आमची प्रेरणा:
१) (रेडा म्हणे वडाला)
२) सेकंड होम...
३) नरेंद्र मोदिंचे विकास मंत्र
गेला रेडा एकदाचा, मोठा भार होता,
चारा खाउन माजलेला तो लालु प्रसाद होता.
घोटाळ्यात अडकला कोळसा,महाग झाला गॅस.
झटपट काम करण्यासाठी विन्टेज कारची आस!
डोंगर उघडे पड्ले,शेती ओसाड झाली,
वाढता वाढता वाढे,लोकसंख्या अफाट झाली.
अच्छे दिन आले,नरेंद्र मोदिंनी दिले मंत्र
स्किल, स्केल आणि स्पीड सोपे केले तंत्र.
कमी करावा जन्मदर, हाच एक राजमार्ग.
ऐकुन पहा माझे, भारतात ऊतरेल स्वर्ग!