लाल निळ्या रंगाचा इंगा
लाल निळ्या रंगाचा इंगा
तंजावूरच्या तमिल विश्वविद्यालयाचा भव्य प्रांगण. ओकसर व मी तेथील मॅन्युस्क्रिप्ट डिपार्टमेंटच्या हेडना भेटायला आम्ही जूनच्या घामफोडू गरमीत डॉ. अदियमन यांच्या ऑफिसचा शोध घेत दुसऱ्या मजल्यावर पोहोचतो; चौकटीच्या बुशकोटातील व्यक्ती म्हणते झाले, 'येस व्हाट डू यू वांट?
' कम टू मीट यू सार.. '
ओके. टेल...
आम्ही काही लोक पुण्यातील इंडॉलॉजिकल विषयक अभ्यास करत आहे. काही हस्तलिखिते आम्ही मिळवली आहेत. त्याचे विश्लेषण करायला आपल्या विश्वविद्यालयात सोय करता येईन का यावर चर्चा करायला आपण थोडा वेळ द्याल अशी आशा आहे.
कॉम्प्युटर वरील नजर न हालवता ते म्हणाले, 'लॉटाफ वर्का, नो टायिमा', कोलावेरी डी गाण्यातील ओळी आठवतील असा सूर धरून 'कोण कोण लोकांच्या पिडा' येतात. असा चेहरा करून ' हं बोला?' म्हणत कॉम्प बंद करून आमच्याकडे प्रथम नीटसे पहात म्हणाले. 'यू सेड मॅन्युस्क्रिप्ट?'
ओक सरांनी मान हलवत म्हटले, ' आम्ही एक प्रॉजेक्ट हाती घेतला आहे. त्याचे प्रेझेंटेशन आम्हास दाखवता आले तर अनेक गोष्टी पटकन समजायला सोपे जाईल.
ओके 'पाहू या' ते म्हणाले. ओकसरांना मी विचारले, त्यांच्या कॉम्पवर कि आपला लॅपटॉप काढू ? का पेन ड्राईव्हवरून काढू या?'
'माझ्या कॉम्पवर नीट ऐकावयास येत नाही. दुसऱ्या ठिकाणी पाहू' डॉ. अदीयमन उठत म्हणाले, 'व्हाटीज् टापिक?' 'नाड़ीग्रंथ पामलीफ एस्ट्रॉरॉलजी!'
'ओह, नाडी या !' चेहरा आंबट करत ते उठलेले परत बसते झाले! म्हणायला लागले. 'आय नो नाडी अँडाल, दे आर फेक. नथिंग बट मनी अर्निंग बिझीनेस यू सी'. डॉ अदीयनम आपल्या अनुभवाचे सार सांगायला सरसावाले. म्हणाले, 'मी एकदा मित्राने म्हटले म्हणून दोन घटकांचा वेळ दिला, तेंव्हा तात्काळ लक्षात आले की हे सगळे फेस रीडींगचे खेळ आहेत बाकी काही नाही. त्यात गोऱ्या कातडीचे काही भंपक लोक त्या नाडीमधे काही 'इसोटेरिक' असा समज करून घेऊन 'इंदियान पामलीफ सूदसेयर्स' म्हणुन त्यांच्या देशात जाऊन भाव मारतात. पण त्यात काही दम नाही'. डॉ. अदीयमन यांनी एका दमात नाडीवरील मत व्यक्त केले.
आता ओक सर तो वार कसा झेलतात हे मला ऐकायला मिळणार म्हणून मी ही सरसावलो! ओक सरांनी संथ आवाजात सुरवात केली. 'अगदी बरोबर. मी ही या नाडी विषयाच्या प्रकरणाचा पडदा फाश करावा म्हणून सरसावलो होतो. आजकाल झटपट पैसा कमवायची चटक लागलेल्या समाजात ही कीड उपटली गेली पाहिजे, असा माझा पवित्रा होता. शिवाय मी हवाईदलात असल्याने माझे अनेक तमिळभाषी सहकारी हाताशी होते. त्यांच्यामुळे व नंतर काही तमिळभाषा तज्ज्ञांच्या मदतीने मी ताडपत्रांतील लेखनाचा अभ्यासक म्हणून शोघ केला. नंतर जे काही सापडले ते मी आपल्यासमोर दाखवायला आणले आहे.'
नाडीभविष्याबद्दल आपले व्यक्तिगतमत विरोधकाचे असले व वैयक्तिकरित्या हा विषय बंद करू इच्छित असलात तरी या विश्वविद्यालयातील तमिळ भाषेतील हस्तलिखिताच्या मुख्य प्रशासकाच्या खुर्चित बसून नाडी हस्तलिखितांच्या मजकुराबाबत हा विषय बंद करणे योग्य ठरणार नाही.' ओक सरांचा सौम्य पण ठाम स्वर ऐकून ते पुढे काय म्हणतील अशी उत्सुकता लागली. तेवढ्यात डॉ. विवेकानंद गोपालन यांनी अदीयमन यांच्या ऑफिसात प्रवेश केला. त्यांची थोडी तमिळमध्ये आव भगत झाल्यावर डॉ.विवेकानंदांना आपल्या बाजूने मत करायला ओढत ते म्हणाले, 'वी आर टाकिंग अबाऊट नाडी यू सी'.
डॉ. अदीयमन यांच्या सुरात सूर मिळवत डॉ.विवेकानंद म्हणाले,'नाडीतील ज्योतिडम फेक असेल असे माझेही मत आहे. कदाचित म्हणून मी ते अनुभवले नसेल, पण नाडी ताडपत्र हस्तलिखितातील भाषेविषयी अभ्यास करू नये असे मी म्हणू शकत नाही. 'आय फील वी आर ओपन दॅट वे. व्हॉट डु यू से सर?'
त्यांच्या बोलण्यास सूर मिळवत डॉ. अदीयमन म्हणाले, ' येसस, शो योर प्रॉग्रेम'. ओकसर मला उद्देशून म्हणाले, 'विवेक आपण त्या ऐवजी मेहतांची डॉक्युमेंटरी दाखवू या.'
आमची तयारी झाली. डॉक्युमेंटरीतील ताडपट्टीवरील नावांच्या कूटतमिळ अक्षरांवरून लाल रंगाची जाडसर रेषा प्रत्येक अक्षरला उठावदार करत दिसू लागताच
"उदय, प्रमिला, मुकुटुलाल व शेवटी प्रीती" अशी स्पष्टपणे दिसू लागली. त्यानंतर ती नावे कोणास उद्देशून आहेत याचे स्पष्टीकरण दाऱवणाऱ्या निळ्या रंगाने आपली करामत दाखवायला सुरवात केली. उदय हेच या व्यक्तीचे नाव, आईचे प्रमिला तर वडिलांचे मुकट्टूलाल असा तमिळ उच्चार त्यांच्या वडिलांच्या नावाचा व पत्नीचे नाम प्रीती, प्रला दीर्घ वेलांटी असून उच्चार प्रि (ह्रस्व) असा नसून तो प्री(दीर्घ) अशी नावांची नाते संबंधदर्शक शब्दरचना पाहून डॉक्युमेंटरी संपताच आश्चर्याने त्यांच्या चेहर्यावरील भाव बदललेले होते!
ओक सरांनी मग कार्यशाळा 2011 मधील राजेंद्र पाठकांनी उदय मेहतांच्या इंग्रजीतील मुलाखतीतील त्यांच्या स्वतःच्या व घरच्यांचे नामोल्लेखाचा ताडपट्टीतील लेखनाला करून दिलेला दुजोरा व त्यांच्या उच्चशिक्षणातील पदव्या व भूषवलेली पदे वगैरे संभाषणाचा भाग ऐकून ओकसरांच्या बोलण्यात बरेच तथ्य असल्याचे कबूल केले! तोवर मी नाडी ग्रंथातील वहीतून मिळवल्या कथनांवर आधारित प्रोग्रॅमची जुळणी करून ताडपट्ट्यातील कथनांचे केलेले वर्गीकरण, फोटो, ऑडियो कॅसेटवरून एम पी3 फाईलवरील भाषांतराची सोय दाखवली. नमुन्यादाखल केलेले तमिळभाषेतील डीटीपी वर्क दाखवले. अशा स्कॅन्सची संख्या काही काळात काही हजारावर जाईल तेंव्हा या सर्वाला तमिळ स्क्रिप्ट मधून सादर करायला आपल्याकडून मदत व्हावी आणि इंडॉलॉजिकल शोधकर्त्यांना हजारो नाडी कथनांचा डेटा उपलब्ध व्हावा असे वाटून डॉ. विजय भटकर या नामांकित शास्त्रज्ञ व भारतीय प्रथम सुपर कॉम्प्युटरचे जनक यांनी प्रयत्न करायला प्रोत्साहन व त्यांच्या मल्टिव्हर्सिटीतर्फे आम्ही आपल्याला संस्थागत सहकार्य करायचे निमंत्रण घेऊन आलो आहे. तेंव्हा तंजावूरच्या तमिळ विश्वविद्यालयातर्फे आपली सहमती हवी आहे.तसे लेखी 'मेमोरॅन्डम ऑफ अंडरस्टॅन्डीग' चे पत्रही मी तयार केले आहे.
'नको, नको इतकी घाई नको. 'डॉ. अदियमन यांची सावध प्रतिक्रिया ओकसरांना अपेक्षित असावी. ते म्हणाले, 'बर, सुरवात म्हणून 50 स्कॅनिंगचे तमिळ डीटीपी करून द्यावे. तोवर आम्ही नमूना म्हणून केलेल्या कामात काही त्रुटी असतील तर त्यावर प्रकाश टाकावा'.
'हो तसे करता येईल ना, पण काय आहे, हे काम आमच्या ऑफिसच्या रामरगाड्या व्यतिरिक्त म्हणून करावे लागेल त्याला काही फी द्यावी लागेल. शिवाय असेही करता येईल की आम्ही काही सँपल्स मिळवता येतात का ते पाहू. त्याची तपासणी करून तसे ऑफिशियल प्रमाण पत्रही देता येईल'. डॉ. अदीयनमन यांच्या बदललेल्या रंगामुळे ओकसरांनी आनंदू म्हटले, 'तसे रीतसर प्रमाणपत्र मिळाले तर फारच छान!'
'सुरवातीला 10 स्कॅन पाठवा जास्त नको. करायची बरीच कामे पड़लीत, म्हणत डॉ अदियमन आपल्याला ऑफिसमधे घुसत दिसेनासे झाले. मग आम्ही त्या भव्य प्रासाद वास्तूतून डॉ. विवेकानंद यांच्यासह परतताना ओक सर डॉ. विवेकानंदांना मराठीत म्हणाले की सर आपण तमिळ भाषेचे व मोडी लिपीचे मान्यवर अभ्यासक आहात. तमिळनाडूत जन्म होऊन ही आपण मराठी भाषेतून सुंदर संवाद साधता. आपण पुण्याच्या डेक्कन कॉलेजात मोडी लिपीवर शोधकार्य करून पीएचडी मिळवली आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे.शिवाय सध्या आपण बंगलोरजवळील एका विश्वविद्यालयाचे भाषांतर व हस्तलिखित विभागाचे प्रमुख म्हणून काम करता त्यामुळे आपण व्यक्त केलेले मत डॉ अदीयमन यांनी मुकाट्याने मान्य केले, म्हणून उदय मेहतांची ती चित्रफीत आम्हाला आपणांस दाखवता आली. सर, आपण आपल्या विश्वविद्यालयातही अशा नाडी हस्तलिखितावर शोघकार्य करायला प्राधान्य द्यावे.'
हो जरूर, म्हणून त्यांनी मान्यता दर्शवली.
त्या परिसरात काही फोटो काढून आम्ही परतलो. ....
.... त्या नंतर दुसऱ्या दिवशी तंजावर संस्थानाचे 'प्रिन्स ऑफ तंजावर' असे नामभिधान धारण करणारे सरफौजीराजे भोसले यांचे सध्याचे वंशज प्रिन्स शिवाजी यांच्या सरस्वतीमहालाच्या मागील गढीवजा इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भेटायला ओक सरांना डॉ. विवेकानंद घेऊन गेले. त्यावेळी झालेल्या चर्चेत नाडी ग्रंथांच्या विषयी ओक सरांशी विचार व्यक्त करताना प्रिन्स शिवाजी राजे म्हणाले, 'काही म्हणा बुवा, पण मला त्या नाडीपट्यात काही भविष्य असेल असे वाटत नाही.' त्यावर डॉ. विवेकानंदांनी आधी पाहिलेल्या चित्रफितीचा उल्लेख करून ओक सर म्हणाले, 'आपण म्हणता ते ठीक, भविष्य कथन असते का नसते यावर तेंव्हा प्रकाश पडू शकतो जेंव्हा त्यात काय लिहिले आहे ते तमिळ भाषातज्ज्ञांकडून समजून घेतले गेले तर'.
'तेच काम हाती घ्यायला आम्ही डॉ. विवकानंद व डॉ. अदीयमन यांना विनंती करायला आलो आहोत. ती त्यांनी मान्य केली आहे. आता यापुढे ते कसे कार्य करतात यावर बरेच अवलंबून आहे!
कार्यशाळा 'नाडीग्रंथावर प्रकाश (Workshop - 'Focus on Naadi Granthas') या अंतर्गत तमिळनाडूमधे काही लोकांना भेटी दिल्या गेल्या त्यातील काही भेटींतील अनुभव सादर -
विवेक चौधरी
(नाडीग्रंथप्रेमी व या शोधयात्रेतील शशिकांत ओक सरांचा सहचारी)
प्रतिक्रिया
****
:)
आत्ता पर्यंत आपण
बर मग पुढे ?
पुढे? सोपं आहे.
असे लाल निळे आता तर
आवडला
पुढे काय झाले?
+१
तमिळभाषा प्रेमी पुढे आले तर हे काम जोरात चालू राहील
लवकर त्या जांभई देणार्या
योगविवेकजी, अभिनंदन...!
व्हिडियो शूटिंग
तू नळीवर जाऊन पाहा ना...
नेपाळ व उत्तर भारतातील भृगुसंहितेच्या फलादेशाच्या शोधयात्रा
लाल आणि निळा रंग प्रतीक
+१
मान्य करुन टाका यार
नको ती कटकट
शिर्षक वाचुन मला वाटले की
इंगा लाल मिळ्या रंगाचा...