गोडवा
.
घडी भर असेच राहू, धाव धाव नको धावू!
डोक्यावरच टोपलं जरा, खाली उतरवून ठेवू!!
निळ्या करड्या दर्यात, जलद सूर घेऊ!
नाती ज्ञाती निरखत, जीवनाचा तळ गाठू!!
चल पुन्हा एकदा, पेन उधार घेऊ!
खार्या खर्या पाण्यात, गोडवा शोधत राहू!!
=======================
स्वाती फडणीस.............. १७-०७-२००८
प्रतिक्रिया
18 Jul 2008 - 1:20 am | सर्किट (not verified)
स्वातीताई,
आपली कविता (विविध भावनांचा आविष्कार असूनही) आपण विरंगुळा ह्या सदरात टाकलेली पाहून विस्मय झाला.
असे, कविता ह्या प्रांतातले आम्हाला अजीबात कळत नाही, हा आमचा आजवरचा समज खराच असल्याची खात्री पटली.
शेवटच्या कडव्यातले, "पेन" म्हणजे लेखणी की पी ए आय एन पेन ?
खार्या खर्या ही टायपो आहे का ? की खरेच तसे आहे ? (म्हणजे खार्या खार्या हवे का ?)
ज्ञाती म्हणजे जाती का ? गाठू च्या ऐवजी पाहू असावे का ? (यमकाच्या दृष्टिकोनातून ?)
अनेक प्रश्न आम्हाला सध्या सतावताहेत.
- सर्किट
18 Jul 2008 - 9:06 am | स्वाती फडणीस
कविता (विविध भावनांचा आविष्कार असूनही) जीव त्यात रमतो म्हणून तो विरंगुळा .
शेवटच्या कडव्यातले, "पेन" म्हणजे लेखणी की पी ए आय एन पेन ? पी ए आय एन
खार्या खर्या ही टायपो आहे का ? की खरेच तसे आहे ? खार्या खर्या
ज्ञाती म्हणजे जाती का ? जीव जाती
गाठू च्या ऐवजी पाहू असावे का ? गाठू च
18 Jul 2008 - 9:13 am | सुचेल तसं
घडी भर असेच राहू, धाव धाव नको धावू!
डोक्यावरच टोपलं जरा, खाली उतरवून ठेवू!!
एकदम छान. दुसरं आणि तिसरं कडवं वाचून, सर्किटप्रमाणे मला देखील जरा प्रश्न पडले होते.
अजुन एक म्हणजे, कविता पटकन संपल्यासारखी वाटली. (हा जर काही लघु कवितेचा प्रकार असेल तर मग ठीक आहे.)
http://sucheltas.blogspot.com
18 Jul 2008 - 1:27 pm | विश्वजीत
आपल्या कविता आगळ्या वेगळ्या आणि मजेशीर असतात. त्यांना विरंगुळा सदरात टाकणे योग्यच आहे.