विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग २

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
20 Mar 2014 - 12:34 pm

भाग २ ...

...पुर्वीच्या लोकांना टिवल्याबावल्या करत बसायला वेळ पण होता. बिनविजेच्या मिणमिणत्या अंधाऱ्या रात्रीत, जंगलातील श्वापदांच्या भयंकर संगतीत, पाण्यासाठी वणवण भटकत फिरणाऱ्या, आक्रमणांच्या लढायांना तोंड देत देत जीवन रहाटणी करणाऱ्या जुन्या काळी, त्या लोकांना त्यांच्या दुःखी जीवनाची रहाटणी ध्यानाला प्रेरक असावी. आता फारसा कोणी या वाटेला जायला धजणार नाही व बुद्ध बनायला जाता जाता बुद्धु बनायला तयार होणार नाही. ...

...सध्याच्या या धावत्या जगात कोणाला आहे इतका वेळ द्यायला व कोणाला हवी आहे मानसिक, अध्यात्मिक प्रगती? आहे ते ठीक आहे. खावे, प्यावे, मजा करावी....

...सुंदर सुंदर कपड्यातील ललना आपण फक्त द्रष्टाभावाने पहायच्या, नाही आवडले दृष्य तर रिमोटच्या क्लिकवर त्यांना ढकलून, नव्या दृष्याला तितक्याच निरिच्छपणे पाहायचा सराव आता झाला आहे. इतके मेले, इतके जखमी आता आपल्याला मनात फार वेळ विषादाच्या संवेदना निर्माण करत नाहीत, ना सुंदरींच्या अश्लील चाळ्यांमुळे अगदी तरुण पहाणाऱ्यांच्या भावना तडकत नाहीत. ...

1
अकराच्या ठोक्याला जेवणासाठी जायची सुचना झाली व पुन्हा आमची पावले जेवणघराकडे लागली. दोन पोळ्या, हवा तितका भात, पातळ आमटी वजा डाल व भाजीचे तोंडी लावणे, दही वाटी वा कोशिंबिर असा साधा पण भरपेट खाना होता. प्रत्येकाने रांगेने सुबकपणे ठेवलेली फळे व पदार्थ वाढून घेऊन जेवणानंतर भांडी विमसोपने धुवुन पुन्हा आपापल्या जागी ठेवल्यावर फिल्टरचे पाणी पिण्यापाशी गर्दी होई.

2

नंतरचा वेळ रात्रीची उरलेली झोप भरून काढण्यात जाई, पुन्हा एक ते तीन ध्यान साधनेत जाई. नंतर सायंकाळी 5ला घंटा झाली की सांगलीफेम चुरमुऱ्याच्या भडंगाच्या फक्क्या रोज मारत, चहा व एक फळ असा रात्रीच्या जेवणाचा भरगच्च मेनू असे. सायंकाळी पाचपर्यंतच्या वेळेत उपधर्माचार्य आळीपाळीने साधकांना बोलावून विचारपुस करत, तेंव्हा तोंड उघडायची संधी मिळे. ‘गोएन्काजी जे हिन्दीतून सांगतात ते समजते का? या विचारणेला, ‘हो समजते, पण काही वेळी कठीण जाते’. प्रगती ठीक वाटतेय का? याला ‘जमतय तितके करतोय’ असा उत्तराचा सारांश असे.
या धम्मालयाचे आकर्षण होते, सोनेरी कळसाचा पॅगोडा! पॅगोडा म्हणजे काय? त्याच्या आत काय असते? तेथे जायला आम्हाला परवानगी मिळणार का? असा सुरवातीला पडलेला पेच नंतर सुटला, कारण प्रत्येकाने तेथे जाऊन ध्यान करायला सांगितले गेले. पॅगोडा म्हणजे ध्यानाच्या साधारण 4`बाय 6` अशा छोट्या खोल्या असलेली दु किंवा तिमजली गोलाकार वास्तू ! मध्यात मुख्याचार्य बसून त्यांच्या भोवती आठ प्रमुख साधकांच्या शिष्यांनी व त्या खालील स्तरावरील त्यानंतरच्या गोलाकारातखोल्यात अन्य सदस्यांनी ध्यानाला बसावे अशी त्याची रचना आहे. साधनेच्या वर्गवारीतील उच्च पातळीवरील साधकांच्या शरीरातून शक्तीलहरी अन्य साधकांच्या ध्यानाला, पाण्याच्या कारंज्याप्रमाणे वर्षाव करत पुरक व्हाव्यात असे त्या मागील कारण असावे असा वाटले. ध्यान करताना त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. जे आधीच्या दोन दिवसात साधताना कष्ट पडले, ते तेथील अंधारात काही मिनिटात साधले!
बाहेर ढगाळ वातावरण, पॅगोडाच्या मागे डोंगरांच्या उतरणीवर हिरव्या गर्द झाडांच्यामधे लालचुटुक गुलमोहोर अन शंकासुराच्या फुलांचा डंवर रंगसंगती साधून होता. मोरांचे थवेच्या थवे आपले अस्तित्व कर्कश्य ओरडून तर विविध पक्षी आपल्या मंजुळ आवाजाने करू देत असत. मधेच पावसाच्या सरींनी आम्हाला छत्र्या उघडायला लावले. एकदा आकाशात दुहेरी इंद्रधनुष्याची नयनरम्य शोभा पहायला मिळाली. आम्हाला आनंदाच्या लहरीं निर्माण करायला निसर्गचिताऱ्याची लहर काही काळ दोन इंद्रधनुष्यातून सरसावली. ध्यानात समता भाव हवा असे ठासून सांगितले जात होते. निसर्गाने केलेली सप्त रंगाची उधळण समताभावाला मागे सारून आमच्या शरीरावर रोमांच निर्माण करणारी असेल, तर भगवान बुद्धांनी अशा मनोहरी दृष्यांचा आस्वाद द्रष्टाभावाने कसा घेतला असेल असा विचार विजेप्रमाणे चमकून गेला. असो.
मनांत येत असे कि सध्याच्या या धावत्या जगात कोणाला आहे इतका वेळ द्यायला व कोणाला हवी आहे मानसिक, अध्यात्मिक प्रगती? आहे ते ठीक आहे. खावे, प्यावे, मजा करावी. भोक्ताभाव आता राहिलाय तरी कुठे? आपण सर्व टीव्ही, सिनेमा, वर्तमानपत्र द्रष्टाभावाने तर पहातो. पडद्यावरची पात्रे मजा करताना, मारधाड करताना दृश्यात दिसतात, अगदी लहान पोरांना देखील माहिती असते कि पडद्यावर दिसते तसे नसते. सिनेमातील लोक मरत नाहीत कारण तेच पुन्हा दुसऱ्या सिनेमात हाणामारीला पुन्हा नव्या जोमाने, नव्या क्लुप्त्या करत निर्ढावलेले दिसतात. सुंदर सुंदर कपड्यातील ललना आपण फक्त द्रष्टाभावाने पहायच्या, नाही आवडले दृष्य तर रिमोटच्याक्लिकवर त्यांना ढकलून, नव्या दृष्याला तितक्याच निरिच्छपणे पाहायचा सराव आता झाला आहे. इतके मेले, इतके जखमी आता आपल्याला मनात फार वेळ विषादाच्या संवेदना निर्माण करत नाहीत, ना सुंदरींच्या अश्लील चाळ्यांमुळे अगदी तरुण पहाणाऱ्यांच्या भावना तडकत नाहीत. जाऊ दे.
आपल्याला काय करायचे ते करावे ना.
पुर्वीच्या लोकांना टिवल्याबावल्या करत बसायला वेळ पण होता. बिनविजेच्या मिणमिणत्या अंधाऱ्या रात्रीत, जंगलातील श्वापदांच्या भयंकर संगतीत, पाण्यासाठी वणवण भटकत फिरणाऱ्या, आक्रमणांच्या लढायांना तोंड देत देत जीवन रहाटणी करणाऱ्या जुन्याकाळी, त्या लोकांना त्यांच्या दुःखी जीवनाची रहाटणी ध्यानाला प्रेरक असावी. आता फारसा कोणी या वाटेला जायला धजणार नाही व बुद्ध बनायला जाता जाताबुद्धु बनायला तयार होणार नाही.
रात्री गोएन्काजींचे त्या त्यादिवशीच्या ध्यानातील बारकाव्यांवरील रसाळ प्रवचन नवनवीन विचारांना सामोरे जायला भाग पाडत असे. एकदा विपश्यना ध्यानाचा भारतात व विदेशात प्रसार कुठे कुठे व कसा चालू आहे. याचा आढावा सांगणारी टेप वाजवली गेली. अन माझ्या नेहमीच्या विचारांना चांगलाच तडाखा बसला. दर वर्षी सध्या कमीत कमी एक लाख लोक विपश्यना ध्यानाच्या शिबिरात येऊन ध्यान व साधना पद्धती समजून घेतात. असे त्यात म्हटले गेले होते. ही साधना सुरवातील घरगुती प्रमाणात सुरू होऊन हळू हळू विस्तृत प्रमाणात वाढत वाढत, गेल्या 40 वर्षात पुज्य गोएन्काजींच्या शिबिरातून चालत आली आहे. असे ही त्यातून कळले.
अगदी 80:20 चे सरसकट माप लावले तर दरवर्षी शिबिरात साधना केलेल्यांपैकी ऐंशी हजारांनी नंतर साधना करायचा कंटाळा केला, फार लक्ष नाही दिले तरी वीस हजार लोक ते करायचा नेटाने प्रयत्न करत असतील असे मानले, त्यापैकी 20 टक्के म्हणजे 4000 जण पुन्हा पुन्हा शिबिरातून साधनेचा पाठपुरावा करणारे निघतील. पैकी वीस टक्के म्हणजे 800 लोक विशेष प्रगतीपथावर असतील. त्यापैकी वीसटक्के म्हणजे 160 जण बुद्धत्वाला प्राप्त करायचेच अशी तीव्र जाणीव साधतील. व त्यातील बत्तीस जणांसाठी निर्वाण प्राप्त होण्याची गती जवळ आली असेल. ज्यांना ती प्राप्ती होते ते दवंडी पिटत नाहीत असे मानले तर मौन राहून आत्ता इथे, पृथ्वीतलावर असे अनेक जीव-साधक सध्या जगभर विखुरलेले आहेत.
प्राचीन काळात जे इतक्या मोठ्याप्रमाणात साधले गेले नसेल ते या शिबिर केंद्रांतून साध्य होत असेल. आधुनिक तंत्रामुळे विपश्यना साधनेतील मार्गदर्शन खुद्द पुज्य गोएन्काजींच्या मुखातून होत असल्याने या ध्यानपद्धतीत काही फेरफार करून त्यात गढूळपणा येणे सध्यातरी अवघड आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही पद्धती अशीच्या अशी अविरत 2-5 शेवर्षे टिकली तर त्याचे फळ जागतिक स्तरावर मानवी जीवनात प्रत्यक्ष दिसायला लागेल. असो.
भाग २ समाप्त, पुढे चालू...
3
पुज्य आचार्य कै. सत्यनारायण व सौ. इलायची देवी गोएंका

राहणीविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

20 Mar 2014 - 12:41 pm | मुक्त विहारि

छान लिहीत आहात.

बॅटमॅन's picture

20 Mar 2014 - 12:44 pm | बॅटमॅन

त्यात परत सांगलीफेम भडंगाचा उल्लेख पाहून अजूनच गारगार वाटलं.

शशिकांत ओक's picture

21 Mar 2014 - 12:50 am | शशिकांत ओक

आपल्या प्रोत्साहनाबद्दल...

आत्मशून्य's picture

21 Mar 2014 - 1:06 am | आत्मशून्य

त्यांच्या प्रोत्साहनामुळे आपला लवकरच थोर व्यक्ती बनण्याचा हमखास योग आहे ज्यामुळे मिपा त्यांना अजुन आवडेल, व तुम्हीसुधा. पटत नाही ? मग हे वाचा

இது விரைவில் நீங்கள் misalpav.com நீங்கள் மிகவும் போன்ற அவரை செய்கிறது என்று பெருந்தன்மையும் போன்ற ஒரு நிலை achive என்று தோன்றுகிறது.

पिंगू's picture

20 Mar 2014 - 12:53 pm | पिंगू

कोल्हापूरच्या विपश्यना केंद्रात दहा दिवसांचा कोर्स केला होता. आता पुन्हा एकदा जायचे आहे.

शशिकांत ओक's picture

21 Mar 2014 - 12:51 am | शशिकांत ओक

आपल्या अनुभवांची भर घालावी ही विनंती...

भंडारदरा रतनगड ट्रेकिंगला जाताना
त्या पैगोडाच्या (इगतपुरी)खाली काय आहे याची मलाही उत्सुकता होती .तिकडे साधना करतात असे ऐकले होते .पण आम्ही पा०घ०पा० असल्यामुळे दुर्लक्ष केले .
लेखातून उलगडा झाला .८०:२०चे गणित समजले .ललनांचे अश्लील चाळे पाहून(अर्थात टीव्हीच्या काचेवर)तरुणांच्याही भावना तडकत नाहीत ची नोंद घेतली .पाचवाजता भडंग चहाने मात्र मला आता घड्याळात पाच वाजल्याचे दिसू लागले .मोर ओरडत असतील तर साधना सोडून मोर पाहाणे पसंत करेन .

चार महिन्यांपूर्वी राणकपूरात (जैन मंदिर राजस्थान)राहिलो त्यावेळी मात्र साधनेशिवायच वातावरणाचा परिणाम जाणवला .तिथली वानरसेनाही शिस्तबध्द .खाण्याचे दिल्यास पिलूवाली प्रथम पुढे येऊन हातातून शांतपणे घेणार ,नंतर एकेकजण पुढे होणार .ते छानसे मंदिर ,कुंभालगडचे अभयारण्य आणि डोंगर .यावेसे वाटत नाही .
जिसस ,महावीर ,बुध्द ,पैगंबर कितीही उपदेश देओत पन्नास वर्षाँनी त्याला दोन दोन फाटे फुटतातच .प्रश्न कायम .
हिंदू धर्मात मुख्य पासष्ट तत्वज्ञानप्रणाली आहेत .

अहम् तसाच आहे .

नेहमीप्रमाणेच आपला नम्र वगैरे पुढील लेखाच्या प्रतिक्षेत .

प्रचेतस's picture

20 Mar 2014 - 6:30 pm | प्रचेतस

कंजूसरावांशी सहमत.

शशिकांत ओक's picture

20 Mar 2014 - 5:24 pm | शशिकांत ओक

मानसिकतेचा परिणाम!
म्हणतात, कंजूस कितीही श्रीमंत झाला तरी आणि उदार दारिद्र्यातही आपापल्या स्वभावाशी इमानदार राहतात.

कंजूस's picture

20 Mar 2014 - 6:22 pm | कंजूस

खरं आहे .
सुईच्या नेढ्यातून उंट जाऊ शकेल पण स्वर्गाच्या दारातून कंजूस जाऊ शकणार नाही .

साधारण40 पैकी 2-3 जणच फक्त विपश्यना व्यवस्थीत करतात असे तेथील लोक म्हणतात. या हिशोबाने गणित करावे.

शशिकांत ओक's picture

20 Mar 2014 - 7:37 pm | शशिकांत ओक

ह्या संख्या महत्वपूर्ण नाहीत. एक वाट आहे. काही काळ तिचे विस्मरण झाले होते. ते ब्रह्मदेशातील काही कुटुंबियांनी शर्थीने जपले होते. करता करता तो साधनापथ गोेएंकांनी प्रशस्त करून दिला.

शशिकांत ओक's picture

20 Mar 2014 - 7:18 pm | शशिकांत ओक

अहो स्वर्ग पाहिला कोणी?
मात्र हेमाच्या डोंगर सदृश पॅगोडाचे बाह्यदर्शन साजरे तेंव्हा होईल जेंव्हा अंतरंगाविषयीचे आवरण एक एक करून उघडून शरीराच्या माध्यमातून शोध घेण्याच्या प्रेरणा या पॅगोडाच्या अंतर दर्शनाने मिळतील. पण ज्यांना असे स्वभावतः वाटत नाही त्यांना हे सर्व पा. घड्यावर पा.
आपण तत्परतेने प्रतिसाद दिलात हेच मोठेपण!

अत्रुप्त आत्मा's picture

21 Mar 2014 - 2:35 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/school/abacus-smiley-emoticon.gif

शशिकांत ओक's picture

24 Mar 2014 - 7:47 am | शशिकांत ओक

पुंण्यात्माजी स्माईली सम्राट,
कशा मिळवायच्या अशा रुपकात्मक स्मिता.

कोणत्या जत्रेत मिळतात या स्मायल्या ?फुरसुंगीला का सिंगापूरला ?

अत्रुप्त आत्मा's picture

24 Mar 2014 - 6:25 pm | अत्रुप्त आत्मा

@कोणत्या जत्रेत मिळतात या स्मायल्या? >>> http://www.sherv.net/cm/emo/south-park/cartman-smiley-emoticon.png

@फुरसुंगीला का सिंगापूरला? >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley-face-laughing.gif आत्मरंगापुरला!

आतिवास's picture

23 Mar 2014 - 11:47 pm | आतिवास

एक अवांतर कुतूहलः तुम्ही हे सगळे फोटो विपश्यना काळात काढलेत का?

सुहास झेले's picture

24 Mar 2014 - 12:02 am | सुहास झेले

अगदी अगदी ... मला पण हेच विचारायचे होते..

शशिकांत ओक's picture

24 Mar 2014 - 7:41 am | शशिकांत ओक

हे फोटो प्रतिनिधिक स्वरूपाचे आहेत. फोटो लेना मना नाही. पण साधनेत काळात शक्य होत नाही.

आभारी आहे खुपच सुन्दर लिहीलय