सणासुदीचे दिवस आले नं की मला लहानपणापासून एक प्रश्न पडतो, म्हणजे स्साला हे घर आवराआवरीचं खूळ सर्वात पहिले मानवाच्या डोक्यात कधी आलं असेल? म्हणजे सगळ्यात पहिला झाडू कोणी बनवला असेल? कधी बनवला असेल?
आणि कसा बनवला असेल. विशेषतः खराट्यांचं कौतुक वाटतं हो, तिच्यामारी कोणाच्या सुपीक डोक्यात आलं असेल कि आधी नारळाची वगैरे झाडं लावा, मग झावळी खाली आल्यावर हीर काढायचा प्रकार म्हणजे "सृष्टीच्या सृजनशीलतेचा अप्रतिम नमुना असलेल्या मानवाच्या सृजनशीलतेची आणि कल्पकतेची आणि साफसफाईची आणि नीटनेटकेपणाची हाईट" वाटते मला!
तसेच इतर अन्य पदार्थांचे ही, जसे कि चिखलटिपणी! साला तो पंचा, त्याचा आंघोळीसाठी वापरून झाल्यावर, त्याचे धागे सुटायला लागल्यावर पुन्हा वापरणे भारीच. कोणाला सुचलं असेल हे असं?
अर्थात हे सगळं एकाच दिवसात सुरु झालेलं नसावं असा माझा अंदाज. या कृती उत्क्रांत होत गेल्या असतील. या कृतींच्या जन्माची, उत्क्रांतीची काही कहाणी असेलच नं.
जाणकार मंडळींच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत.
प्रतिक्रिया
29 Oct 2013 - 7:25 am | मुक्त विहारि
"लाडू ते झाडू"
लाडू खांताना कधी कधी सांडतो, ते कण झाडायला झाडूचा शोध लागला असावा.
असो.
शेवटी काय तर "प्रथम लाडू मग झाडू" हेच अंतिम सत्य.
आधी लाडू लग्नाचे.
मग झाडू धरायचे.
29 Oct 2013 - 7:56 am | स्पंदना
अन झाडू खायचे? ते विसरलात?
मी तर विचारेन पहिला झाडू कोणी खाल्ला?
29 Oct 2013 - 9:54 am | मुक्त विहारि
प्रथम खायचे लग्नाचे लाडु
मग खायचे बायकोच्या हातचे झाडूचे फटके.
मी तर पहिला पण नाही आणि शेवटचा पण नाही...
29 Oct 2013 - 9:38 pm | विद्युत् बालक
बहुतेक विक्षिप्त लोकांचा विक्षिप्त पणा घालवण्या साठी डोक्यात मारण्या साठी पहिला झाडू बनवला गेला असावा =))
29 Oct 2013 - 11:19 pm | बॅटमॅन
ती प्रतिक्षिप्त क्रिया तर नसेल ना ;) =))
29 Oct 2013 - 8:37 am | पैसा
नक्कीच कोणा आदिमानवीने शोधला असणार. आदिमानवाच्या पाठीत घालायला!
29 Oct 2013 - 9:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> नक्कीच कोणा आदिमानवीने शोधला असणार.
सहमत आहे. अदिमानव जेव्हा जमिनीवर बसला असेल तेव्हा त्याच्या बुडाला खडे वगैरे टोचले असतील तेव्हा त्याने हाताच्या पंजाने प्रथम पूर्व पच्छिम, पच्छिम पूर्व किंवा विविध दिशांनी असेच एकमेकाच्या बाजूने अथवा विरोधी बाजूने जमीनीवरुन हात फिरवला असेल तेव्हा झाडूची प्रथम व्युत्तपत्ति किंवा कल्पना हीच मानली पाहिजे. पुढे त्याच्या लक्षात आले की हाताने असे केल्यावर हाताला वेदना होतात तेव्हा त्याने काही काड्या, झाडाची फांदीने ते खडे काढले असावेत किंवा जागा स्वच्छ केली असावी तो पहिला झाडू. अर्थात याचे सर्व श्रेय अदिमानवालाच दिले पाहिजे. गरजेतून हा झाडू निर्माण झाला आहे.
आणि पुढे शिंदीच्या पानांचा उत्तम झाडू बनला काल परवापर्यंत मला दिसायचा आता हल्ली दिसत नाही.
>>>> आदिमानवाच्या पाठीत घालायला!
नैनै. झाडूचा उपयोग तेव्हा योग्य कारणासाठीच होत असावा. झाडू पाठीत घालणे वगैरे हे स्त्रीवादामुळे हल्ली हल्ली होत आले आहे असे वाटते. चुभुदेघे. तेव्हाच्या स्त्रीया आजच्या इतक्याच आधुनिक होत्या म्हणजे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्या शिकारी करायच्या त्यामुळे स्त्री आणि पुरुष एकमेकांना पाठीत घालण्यासाठी काही वेगळी साधनं वापरत असावी, असे वाटते. संशोधनासाठी उत्तम विषय आहे.
वल्ली, एखाद्या लेणीत असं शिल्प दिसलंय का झाडू मारतांना वगैरे. च्यायला, मला वेरुळ लेणीत पाहिल्यासारखं वाटतं.
-दिलीप बिरुटे
29 Oct 2013 - 9:27 am | प्रचेतस
मला तरी तसे दिसले नै. वेरूळला तर नक्कीच नै.
29 Oct 2013 - 9:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झाडू मारतांनाच असा शब्दशः अर्थ नै पण झाडू वगैरे.. नाही का ? नसेल तर जाऊ द्या.
-दिलीप बिरुटे
29 Oct 2013 - 9:37 am | प्रचेतस
झाडू वैग्रे पण दिसला नै कधी.
पण बाकी चावट माकडांना धपाटे घालणार्या नायिकांची लै शिल्पे आहेत.
29 Oct 2013 - 10:12 pm | सोत्रि
वाटलच मला, पाशवी शक्ती एकत्र येणार म्हणून!
:) :)
- (पाशवी शक्तींना न घाबरणारा) सोकाजी ;)
30 Oct 2013 - 3:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
शेतीचा शोध म्हणे बायकांनीच लावला. पीक कापल्यावर पेंढ्याच्या बुताऱ्याही बायकांनीच बनवल्या असण्याची शक्यता वाढते, नै का.
29 Oct 2013 - 8:47 am | चौकटराजा
पयले परतम ज्याने आप्ल्याच घरात घाण केली त्यानेच बनविला असणार ना ?
( मिपावरचा आद्य संपादक हा आद्य झाडू असला पाहिजे. आजकालचे संपादक झाडूकामा बद्द्ल शिरेस दिसत नाही त्यामुळे
एक टोळके फार शेफारले आहे ! )
29 Oct 2013 - 9:55 am | मुक्त विहारि
अगदी अगदी
फारच कंपू बाज माणसे...
29 Oct 2013 - 8:54 am | चित्रगुप्त
तिच्यामारी हे मिपाकर शिंचे लई उपद्रवी. कुणी विचारतो सगळ्यात पहिला लाडू कोणी बनवला. तो धुरळा जरा खाली बसतो न बसतो, तोच लगेच कुणी विक्षिप्त विचारतो, सगळ्यात पहिला झाडू कोणी बनवला ???
अरे काही उद्योग नाही का तुम्हाला ??? आणखी काय काय विचारणार आहात?
आमचे बघून हल्ली यमराज देखील मिपा आयडी घेऊन वाचू लागलेत (आता हे वाचून लगेच कुणीतरी "ओळखा पाहू यमराजांचा मिपा आयडी कोणता? असा धागा काढणार. मायला, वैताग नुसता. तरी तुम्हाला मी दोन हिंटा देतो: एक ही आणि दुसरी ही ).
तर यमराजांनी हे लाडू-झाडूचे धागे बघितले, तर लगेच आम्हाला फर्मान सुटणार, हजारो वर्षांचे रेकॉर्ड तपासून या प्रथमवीरांची वा प्रथमवीरांगनांची नावे शोधून काढ म्हणून.
खरेतर यमराज पूर्वी हजारो वर्षांपासून सोमरस वगैरे घेऊन रंभा, उर्वशी, तिलोत्तमा वगैरे बारबालांचे डान्स बघत बसायचे, आम्हीही काम आटोपल्यावर तिकडे हजेरी लावायचो. ते सर्व सोडून यमपुरीतला एकुलता एक संगणक घेऊन आता यमराज नेहमी मिपावर पडीक असतात.(खरेतर तो संगणक मी मोठ्या मुश्किलीने माझे काम सोपे व्हावे म्हणून मिळवला होता, पण म्हणतात ना, बॉस ईज ऑलवेज राईट.)
मुळातच आमचे कंबरडे पाप-पुण्याच्या नोंदी करून, त्या नोंदींच्या जड जड चोपड्यांचे गठ्ठे उचलून अगदी मोडकळीस आलेले आहे. आम्ही मागे आमच्या रिटायरमेंट साठी मिपाकरांना मदतीचे आवाहन केले होते, त्यावर सगळे नुसते वादच घालत बसले. आमचे काम कुणीच मनावर घेतले नाही.
मिपाकरेच्छा बलीयसी, दुसरे काय???? लागा आता त्या पहिला लाडू आणि पहिला झाडू बनवणार्यांच्या शोधाला.
29 Oct 2013 - 9:08 am | अत्रुप्त आत्मा
सर्वजण आता झाडुन प्रतिसाद देतिल! ;-)
29 Oct 2013 - 9:34 am | चित्रगुप्त
"सर्वजण आता झाडुन प्रतिसाद देतिल" की
"आता झाडुन सर्वजण प्रतिसाद देतिल"
29 Oct 2013 - 9:42 am | अत्रुप्त आत्मा
दोन्ही वाक्य झाडू आहेत! .... आपलं .. ते हे.. लागू आहेत! :P
29 Oct 2013 - 10:23 am | विश्वनाथ मेहेंदळे
मिपावरील फालतू विडम्बने कमी होताहेत असे जरा कुठे वाटत होते तेव्हढ्यात लाडू ला झाडू चे यमक जुळवणारे तद्दन फालतू विडम्बन बोर्डावर…
असो, प्रिय मित्र प्यारे यांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत. त्यांचा प्रतिसाद नक्की येणार असे इतिहास सांगतो.
29 Oct 2013 - 10:30 am | मदनबाण
मिपावरील फालतू विडम्बने कमी होताहेत असे जरा कुठे वाटत होते तेव्हढ्यात लाडू ला झाडू चे यमक जुळवणारे तद्दन फालतू विडम्बन बोर्डावर…
सहमत !
29 Oct 2013 - 12:07 pm | प्यारे१
>>>प्रिय मित्र प्यारे यांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत
विमेंसारख्या थोर्थोर व्यकितनी काढली आठवण
डोळ्यात माझ्या झाली पाण्याची साठवण...
जा इस्स बार मुआफ किया !
-अमरिश प्यारे ;)
29 Oct 2013 - 12:22 pm | घन निल
झाडलोट करायचं काम कधी आपण केला नाय ! म्हणून चायला असा प्रश्न पडलाच नाय ! बाकी या प्रश्नावर सुद्धा चर्चा
व्हायलाच पायजेल !! लाडू लमोठे खाल्ले म्हून श्यान पडला तेच्या मारी लाडवा इषयी प्रश्न !! असे प्रश्न पडायलाच पायजेल!
शून्य प्रहरात मांडण्या सारखा तारांकित प्रश्न आहे ह्यो !
30 Oct 2013 - 3:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आपण दोघांनी असे महत्त्वाचे प्रश्न लोकसभेत नेले पाहिजेत. तुम्हां-आम्हांसारख्या जागरूक लोकांनी अशा संवेदनशील विषयांवर संशोधन व्हावं यात पुढाकार घेतला नाही तर कोण घेणार? ;-)
भावना दुखावून न घेता मस्करी हलक्याने घेण्याबद्दल आभार.
30 Oct 2013 - 11:34 am | घन निल
आपण असेच लोकोपयोगी प्रश्न मांडत राहू ! (मीच मीच्या डोळ्यांची स्मायली) (दीड शहाणपणा चे भाव असणारी स्मायली) :)
29 Oct 2013 - 9:05 pm | आशु जोग
खूपच सुंदर अप्रतिम ! येत जा अशाच ...
29 Oct 2013 - 10:06 pm | सोत्रि
"आयला, तू पण!"१
-(ब्रूट्स)सोकाजी
29 Oct 2013 - 11:48 pm | प्यारे१
मौके की तलाश के दो साल ???
किती जुना आहे तो धागा? कसं ब्वा लक्षात ठेवतात लोक्स!
-'वि'स्मरणशक्तीचा पुरस्कर्ता प्यारे ;)
30 Oct 2013 - 3:55 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मी पण म्हणजे? ही जुनी सवय आहे.
थोडं खाणकाम केलंस तर आणखी "रत्नं" सापडतील. उदा आमच्या गाववाल्यांच्या धाग्याचाही कच्चा माल बनवला होता. हे एक पहा.
29 Oct 2013 - 10:55 pm | राजु भारतीय
मला फार अनुभव नाही, प्ण आदिती ़़काकु तुम्ही मिपाच्या एक्दम भारी मेंब्र आहात.
30 Oct 2013 - 12:31 am | आशु जोग
काकू ................
30 Oct 2013 - 4:23 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून हो म्हणून माझ्या भारी असण्याचं कौतुक होतं हो! नाहीतर लोक मेले "वय वाढलं तर वजन कमी कर" म्हणून फार डोकं उठवतात. या वयात कुठून आणि कसं कमी करणार वजन?
30 Oct 2013 - 12:51 am | बाबा पाटील
ख्या़क्क....ओ काकू...!
30 Oct 2013 - 10:58 am | तिमा
झाडावरुन नारळाची फांदी खाली पडली. ती निवार्यासाठी ओढून नेताना त्याने जमीनही झाडली जातीये हे मानवाला कळले. मग तो त्या फांदीनेच झाडू लागला. पण फांदी अवजड असल्यामुळे हाताला रग लागली. मानवच तो. डोके वापरणारच. त्या झावळ्यातली पाने त्याने सुटी केली. आणि ती एकत्र बांधून झाडु बनवला. हाच तो आद्य झाडु!
पुढे झाडुचे अनेक उपयोगही त्याला अनुभवाने समजले. आपल्यावर दादागिरी करणार्या 'मानवा'ला झाडुने चांगले बदडून काढता येते हे एका 'मानवी'ला समजले. त्याचा यथेच्छ उपयोग होऊ लागला. पण त्यांत झाडु खराब होऊ लागले. तेंव्हा, झाडुच्या ऐवजी चामड्याच्या पट्ट्याने बडवले तर ते त्या 'मानवा'लाही समर्पण भावनेने आवडते आणि आपली वर्चस्व गाजवण्याची उर्मीही पुर्ण होते हे एका 'मानवी'ला समजले. त्यावर कथा लिहिल्या जाऊ लागल्या. या कथा वाचून त्यावर काही विकृत तर काही प्राकृत प्रतिक्रियांचे द्वंद जाहले. शंभरी पार केल्यावरच ते शमले. असो.
30 Oct 2013 - 6:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
_/\_
30 Oct 2013 - 6:28 pm | बॅटमॅन
=)) =)) =))
तिमा सर येकच णंब्र!!!!
31 Oct 2013 - 1:09 am | अत्रुप्त आत्मा
तिमा--- =)) साष् टांग नमस्कार! =))
31 Oct 2013 - 1:22 am | कवितानागेश
फाडू विवेचन! :)
30 Oct 2013 - 12:10 pm | आशु जोग
'स्तुती' हा निंदेचाच एक प्रकार आहे
असं कुणीसं म्हटलय !
30 Oct 2013 - 6:04 pm | विनायक प्रभू
हा ? ३.१४ ने विचारावा म्हणजे...
31 Oct 2013 - 1:48 pm | सुहास..
लईच !!
झाडु कोणी का बनवेना ....संपादकाच्या हातात आहे की नाही हे महत्वाचे ;)
अवांतर : एक माह भयानक विडंबन सुचले होते, पण सर्वजनीक नाही टाकता येणार ....ईच्छुंकानी व्यनी करावा ....;)