - 1:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आपणसुद्धा आय आय टी मध्ये कार्यरत राहून मराठी माणसाची कॉलर ताठ ठेवत आहातच की...
मान्यच!

पण तरीही असं वाटतं की संशोधनासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमधे तरी अशी भाषावार विभागणी होऊ नये. हुशार माणसांना संधी मिळावी आणि त्यांनी त्याचं चीज करावं, आणि आम्ही सामान्यांनी त्यांचं मुक्तकंठाने कौतुक करावं; भले त्यांची भाषा (जात, धर्म, पंथ) कोणतीही असेल. आय आय टी ही संस्था भारताच्या भल्यासाठी निर्माण झाली आहे आणि तिथे 'भारतीय' कार्यरत आहेत. अमुक एक माणूस मराठी, तो बंगाली ही वृत्ती मला तरी पटत नाही.

मराठी माणसासाठी कौतुकाचे दोन शब्द अधिक बोलायला हरकत नाही, पण त्यातून कधी फॅनॅटिक्स, फासिस्ट जन्माला येतील सांगता येत नाही.

श्रीयुत संतोष जोशी's picture

10 Aug 2008 - 8:36 am | श्रीयुत संतोष जोशी

नमस्कार,

आय आय टी (मुंबई ) मधे माझ्या ओळखीचे ४ जण मराठी आहेत.
श्री.जोगळेकर ; श्री. शरद जोग ; श्री . वरदराज बापट आणि श्री . अभिजीत फडणीस ( हे येत्या काही दिवसातच आय आय टी मधे कार्यरत होतील . त्यांची पी एच डी पूर्ण होत आली आहे.)

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

विसोबा खेचर's picture

11 Aug 2008 - 7:54 am | विसोबा खेचर

या समारंभात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे आयआयटीतील मराठी विद्यार्थ्यांचे वाढते प्रमाण!

एक मराठी या नात्याने हे वाचून आनंद वाटला...! :)

आपला,
(मराठी) तात्या.

सर्किट's picture

11 Aug 2008 - 9:06 am | सर्किट (not verified)

चालू द्या !

मजा वाटली!

- सर्किट