लाल निळ्या रंगाचा इंगा

योगविवेक's picture
योगविवेक in जनातलं, मनातलं
11 Dec 2013 - 6:12 pm

लाल निळ्या रंगाचा इंगा 

तंजावूरच्या तमिल विश्वविद्यालयाचा भव्य प्रांगण. ओकसर व मी तेथील मॅन्युस्क्रिप्ट डिपार्टमेंटच्या हेडना  भेटायला आम्ही जूनच्या घामफोडू गरमीत डॉ. अदियमन यांच्या ऑफिसचा शोध घेत दुसऱ्या मजल्यावर पोहोचतो; चौकटीच्या बुशकोटातील व्यक्ती म्हणते झाले, 'येस व्हाट डू यू वांट?
' कम टू मीट यू सार.. '

ओके. टेल...

आम्ही काही लोक पुण्यातील इंडॉलॉजिकल विषयक अभ्यास करत आहे. काही हस्तलिखिते आम्ही मिळवली आहेत. त्याचे विश्लेषण करायला  आपल्या विश्वविद्यालयात सोय करता येईन का यावर चर्चा करायला आपण थोडा वेळ द्याल अशी आशा आहे.
कॉम्प्युटर वरील नजर न हालवता ते म्हणाले, 'लॉटाफ वर्का, नो टायिमा', कोलावेरी डी गाण्यातील ओळी आठवतील असा सूर धरून 'कोण कोण लोकांच्या पिडा' येतात. असा चेहरा करून ' हं बोला?' म्हणत कॉम्प बंद करून आमच्याकडे प्रथम नीटसे पहात म्हणाले. 'यू सेड मॅन्युस्क्रिप्ट?' 

ओक सरांनी मान हलवत म्हटले, ' आम्ही एक प्रॉजेक्ट हाती घेतला आहे. त्याचे प्रेझेंटेशन आम्हास दाखवता आले तर अनेक गोष्टी पटकन समजायला सोपे जाईल.

ओके 'पाहू या' ते म्हणाले. ओकसरांना मी विचारले,  त्यांच्या कॉम्पवर  कि आपला लॅपटॉप काढू ? का पेन ड्राईव्हवरून काढू या?'

'माझ्या कॉम्पवर नीट ऐकावयास येत नाही.  दुसऱ्या ठिकाणी पाहू' डॉ. अदीयमन उठत म्हणाले,  'व्हाटीज् टापिक?'  'नाड़ीग्रंथ पामलीफ  एस्ट्रॉरॉलजी!'

'ओह, नाडी या !'  चेहरा आंबट करत ते उठलेले परत बसते झाले! म्हणायला लागले. 'आय नो नाडी अँडाल, दे आर फेक. नथिंग बट मनी अर्निंग बिझीनेस यू सी'. डॉ अदीयनम आपल्या अनुभवाचे सार सांगायला सरसावाले. म्हणाले, 'मी एकदा मित्राने म्हटले म्हणून दोन घटकांचा वेळ दिला, तेंव्हा तात्काळ लक्षात आले की हे सगळे फेस रीडींगचे खेळ आहेत बाकी काही नाही. त्यात गोऱ्या कातडीचे काही भंपक लोक त्या नाडीमधे काही 'इसोटेरिक' असा समज करून घेऊन 'इंदियान पामलीफ सूदसेयर्स' म्हणुन त्यांच्या देशात जाऊन भाव मारतात. पण त्यात काही  दम नाही'. डॉ. अदीयमन यांनी एका दमात नाडीवरील मत व्यक्त केले.
आता ओक सर तो वार कसा झेलतात हे मला ऐकायला मिळणार म्हणून मी ही सरसावलो! ओक सरांनी संथ आवाजात सुरवात केली. 'अगदी  बरोबर. मी ही या नाडी विषयाच्या  प्रकरणाचा पडदा फाश करावा म्हणून सरसावलो होतो. आजकाल झटपट  पैसा कमवायची चटक लागलेल्या समाजात ही कीड उपटली गेली पाहिजे, असा माझा पवित्रा होता. शिवाय मी हवाईदलात असल्याने माझे अनेक तमिळभाषी सहकारी हाताशी होते. त्यांच्यामुळे व नंतर काही तमिळभाषा तज्ज्ञांच्या मदतीने मी ताडपत्रांतील लेखनाचा अभ्यासक म्हणून शोघ केला. नंतर जे काही सापडले ते मी आपल्यासमोर दाखवायला आणले आहे.'

नाडीभविष्याबद्दल आपले व्यक्तिगतमत विरोधकाचे असले व वैयक्तिकरित्या हा विषय बंद करू इच्छित असलात तरी या विश्वविद्यालयातील तमिळ भाषेतील हस्तलिखिताच्या मुख्य प्रशासकाच्या खुर्चित बसून नाडी हस्तलिखितांच्या मजकुराबाबत हा विषय बंद करणे योग्य ठरणार नाही.' ओक सरांचा सौम्य पण ठाम स्वर ऐकून ते पुढे काय म्हणतील अशी उत्सुकता लागली. तेवढ्यात डॉ. विवेकानंद  गोपालन यांनी अदीयमन यांच्या ऑफिसात प्रवेश केला. त्यांची थोडी तमिळमध्ये आव भगत झाल्यावर डॉ.विवेकानंदांना आपल्या बाजूने मत करायला ओढत ते म्हणाले, 'वी आर टाकिंग अबाऊट नाडी यू सी'.

डॉ. अदीयमन यांच्या सुरात सूर मिळवत डॉ.विवेकानंद म्हणाले,'नाडीतील ज्योतिडम फेक असेल असे माझेही मत आहे.  कदाचित म्हणून मी ते अनुभवले नसेल, पण नाडी ताडपत्र हस्तलिखितातील भाषेविषयी अभ्यास करू नये असे मी म्हणू शकत नाही. 'आय फील वी आर ओपन दॅट वे. व्हॉट डु यू से सर?'
त्यांच्या बोलण्यास सूर मिळवत डॉ. अदीयमन म्हणाले, ' येसस, शो योर प्रॉग्रेम'. ओकसर मला उद्देशून म्हणाले, 'विवेक आपण त्या ऐवजी  मेहतांची डॉक्युमेंटरी दाखवू या.' 
आमची तयारी झाली. डॉक्युमेंटरीतील ताडपट्टीवरील नावांच्या कूटतमिळ अक्षरांवरून लाल रंगाची जाडसर रेषा प्रत्येक अक्षरला उठावदार करत दिसू लागताच
"उदय, प्रमिला, मुकुटुलाल व शेवटी प्रीती" अशी स्पष्टपणे दिसू लागली. त्यानंतर ती नावे कोणास उद्देशून आहेत याचे स्पष्टीकरण दाऱवणाऱ्या निळ्या रंगाने आपली करामत दाखवायला सुरवात केली. उदय हेच या व्यक्तीचे नाव, आईचे प्रमिला तर वडिलांचे मुकट्टूलाल असा तमिळ उच्चार त्यांच्या वडिलांच्या नावाचा व पत्नीचे नाम प्रीती, प्रला दीर्घ वेलांटी असून उच्चार प्रि (ह्रस्व) असा नसून तो प्री(दीर्घ) अशी नावांची नाते संबंधदर्शक शब्दरचना पाहून डॉक्युमेंटरी संपताच आश्चर्याने त्यांच्या चेहर्‍यावरील भाव  बदललेले होते!
ओक सरांनी मग कार्यशाळा 2011 मधील  राजेंद्र पाठकांनी उदय मेहतांच्या  इंग्रजीतील मुलाखतीतील त्यांच्या स्वतःच्या व घरच्यांचे नामोल्लेखाचा   ताडपट्टीतील लेखनाला करून दिलेला दुजोरा व त्यांच्या उच्चशिक्षणातील पदव्या व भूषवलेली पदे वगैरे संभाषणाचा भाग ऐकून ओकसरांच्या बोलण्यात बरेच तथ्य असल्याचे कबूल केले! तोवर मी नाडी ग्रंथातील वहीतून मिळवल्या कथनांवर आधारित प्रोग्रॅमची जुळणी करून ताडपट्ट्यातील कथनांचे केलेले वर्गीकरण,  फोटो,  ऑडियो कॅसेटवरून एम पी3 फाईलवरील भाषांतराची सोय दाखवली. नमुन्यादाखल केलेले तमिळभाषेतील डीटीपी वर्क दाखवले.  अशा स्कॅन्सची संख्या काही काळात काही हजारावर जाईल  तेंव्हा या सर्वाला तमिळ स्क्रिप्ट मधून  सादर करायला आपल्याकडून मदत व्हावी आणि इंडॉलॉजिकल शोधकर्त्यांना हजारो नाडी कथनांचा डेटा उपलब्ध व्हावा असे वाटून डॉ. विजय भटकर या नामांकित शास्त्रज्ञ व भारतीय प्रथम सुपर कॉम्प्युटरचे जनक यांनी प्रयत्न करायला प्रोत्साहन व त्यांच्या मल्टिव्हर्सिटीतर्फे आम्ही आपल्याला संस्थागत सहकार्य करायचे निमंत्रण घेऊन आलो आहे. तेंव्हा तंजावूरच्या तमिळ विश्वविद्यालयातर्फे आपली सहमती हवी आहे.तसे लेखी 'मेमोरॅन्डम ऑफ अंडरस्टॅन्डीग' चे पत्रही मी तयार केले आहे.
'नको, नको इतकी घाई नको. 'डॉ. अदियमन यांची सावध प्रतिक्रिया ओकसरांना अपेक्षित असावी. ते म्हणाले, 'बर, सुरवात म्हणून 50 स्कॅनिंगचे तमिळ डीटीपी करून द्यावे. तोवर आम्ही नमूना म्हणून केलेल्या कामात काही त्रुटी असतील तर त्यावर प्रकाश टाकावा'.

'हो तसे करता येईल ना, पण काय आहे, हे काम आमच्या ऑफिसच्या रामरगाड्या व्यतिरिक्त म्हणून करावे लागेल त्याला काही फी द्यावी लागेल. शिवाय असेही करता येईल की आम्ही काही सँपल्स मिळवता येतात का ते पाहू. त्याची तपासणी करून तसे ऑफिशियल प्रमाण पत्रही देता येईल'. डॉ. अदीयनमन यांच्या बदललेल्या रंगामुळे ओकसरांनी आनंदू म्हटले, 'तसे रीतसर प्रमाणपत्र मिळाले तर फारच छान!'

'सुरवातीला 10 स्कॅन पाठवा जास्त नको. करायची बरीच कामे पड़लीत, म्हणत डॉ अदियमन आपल्याला ऑफिसमधे घुसत दिसेनासे झाले. मग आम्ही त्या भव्य प्रासाद वास्तूतून डॉ. विवेकानंद यांच्यासह परतताना ओक सर डॉ. विवेकानंदांना मराठीत म्हणाले की  सर आपण तमिळ भाषेचे व मोडी लिपीचे मान्यवर अभ्यासक आहात. तमिळनाडूत जन्म होऊन ही आपण मराठी भाषेतून सुंदर संवाद साधता. आपण पुण्याच्या डेक्कन कॉलेजात मोडी लिपीवर शोधकार्य करून पीएचडी मिळवली आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे.शिवाय सध्या आपण बंगलोरजवळील एका विश्वविद्यालयाचे भाषांतर व हस्तलिखित विभागाचे प्रमुख म्हणून काम करता त्यामुळे आपण व्यक्त केलेले मत डॉ अदीयमन यांनी मुकाट्याने मान्य केले, म्हणून उदय मेहतांची ती चित्रफीत आम्हाला आपणांस दाखवता आली. सर, आपण आपल्या विश्वविद्यालयातही अशा नाडी हस्तलिखितावर शोघकार्य करायला प्राधान्य द्यावे.'
हो जरूर, म्हणून त्यांनी मान्यता दर्शवली.
त्या परिसरात काही फोटो काढून आम्ही परतलो.  ....

.... त्या नंतर दुसऱ्या दिवशी तंजावर संस्थानाचे 'प्रिन्स ऑफ तंजावर' असे नामभिधान धारण करणारे  सरफौजीराजे भोसले यांचे सध्याचे वंशज प्रिन्स शिवाजी यांच्या सरस्वतीमहालाच्या मागील गढीवजा इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भेटायला ओक सरांना डॉ. विवेकानंद घेऊन गेले. त्यावेळी झालेल्या चर्चेत नाडी ग्रंथांच्या विषयी ओक सरांशी विचार व्यक्त करताना प्रिन्स शिवाजी राजे म्हणाले, 'काही म्हणा बुवा, पण मला त्या नाडीपट्यात काही भविष्य असेल असे वाटत नाही.' त्यावर डॉ. विवेकानंदांनी आधी पाहिलेल्या चित्रफितीचा उल्लेख करून ओक सर म्हणाले, 'आपण म्हणता ते ठीक, भविष्य कथन असते का नसते यावर तेंव्हा प्रकाश पडू शकतो जेंव्हा त्यात काय लिहिले आहे ते तमिळ भाषातज्ज्ञांकडून समजून घेतले गेले तर'.
'तेच काम हाती घ्यायला आम्ही डॉ. विवकानंद व डॉ. अदीयमन यांना विनंती करायला आलो आहोत. ती त्यांनी मान्य केली आहे. आता यापुढे ते कसे कार्य करतात यावर बरेच अवलंबून आहे!

कार्यशाळा 'नाडीग्रंथावर प्रकाश (Workshop - 'Focus on Naadi Granthas') या अंतर्गत तमिळनाडूमधे काही लोकांना भेटी दिल्या गेल्या त्यातील काही भेटींतील अनुभव सादर  - 

विवेक चौधरी

(नाडीग्रंथप्रेमी व या शोधयात्रेतील शशिकांत ओक सरांचा सहचारी)

इतिहासवाङ्मयभाषाज्योतिष

प्रतिक्रिया

जेपी's picture

11 Dec 2013 - 8:15 pm | जेपी

विट्रेश्टींग .
मीपावरील जाणत्यांच्या प्रतिसाद वाचण्यासाठी येत राहीण .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Dec 2013 - 8:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचतोय....!

-दिलीप बिरुटे

योगविवेक's picture

22 Apr 2015 - 7:51 pm | योगविवेक

धागा वाचून घेतला असेल...

विजुभाऊ's picture

12 Dec 2013 - 3:22 am | विजुभाऊ

बर मग पुढे ?

रामपुरी's picture

12 Dec 2013 - 4:42 am | रामपुरी

त्या १०+ अब्ज लोकांच्या नाड्या कुठे ठेवल्या आहेत याचा पत्ता लागू न शकल्याने फाईलवर "मिसींग" असा शेरा मारून ती बंद करण्यात आली आहे. शिवाय त्या दिलेल्या १० पट्ट्यांवरील मजकूर आपोआप बदलत असल्याने (त्या प्रेझेंटेशनमधल्या सुद्धा पट्ट्यांवरील मजकूर बदलत होता असे नंतर कोणीतरी म्हणत होते) त्यावर नक्की केव्हा काम सुरू करायचे हे न समजल्याने त्यासुद्धा गुंडाळून ठेवण्यात आल्या आहेत. अशा तर्‍हेने विषय मिटलेला आहे.

योगविवेक's picture

22 Apr 2015 - 7:55 pm | योगविवेक

अनेक व्हीडीओ तयार केले गेलेत. शिवाय आजकाल जो आपले नाडी भविष्य पाहतो त्याला मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढायला परवानगी द्यायला नाडी केंद्रांनी सुरवात झाली आहे...

खटपट्या's picture

12 Dec 2013 - 4:07 am | खटपट्या

आवडला

पण नाडी भविष्याविषयी अजून माहिती मिळाली असती तर बरे झाले असते.

क्रमश: नाही आहे म्हणून….

मुक्त विहारि's picture

12 Dec 2013 - 3:58 pm | मुक्त विहारि

की अद्याप अभ्यास सुरु आहे?

अनिरुद्ध प's picture

12 Dec 2013 - 4:56 pm | अनिरुद्ध प

+१ पुढे काय? म्हणजे क्रमशा की समाप्त?

होय. अभ्यास चालू आहे. पण तमिळभाषा प्रेमी पुढे आले तर हे काम जोरात चालू राहील. शाळा कॉलेजातील पगारी नोकरदार वेळ मिळत नाही ना म्हणून टाळाटाळ करताना दिसतात...

लवकर त्या जांभई देणार्‍या स्मायलीची सोय करा बॉ!

शशिकांत ओक's picture

12 Dec 2013 - 5:13 pm | शशिकांत ओक

योगविवेक जी,
मिसळपाववर आपले स्वागत. नाडीग्रंथांवरील सध्या होत असलेल्या अभ्यासकार्याची मिपाकरांना माहिती असावी अशा विचाराने आपण हा धागा सादर केला असावात. त्याबद्दल आपले अभिनंदन.
तमिळनाडूमधील तंजावूरच्या तमिल विश्वविद्यालयात भेट देताना आपणास आलेल्या अनुभवाचे साद्यंत वर्णन केलेले वाचून त्या आठवणी जागृत झाल्या. मराठी टंकलिखाणाची विशेष सवय नसूनही त्या सहलीतील प्रत्येक घटनेची नोंद असावी म्हणून अशा घटनांची रीतसर लेखी नोंद आपण करत आहात हे योग्यच आहे.
मिसळपाववर नाडीग्रंथांवर लेखन सादर होऊन अनेक वर्षे झाली. कोणी अभ्यासपुर्ण लेखन करून सादर केले तर काही वाचनांची त्या लेखनाकडे पहायची दृष्टी पुर्वमतांमुळे समानतेची नसते. आपल्याला नावडत्या धाग्यावर टिंगलटवाळी करून वा त्याला हिणकस ठरवून काहींना समाधान मिळत असल्याचा आभास होतो.
आपल्याला माहित आहे की हवाईदलात असल्यापासून नाडीचा विषय मी आपणहून काढत नाही. मिसळपावही अपवाद नाही. नाडीग्रंथांवर टिप्पणी करणारा धागा इथे वाचनात आला म्हणून मिपावरील सदस्यांना या विषयाची तोंडओळख व्हावी म्हणून माझ्यातर्फे लेखन केले गेले. नाडीग्रंथ हा विषय ज्याचा त्याने अनुभव घेण्याचा असल्याने मी तसे विषद करत असतो.
नाडीग्रंथांवरील माझे विविध धागे या विषयाची व्याप्ती व महत्व सांगणारे होते. ज्यांचा जोतिष या विषयावर रोष आहे त्यांच्याकडून नाडीग्रंथातील भविष्य कथनामुळे स्वाभाविकपणे विरोध होऊन उलटसुलट टिप्पणी होत राहतील याची मला जाणीव होती पण म्हणून त्यांच्या टीकाटिपणीकडे दुर्लक्षकरून, तर कधी पर्वा न करता त्यांना समर्थ उत्तरे देऊन ज्यांना या विषयात रस आहे त्यांच्यासाठी मी धागे वेळोवेळी सादर करत होतो. असो.
नाडी ग्रंथांवर जे लोक अभ्यास करून त्यांचा पाठपुरावा करू इच्छितात, त्यांच्यासाठी आपल्यासारख्या नाडी ग्रंथप्रेमींच्या प्रयत्नांमुळे कार्यशाळेचे संचलन करायचे काम योग्य त्या गतीने होत आहे. अभ्यासकार्य कोणी करत असेल तर त्यास नामोहरम करायला सरसावयाचे. विरोध दाखवायला पुरावे द्यायचे नाहीत, जमले तर विषय भरकटवून, खुरपटे काढून वाचकांच्या मनात संभ्रम उपस्थित करायचा उपद्व्याप करायला काहींना रस असतो. हे आपण जाणताच.
आपण सादर केलेला धाग्याचा विषय असाच आहे. पण प्रत्यक्षात नाडीविरोधात पुरावे सादर करायची वेळ आली की आपण त्या गावचे नाही असा साळसूदपणाचा आव आणला जातो. आपल्या समोरच तमिल भाषेचे व त्यातल्या त्यात ता़पत्रावरील प्राचीन तमिल भाषा व लिपीच्या दोन अभ्यासकांनी ती क्लिप पाहून थक्क होऊन झाल्यावर या विषयाची महती जाणली व तसे शोधकार्य हाती घ्यायचे मान्य केले. या सर्वाला आपण साक्षी होतात. यामुळे अन्य ज्योतिष विरोधी लोकांचे नाडी पट्टीतील लिखाणावर काय मत पडते, याला किती किंमत द्यायची हा आपण ठरवायची गोष्ट आहे.
आपल्याला माहित असेल की 1996च्या आसपास इंडिया स्केप्टीक नावाच्या कै. बी प्रेमानंदांच्या मसिकातून नाडीग्रंथांवरील त्यांच्या अनुभवाच्या दाव्याला उद्धेशून कै. मा.स. रिसबुड नामक पुण्यातील विचारवंतांनी, - जे नाडीविरोधक संस्थेचे या कामासाठीचे विभागप्रमुख म्हणून हिरीरीने काम पहात असत - बराच पत्रव्यवहार केला होता. त्यात त्यांनी 'बुद्धिवाद्यांचे नेता' - बी. प्रेमानंदांनी हातचलाखी करूनही नाडीग्रंथातून अचुक माहिती मिळाल्याचे' असे एका लेखातून धडधडीत म्हणाल्याने शेवटी प्रेमानंदांनाही कोणी चोरावर मोर गाठ पडला याचे वाईट वाटून आले. जे नेहमीच विरोधकांशी नाना चलाख क्लृप्त्या करून विरोधकांचा खोटेपणा उघड करतात अशा प्रमुकाने हातचलाखी करूनही नाडीपट्टीत त्यांचा उल्लेख अचुक आला हे म्हणणे खचितच शोभादायक नव्हते असे वाटून खरेखोटे काय याचा साक्षमोक्ष लावायला पत्रव्यवहार केला असावा. त्यांच्या त्या विधानावर चकीत होऊन आपणासारखा प्रखर विरोधकच नाडीग्रंथातून माहिती अचुक आली असा उल्लेख कसा करू शकतो? असा असा प्रश्न विचारून या विषयाला वाचा फोडली होती. आपण स्वतः खोटेपणा करूनही नाडीवाचकांने नाडीग्रंथांच्या ताडपट्टीत त्या त्या व्यक्तीचे नाव लिहिलेले असते हे खरे असेल तर तुम्ही ते वाचायचा का प्रयत्न का करत नाही? असे विचारून त्यांना जाम फैलावर घेतले होते. त्याला उत्तर म्हणून बी. प्रेमानंदांनी रिसबुडांना उलट पक्षी, ‘तुम्ही माझे लेख नीट वाचत नाही. आमची माहिती त्याने आमच्या नकळत काढून तीच आम्हाला ताडपट्टीतून मिळवत असल्याचा बहाणा केला' असा मी जो निष्कर्ष काढला त्याच्याकडे आपण साफ दुर्लक्ष केलेले दिसते’ असे म्हणून रिसबुडांवर - त्यांच्या अभ्यासू वृत्तीवर - टीका करून त्यांची हेटाळणी केली होती. तरीही रिसबुडांनी तो प्रश्न पुढे रेटून लावल्यावर ‘तुम्ही माझ्या एका पुस्तकाचे सहलेखन आहात तरीही असे प्रश्न कसे उपस्थित करता? आपल्या वरिष्ठतेचा व ज्ञानाचा आदर म्हणून मी हे नाडीप्रकरण इतक्या विस्ताराने लेखातून पुन्हा हाताळतोय अन्यथा माझ्यादृष्टीने हा विषय केंव्हाच संपलेला आहे. याची जाणीव असू दे’ असे काहीसे खडसावल्याचे स्मरते. काहीशा वैतागाने त्यांनी रिसबुडांना आपल्याकडे नाडीपट्टीच्या फोटोचा पुरावा असल्याचे म्हणता तर मग तो मला पाठवावा त्यातील मजकूर वाचून त्यात नावाचे उल्लेख कसे नसतील असे मला ताबडतोब दाखवता येईल. पण आपण असा पुरावा पाठवतो म्हणून ही अद्याप सादर केलेला नाहीत. इतःपर हा विषय माझे लेखी संपला आहे. त्यावरून रिसबुडांनी तो फोटोचा पुरावा काही कारणांनी प्रेमानंदाना पाठवला नसावा किंवा प्रेमानंदांशी यापुढे अर्थपुर्ण विचारमंथन होणे शक्य नाही असे उमगून पत्रव्यवहार थांबवला असावा. मात्र प्रेमानंदांनी झिडकारले म्हणून तरी कै. रिसबुडांनी आपणहून त्या फोटोतील नावाचा मजकूर खरा कि खोटा याची शहानिशा करायचा प्रयत्न केला नाही. वर कडी म्हणजे तमिलभाषेची बाराखडी, कूटलिपीची व देवनागरीतील अक्षरांची सांगड घालणे आम्हाला शक्य नाही असे साळसूदपणे म्हणून शाब्दिक हार कबूल करून एका अर्थाने ताडपट्टीतील लेखनाची शहानिशा करायच्या बाबीवर शेवटपर्यंत मौन साधले. कै रिसबुडांची खासियत अशी की एका बाजूला ते प्रेमनंदांच्या पाणउताऱ्याला टक्कर देत होते की नाडीपट्टीत नाव लिहिलेले असते असा दावा केला जातो आहे म्हणून तर दुसऱ्याबाजूने माझ्याशी व नंतर प्रा. अद्वयानंद गळतगे यांच्याशी पत्रव्यवहार करून नाडीग्रंथांवर सडकून टीकाटिप्पणी करताना नाडीपट्टीवर कूट तमिळ तर सोडाच, काहीही मजकूर नसतो असे छाती ठोकून लिहित होते. प्रश्न असा उरतो की जो फोटो रिसबुडांनी मिळवल्याला आव आणला जात होता व जो बी प्रेमानंदांना पाठवायला त्यांनी टाळले, तो होता कोणाचा फोटो? त्यात काय लिहिलेले होते? त्याच्याकडे तो आला कसा? असा सवाल कै. रिसबुडांना कोणी केला नाही.
कदाचित त्यांनी तो फोटो कै.प्रेमानंदाना पाठवला ही असेल. फोटोतील मजकूराला वाचून नाडीपट्टीत व्यक्तीचे नाव खरेच कोरून लिहिले असते हे उघडपणे मान्य करायला अशक्य वाटल्याने त्या दोघांनी किंवा दोन्ही संस्थांनी हया विषयातील रस अचानक एकदम बंद करून गुलदस्तात ठेवला असेल तर नवल वाटायला नको. किंवा रिसबुडांनी त्यांना कदाचित एक फोटोचा पुरावा काय मागताय? प्रेमानंद, आपण खुद्द तमिळनाडूच्या इतके जवळ राहता मग फोटो माझ्याकडे मागायच्याऐवजी आपण सरळ एखाद्या नाडी केंद्रातून का मिळवत नाही? शिवाय जर आपल्याला तमिळभाषा समजते असा आपण दावा करता तर मग आपणच त्याचा साक्षमोक्ष लावायला नाडीपट्ट्या मिळवून का तपास करत नाही? असा प्रश्न ही त्यांना केला असावा. असो.
हे इथे लिहायचे कारण असे की दिलेल्या पुराव्याकडे दुर्लक्ष करायचे व ‘हे काहीच नाही- आणखी सादर केलात तर यावर विचार करू’ असे मानभवीपणे म्हणायचे ही फार पुर्वीपासून चालत आलेली खेळी आहे. जसे कसाबच्या संदर्भात भारताने पुराव्यांची थप्पी पाकिस्तानाला सुपूर्त करूनही ‘ही काय रद्दी आणलीत! यातील पुराव्यात काहीच दम नाही’ म्हणावे. तसे एखाद्या आज्ञाधारक आशाळभूत श्वानाने मालकाची आज्ञा पाळल्यावर शेपटी हालवत मालकाकडे पहायचे व आता तरी मालक खूष होऊन खायचे ताट पुढे करेल असे पाहत राहायचे पण हाडकाची हूल हेऊन पुन्हा त्या श्वानाला पळायला लाऊन मजा पहायचे काम करत राहायचे. ओकांना दमवत नाडीची मजा पहायला बसलेल्या लोकांच्याकडे दुर्लक्ष करून आपण हा ‘लाल निळ्या रंगाचा इंगा’ सादर केलात याचे पुन्हा कौतुक करतो.
यानंतर कोणी नाडीग्रंथांवरील विषयात आणखी वाचायला मिळावे असा अभिप्राय व्यक्त केला तर सवडीने आपण काही भाग जरूर सादर करावा. विशेषतः २०१२ च्या नाडी ग्रंथावर आधारित दिवाळी अंकातील काही लेख. माझ्याकडून काही मदत हवी तर मी आनंदाने ती करीन.
ता.क. वरील धाग्यात उल्लेख केलेल्या क्लिपची निर्मिती ज्यांनी कष्टपुर्वक केली त्यांचे मत अशा सार्वजनिक ठिकाणी ती न दर्शवलेली राहावी असे आहे. फक्त ज्यांना नाडी ग्रंथांतील भाषा व लिपीच्या शास्त्राची जाण आहे अशांनाच अभ्यासकार्यात मदत व्हावी म्हणून तिचा वापर केला जावा असे त्यांना वाटते. मला ही नेमके तसेच वाटते. असो.

चित्रगुप्त's picture

13 Dec 2013 - 6:16 pm | चित्रगुप्त

श्री. ओक हे अतिशय तळमळीने त्यांचे अंगिकृत कार्य अथक उत्साहाने करत आहेत, हे फार कौतुकास्पद वाटते. याकामी त्यांना योगविवेक व अन्य मिपाकरांचा साथ मिळत आहे, हेही उत्तम.
त्यांच्या या कार्यातून लवकरच काही गोमटी फळे चाखायला मिळून नाडी विषयाबद्दल संभ्रम दूर होईल अशी आशा वाटते.
आधीच ठरवून कोणतीतरी एक बाजू न घेता डोळस निष्पक्षपणे हे सर्व प्रकरण हाताळले जावे, अशी अपेक्षा करणे वावगे ठरू नये.
वरील प्रतिसादातील बी. प्रेमानंद आणि कै. रिसबूड यांचे दरम्यान नेमके काय घडले, हे कळले नाही, हा एकादी गोष्ट समजून घेण्याच्या माझ्या वकूबाचा कमकुवत पणा असावा.

मागे आम्ही श्री. ओक यांना त्यांनी नाडीकेंद्रात प्रवेश केल्यापासून नाडीवाचनापर्यंतच्या सर्व घटनांचे व्हिडियो शूटिंग करून ते वाचकांना उपल्ब्ध करून द्यावे, अशी विनंती केली होती. आता योगविवेक यांच्या सहय्याने त्यांनी पुन्हा एकदा ते मनावर घ्यावे, असे सुचवतो.
वाचकांनी स्वतः नाडीकेंद्रात जाऊन अनुभव घ्यावा, हे खरे, परंतु तितका उत्साह, निकड, वेळ आणि खर्चाची तयारी बहुतेकांची असणार नाही. त्यामुळे हे कार्य त्यांनीच करणे योग्य ठरेल.
असा प्रयत्न जर कुणा मिपाकराने केला असेल, तर त्यांना काय अनुभव आले, हे वेगळा धागा काढून लिहावे.
असे व्हिडियो जर तूनळी वगैरे वर आधीच टाकलेले असतील, तर त्यांचे दुवे द्यावेत, ही विनंती.
पुढील कार्यासाठी शुभेच्छा.

शशिकांत ओक's picture

14 Dec 2013 - 10:10 am | शशिकांत ओक

नाडीकेंद्रात जाऊन अनुभव घ्यावा, हे खरे, परंतु ...

मग इथे धाग्यावर तसे काही नसतेच असे अनुभव न घेता म्हणू नका....

ओक सर आपल्या सांगण्यावरून या यात्रेत मला आलेल्या अनुभवांचा संक्षिप्त अहवाल वेगळा सादर करत आहे.
काही त्रुटी असतील तर दाखवून द्याव्यात.

आतिवास's picture

12 Dec 2013 - 5:19 pm | आतिवास

लाल आणि निळा रंग प्रतीक असलेल्या विचारसरणींमधल्या वैचारिक संघर्षाचा काही आढावा असेल अशा अपेक्षेने धागा उघडला.
असो!
आणखी एक असो!

प्यारे१'s picture

12 Dec 2013 - 6:15 pm | प्यारे१

+१

पण इथे तर फक्त लालेलालच रंग दिसला असं शेपूट जोडतो.

अनुप ढेरे's picture

12 Dec 2013 - 6:20 pm | अनुप ढेरे

मान्य करुन टाका यार नाडीग्रंथांबद्दलची सगळी विधानं !! चर्चा तरी थांबेल.

योगविवेक's picture

22 Apr 2015 - 7:57 pm | योगविवेक

मानून टाका ना...
आपल्यासारखे लोक सगळे नसतात...

शिर्षक वाचुन मला वाटले की "भगव्या निळ्या रंगाचा दंगा" असे काहीतरी असेल पण...

योगविवेक's picture

21 Apr 2015 - 2:42 am | योगविवेक

धागे सोडायची मला प्रॅक्टीस नाही. पुर्वी या धाग्यावर मी बरेच खपून लेखन केले होते. त्या नंतर अधून मधून मिपावर मी चक्कर मारायला येतो पण लेखनाचा कंटाळा म्हणून वेळ लागतोय
भृगुसंहितेच्या शोधात मी व ओक सर नेपाळ व उत्तर प्रदेशातील काही केंद्रांना भेटी देऊन आलो. विविध अनुभव मिळाले. ते एकत्र करून सादर करायला पाहतोय...