मदत हवी आहे

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
17 Jul 2013 - 2:58 pm

नमस्कार,

कामाच्या व्यापामुळे मिपावर लिहिणे कमी (अल्मोस्ट बंदच) झाले असले तरी वाचन मात्र सुरु आहे. असो.

आपली मदत हवी आहे म्हणून हा एक नम्र विनंतीलेख!

कार्यालयाच्या कामानिमित्त ऑगस्ट २०१३ च्या पहिल्या आठवड्यात मूर्सव्हील (उच्चार चुकीचा असल्यास क्षमस्व, पहिल्यांदाच या गावाचे नाव ऐकले आहे), नॉर्थ कॅरोलीना, अमेरिका येथे सहकुटुंब (म्हणजे फक्त बायको आणि मी) जाण्याचे ठरते आहे. अजून इथली बरीच कामे बाकी आहेत. अशा नियोजित परदेशवारीचे विमान केव्हा वाकड किंवा हिंजवडीच्या ट्रॅफीकमध्ये गच्च रुतून बसेल याचा नेम नसतो. परंतु सध्या तरी हे जाणे अटळणीय आहे असे वाटते (असे नेहमीच वाटते). साधारण ६-८ महिन्यांच्या कालावधीसाठी जाणे होईल असे आम्हास सांगण्यात आले आहे.

कुटुंबासोबत प्रथमच परदेशवारी (आणि ती ही अमेरिका) घडते आहे. त्यामुळे जरा टेंशन आले आहे. तिथे घर शोधणे कितपत सोपे आहे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी आहे याचा अजून फारसा अंदाज आलेला नाहे. मला कार चालवता येत नसल्याने (हसणे बंद!) कार्यालयात आणि इतरत्र जाणे-येणे कसे करावे याबाबत भीतीदायक असा संभ्रम मनात ठाण मांडून बसलेला आहे. शिवाय घर शोधणे हे ही एक जिकीरीचे काम आहेच. हे गाव शॉर्लेपासून ('ट' चा उच्चार होतो की नाही माहित नाही, ईलिनॉयमध्ये 'स' चा होत नाही म्हणून इथे 'ट' चा होत नसावा असा भाबडा अंदाज) २५-३० माईल्सवर आहे असे ऐकले आहे. तिथले हवामान कसे आहे हे अजून पूर्णपणे कळालेले नाही.

मिपाकर मंडळींपैकी या भागात राहणारे किंवा या भागात ओळखीचे/मित्र/नातेवाईक राहत असलेले मिपाकर या बाबतीत मदत करू शकतील काय?

विशेषतः घर शोधणे आणि सार्वजनिक वाहतूकीची सोय याबाबतीत कुणी मदत करू शकले तर फार बरे होईल. बाकी उपयुक्त माहिती मिळाल्यास सोने पे सुहागा!

कृपया शक्य असल्यास मदत करावी ही विनंती!

आपला,
समीर

राहणी

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

17 Jul 2013 - 3:41 pm | चित्रगुप्त

क्रेगलिस्ट:
http://www.craigslist.org/about/sites
http://charlotte.craigslist.org/
घरांसाठी:
http://charlotte.craigslist.org/apa/index100.html
http://www.trulia.com/for_rent/Mooresville,NC/SINGLE-FAMILY_HOME_type/
http://www.homes.com/rentals/NC/City/MOORESVILLE/
भारतात असतानाच तुम्ही घर शोधू शकता:
http://charlotte.craigslist.org/hsw/

तापमान, हवामान इ.
http://www.weather.com/weather/tenday/28115

सार्वजनिक वाहतुकीची सोय नसल्यास ऑफिसपासून जवळात जवळचे घर घेऊन सायकल खरेदी करणे हा एक तात्काळ करता येण्यासारखा उपाय. ऑफिस मधील मंडळींबरोबर येणे-जाणे हा पण.

(वर लिहिलेले सर्व ठाऊक असल्यास दुर्लक्ष करावे)

देवांग's picture

17 Jul 2013 - 4:12 pm | देवांग

One of my friend is there(in the same state). Probably he can help you. Call me on ८५५-०९०-६२६२

धमाल मुलगा's picture

17 Jul 2013 - 5:17 pm | धमाल मुलगा

बिनधास्त या हो! काय टेन्शन नाय घ्यायचं. हवामान वगैरेची काहीही चिंता नको. बेष्ट आहे सध्या वातावरण. एकदम पुण्यासारखंच आहे. हां, अधूनमधून पाऊस पडतो खुळ्यासारखा, पण त्याचं काही नाही.

कुटुंबासह येताय, तर मग शेअरिंगवाल्या अपार्टमेंटचा मुद्दा बादच.


अशा सायटींवरुन अपार्टमेंट्स पाहून ठरवा.
पहिल्यांदाच येताय असं म्हणताय म्हणजे सोशल सिक्युरिटी नंबर नसेल तुमच्याकडे. तसे असेल तर ताबडतोब अपार्टमेंट्स मिळणं मुश्किल आहे.

ड्रायव्हिंगचं टेन्शनच घेऊ नका. लै सोप्पंय इकडं. दोन तासात शिकाल :)

आणि काही अडचण आली तर ९८०-२१३-९८०३ ह्या लंबरवर मला हाक मारा. मी शॉर्लेमध्येच आहे. हाय काय अन नाय काय? :)

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Jul 2013 - 5:34 pm | बिपिन कार्यकर्ते

चांगल्या गावात दिलं हो तुम्हाला कंपनीने! धमुकाका तिथेच आहेत! कसलिच काळजी करू नका! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jul 2013 - 5:53 pm | अत्रुप्त आत्मा

@चांगल्या गावात दिलं हो तुम्हाला कंपनीने! >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/yellow-laughing-smiley-emoticon.gif

प्रभाकर पेठकर's picture

17 Jul 2013 - 6:16 pm | प्रभाकर पेठकर

धमुकाका काय? धमुमामा म्हणा. अहो ते अगदी माहेरचे आहेत.

धमाल मुलगा's picture

17 Jul 2013 - 9:41 pm | धमाल मुलगा

च्यायला! थोडक्यात काय, तर एका येड्याबागड्याच्या फटक्यात तुम्ही 'मामा' केलात म्हणायचं. ;)

- मामा रेड्डी. ;)

यशोधरा's picture

17 Jul 2013 - 5:59 pm | यशोधरा

शुभेच्छा :)

उपास's picture

17 Jul 2013 - 6:19 pm | उपास

समीरसूर, तुम्हास मुद्देसूद व्यनि केला आहे.

श्रीरंग_जोशी's picture

17 Jul 2013 - 6:28 pm | श्रीरंग_जोशी

नमस्कार, अमेरिकेत स्वागत.

उत्तर कॅरोलायनामध्ये राहत नसलो तरी माझ्या स्वानुभवातून व नव्याने अमेरिकेत प्रथम वेळी येणार्‍या बर्‍याच मित्रमंडळींना खालील प्रकारची माहिती पुरवत असतो.

भारतातून चांगल्या दर्जाचा प्रेशर कुकर व त्याच्या अतिरिक्त रबरी रिंग व वॉल्व खेरीज इतर कुठलीही भांडी आणण्याची गरज नाही.

प्रथम येताना मॅगी व काही सुके वाणसामान आणावे, अमेरिकेत पोर्ट ऑफ एन्ट्री कुठे आहे यानुसार कस्टम्स चेकची डोकेदुखी कमी अधिक असते. मोठ्या शहरांतील विमानतळांवर काहीच फरक पडत नाही अन छोट्या ठिकाणी बरीच तपासणी होऊन काही गोष्टी तेथेच टाकून द्याव्या लागतात. स्थानिक भारतीय वाणसामानाच्या दुकानात जवळ जवळ प्रत्येक वस्तू मिळत असल्याने उगाचच वजनदार बॅगा का आणाव्या? (ज्याचा त्याचा प्रश्न आहे शेवटी).

पहिल्या काही आठवड्यांसाठी किचन व शटल (हापिसला जाणे येणे व जवळपासच्या दुकानांमध्ये जाणे येणे) सुविधा असलेले हॉटेल बूक करावे. तुमच्या ठिकाणी हे हॉटेल दिसत आहे.

ज्या हापिसात काम करायला येणार असाल तेथील भारतीय सहकारी सर्वाधिक उपयुक्त माहिती देवू शकतात जसे सोयिस्कर रेन्टल अपार्टमेंट व बहुतांश वेळी सुरूवातीच्या काळात तेच मदतही करतात. उदा लंच टाईममध्ये बॅंक अकाउंट उघडायला घेऊन जाणे.

एसएसएन मिळायला जरा अवकाश लागत असला तरी अधिक अनामत रक्कम घेऊन बर्‍याच ठिकाणी रेन्टल अपार्टमेंट मिळते.

अमेरिकेत गाडी चालवायला शिकणे भारतापेक्षा फारच सोपे आहे. नॉर्थ कॅरोलायनाचे ड्रायव्हिंग हँडबूक. प्रथम लेखी (प्रत्यक्षात ऑनलाइन) परिक्षा देवून इन्स्ट्रक्शन परमिट (शिकाऊ परवाना) मिळवावा लागतो. नंतर काही क्लासेस घेऊन व मित्रमंडळींच्या मदतीने रेन्टल कार घेऊन व्यवस्थित सराव झाला की ड्रायविंग टेस्ट द्यावी व लायसन्स मिळवावे. ड्रायविंग टेस्ट चित्रफीती

काही प्रश्न व शंका असल्यास कधीही संपर्क साधा jshrirang@gmail.com|+1 949 439 3740.

लंबूटांग's picture

17 Jul 2013 - 7:47 pm | लंबूटांग

मी बॉस्टनजवळ राहतो त्यामुळे north carolina मधील हवामानाची माहिती नाही पण weather.com वर तुम्हाला तेथील सरासरी तापमान कळेल.

फारसे सामान न आणण्याबाबत सहमत. त्यातून तुमच्या अपार्टमेंट मधे जर का electric coilअसेल gas cooking rangeऐवजी तर मग त्या पातेल्यांचा वगैरे तसाही फारसा काही उपयोग नसतो. स्टीलच्या ताटल्या वाट्या ही मायक्रोवेव्ह मधे वापरता येत नाहीत त्यामुळे शक्यतो भांडी कुंडी इथेच घ्या.

इंडियन स्टोअर मधे अगदी पारले जी पासून सगळे मिळते. डॉलर मधे अर्थात. ते अजून एक. डॉलरचे रुपयात कन्व्हर्जन करू नका. पहिले पहिले सर्वच करतात आणि ते नैसर्गिक आहे पण शक्य तितका प्रयत्न करा. उगाच वजन वाहून आणणे आणि ते इथे फेकून द्यायला लागण्याची रिस्क घेण्यापेक्षा इथेच घेणे बरे असे मला वाटते. माझ्या आजीने वाल आणि अजून काहीतरी आणले होते मावशीकडे येताना आणि इथे घरी आल्यावर बॅग उघडल्यावर गायब होते.

तुम्ही घरात बनवलेले मसाले, इ. वापरत असाल तर आणू शकता. (लोणची शक्यतो टाळा कारण कितीही व्यवस्थित सीलबंद केली तरी तेल गळतेच हा स्वानुभव आहे. आणायचीच असतील तर बरणी एखाद्या फेकून देता येण्याजोग्या कपड्यात गुंडाळून आणा).

अपार्टमेंटसाठी बरेचदा कोणीतरी guarantor म्हणून सही केली तरीही चालते. अर्थात त्या माणसाचा एसएसएन लागतो.

सध्यातरी इतकेच आठवतेय.

धमाल मुलगा's picture

17 Jul 2013 - 8:07 pm | धमाल मुलगा

शाब्बास रे वाघरांनो! :) ह्ये आस्सं डिट्टेलवारी सांगायला पाहिजे!

पब्लिक ट्रान्स्पोर्टबाबत कल्पना नाही. पण बहुतेक फारसं फायदेशीर नसावं. रंग्यानं सुचवल्याप्रमाणं शटल सर्व्हिस देणारं हाटिल पकडणं हेच उत्तम. नंतर एकदा ओळखी झाल्या की मग मित्रांसोबत कार-पुलींग करता येईलच.

सखी's picture

17 Jul 2013 - 7:41 pm | सखी

स्वागत आहे हिरव्या देशात. श्रीरंग_जोशींनी ब-याच गोष्टी नीट सांगितलेल्या आहेत तरी मला असे वाटते काही रोजच्या वापरातील आवश्यक भांडी इथे मिळतीलच अशी काही गॅरंटी नाही (मोठ्या शहरात मिळूही शकतील) - उदा - कढई, झा-या, उलथणे, पोळपाट-लाटणे, कुकर तर मी दोन दोन आणते - लहान नुसती खिचडी वगैरे करायला, मोठा डाळ-भात लावायला. तसेच भाज्या आमट्यांमध्ये गोडा मसाला, कांदा लसुण मसाला लागतच असेल तर तोही आणायला हरकत नाही, मेतकुट, थालपिठाची भाजणी, कारण परत तेच इथे मिळतीलच अशी काही गॅरंटी नाही - शकत्यो सगळ्या डाळी, तांदूळ, पीठे, इन्संट पॅक्स इडली-डोसा-ढोकळा-गुलाबजाम असे सहज मिळते. (तुमचे काही सहकारी आधी या भागात आलेले असतील तर त्यांना कल्पना असेल.)
मागे कोणीतरी मिपावरच सल्ला दिलेला होता तो अगदी बरोबर आहे बाहेर घालायचे गरम कपडे इथे घेतलेलेच बरे.
कार चालवण खरचं खूपच सोप आहे. आणि धम्या तिकडेच आहे म्ह्टल्यावर तुम्ही ते टेंशन सोडुन सोडाच म्हणते मी :) अजुन काही प्रश्न असतील तरी विचारा.

धमाल मुलगा's picture

17 Jul 2013 - 8:13 pm | धमाल मुलगा

सखीताई...खुद्द धम्या अजूनतरी ' श्री. भागवत' आहे गाडीच्या बाबतीत. ;) हां, मित्रांच्या गाड्या चालवतोय सुमडीत अधूनमधून.

>>मागे कोणीतरी मिपावरच सल्ला दिलेला होता तो अगदी बरोबर आहे बाहेर घालायचे गरम कपडे इथे घेतलेलेच बरे.
++१ भारतात मिळणार्‍या गरम कपड्यांचा फारसा उपेग होत नाहीच इकडे. अगदीच कुडकुडून मरण्यापेक्षा ते बरे इतकंच. मग दुप्पट खर्च होण्यापेक्षा इथेच घेतलेले बरे. ते असो. सध्या नुसतं बिनबाह्यांचं बन्यान आणि कुलकर्णी बर्मुडा घालून हिंडलं तरी घाम येईल असं वातावरण आहे. त्यामुळं गरम कपड्यांचा खर्च, ते ओझं घेऊन येणं ह्या गोष्टी टाळलेल्याच बर्‍या. :)

सखी's picture

17 Jul 2013 - 8:20 pm | सखी

अरेच्च्या ती कारबद्दलची ओळ तुझ्या नावाच्या आधीच आली. मी टेंशन नही लेनेका म्हणत होते ते काही प्रश्न, शंका असतील तर तुही तिथे जवळच आहेस म्हणुन. मी हिरव्या देशात असले तरी मिशिगनमध्ये आहे म्हणजे बरेच लांब N.C.पासुन.

धमाल मुलगा's picture

17 Jul 2013 - 8:28 pm | धमाल मुलगा

माझं थोडं कन्फुजन झालं. च्यायला, माझ्याकडे गाडी असती तर समीरसूरला आल्याबरोबर जेटलॅग जायच्या आत गाडी शिकवून टाकली असती. :)

प्रश्न शंका ह्याबाबत तर जमेल ते सांगेनच. पण जास्त डिटेल माहिती नसल्यानं हायपोथेटिकल मदत करण्यापेक्षा समक्ष मदत करणं मला जास्त शक्य होईल. :) समीरसूरशेठ, बिन्धास्त फोनवायचं...आपण काय ना काय तरी सेटिंग लावू भो. :)

श्रीरंग_जोशी's picture

17 Jul 2013 - 8:29 pm | श्रीरंग_जोशी

अमेरिकेत स्वतःची कार असणे हे उत्तमच आहे. पण नसल्यास काही ठिकाणी सिटी बस बर्‍यापैकी कामी येऊ शकतात, त्याखेरीज शटल सर्विससुद्धा कामी येते. बाके हापिसातील सहकारी, मित्रमंडळी अडी-अडचणीला असतातच.

मी सुद्धा पहिली अडीच वर्षे स्वतःची कार न घेता राहिलोय. लायसन्स निघाल्यावर दर महिन्या दोन महिन्यांनी रेन्टल कार घेऊन सर्व मोठाल्या खरेद्या करून ठेवत असे.

एक आहे की एकतर कार घेण्यामध्ये पैसे गुंतवावे किंवा मग टॅक्सी वगैरेवर खर्च होणार्‍या पैशाची चिंता करू नये.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jul 2013 - 6:06 pm | अत्रुप्त आत्मा

@बिनबाह्यांचं बन्यान आणि कुलकर्णी बर्मुडा >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif

श्रीरंग_जोशी's picture

17 Jul 2013 - 8:04 pm | श्रीरंग_जोशी

ब्रिटीश इंग्लिश व अमेरिकन इंग्लिश बोलीभाषांत बरेच फरक आहेत. मा.तं. मध्ये काम करून व अनेक हॉलिवूडपट पाहून आपल्याला बरेचदा वाटते की आपण अमेरिकन इंग्लिशबरोबर अगदी सहज जमवून घेऊ पण भल्या भल्यांचा इथे आल्यावर जरा गोंधळ होतोच. जालावर भरपूर माहिती / चित्रफीती आहेतच त्याचा जुजबी का होईना अभ्यास नक्की करा.

तुमच्या ठिकाणाहून जवळचे महाराष्ट्र मंडळ कॅरोलायना सांस्कृतीक महाराष्ट्र मंडळ हे आहे. त्यांच्याशीही आताच संपर्क साधून बघा.

मांसाहारी असल्यास खाण्याचे बरेच प्रश्न कमी होतात पण शाकाहारी / शुद्ध शाकाहारी असाल तर सांगा. इथल्या कुठल्या चेन रेस्टॉरंटमध्ये आपण काय ऑर्डर करावे ते सांगता येईल. मी इथे नवा असताना मॅकडोनाल्ड्समध्ये गेलो व चिकन बर्गर विदाऊट चिकनची ऑर्डर केली अन बर्गर मधील खालचा व वरचा ब्रेड मिळाला ;-).

या दुकानात भारतीयांना लागणार्‍या बरीच भांडीकुंडी मिळतात जसे पोळपाट लाटणे वगैरे. मी तर खलबत्ताही तिथूनच घेतलाय :-).

प्रभाकर पेठकर's picture

17 Jul 2013 - 9:00 pm | प्रभाकर पेठकर

ब्रिटीश इंग्लिश व अमेरिकन इंग्लिश बोलीभाषांत बरेच फरक आहेत.

होsss! तिकडे कारच्या 'डिकी'ला डिकी नाही म्हणत हं...'डिकी' चा अर्थ वेगळा आहे... ट्रंक म्हणतात मला वाटतं.

सखी's picture

17 Jul 2013 - 9:04 pm | सखी

हो बरोबर आहे पेठकर काका - पिडांची कथा शोधुन वाचणे आले आता.

श्रीरंग_जोशी's picture

17 Jul 2013 - 9:10 pm | श्रीरंग_जोशी

रोजच्या वापरातले किमान डझनावारी असे शब्द आहेत की फारच फरक आहे. रेस्टॉरेंटमध्ये जेवल्यावर चेक (आपण ज्याला बिल म्हणतो) मागावा लागतो अन डॉलर बिल्स ने रक्कम अदा करावी लागते (डॉलरच्या नोटांना डॉलर बिल्स असे म्हणतात). पंक्चर ला फ्लॅट टायर, एटिम कार्डला चेककार्ड, सार्वजनिक ठिकाणच्या टॉयलेट्स ला रेस्टरूम्स वगैरे वगैरे...

यासंबंधीत जालावर मनासारखा दुवा अजून भेटला नाही. फार पूर्वी ढकलपत्रातून अशी यादी मिळाली होती. हा एक दुवा जरा बरा वाटतोय.

श्रीरंग_जोशी's picture

18 Jul 2013 - 10:10 pm | श्रीरंग_जोशी

हे चित्र इथे डकवण्याकरिता धन्यवाद.

शब्दांच्या अशा घोळांमूळे बरेचदा कामाच्या ठिकाणी विनोदी परिस्थिती उद्भवते. उदा. एका भारतीय कर्मचार्‍याला डिंक हवे होते त्याने अमेरिकन सहकार्‍याकडे 'गम आहे का' अशी चौकशी केली तर त्याला च्युइंगम मिळाले. कारण अमेरिकेत डिंकाला 'ग्लु' असे संबोधले जाते.

गेल्या एक दोन दशकांत भारतातही अनेक अमेरिकन इंग्लिश शब्दांनी बोलीभाषेत स्थान मिळवले असल्याने (उदा इरेझर, ट्राउझर वगैरे) इथे नव्याने येणार्‍या भारतीयांना रुळायला सोपे जाते.

किलमाऊस्की's picture

18 Jul 2013 - 10:18 pm | किलमाऊस्की

हो, मी सुरवाती सुरवातीला डंकीन डोनट्समधे एकदा दोनदा 'सॉस' मागतीला. समोरचा प्रश्नार्थक बघायला लागला. मी त्याला सॉसची पाकिट दाखवली. तो म्हणे 'आह!! केचअप" :-P

बाकी "For Here or to Go?" हे आधी पासून माहित असल्याने तसला गोंधळ कधी घातला नाही. :-D

स्वागत. मी सध्या मिशीगन मधे आहे त्यामुळे डायरेक्ट मदत करू शकत नाही. पण माझे काही मित्र तिथे राहतात ; त्यांची ओळख करून देऊ शकतो. (माझा नंबर हवा असल्यास व्यनी करेन).

१. हवामानः सध्या हवामान उत्तम असल्याने त्याचा त्रास नाही. शिवाय नॉ.कॅ. मधे हवामान बर्‍यापैकी आल्हाददायक असते (मिशिगन च्या हिशोबाने).
२. स.स.न.: तुम्ही कोणत्या विसावर येत आहात? जर एच-१ किंवा एल-१ असेल तर तुम्हाला सोशल सेक्युरिटी नंबर मिळेल. (जर बिजिनेस विसावर येत असाल तर मिळणार नाही).
ह्या स.स.न. ची तुम्हाला सारखी गरज लागेल. इथे मिशीगनमधे काही काही रेंटल अपार्ट्मेंट वाले स.स.न. शिवाय जागा देत नाहीत .. पण असं सगळीकडे असेलच असं नाही.
३. गाडी: जर काही महिन्यांसाठीच येत असाल तर गाडी विकत घेण्यात फारसा पॉईंट नाही पण तरीही गाडी चालवता यायला पाहिजे. (जर मोठया शहरात राहात असाल तर गाडीशिवाय चालू शकेल.. नाहीतर साधा ब्रेड्/दूध आणण्यासाठीसुद्धा मित्रांकडे मदत मागावी लागेल) भारतातून लायसंस घेऊन (+ आय.डी.पी.) इथे गाडी चालवू शकाल. पण हा नियम सुद्धा सगळ्या राज्यात सेम असेलच असे नाही. (मिशीगन मधे एक वर्षापर्यंत भारतीय लायसंस वर गाडी चालवता येते).
सुदैवाने ही सगळी माहीती तुम्हाला इंटर्नेट वर मिळू शकते. त्यामुळे इथे येण्यापूर्वीच तुम्ही तयारी करू शकता.

एक उगाच आगाऊ सूचना: सहा - आठ महिन्यांचं वर्ष / दोन वर्ष सहज होऊ शकतं. (स्वानुभव)

धमाल मुलगा's picture

17 Jul 2013 - 9:08 pm | धमाल मुलगा

च्यायला! त्यांना गाडी येत नाही म्हणताहेत ते. पुण्यातून लायसन्स काढून इकडं येण्यापेक्षा त्यांना इथं आल्यावर गाडी शिकून लायसन्स काढणं जास्त सोपं, कमी खर्चीक आणि कमी मनस्तापाचं ठरेल राव. :)

६-८ महिने म्हणजे बिझनेस व्हिसा नाहीच. एल-१ असणार हे नक्की. म्हणजे एस.एस.एनच्या भानगडी आल्याच.

>>एक उगाच आगाऊ सूचना: सहा - आठ महिन्यांचं वर्ष / दोन वर्ष सहज होऊ शकतं. (स्वानुभव)
++१ त्याच अनुशंगानं एक सांगू इच्छितो, इकडं आल्यावर शक्यतो ब्यांक ऑफ अमेरिकेमध्ये खातं काढा. कंपनीच्या लेटरवर ते खातं उघडू देतात, शिवाय अनसिक्युअर्ड क्रेडिट कार्डही देतात (निदान शॉर्लेमध्ये तरी, आमच्या कुंपनीचं नाव बघून तरी देतात.) ह्याचा उपयोग क्रेडिट रेटिंग/स्कोअरसाठी जास्त चांगला होईल. आणि ६-८ महिन्यांचं २-३ वर्षं होताना दिसलं की गाडी घ्यायच्या वेळी वगैरे चांगला व्याजदर मिळायला मदत होईल. :)

आहो पण जवळ लायसन्स नसेल तर त्यांना गाडि रेन्ट ने देनार कोण?

गाडि रेन्टने घ्यायला भारतिय लायसन्स तरी लागते..

श्रीरंग_जोशी's picture

17 Jul 2013 - 10:19 pm | श्रीरंग_जोशी

इथे ऑनलाइन टेस्ट पास करून लर्नर्स परमिट (भारतातले लर्निंग लायसन्स मिळवावे). मग काही रेन्टल कार कंपन्या आपल्याला (आपण व आपला कुणी मित्र ज्याच्याकडे लायसन्स आहे असा) कार देतात. सगळ्याच देतात असे नाही.

मला इथे येण्यापूर्वी कार चालवता यायची नाही. केवळ अडीच तासाचा सराव मी इन्स्ट्रक्टरबरोबर केला, त्या गाडीला दुसर्‍याबाजूनी ब्रेक वगैरे काही नव्हते भारतात जसे असते तसे ;-). बाकी सगळा सराव मी रेन्टल कार्सवरच केला. लर्नर्स परमिट मिळाल्यापासून दिड महिन्यात लायसन्स मिळवले.

रमेश आठवले's picture

17 Jul 2013 - 8:52 pm | रमेश आठवले

खालील दोन दुवे नॉर्थ कॅरोलिनातील मराठी मंडळांचे आहेत. google शोधात मिळाले. त्यांच्याशी संपर्क करून बघा. कदाचित तुम्ही ज्या गावी जाणार आहात तेथे राहणार्या मराठी कुटुंबांचे पत्ते सुद्धा या संस्थांकडे मिळतील.
http://www.rtpmm.org/
http://www.charlottemarathimandal.com/page10.php

श्रीरंग_जोशी's picture

17 Jul 2013 - 9:03 pm | श्रीरंग_जोशी

नव्याने येणार्‍या प्रत्येकाला पहिली काही वर्षे क्रेडिट प्रोफाइल हवे तेवढे मजबूत नसल्याने काही समस्यांना तोंड द्यावे लागते (अधिक पैसे मोजावे लागणे, दर वेळी अधिक अनामत रक्कम, कुठलेही कर्ज घेताना अधिक व्याजदर).

क्रेडिट प्रोफाईल मजबूत करण्याचा एक मार्ग म्हणजे सेक्युअर्ड क्रेडिट कार्ड घेणे. ज्या बँकेत आपण सॅलरी अकाउंट काढतो तेथे असे क्रेडिट कार्ड मिळवणे नव्या माणसाला सोपे जाते. नंतर काही महिन्यांनी / वर्षभरानी इतर कंपन्यांच्या क्रेडीट कार्ड्सच्या ऑफर येऊ लागतात.

बाकी क्रेडीट कार्डच्या लिमिटच्या किती टक्क्यांपर्यंत खर्च करावा यावर मार्गदर्शन मिळवावे (जालावर / तज्ञ मंडळींकडून)

टीपः हि माहिती मी स्वानुभावातून देत आहे मी बँकींग क्षेत्राशी संबंधीत नाहीये.

धमाल मुलगा's picture

17 Jul 2013 - 9:13 pm | धमाल मुलगा

क्रेडिट लिमिटच्या ३०% ही डेडलाईन. त्यापुढं गेलं की भुंगा तुमचं प्रोफाईल पोखरायला सुरु करतोय. वर सांगितल्याप्रमाणे बँक ऑफ अमेरिका अनसिक्युअर्ड कार्ड देताहेत, ते शक्यतो तुमच्या वार्षिक पगाराच्या १०% लिमिटचं देताहेत. त्याच्या ३०% महिन्याचा खर्च म्हणजे लै डोक्यावरुन पाणी. आपण देशी पपलिकनं त्याची चिंता करायची फार गरज नाही असं मला वाटतं. (आमच्यासारख्या उधळ्यांचा अपवाद वगळता! ;) )

शक्यतो सगळ्या सहकर्मचार्‍यांच्या पगाराचे खाते ज्या बँकेत आहे तिथेच आपलंही खातं उघडावं, ब्यांकांना तुमच्या कंपनीचा अंदाज आलेला असतो त्यामुळं ते काही पेश्शल ऑफर्स, अनसिक्युअर्ड क्रेडिट कार्ड (एस.एस.एन. नसतानाही) देतात असा अनुभव आहे.

श्रीरंग_जोशी's picture

17 Jul 2013 - 9:18 pm | श्रीरंग_जोशी

पण ३०% टक्के म्हणजे फारच कमी. ५० ते ६०% च्या पलिकडे गेल्यास नकारात्मक परिणाम होतो असे ऐकले आहे. उदा. १५०० डॉलर भरून सेक्युअर्ड क्रेडीट कार्ड घेतले तर किमान महिन्याला ७००-८०० डॉलर्स तरी खर्च करता यायला हवे.

बाकी समीरसूर - तिकडे पोचल्यावर धमालपंतांच्या लिमोतून सफर करायची संधी सोडू नका ;-).

धमाल मुलगा's picture

17 Jul 2013 - 9:31 pm | धमाल मुलगा

३०% लिमिट हे बेष्ट पर्फॉर्मन्स राखण्यासाठीचं आहे असं बर्‍याच फोरम्स, ब्लॉग्ज आणि एका अकाउंटंटकडून समजलं. खरं खोटं ट्रान्स युनियन जाणे. :)
सेक्युअर्ड आणि अनसेक्युअर्डसाठी बाकीचे सगळे नियम सारखेच असतात का? सेक्युअर्डच्या भानगडीत पडायची वेळच आली नाही त्यामुळं त्याबद्दल खोदकाम केलं नाही कधी.

>>बाकी समीरसूर - तिकडे पोचल्यावर धमालपंतांच्या लिमोतून सफर करायची संधी सोडू नका
अलबत अलबत! अरेऽ...ह्या धम्याच्या दोस्तीची परिक्षा घेता काय बे? आपल्या बुडाखाली गाडी नसली तरी दोस्तांसाठी आपण सेटिंग लाऊन सोय करु की! रंग्या, येतोयस का तू पण? चल, तुलाही हिंडिवतो की. :)

श्रीरंग_जोशी's picture

17 Jul 2013 - 9:35 pm | श्रीरंग_जोशी

येतोच तिकडे लिमोतून फिरायला.

अन तू इकडे आलाकी यॉचमधून फिरवीन लेक मिनेटॉन्कामधून ;-).

बाकी क्रेडीट स्कोअर अमेरिकेत काही वर्षे घालवल्याशिवाय वर येत नाहीच त्यामुळे जरा वाट पहावीच लागते. जाणकार लोक मार्गदर्शन करतीलच.

धमाल मुलगा's picture

17 Jul 2013 - 9:40 pm | धमाल मुलगा

बाकी क्रेडीट स्कोअर अमेरिकेत काही वर्षे घालवल्याशिवाय वर येत नाहीच त्यामुळे जरा वाट पहावीच लागते. जाणकार लोक मार्गदर्शन करतीलच.

:) कसा ठाऊक नाही...पण आपला रेटिंग ट्रान्स एकूण ५ महिन्यांच्या कालावधीत क्रेडिटकर्मा.कॉम नुसार 'गुड' आहे. (थोडक्यात...उधळा तिच्यायला!!! पण म्हैन्याच्या म्हैन्याला पेमेंटला चुकू नका.)

राघवेंद्र's picture

17 Jul 2013 - 9:47 pm | राघवेंद्र

कमी पैश्यामध्ये अमेरिका बघायची (डी सी, न्यु योर्क, नायगारा इ. ) असेल तर http://www.taketours.com/ ही टुर कंपनी छान आहे.

किलमाऊस्की's picture

17 Jul 2013 - 10:10 pm | किलमाऊस्की

वर सर्वांनी उत्तम माहीती लिहिलीच आहे. माझं वास्तव्य सध्या पश्चिम किनार्‍यावर असल्याने डायरेक्ट मदत नाही करु शकत. परंतु काही गरज लागल्यास नक्की कळवा. आता माझेही दोन पैसे -
सध्या एकूणच उन्हाळा चालू असल्याने वातावरणाचा उत्तम आहे. त्यामुळे ती चिंता नको. तुम्ही किती महिन्यांसाठी येत आहात? एक वर्षापेक्षा कमी कालावधी असेल तर गाडी न घेता तुमच्या भागातल्या ट्रांझिट सिस्टमवर अवलंबून रहाता येईल. माझ्याजवळही गाडी नाही गेले ७-८ महिने पण इकडची ट्रांझिट सिस्टम अफाट आहे. थोडं वेळेच गणित जमवता तर काहीही बिघडत नाही. बाकी बसेस एकदम टायमावर अवतरतात स्टॉपवर. त्याचा धसका घेउन मीच ५ मिनीटं आधी पोचते स्टॉपवर.

तुमच्या ऑफिसमधल्या सहकार्‍यांशी बोललात तर अधिक माहीती मिळू शकेल. शक्यतो एका ऑफिसमधले लोकं साधारण जवळजवळ रहातात. तुम्हीही तिथेच घर पाहू शकता. शक्यतो इंडीयन स्टोअर जवळ असेल असं बघा.

येतांना कूकर आणा, घरगुती मसाले वापरत असाल तर ते आणा, भाजणी, मेतकूट आणलं तरी चालेल. डाळ्,तांदूळ, लोणची, कडधान्य अजिबात नको. जेवणात वाटणाची सवय असेल तर नारळ मिळतो अथवा फ्रोझन कोकोनट मिळत. आपल्यासारखे मिक्सर मिळत नाहीत. मॅजिक बुलेट तत्सम काही घेउन वाटण, चटण्या बनवता येतं. गरम कपडे अमेरि़केतच घेतलेले बरे. बरेच सेल, डिस्काउंट वर्षभर चालूच असतात. आसपासची दुकानं माहीत होईपर्यंत अमेझॉन.कॉम झिंदाबाद!! घरपोच वस्तू येतात. पूर्व किनार्‍यावर बरेच भारतीय असल्याने इंडीयन स्टोअर्स, हॉटेल्स बरीच आहेत. जरूरी, इमर्जंसी औषधं आणा. आल्याआल्या ऑफिसमधे जरुरी इंश्युरंसचं काम करुन टाका. बायकोचं नावही त्यात घालायला विसरू नका. अन्यथा वेळेला चांगलाच फटका पडू शकतो.

नॉनवेज खात असाल तर प्रश्न नाही नाही. वेज असाल आणि बाहेर खायची वेळ आली तर सब वे गाठू शकता. तिथे वेजी पॅटी ऑर्डर करायची. नाहीतर मेक्सिकन 'टाको'त ही वेज ऑप्शन असतात. भारतीय जिभेला सवय व्हायला वेळ लागेल थोडा.

फोन कॉन्ट्रॅक्टवर मिळतो. इंस्ट्रुमेंट असेल तर प्रिपेड कनेक्क्षन घेउ शकता. मी सध्या टी-मोबाईल प्रिपेड वापरतेय. $३० महीना. १५०० मिनीटं मिळतात. अन्यथा $५० अनलिमिटेड कॉल, इंटरनेट हाही ऑपशन आहे. भारतात कॉल करण्यासाठी वॉनेज घेउ शकता. आम्ही इंडीया एलडी वापरतो. $७ मधे ५०० मिनीटं मिळतात. वाटल्यास रिफिल करता येतं.

एच वन वर येताय असं गृहीत धरलं तर बायको नोकरी करु शकत नाही. घरात बसून कंटाळा येणार असेल तर गावातली लायब्ररी लावून देऊ शकता. ईकडे फुकटात लायब्ररी उत्तम सेवा देतात. अगदी खजिनाच असतो. बायकोला आवड असेल तर वॉलिंटीअर वर्क करु शकते. लायब्ररी, म्युझियम्स या ठिकाणी चांगला अनुभव देणारी वॉलिंटिअरींगची कामं मिळतात. Its a differant experiance!!!

सुरवातीला पैसे जरा जपूनच वापरा. क्रेटीड हिस्ट्रि नसेल तर काही ठिकाणी डिपॉझिट भरावं लागत. तसंच नवख्या भागात गाठीला पैसे असलेले बरे. बाकी ऑफिसमधले सहकारी मदत करतातच.

सध्या एवढच. काही लागलं तर कळवा. मुख्य म्ह्णजे जितके दिवस इथे आहात तितके दिवस भरपूर फिरा. बघण्यासारखी अनेक अजब ठिकाणं आहेत इथे.

प्रभाकर पेठकर's picture

18 Jul 2013 - 2:07 am | प्रभाकर पेठकर

'चिपोटले' आहे की.

तसं, पिटा ब्रेड, फलाफल ही ट्राय मारु शकता.

मी सध्या टी-मोबाईल प्रिपेड वापरतेय. $३० महीना. १५०० मिनीटं मिळतात. अन्यथा $५० अनलिमिटेड कॉल,
बरं झालं समजलं. हे टी मोबीलवाले चावट आहेत. मीही आता प्रिपेड सेवा वापरायला लागावी काय हा विचार करत होते. मला व नवर्‍याला दोघांना मिळून फक्त ५०० मिंटं देत होते $ ५० मग १००० मिंटं मागितली तर १०० $ घेतलेन मेल्यांनी. आता हा प्ल्यानच बदलते. तरी नुकतेच वाद घालून झाले, तशी त्यांनी ५०$ कमी केले आणि आम्ही प्ल्यान बदलायचा विचार सुरु केला.

काँट्रक्टमधे असेल तर माहीत नाही मला हा प्लॅन देतील का ते. $३० प्लॅन मधे महिन्याला १५०० मिनीटं टॉक टाईम + मेसेज पकडतात ते. आणि इंटरनेट ३० एम. बी मिळतं. $५० प्लॅन मधे टाईम + मेसेज + इंटरनेट अनलिमिटेड मिळतं.

अच्छा! मला टी मोबिलवाले दर २२ महिन्यांनी नवा (बहुधा खपत नसलेला)सेलफोन देतात. ;)

मला नॉ कॅ ची फारशी माहिती नाही. माझी भाची आत्ताच लग्न करून तिथे गेल्याने अजून तीही तशी नवीनच!
अपर्टमेंट्साठी बरेचदा कंपनी मदत करते. चौकशी करून बघा. चौकशी न केल्याकारणाने तशी मदत केली न जाण्याची एक केस मला समजलीये. ते नाहीच म्हणाले तरी काळजी करू नका. चाम्गल्या टाऊनमध्ये, चांगल्या अपर्टमेंटमध्ये राहिलात तर जास्त बरे. भारतातून आणलेल्या थंडीच्या कपड्यांचा काहीही उपयोग होत नाही. उगीच विंटरच्या सुरुवातीला काही दिवस वापरता येतील. ;) खाण्यापिण्याचे सामान बर्‍यापैकी मिळते (तरी पहिल्यांदा गोडा मसाला/ नेहमी वापरला जाणारा मसाला, चटण्या आणा. अगदी लगेच खानपानसेवा शोधायला लागू नये म्हणून टिकावू प्रवासे पदार्थ आणलेत तरी चालेल). औषधे आणायची गरज असल्यास डॉ. चा कागुद आणावा. कार चालवण्याची आवड आपोआप निर्माण होईल, कारण ती गरज आहे. तुमच्या इथे सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे का याची चौकशी करावी लागेल. बाकी काहीही लागल्यास धम्याला पकडा किंवा मला व्यनि करा. ;)
शुभेच्छा!

धमाल मुलगा's picture

18 Jul 2013 - 1:47 am | धमाल मुलगा

ते धम्याला पकडा अगदीच बाबुरावला पकडा सिनेमासारखं वाटलं राव :(

कसले कसले शिनेमे माहित असतात रे तुला!

धमाल मुलगा's picture

18 Jul 2013 - 2:00 am | धमाल मुलगा

रिकामा धम्या.....इंटरनेटला तुंबड्या लावी :D

प्रभाकर पेठकर's picture

18 Jul 2013 - 2:17 am | प्रभाकर पेठकर

धमाल मुला, एकटाच असशील तर 'बाबुरावला पकडा' पेक्षा 'बाबुरावला (कसं) आवरा' ते इंटरनेटावर शोध.

धमाल मुलगा's picture

18 Jul 2013 - 2:44 am | धमाल मुलगा

सध्या अपार्टमेंटमध्ये नवं खुळ चालू झालंय. रद्दडातले रद्दड सिनेमे लावायचे आणि जो पाहू शकणार नाही त्यानं विकांताला क्लब्सचे कव्हर चार्जेस भरायचे. :) मिथूनदयेनं अजूनतरी माझ्यावर हरण्याची वेळ आलेली नाही. :D

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jul 2013 - 6:07 pm | अत्रुप्त आत्मा

@एकटाच असशील तर 'बाबुरावला पकडा' पेक्षा 'बाबुरावला (कसं) आवरा'>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif

किलमाऊस्की's picture

18 Jul 2013 - 11:31 pm | किलमाऊस्की

अपर्टमेंट्साठी बरेचदा कंपनी मदत करते. चौकशी करून बघा. चौकशी न केल्याकारणाने तशी मदत केली न जाण्याची एक केस मला समजलीये. ते नाहीच म्हणाले तरी काळजी करू नका.

हे खरंय. तुमच्या कंपनीला विचारा. माझी कंपनी सुरवातीचा आठवडा Exteded Stay America या हॉटेलमधे सोय करायची. आठवड्यात घर नाही सापडलं तर कंपनीच्या Discount Rate मधे स्टे वाढवता येत असे. मला शेअरींग मधे घर न मिळाल्याने मी अजून आठवडा वाढवलेला. ते पैसे मला भरावे लागलेले. कंपन्या शक्यतो ऑफिसपासून जवळच हॉटेल बघतात.

माझ्या नवर्‍याला कंपनीने स्टे नव्ह्ता दिला. पण एक महिन्याचा पगार आगाउ भारतातच दिला तसंच Crediत Card हि दिलेलं. त्यामुळे सुरवातीला अपार्ट्मेंट घेतांना डिपॉसिट भरतांना प्रश्न आला नाही. तुम्ही चौकशी करा ऑफिसमधे.

श्रीरंग_जोशी's picture

18 Jul 2013 - 8:06 am | श्रीरंग_जोशी

पुण्यातून कर्मचार्‍यांना कामानिमित्त परदेशात पाठवणार्‍या कंपन्या पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरूनचे तिकिट काढून देऊ लागल्या आहेत का?

अमेरिकेतील ठिकाणासाठी अगोदरच २२-२३ तासांचा प्रवास असतो त्यात ९-१० तास अगोदर पुण्यातून रस्त्याने निघायचे अन मुंबई शहरात प्रवेश करून संपूर्ण वाहतूकीचे अडथळे पार करून छत्रपती शिवाजी आंतराष्ट्रीय विमानतळावर पोचावे लागते. अन तेथे पोचल्यावरचे वातावरण व वर्दळ पाहता महाराष्ट्रातली अनेक बसस्थानके बरी अशी अवस्था असते.

तसेच बहुतांशी आंतराष्ट्रीय विमाने मुंबईला मध्यरात्री उतरत असल्याने व नंतर मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर संपूर्ण रात्रभर कुर्मगतीने प्रवास करावा लागतो (रात्रीच्या वेळी मोठाले ट्रेलर्स त्यांना दिवसा प्रवेश नसल्याने बहुसंख्येने असल्याने इतर वाहनांनाही वाहतुकीच्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो).

त्याऐवजी पुण्याहूनच तिकीट असल्यास हे सर्व द्राविडी प्राणायम करायची वेळ येणार नाही. व मुंबई पुणे रस्त्याने प्रवास करायचा खर्चही वाचेल.

पहिल्या काही वेळेस मुंबईहून प्रवास करण्याचे असे अनुभव आल्यावर मी जमेल तेव्हा पुण्याचे तिकीट काढतो. पण आजवर आंतराष्ट्रीय विमानाने पुण्याला यायची व उड्डाण करण्याची संधी मिळाली नाही. नवी दिल्ली व बेंगरुळू आंतरराष्ट्रीय विमानतळांचा अनुभव मुंबईपेक्षा बराच चांगला आहे.

रेवती's picture

18 Jul 2013 - 9:15 am | रेवती

सहमत. पण मला नाही वाटत पुण्यापासून व्यवस्था करीत असतील. मीही शक्य असेल तेंव्हा पुण्यापर्यंत जायला शिकलीये. तो मुंबईचा छ शि हवाईअड्डा नको झालाय. एक पुस्तक लिहू शकीन त्या अनुभवांवर. उतरल्यानंतर सगळ्यात भीती वाटते ती पेंगणार्‍या ड्रायव्हरांची! दोनेक वेळा तर गाडी थांबवून दोन तीन तास झोप घेऊ द्यावी लागली होती. भलेही सगळेजण खिडकीबाहेर बघत असतील, मी सतत चालकरावांच्या डोळ्यांकडे बघत असते म्हटले तरी चालेल. बरं, कारण विचारलं तर "अहो ताई, पहाटेपासून तिसर्‍यांदा येतोय. काल ३ तास झोपलो." असं काही ऐकून आपल्यालाच वाईट वाटतं.

प्रभाकर पेठकर's picture

18 Jul 2013 - 4:33 pm | प्रभाकर पेठकर

पण आजवर आंतराष्ट्रीय विमानाने पुण्याला यायची व उड्डाण करण्याची संधी मिळाली नाही.

मार्गे दुबई किंवा फ्रँकफर्ट गेलात तर तशी संधी मिळू शकेल. एअर इंडियाची पुणे - दुबई अशी विमानसेवा आहे. तर लुफ्तांझाची पुणे - फ्रँकफर्ट अशी सेवा आहे.

श्रीरंग_जोशी's picture

18 Jul 2013 - 5:18 pm | श्रीरंग_जोशी

मी शिकागोसारख्या ठिकाणी राहत असतो तर लुफ्तान्साच्या मार्गे फ्रँकफर्ट सेवेने केवळ १ थांबा घेऊन पुण्यात पोचता आले असते. हे (मिनियापोलिस - सेन्ट पॉल) डेल्टा चे हब आहे व एअर फ्रान्स, केएलएम यांच्याबरोबर डेल्टाची युती असल्याने इथून पॅरिस वा अ‍ॅमस्टरडॅमचा थांबा घेऊन नवी दिली, मुंबई व बंगळुरूला चांगली सेवा आहे. गेल्या भारतवारीत काश्मीर पहायचे असल्याने जातानाचे तिकीट दिल्लीपर्यंतचे होते व परतीचे पुणे बंगळुरू व मग आंतराष्ट्रीय असे होते.

इथे लुफ्तान्साची सेवा सुरू व्हायला हवी किंवा वर उल्लेखलेल्या त्रयीने पुण्याचे विमान सुरू करायला हवे म्हणजे फारच सोय होईल :-).

रमेश आठवले's picture

18 Jul 2013 - 10:32 am | रमेश आठवले

मी परदेशी जाण्यापूर्वी इथे भारतात driving license मिळवले. त्याच्यासाठी गाडी चालवायला शिकण्याचे learning license घेतले व driving शाळेत जाउन शिकलो. माझ्याजवळ गाडी नसल्यामुळे काही दिवसांनतर मित्राची गाडी वापरून टेस्ट दिली व भारतीय license मिळवले. त्याच्या आधारावर मग international license स्थानिक आर. टि. ओ . मधून घेतले . हे license जगात जवळ जवळ सर्व देशात चालते.
valid license असतानासुद्धा त्या युरोपातील देशात रस्त्यावर उजव्या बाजूने गाडी चालवण्याची सवय नसल्याने आणि स्थानिक traffic नियम समजण्यासाठी व माझ्या ऑफिस कडे जायचा सराव करण्यासाठी तेथील driving शाळेच्या माणसाबरोबर बसून ८ दिवस शिकलो. नंतर गाडी घेतली. वर्षाच्या शेवटी सम्बन्धित ऑफिस मध्ये गेल्यावर त्यांनी त्या देशाचे वयाचे ७० पूर्ण होईपर्यंत चालणारे कायम स्वरूपाचे license दिले.

समीरसूर's picture

18 Jul 2013 - 10:50 am | समीरसूर

शतशः आभार! खूप उपयुक्त माहिती मिळतेय. मी याआधी एकदा अमेरिकेला (एकटाच) जाऊन आलेलो आहे त्यामुळे माझ्याकडे एसएसएन आहे. मी एच१ व्हिसावर येणार आहे त्यामुळे बायकोला काम करता येणार नाही.

मोबाईल फोनचे अजून काय पर्याय उपलब्ध आहेत? हेमांगीके म्हणतात त्याप्रमाणे $५०/महिना हा प्रीपेडचा पर्याय चांगला (वाचा: स्वस्त) आहे काय? यात स्वतःचा हँडसेट वापरावा लागतो का?

६-७ महिन्यांसाठी येत असल्याने कार विकत घेण्यात काही पॉईंट आहे का? मला कार चालवता येत नाही. कधीच प्रयत्न देखील केलेला नाही म्हणून हा पर्याय टाळण्याकडे माझा कल आहे हे सुज्ञांच्या (म्हणजे सगळ्यांच्याच) लक्षात आले असेलच. :-) मी जिथे राहीन तिथून साधारण ४-५ माईल्सवर माझे कार्यालय असणार आहे. मूर्सव्हीलमध्ये भारतीय दुकाने आहेत असे समजले.

अजून एक, क्रेडित कार्ड घेणे आवश्यक आहे का? मी मागच्या वेळेस विना क्रेडिट कार्ड राहिलो होतो. अर्थात तेव्हा मी फक्त ३ महिने राहिलो होतो. माझ्याकडे भारतात देखील क्रेडिट कार्ड नाहीये. काही अप्रिय अनुभवांमुळे मी क्रेडिट कार्ड ही संकल्पनाच माझ्या आयुष्यातली बाद करून टाकली.

ज्यांनी फोन नंबर्स आणि ईमेल आयडीज दिले आहेत मी त्यांना फोन करून शंका विचारू शकतो असे मी गृहित धरत आहे. :-) तसदीबद्दल आगाऊ क्षमस्व! मी सगळे नंबर्स साठवून ठेवीन.

धमाल मुलगा, तुमच्या प्रतिसादाने जरा मोकळं वाटतयं. श्रीरंग_जोशी, हेमांगी के, उपास, लंबूटांग, अमित तलथि, मराठे, सखी आणि सगळ्यांच्या उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल आणि मदतीच्या तयारीबद्दल शतशः धन्यवाद!

वर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास बरे होईल. बाकी सगळी माहिती उपयोगी ठरेलच आणि गरज लागेल तशी माहिती मी विचारीनच.

श्रीरंग_जोशी's picture

18 Jul 2013 - 6:01 pm | श्रीरंग_जोशी

भारतातून स्वतःचा हँडसेट आणल्यास प्रिपेड वा पोस्टपेड दोन्हीमध्ये केवळा सिम घेण्याचा पर्याय उपलब्ध आहेच (एटिअ‍ॅन्डटी). बहुतेक वेळी आपण काम करतो त्या कंपनीच्या कर्मचार्‍यांना फोन कंपनीद्वारे १२% किंवा २४% अशी सुट असते पोस्टपेड कनेक्शन घेतल्यास. पण सुट घेताना त्या दुकानात २ वर्षांचा करार नाहीये ना याची खात्री करून घ्या. पोस्टपेडमध्ये ३९.९९ + कर - सुट असा किमान प्लॅन घ्यावा लागतो. चतुरभ्रमणध्वनी असल्यास डेटाप्लॅन वेगळा.

एटीअ‍ॅन्डटी व वेरायझन यांच्या सेवेचा दर्जा चांगला आहे.

इथे येऊन कार शिकल्याने व लायसन्स घेतल्याने वास्तव्याच्या काळात ज्या सहली कराल त्यात रेन्टल कार घेता येईल अन सहलीचा आनंद अधिक उपभोगता येईल. बरेच नॅशनल पार्क जसे ग्रँड कॅनियन वगैरे ठिकाणी स्वतः कारने फिरण्यात जी सोय होते व आनंद मिळतो कुठल्या टुरबसबरोबर नक्कीच मिळू शकत नाही.

क्रेडिट कार्ड अमेरिकेत तरी जवळजवळ आवश्यकच आहे. अन माझ्या अनुभवानुसार अमेरिकेतील कडक कायद्यांमुळे व अंमलबजावणी करणार्‍या सजग व्यवस्थेमुळे आपण नेटकेपणाने बिल भरल्यास कुठलाही वाईट अनुभव येण्याची शक्यता नसल्यातच जमा आहे. दुसरा मुद्दा असा की इथले रिवॉर्ड प्रोग्राम्स फारच फायद्याचे ठरतात. मला दरवर्षी किमान ५०० डॉलर्स तरी कॅशबॅकद्वारे परत मिळतात.

इथे येऊन स्थिरस्थावर झाल्यावर सांगा, इथे ऑनलाइन खरेदीद्वारे चांगल्या डील्स मिळवणे वगैरे यावर चर्चा सुरू करता येईल.

वर फोन क्र. दिलेला आहेच, संपर्क साधण्यास कधीही संकोचू नका.

टीप: पुण्यातून निघण्यापूर्वी बाजीराव रस्त्यावरील चितळे बंधूंच्या मुख्य दुकानातून एकदम ताजी बाकरवडी आणल्यास व ती कामाच्या पहिल्याच दिवशी सहकार्‍यांमध्ये वाटल्यास त्यांच्याबरोबर मधुर संबंध प्रस्थापित होणे अगदी सहज होईल :-). इथे आयात केलेली मिळते पण ती जरा मिळमिळीत असते. भारतातून आलेली ताजी बाकरवडी खायचा मजा काही औरच.

प्रभाकर पेठकर's picture

18 Jul 2013 - 7:02 pm | प्रभाकर पेठकर

पुण्यातून निघण्यापूर्वी बाजीराव रस्त्यावरील चितळे बंधूंच्या मुख्य दुकानातून एकदम ताजी बाकरवडी आणल्यास व ती कामाच्या पहिल्याच दिवशी सहकार्‍यांमध्ये वाटल्यास त्यांच्याबरोबर मधुर संबंध प्रस्थापित होणे अगदी सहज होईल

आखातात येणारे कोणी असतील (नोकरी व्यवसायासाठी, मित्रांना/नातेवाईकांना भेटण्यासाठी किंवा सफरीसाठी) त्यांनी बाकरवडी किंवा इतर पदार्थ (जसे अनारसे, एखादा केक एखादी मटण डिश) ज्यात 'खसखस' असते असे पदार्थ आणण्याचे कटाक्षाने टाळावे. (कोणी मागवले असतील तरीही). , इथे 'खसखस' वर बंदी आहे (ती 'ड्रग' ह्या वर्गात मोडते). दहा वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा आहे. पकडले गेला नाहीत तर बाकरवडीचा आनंद मिळेल पकडले गेलात तर दहा वर्ष सक्तमजूरी. चॉईस इस यूवर्स..!

श्रीरंग_जोशी's picture

18 Jul 2013 - 8:04 pm | श्रीरंग_जोशी

आखाताखेरीज सिंगापूरच्या अशा नियमांविषयी व निरपराध व्यक्तिस झालेल्या अनेक वर्षांच्या तुरूंगवासाविषयी ऐकले आहे.

मी स्वतः अमेरिकेत येताना अनेकदा ताजी बाकरवडी, घरी बनलेले अनरसे, चिवडा अनेकदा आणले आहेत, माझ्या ओळखीच्या बहुतांश व्यक्ती अशा अनेक गोष्टी आणत असतात. काही दक्षिण भारतीय मित्रमंडळी खाण्याचे / वाणसामानातले जे काही आणतात अन जितक्या प्रमाणात आणतात ते पाहून डोळे पांढरे व्हायची वेळ येत ;-).

पण अशा वेळी कस्टम्स अधिकार्‍यांकडून थोडीफार प्रश्नोत्तरे व काही पदार्थ तिथे टाकून द्यावे लागणे (उदा साबुदाणा) याखेरीज कुठलेही उदाहरण पाहिलेले नाहीये. अमेरिकेतील बर्‍याच मोठ्या विमानतळांवर 'सम ड्राय इंडियन स्नॅक्स' आणले आहेत असे सांगितले तर बॅग उघडून तपासणीही केली जात नाही. एक्स रे मशीनमधून होत असतेच.

माझी Port of Entry सानफ्रान्सिस्कोला होती. घरी येउन बॅग उघडली तेव्हा बाकरवडी नसलेल्या बॅगतलं सामान तसुभरही हललं नवह्तं पण बाकरवडी असलेल्या बॅगेची कसून पाह्णी केली असं वाटलं. सात आठ पाकीटं होती बाकरवडीची. त्यातलं एक फोडलेलं दिसलं. बाकी भाजणी वैगेरेच्या पिशव्यांवर मी इंग्रजीत लेबल लावून आणलेलं. तिला हात नाही लावला. फोडलेलं बाकरवडीचं पाकीट बॅगेत मस्त पसरलं आणि ते साफ करता करता मला चितळे आठवले. :-)

पण हा अनुभव सर्वांनाच येइल असं नाही आणि चालतं आणलं तर.

सखी's picture

18 Jul 2013 - 7:05 pm | सखी

इथे येऊन कार शिकल्याने व लायसन्स घेतल्याने वास्तव्याच्या काळात ज्या सहली कराल त्यात रेन्टल कार घेता येईल अन सहलीचा आनंद अधिक उपभोगता येईल. बरेच नॅशनल पार्क जसे ग्रँड कॅनियन वगैरे ठिकाणी स्वतः कारने फिरण्यात जी सोय होते व आनंद मिळतो कुठल्या टुरबसबरोबर नक्कीच मिळू शकत नाही.
+१. अगदी सहमत. इथे शनिवार+रविवारी ड्राईव्ह करुन बरेच लोक बाहेर जायचा प्लान करतात - पुण्यातल्या ट्रफिकसारखे इंच इंच लढावे लागत नाही, आणि कारही सोप्या शिकायला. तुमच्याबरोबर लहान मुलं नाहीत असे दिसते, तर सपत्नीसह तुम्हाला नविन देश बघायला खूप संधी आहे - आणि बघण्यासारख्या खरचं खूप गोष्टी आहेत. कारने गेल्यास स्वस्त पडते, सोयीचे पडते. जरी बस-ट्रेन अशी सोय दुस-या शहरात, राज्यात जाण्यासाठी असली तरी. मी जिथे आहे तिकडे सार्वजनिक वाहतूकीची सोय जास्त नाहीये. तुम्ही सुरवातीला ६-७ महिनेच असाल तर सेंकड हॅन्ड कार घेऊ शकता (बहुतेक देसी असे करतात - बरोबर अनुभवी मित्राला घेऊन गेलेले बरे, म्हणजे फार प्रोब्लेमाटीक कार नको पडायला कारण तशा नंतर खर्चिक ठरु शकतात) किंवा रेंटवर कार घेऊ शकता, फक्त विकांताला कुठे जायचे आहे तर फक्त १,२ दिवसांसाठीही रेंटवर घेऊ शकता. पण इंटरनॅशनल लायसन्स पुण्यात घेण्याची मला तरी आवश्यकता वाटत नाही. आठवल्यांनी सांगितल्याप्रमाणे - तिकडे क्लासेस घेऊन, पैसे भरुन, टेस्ट देऊन, तुम्हाला ते सगळे परत इथे करावेच लागेल, परत इकडचे नियम वेगळे त्यामुळे धम्या म्हटला तसा त्याचा फारसा उपयोग होईल असे वाटत नाही. कार घेण्याचा निर्णय तुम्ही इथे आल्यानंतर, एखादा महीना गेल्यावर, परिस्थितीचा अंदाज आल्यावर घेऊ शकता.
क्रेडित कार्ड घेणे आवश्यक आहे का?
क्रेडिट कार्ड घेण्याने तुमची क्रेडिट हिस्टरी बिल्डअप होते. ज्याचा भविष्यात उपयोग होऊ शकतो, तुमचा स्वत:चा अपार्टमेंट घ्यायला (कोसाईनरशिवाय), नविन कार घ्यायला, घर घ्यायला. मुख्य म्हणजे क्रेडिट रिपोर्ट बघितला जातो ते तुम्ही तुमची बिलं वेळच्यावेळी भरत आहात ना यासाठी.

फोनवर मिळणारी मिनिटे पुरेशी आहेत काय हे तपासायला लागेल. भारतात फोन करणे हे फक्त खुशाली कळवण्याच्या पलिकडे जाते आणि आज कोणती भाजी केली असे होत जाते. ते अपरिहार्य आहे. त्यासाठी इंटरनेट (वॉनेज फोन, स्काईप) सुविधा चाम्गली आहे पण कधीकाळी फोनवर बोलावे लागले तर सोय करावी लागेल. कॉलिंग कार्ड्स हा पर्याय फक्त पर्याय म्हणून सांगत आहे. वॉलमार्टमधील ही सुविधा पहावी. http://www.walmart.com/ip/TracFone-Samsung-S125G-Prepaid-Cell-Phone-Bund...
तुम्ही कार विकत न घेता रेंट करू शकाल. चालक परवाना भारतातून आणल्यास सगळ्यात चांगले. गाडी चालवण्याला पर्याय नाही. पूर्वी तरी तो परवाना १८ महिन्यांसाठी असे. तुम्ही सात आठ महिने आहात म्हणजे वाहन आवश्यक. थंडीमध्ये पंचाईत होण्याआधी ती सोय करावी लागेल.

क्रेडीट कार्ड आवश्यक आहे. जर आणखी काही काळासाठी इथेच राहण्याची वेळ आली तर आपापले वाहन विकत घेण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी ते आवश्यक! आधी काही फार किमतीचे कार्ड मिळणार नाही तरी जे काय मिळेल त्याचे पैसे वेळेवर दिल्यास ते जमून जाईल. मलाही क्रेका आवडत नाही म्हणून तुम्ही म्हणताय ते समज्ते आहे.

श्रीरंग_जोशी's picture

18 Jul 2013 - 8:20 pm | श्रीरंग_जोशी

वर उल्लेखलेला एटीअ‍ॅन्डटीचा जो ३९.९९ डॉलर्स/महिना प्लॅन आहे त्यात

  • एटीअ‍ॅन्डटीच्या मोबाइल्सला कॉल करायला कुठलिही मर्यादा नाही.
  • नाईट्स अ‍ॅन्ड विकेंड (रोज रात्री ९ ते सकाळी ६) व शनिवार, रविवार २४ तास - एकून ५००० मिनिट
  • इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल व लँडलाइन्स (इथल्या भाषेत होम फोन्स) - ४५० मिनिट
  • या ४५० मिनिटांपैकी उरलेल मिनिट १२ महिन्यांपर्यंत कॅरीफॉर्वर्ड होत राहतात.
  • अ‍ॅडीशनल फोन केवळ ९.९९ डॉलर/महिना या दरावर जोडता येतो मिनिटांच्या मर्यादा मात्र बदलत नाहीत.

अधिक माहिती

उपास's picture

18 Jul 2013 - 11:02 pm | उपास

>>मी एच१ व्हिसावर येणार आहे त्यामुळे बायकोला काम करता येणार नाही.
समीर, सिनेटने पास केलेल इमिग्रेशन रीफॉर्मच बिल हाऊस मध्ये येतय. जर झालच पास (शक्यता कमी दिसतेय) तर एच ४ लाही नोकरीचा पर्याय खुला होऊ शकतो, फक्त माहिती म्हणून सांगतोय.

किलमाऊस्की's picture

18 Jul 2013 - 11:07 pm | किलमाऊस्की

समीर, सिनेटने पास केलेल इमिग्रेशन रीफॉर्मच बिल हाऊस मध्ये येतय. जर झालच पास (शक्यता कमी दिसतेय) तर एच ४ लाही नोकरीचा पर्याय खुला होऊ शकतो, फक्त माहिती म्हणून सांगतोय.

माझ्या माहितीप्रमाणे, जे h1 होल्डर्स, ६ वर्षं एच वन वर आहेत आणि ज्यांचं GC process मधे अशा एच ४ साठी ते बिल आहे.

उपास's picture

19 Jul 2013 - 12:53 am | उपास

सुधारणेबद्दल धन्यवाद..

रमेश आठवले's picture

18 Jul 2013 - 3:21 pm | रमेश आठवले

ही माहिती कदाचित आता शिळी झाली असेल. तरीही-
मी काही वर्षापूर्वी अमेरिकेत भारतात वापरत असलेला सेल फोन घेऊन गेलो होतो. तो तिथे चालला नाही. तेंव्हा तपास केल्यावर दोन्ही देशात tri band सेल फोन चालू शकतो असे समजले. माझ्या पुढच्या अमेरिका वारीत तसा फोन घेऊन गेलो आणि त्याच्यात तेथील कंपनीचे हवे त्या किमतीचे सीम कार्ड घेऊन वापरले. परत आल्यावर जुने भारतीय कंपनीचे सीम कार्ड वापरले. असे दोन तीन वेळा केले आहे.

दिपस्तंभ's picture

18 Jul 2013 - 6:02 pm | दिपस्तंभ

समिरसुर आपणास परदेशगमनाच्या शुभेछा...

बाकी काही जानकार तिथल्या नवीन नोकरी शोधा बद्दल पण सांगतिल का??? जे सध्या तिथे आहेत त्यांना याबाबत अधिक माहिती असेल......

किलमाऊस्की's picture

18 Jul 2013 - 9:49 pm | किलमाऊस्की

मी एच१ व्हिसावर येणार आहे त्यामुळे बायकोला काम करता येणार नाही.

मी वर म्हटल्याप्रमाणे बायकोसाठी लायब्ररी अथवा वॉलेंटीअरींग चांगले ऑपश्नस आहेत. अर्थात आवड असेल तर.
वॉलेंटिअरींग कामं शोधण्यासाठी ही उत्तम साईट आहे.

हेमांगीके म्हणतात त्याप्रमाणे $५०/महिना हा प्रीपेडचा पर्याय चांगला (वाचा: स्वस्त) आहे काय? यात स्वतःचा हँडसेट वापरावा लागतो का?

हो, यात आपला हँडसेट असावा लागतो. माझ्याजवळ भारतातून आणलेला HTC Experia होता. हे प्लॅन डिटेल्स:
टि-मोबाईल प्रिपेड प्लॅन

भारतात कॉल करण्यासाठी वॉनेज आहे पण कॉल क्वालिटी तितकीशी न आवड्ल्याने आम्ही कधी वापरलं नाही. आम्ही इंडिया एल्डी प्रिपेड कार्ड वापरतो. वॉनेजमधे हँड्सेट विकत घ्यावा लागतो.

६-७ महिन्यांसाठी येत असल्याने कार विकत घेण्यात काही पॉईंट आहे का?

मलातरी पॉईंट वाटत नाही.

मला कार चालवता येत नाही. कधीच प्रयत्न देखील केलेला नाही म्हणून हा पर्याय टाळण्याकडे माझा कल आहे हे सुज्ञांच्या (म्हणजे सगळ्यांच्याच) लक्षात आले असेलच.

कार घेतली नाहीत तरी चालवायला नक्की शिका. इथे अगदी व्यवस्थित शिकवतात. आणि फार सोप्पं आहे इथे चालवणं आणि शिकणं. फक्त चार्जेस जास्त आहेत भारताशी तुलना केल्यास. पक्के मुंबईकर असल्याने मला आणि माझ्या नवर्‍यालाही कार चालवता येत नव्ह्ती. नवर्‍याने इथे आल्यावर क्लास लावला. अजिबात कार येत नसल्याने त्याने १० hours चा क्लास लावला. त्याला साधारण टॅक्स पकडून $४५० पडले. पण अगदी बेसिकपासून व्यवस्थित शिकवलं. मुळात त्याचा आत्मविश्वास वाढला. लायसन्सही मिळालं. मला अजून तरी कार चालवता नाही येत पण इथली ट्रांझिट सिस्टम बेस्ट आहे. त्यामुळे माझं अजून तरी काहीही अडलेलं नाही. आमच्या मित्रमंडळींमधे ज्यांना कार येत होती त्यांनी ४ hours, ७ hours असे जमतील तसे इथले नियम समजून घेण्यापुरते क्लास लावले. जे फार कमी खर्चात मिळाले.

किलमाऊस्की's picture

18 Jul 2013 - 9:53 pm | किलमाऊस्की

६-७ महिन्यांसाठी येत असल्याने कार विकत घेण्यात काही पॉईंट आहे का?

मलातरी पॉईंट वाटत नाही.

तुमचं वास्तव्य वाढणार असेल आणि तिकडे फार बर्फ वैगेरे पडत असेल तर मग तुम्हाला कार घ्यावी लागेल. मी सिअ‍ॅट्लजवळ असल्याने इथे फारशी बर्फवृष्टी होत नाही. वर्षातून अगदी एक - दोन वेळा. त्यामुळे फारसा त्रास नाही.

बरेच दिवसांपासून काहीतरी समाजोपयोगी करायची इच्छा होती. इथे एक दोन छान संधी दिसताहेत.

धन्यु!!

किलमाऊस्की's picture

18 Jul 2013 - 10:03 pm | किलमाऊस्की

तुमच्या वरच्या प्रतिसादात तुम्ही बॉस्ट्नला आहात असं कळलं.
इथे ही शोधता येईल.

तसंच, तुमचं वास्तव्य असलेल्या काउंटीच्या संस्थळावरही असतील बर्‍याच संधी. आपल्या आवडीप्रमाणे व वेळेप्रमाणे काम करता येतं. मी सध्या लायब्ररी, म्युझियम अशा ठिकाणी वॉलिंटिअर काम करते. बर्‍याच ओळखी तर होतात पण एक वेगळाच अनुभव ही आहे हा.

सखी's picture

18 Jul 2013 - 10:52 pm | सखी

हेमांगीताई चांगली माहीती दिली आहे तुम्ही दोन्ही प्रतिसादात, ते इंग्लिश्-विंग्लिश चित्रतर भारीच आहे, लय आवडलं.
फक्त वॉलेंटीअरींग कामासाठी सोशल सिक्युरीटी नंबर (SSN)नाही लागत का? म्हणजे मलातरी असं सांगण्यात आलं होतं सुरवातीला इथे आल्यावर. ज्यांनी माहीती दिली त्याची मी पुढे खात्री करुन घेतली नाही कारण माझा स्वत:चा SSN आला होता.

नाही. SSN नाही लागत. जी कामं १-२ दिवसाची असतात त्यांना काहीच डॉक्युमेंट नाही लागत. काही long term कामांसाठी काही ठिकाणी Identity Proof विचारतात. तेव्हा Passport Copy चालते. माझ्याजवळ SSN आहे परंतु मला कुठेही विचारला गेला नाही अगदि पासपोर्ट ही नाही. या प्रकारचं काम पूर्णपणे स्वखुशीने केलं जातं, तसंच या कामात जर तुम्ही h4 विसावर असाल तर कुठल्याही प्रकारे मोबदला स्विकारु शकत नाही. पण वेळ सत्कारणी लावायला हा उत्तम पर्याय आहे. त्यातून तुमची आवड लक्षात घेऊन काम शोधाता येतं. जर तुम्हाला फोटोग्राफी करण्याची आवड आहे परंतु तुमच्या करीअरचा त्याच्याशी काहीही संबध नाही अशा वेळी फोटोग्राफिशी निगडीत वॉलिंटिअर काम तुम्ही करु शकता. त्यातून बरच शिकता येतं.

मी सुद्धा आता नोकरीतून सुट्टी घेउन h4 वर आहे. आठवडाभर नोकरी सारखंच वॉलिंटिअरींग करते. फक्त माझ्या नोकरीशी काडीचा संबध नसलेल्या क्षेत्रात. आणि आवडीने करतेय. खरंतर आयुष्यात Job Satisfaction काय असतं हे आत्ता कळतंय.

अवांतर - इथे आल्यावर h4 वर येउन त्रासलेल्या, वैतागलेल्या कित्येक मुली पाहिल्यात मी. अनेकांना मी हा पर्याय सुचवलाय. ज्यांना खरंच काहीतरी नविन करायची उर्मी असते त्या करतात. अशा वैतागलेल्या h4 वाल्यांसाठी एक लेख पाडायचा फार दिवसावसून मनात आहे.

राघवेंद्र's picture

19 Jul 2013 - 12:00 am | राघवेंद्र

h4 वाल्यांसाठीच्या एक लेखाची गरज आहे. काही नवीन कल्पना मिळाल्या तर छान होईल.
राघवेंद्र

किलमाऊस्की's picture

19 Jul 2013 - 1:26 am | किलमाऊस्की

वेळ मिळाल्यास नक्की जमवेन.

प्रभाकर पेठकर's picture

19 Jul 2013 - 12:38 am | प्रभाकर पेठकर

बॅगांना लॉक्स लावू नका. किंवा लावायचे झालेच तर अमेरिकन कस्टम्स अ‍ॅप्रूव्हड लॉक्स मिळतात तीच वापरावी. इतर लॉक असेल तर चक्क तोडून बॅगा उघडून तपासतात. अर्थात तुम्ही तिथे आधी राहिलेले आहात म्हणजे हे तुम्हाला माहित असेलच.

श्रीरंग_जोशी's picture

19 Jul 2013 - 12:49 am | श्रीरंग_जोशी

अधिक माहितीसाठी हा दुवा बघा.
अमेरिकन विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्था सांभाळणार्‍या द्लाचे नाव आहे - Transportation Security Administration

TSA approved locks विकत मिळतात. आंतरराष्ट्रिय विमानप्रवासात चेक इन केलेल्या बॅगेतून काही सामान गायबले आहे असे कधी ऐकले नाही. बहुतेकदा मौल्यवान वस्तू आकाराने शक्य असल्यास स्वतः जवळील केबिन बॅगेतच ठेवल्या जातात.

मी याधी कधीही लॉक लावलं नव्हत. यावेळेस बॅग नविन घ्यायला गेले तेव्हा छोट्सं TSA लॉक आवडलं म्ह्णून घेतलं आणि घेतलं म्हणून लावलं. आणि पहिल्यांदा माझी बॅग चेक केली गेली. बा़की बॅगांच्या भाउगर्दीत आपली बॅग ओळखण्यासाठी काहीतरी खूण ठेवाच. (आधी प्रवास केल्याने तुम्हाला माहीत ही असेल.) मी छोटे छोटे स्माईली स्टिकर्स बॅगभर चिकट्वते. मागच्या बाजूला नाव, गाव, पत्ता, फ्लाईट नंबर्स कागदावर छापून चिकटवून टाकते. कोणाची बिशाद माझ्या बॅगेला हात लावायची.

सिद्धार्थ ४'s picture

19 Jul 2013 - 6:15 am | सिद्धार्थ ४

Hi, I am in Charlotte since last 2 years. Please email me on kulkarnisj@gmail.com if you need any help.
(Sorry don't have time to type in marathi)
Thanks

प्रभाकर पेठकर's picture

19 Jul 2013 - 9:14 am | प्रभाकर पेठकर

(Sorry don't have time to type in marathi)

मन धन्य धन्य झाले.

सिद्धार्थ ४'s picture

19 Jul 2013 - 5:20 pm | सिद्धार्थ ४

माझ्या मुळे कोणीतरी धन्य झाले हे ऐकून/वाचून आज आषाडी कार्तिकीला माझा तर वेलू गगनावरती गेला. :P

(jokes apart, but it took 10 mins to type. :( )

उपास's picture

19 Jul 2013 - 6:44 pm | उपास

मित्राची आठवण झाली, जेवताना "वेळ नाही" म्हणून चावायच्या ऐवजी गिळायचा.. आणि मग पोट दुखतय म्हणून रडायचा :))

सिद्धार्थ ४'s picture

19 Jul 2013 - 8:55 pm | सिद्धार्थ ४

Thanks for sharing this. LOL

समीरसूर's picture

19 Jul 2013 - 9:48 am | समीरसूर

आपल्या सगळ्यांच्या उस्फुर्त प्रतिसादांबद्दल आणि मदतीच्या तयारीबद्दल मी खरंच आभारी आहे. माझी मानसिक तयारी करण्याचे काम आपल्या या धीर देणार्‍या शब्दांनी केले आहे. बायकोसोबत पहिल्यांदाच इतक्या लांबच्या (आणि ते ही अमेरिकेच्या) प्रवासाला जात असल्याने आणि तिथे मुक्काम तसा बरेच महिने असल्याने थोडे टेंशन आले आहे.

क्रेडिट कार्ड घेता येईल पण कारचे कसे करावे हा थोडा प्रश्न आहेच. बायको सोबत असतांना घरात बसून राहणे तसे तिच्यावर थोडे अन्यायकारक होईल. असो. बघू, कुछ तो हल निकल ही आयेगा...

तिथे मोबाईल फोनवर अजूनही दिवसाच्या येणार्‍या कॉल्सना पैसे पडतात का? २००८ मध्ये असे काहीतरी होते असे अंधुकसे आठवते आहे. कृपया ही माहिती पण द्यावी.

श्रीरंग_जोशी's picture

19 Jul 2013 - 6:31 pm | श्रीरंग_जोशी

होय बहुतांश सेवादाते, स्वतःच्या सोडून इतर नेटवर्कहून आलेल्या इनकमिंग कॉल्सला आउटगोइंगसारखाच चार्ज लावतात.
या कारणाने आपले नेहमी ज्या लोकांशी बोलणे होते त्यातील बहुतांश लोक ज्या कंपनीचा फोन वापरतात त्याचाच घ्यावा.

भारतात कॉल करण्यासाठी आम्ही पण वॉनेजइंडियाएलडी वापरतो. वॉनेज एकाच मोबाईल नंबरवरून एक्सेंशन म्हणून वापरता येते अन कधीकधी गंडतेही म्हणून बॅकअप असलेले बरे.

पिलीयन रायडर's picture

19 Jul 2013 - 5:45 pm | पिलीयन रायडर

आई शप्पथ..
पुढे मागे कधी उसगाव ला गेलेच तर मला काहीही प्रोब्लेम येणार नाही..
काय डिट्टेल सुचना आहेत!!!!

जुइ's picture

19 Jul 2013 - 7:19 pm | जुइ

उसगावात स्वागत. मी मिनियापोलिस मधे राहते काही मदत लागल्यास कळवा.
इथे आल्यावर मेडिक्ल इनशुरन्स काढल्यावर "Primary Care Provider(PCP)" साठी जरुर नोदंणी करा तुम्हा दोघांसाठी. हे खुप गरजेचे आहे कारण कोणी आजारी (ताप वा इतर साधे दुखणे) असेल आणि "PCP( family doctor)" असेल तर डोक्टर ला भेटायची वेळ लवकर मिळते."Emergency Room" मधे साध्या दुखण्यासाठी जाणे इथे योग्य ठरत नाही व कदचित महागही असु शकते. मेडिक्ल इनशुरन्स आणि PCP असणे आवश्क आहे.जाणकार लोक यावर अधिक प्रकाश टाकू शकतील.

श्रीरंग_जोशी's picture

20 Jul 2013 - 7:43 pm | श्रीरंग_जोशी

बहुतेक वेळी इकडच्या नोकरीत रुजू झाल्यावर पहिल्या काही दिवसांतच आरोग्यविम्याची नोंदणी करणे प्रत्येक कंपनीमध्ये कर्मचार्‍यांसाठी सक्तीचे असते. ते करत असताना सर्व संज्ञा व प्रक्रीया नीट समजून घ्यावी. इथे ही सर्व प्रक्रिया उगाचच क्लिष्ट आहे असे बर्‍याच लोकांचे म्हणणे आहे.

एक उदाहरण सांगतो, माझी एक मैत्रीण अमेरिकेत नवी आलेली असताना हापिसातून सहकार्‍याबरोबर त्याच्या कारमधून जेवणाच्या सुटीत बँकेत खाते उघडायला गेली होती. परत येताना या सहकार्‍याने अनावधानाने कमी वर्दळीच्या रस्त्यावर एक सिग्नल मोडला. पण दुर्दैवाने एका जाडजूड गाडीने यांच्या कारला साईडने ठोकले. चौक असल्याने वेग कमी होता व कुणालाही फार लागल्याचे लगेच लक्षात आले नाही. मात्र या सहकार्‍याने त्याची कार १५०० डॉलर्स किमतीला जुनी पुराणी घेतलेली असल्याने अगोदरच टिनपाट होती व आजच्या कार्सप्रमाणे त्यात अपघात संरक्षण सुविधा कमी होत्या.

माझी मैत्रीण नेमकी ड्रायव्हरमागच्या सीटवर बसली होती व डाव्या बाजूने मोठ्या गाडीचा धक्का बसल्याने गाडीच्या दारातली कडी नेमकी तिच्या बरगडीत डाव्या बाजूने टोचली गेली. दोन्ही गाड्या रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आल्या. ९११ ला फोन लावला गेला. पोलिसाने चौकशी केली. ज्यांचे नुकसान झाले त्याच गाडीच्या चालकाची चूक असल्याने मोठ्या गाडीच्या चालकाच्या मोटार विम्याची माहिती न घेता सोडण्यात आले.

काही वेळानंतर बरगडीतून फारच वेदना होऊ लागल्याने माझी मैत्रीण जवळच्या इमर्जन्सी रूम (क्लिनिक) मध्ये गेली व अपघातात असे लागल्याचे सांगितले. फॉर्म वगैरे भरून घेताना तिला विम्याची माहिती मागितली तर तिने स्वतःच्या आरोग्यविम्याचे कार्ड दाखवले अन त्यावरचा क्रमांक त्या फॉर्मवर लिहिला.

अमेरिकेतील पद्धतीप्रमाणे तिच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या ज्यात गर्भधारणा चाचणी पण होती, एक्स रे होता. दोन तासांनी प्रत्यक्ष डॉक्टरांनी तपासले व १ आठवडा पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला व वेदना कमी होत नसल्यास ibuprofen गोळ्या सकाळ संध्याकाळ घेण्यास सांगितले. या गोळ्यांसाठी इथे प्रिस्क्रिप्शन लागत नाही.

त्या दिवशी तिथे तिला केवळ मिनिमम पेमेंट करावे लागले जे आरोग्यविम्याच्या प्रकारानुसार ठरते. इतर रक्क्म विमाकंपनी भरत असते. १५ दिवसांनी त्या इमर्जन्सी रूम कडून ५०० डॉलर्सहून अधिक रकमेचे बिल आले. कारण होते विमा कंपनीने क्लेम स्विकारायला नकार दिला.

विमा कंपनीला फोन लावून विचारले तर त्यांनी सांगितले की हे उपचार अपघातामुळे घ्यावे लागले असल्याने त्यांच्या कव्हरेजमध्ये बसत नाहीत. ज्या चालकामुळे अपघात झालाय त्याच्या मोटारविम्यामध्ये हे कव्हर होईल. तिने त्या कर्मचार्‍याला संपर्क साधला तर त्याने सांगितले की त्याचा मोटार विमा अपघाताच्या अगोदरच्या दिवशीच संपला होता. त्याने त्याची अपघातग्रस्त कार ५०० डॉलर्सला विकली अन तो भारतात परत जात होता.

म्हणजे बिलाची सर्व रक्कम अपघातग्रस्त व्यक्तीलाच भरावी लागली. किमान काही उपचार मिळाले असते जसे काही तासांसाठी इस्पितळात भरती होणे, इंजेक्शन, सलाईन वगैरे तर भारतीय मानसिकतेनुसार बरे तरी वाटले असते.

ibuprofen च्या गोळ्या ज्या तश्याही भेटतातच त्यासाठी ५०० डॉलर्सहून अधिक रकमेचा भूर्दंड. नियमानुसार माझी मैत्रिण त्या सहकार्‍याला वकीलाकडून नोटीस देवू शकली असती पण त्याचा मूळ उद्देश मदतीचाच होता व तो अमेरिकेत थांबणारही नव्हता.

या सर्व प्रकरणात येथील नियमांबाबत व प्रक्रीयेबाबत नेमकी माहिती नसणे हा अपघातग्रस्त व्यक्तिचा सर्वात मोठा दोष होता असे मला वाटते.