Skip to main content

मदत हवी आहे

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 17/07/2013 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, कामाच्या व्यापामुळे मिपावर लिहिणे कमी (अल्मोस्ट बंदच) झाले असले तरी वाचन मात्र सुरु आहे. असो. आपली मदत हवी आहे म्हणून हा एक नम्र विनंतीलेख! कार्यालयाच्या कामानिमित्त ऑगस्ट २०१३ च्या पहिल्या आठवड्यात मूर्सव्हील (उच्चार चुकीचा असल्यास क्षमस्व, पहिल्यांदाच या गावाचे नाव ऐकले आहे), नॉर्थ कॅरोलीना, अमेरिका येथे सहकुटुंब (म्हणजे फक्त बायको आणि मी) जाण्याचे ठरते आहे. अजून इथली बरीच कामे बाकी आहेत. अशा नियोजित परदेशवारीचे विमान केव्हा वाकड किंवा हिंजवडीच्या ट्रॅफीकमध्ये गच्च रुतून बसेल याचा नेम नसतो. परंतु सध्या तरी हे जाणे अटळणीय आहे असे वाटते (असे नेहमीच वाटते). साधारण ६-८ महिन्यांच्या कालावधीसाठी जाणे होईल असे आम्हास सांगण्यात आले आहे. कुटुंबासोबत प्रथमच परदेशवारी (आणि ती ही अमेरिका) घडते आहे. त्यामुळे जरा टेंशन आले आहे. तिथे घर शोधणे कितपत सोपे आहे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी आहे याचा अजून फारसा अंदाज आलेला नाहे. मला कार चालवता येत नसल्याने (हसणे बंद!) कार्यालयात आणि इतरत्र जाणे-येणे कसे करावे याबाबत भीतीदायक असा संभ्रम मनात ठाण मांडून बसलेला आहे. शिवाय घर शोधणे हे ही एक जिकीरीचे काम आहेच. हे गाव शॉर्लेपासून ('ट' चा उच्चार होतो की नाही माहित नाही, ईलिनॉयमध्ये 'स' चा होत नाही म्हणून इथे 'ट' चा होत नसावा असा भाबडा अंदाज) २५-३० माईल्सवर आहे असे ऐकले आहे. तिथले हवामान कसे आहे हे अजून पूर्णपणे कळालेले नाही. मिपाकर मंडळींपैकी या भागात राहणारे किंवा या भागात ओळखीचे/मित्र/नातेवाईक राहत असलेले मिपाकर या बाबतीत मदत करू शकतील काय? विशेषतः घर शोधणे आणि सार्वजनिक वाहतूकीची सोय याबाबतीत कुणी मदत करू शकले तर फार बरे होईल. बाकी उपयुक्त माहिती मिळाल्यास सोने पे सुहागा! कृपया शक्य असल्यास मदत करावी ही विनंती! आपला, समीर
लेखनविषय:

वाचने 41227
प्रतिक्रिया 102

प्रतिक्रिया

In reply to by किलमाऊस्की

६-७ महिन्यांसाठी येत असल्याने कार विकत घेण्यात काही पॉईंट आहे का? मलातरी पॉईंट वाटत नाही.
तुमचं वास्तव्य वाढणार असेल आणि तिकडे फार बर्फ वैगेरे पडत असेल तर मग तुम्हाला कार घ्यावी लागेल. मी सिअ‍ॅट्लजवळ असल्याने इथे फारशी बर्फवृष्टी होत नाही. वर्षातून अगदी एक - दोन वेळा. त्यामुळे फारसा त्रास नाही.

In reply to by किलमाऊस्की

बरेच दिवसांपासून काहीतरी समाजोपयोगी करायची इच्छा होती. इथे एक दोन छान संधी दिसताहेत. धन्यु!!

In reply to by लंबूटांग

तुमच्या वरच्या प्रतिसादात तुम्ही बॉस्ट्नला आहात असं कळलं. इथे ही शोधता येईल. तसंच, तुमचं वास्तव्य असलेल्या काउंटीच्या संस्थळावरही असतील बर्‍याच संधी. आपल्या आवडीप्रमाणे व वेळेप्रमाणे काम करता येतं. मी सध्या लायब्ररी, म्युझियम अशा ठिकाणी वॉलिंटिअर काम करते. बर्‍याच ओळखी तर होतात पण एक वेगळाच अनुभव ही आहे हा.

In reply to by किलमाऊस्की

हेमांगीताई चांगली माहीती दिली आहे तुम्ही दोन्ही प्रतिसादात, ते इंग्लिश्-विंग्लिश चित्रतर भारीच आहे, लय आवडलं. फक्त वॉलेंटीअरींग कामासाठी सोशल सिक्युरीटी नंबर (SSN)नाही लागत का? म्हणजे मलातरी असं सांगण्यात आलं होतं सुरवातीला इथे आल्यावर. ज्यांनी माहीती दिली त्याची मी पुढे खात्री करुन घेतली नाही कारण माझा स्वत:चा SSN आला होता.

In reply to by सखी

नाही. SSN नाही लागत. जी कामं १-२ दिवसाची असतात त्यांना काहीच डॉक्युमेंट नाही लागत. काही long term कामांसाठी काही ठिकाणी Identity Proof विचारतात. तेव्हा Passport Copy चालते. माझ्याजवळ SSN आहे परंतु मला कुठेही विचारला गेला नाही अगदि पासपोर्ट ही नाही. या प्रकारचं काम पूर्णपणे स्वखुशीने केलं जातं, तसंच या कामात जर तुम्ही h4 विसावर असाल तर कुठल्याही प्रकारे मोबदला स्विकारु शकत नाही. पण वेळ सत्कारणी लावायला हा उत्तम पर्याय आहे. त्यातून तुमची आवड लक्षात घेऊन काम शोधाता येतं. जर तुम्हाला फोटोग्राफी करण्याची आवड आहे परंतु तुमच्या करीअरचा त्याच्याशी काहीही संबध नाही अशा वेळी फोटोग्राफिशी निगडीत वॉलिंटिअर काम तुम्ही करु शकता. त्यातून बरच शिकता येतं. मी सुद्धा आता नोकरीतून सुट्टी घेउन h4 वर आहे. आठवडाभर नोकरी सारखंच वॉलिंटिअरींग करते. फक्त माझ्या नोकरीशी काडीचा संबध नसलेल्या क्षेत्रात. आणि आवडीने करतेय. खरंतर आयुष्यात Job Satisfaction काय असतं हे आत्ता कळतंय. अवांतर - इथे आल्यावर h4 वर येउन त्रासलेल्या, वैतागलेल्या कित्येक मुली पाहिल्यात मी. अनेकांना मी हा पर्याय सुचवलाय. ज्यांना खरंच काहीतरी नविन करायची उर्मी असते त्या करतात. अशा वैतागलेल्या h4 वाल्यांसाठी एक लेख पाडायचा फार दिवसावसून मनात आहे.

In reply to by किलमाऊस्की

h4 वाल्यांसाठीच्या एक लेखाची गरज आहे. काही नवीन कल्पना मिळाल्या तर छान होईल. राघवेंद्र

बॅगांना लॉक्स लावू नका. किंवा लावायचे झालेच तर अमेरिकन कस्टम्स अ‍ॅप्रूव्हड लॉक्स मिळतात तीच वापरावी. इतर लॉक असेल तर चक्क तोडून बॅगा उघडून तपासतात. अर्थात तुम्ही तिथे आधी राहिलेले आहात म्हणजे हे तुम्हाला माहित असेलच.

In reply to by प्रभाकर पेठकर

अधिक माहितीसाठी हा दुवा बघा. अमेरिकन विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्था सांभाळणार्‍या द्लाचे नाव आहे - Transportation Security Administration TSA approved locks विकत मिळतात. आंतरराष्ट्रिय विमानप्रवासात चेक इन केलेल्या बॅगेतून काही सामान गायबले आहे असे कधी ऐकले नाही. बहुतेकदा मौल्यवान वस्तू आकाराने शक्य असल्यास स्वतः जवळील केबिन बॅगेतच ठेवल्या जातात.

In reply to by प्रभाकर पेठकर

मी याधी कधीही लॉक लावलं नव्हत. यावेळेस बॅग नविन घ्यायला गेले तेव्हा छोट्सं TSA लॉक आवडलं म्ह्णून घेतलं आणि घेतलं म्हणून लावलं. आणि पहिल्यांदा माझी बॅग चेक केली गेली. बा़की बॅगांच्या भाउगर्दीत आपली बॅग ओळखण्यासाठी काहीतरी खूण ठेवाच. (आधी प्रवास केल्याने तुम्हाला माहीत ही असेल.) मी छोटे छोटे स्माईली स्टिकर्स बॅगभर चिकट्वते. मागच्या बाजूला नाव, गाव, पत्ता, फ्लाईट नंबर्स कागदावर छापून चिकटवून टाकते. कोणाची बिशाद माझ्या बॅगेला हात लावायची.

Hi, I am in Charlotte since last 2 years. Please email me on kulkarnisj@gmail.com if you need any help. (Sorry don't have time to type in marathi) Thanks

In reply to by सिद्धार्थ ४

(Sorry don't have time to type in marathi)
मन धन्य धन्य झाले.

In reply to by प्रभाकर पेठकर

माझ्या मुळे कोणीतरी धन्य झाले हे ऐकून/वाचून आज आषाडी कार्तिकीला माझा तर वेलू गगनावरती गेला. :P (jokes apart, but it took 10 mins to type. :( )

In reply to by सिद्धार्थ ४

मित्राची आठवण झाली, जेवताना "वेळ नाही" म्हणून चावायच्या ऐवजी गिळायचा.. आणि मग पोट दुखतय म्हणून रडायचा :))

आपल्या सगळ्यांच्या उस्फुर्त प्रतिसादांबद्दल आणि मदतीच्या तयारीबद्दल मी खरंच आभारी आहे. माझी मानसिक तयारी करण्याचे काम आपल्या या धीर देणार्‍या शब्दांनी केले आहे. बायकोसोबत पहिल्यांदाच इतक्या लांबच्या (आणि ते ही अमेरिकेच्या) प्रवासाला जात असल्याने आणि तिथे मुक्काम तसा बरेच महिने असल्याने थोडे टेंशन आले आहे. क्रेडिट कार्ड घेता येईल पण कारचे कसे करावे हा थोडा प्रश्न आहेच. बायको सोबत असतांना घरात बसून राहणे तसे तिच्यावर थोडे अन्यायकारक होईल. असो. बघू, कुछ तो हल निकल ही आयेगा... तिथे मोबाईल फोनवर अजूनही दिवसाच्या येणार्‍या कॉल्सना पैसे पडतात का? २००८ मध्ये असे काहीतरी होते असे अंधुकसे आठवते आहे. कृपया ही माहिती पण द्यावी.

In reply to by समीरसूर

होय बहुतांश सेवादाते, स्वतःच्या सोडून इतर नेटवर्कहून आलेल्या इनकमिंग कॉल्सला आउटगोइंगसारखाच चार्ज लावतात. या कारणाने आपले नेहमी ज्या लोकांशी बोलणे होते त्यातील बहुतांश लोक ज्या कंपनीचा फोन वापरतात त्याचाच घ्यावा. भारतात कॉल करण्यासाठी आम्ही पण वॉनेजइंडियाएलडी वापरतो. वॉनेज एकाच मोबाईल नंबरवरून एक्सेंशन म्हणून वापरता येते अन कधीकधी गंडतेही म्हणून बॅकअप असलेले बरे.

आई शप्पथ.. पुढे मागे कधी उसगाव ला गेलेच तर मला काहीही प्रोब्लेम येणार नाही.. काय डिट्टेल सुचना आहेत!!!!

उसगावात स्वागत. मी मिनियापोलिस मधे राहते काही मदत लागल्यास कळवा. इथे आल्यावर मेडिक्ल इनशुरन्स काढल्यावर "Primary Care Provider(PCP)" साठी जरुर नोदंणी करा तुम्हा दोघांसाठी. हे खुप गरजेचे आहे कारण कोणी आजारी (ताप वा इतर साधे दुखणे) असेल आणि "PCP( family doctor)" असेल तर डोक्टर ला भेटायची वेळ लवकर मिळते."Emergency Room" मधे साध्या दुखण्यासाठी जाणे इथे योग्य ठरत नाही व कदचित महागही असु शकते. मेडिक्ल इनशुरन्स आणि PCP असणे आवश्क आहे.जाणकार लोक यावर अधिक प्रकाश टाकू शकतील.

In reply to by जुइ

बहुतेक वेळी इकडच्या नोकरीत रुजू झाल्यावर पहिल्या काही दिवसांतच आरोग्यविम्याची नोंदणी करणे प्रत्येक कंपनीमध्ये कर्मचार्‍यांसाठी सक्तीचे असते. ते करत असताना सर्व संज्ञा व प्रक्रीया नीट समजून घ्यावी. इथे ही सर्व प्रक्रिया उगाचच क्लिष्ट आहे असे बर्‍याच लोकांचे म्हणणे आहे. एक उदाहरण सांगतो, माझी एक मैत्रीण अमेरिकेत नवी आलेली असताना हापिसातून सहकार्‍याबरोबर त्याच्या कारमधून जेवणाच्या सुटीत बँकेत खाते उघडायला गेली होती. परत येताना या सहकार्‍याने अनावधानाने कमी वर्दळीच्या रस्त्यावर एक सिग्नल मोडला. पण दुर्दैवाने एका जाडजूड गाडीने यांच्या कारला साईडने ठोकले. चौक असल्याने वेग कमी होता व कुणालाही फार लागल्याचे लगेच लक्षात आले नाही. मात्र या सहकार्‍याने त्याची कार १५०० डॉलर्स किमतीला जुनी पुराणी घेतलेली असल्याने अगोदरच टिनपाट होती व आजच्या कार्सप्रमाणे त्यात अपघात संरक्षण सुविधा कमी होत्या. माझी मैत्रीण नेमकी ड्रायव्हरमागच्या सीटवर बसली होती व डाव्या बाजूने मोठ्या गाडीचा धक्का बसल्याने गाडीच्या दारातली कडी नेमकी तिच्या बरगडीत डाव्या बाजूने टोचली गेली. दोन्ही गाड्या रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आल्या. ९११ ला फोन लावला गेला. पोलिसाने चौकशी केली. ज्यांचे नुकसान झाले त्याच गाडीच्या चालकाची चूक असल्याने मोठ्या गाडीच्या चालकाच्या मोटार विम्याची माहिती न घेता सोडण्यात आले. काही वेळानंतर बरगडीतून फारच वेदना होऊ लागल्याने माझी मैत्रीण जवळच्या इमर्जन्सी रूम (क्लिनिक) मध्ये गेली व अपघातात असे लागल्याचे सांगितले. फॉर्म वगैरे भरून घेताना तिला विम्याची माहिती मागितली तर तिने स्वतःच्या आरोग्यविम्याचे कार्ड दाखवले अन त्यावरचा क्रमांक त्या फॉर्मवर लिहिला. अमेरिकेतील पद्धतीप्रमाणे तिच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या ज्यात गर्भधारणा चाचणी पण होती, एक्स रे होता. दोन तासांनी प्रत्यक्ष डॉक्टरांनी तपासले व १ आठवडा पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला व वेदना कमी होत नसल्यास ibuprofen गोळ्या सकाळ संध्याकाळ घेण्यास सांगितले. या गोळ्यांसाठी इथे प्रिस्क्रिप्शन लागत नाही. त्या दिवशी तिथे तिला केवळ मिनिमम पेमेंट करावे लागले जे आरोग्यविम्याच्या प्रकारानुसार ठरते. इतर रक्क्म विमाकंपनी भरत असते. १५ दिवसांनी त्या इमर्जन्सी रूम कडून ५०० डॉलर्सहून अधिक रकमेचे बिल आले. कारण होते विमा कंपनीने क्लेम स्विकारायला नकार दिला. विमा कंपनीला फोन लावून विचारले तर त्यांनी सांगितले की हे उपचार अपघातामुळे घ्यावे लागले असल्याने त्यांच्या कव्हरेजमध्ये बसत नाहीत. ज्या चालकामुळे अपघात झालाय त्याच्या मोटारविम्यामध्ये हे कव्हर होईल. तिने त्या कर्मचार्‍याला संपर्क साधला तर त्याने सांगितले की त्याचा मोटार विमा अपघाताच्या अगोदरच्या दिवशीच संपला होता. त्याने त्याची अपघातग्रस्त कार ५०० डॉलर्सला विकली अन तो भारतात परत जात होता. म्हणजे बिलाची सर्व रक्कम अपघातग्रस्त व्यक्तीलाच भरावी लागली. किमान काही उपचार मिळाले असते जसे काही तासांसाठी इस्पितळात भरती होणे, इंजेक्शन, सलाईन वगैरे तर भारतीय मानसिकतेनुसार बरे तरी वाटले असते. ibuprofen च्या गोळ्या ज्या तश्याही भेटतातच त्यासाठी ५०० डॉलर्सहून अधिक रकमेचा भूर्दंड. नियमानुसार माझी मैत्रिण त्या सहकार्‍याला वकीलाकडून नोटीस देवू शकली असती पण त्याचा मूळ उद्देश मदतीचाच होता व तो अमेरिकेत थांबणारही नव्हता. या सर्व प्रकरणात येथील नियमांबाबत व प्रक्रीयेबाबत नेमकी माहिती नसणे हा अपघातग्रस्त व्यक्तिचा सर्वात मोठा दोष होता असे मला वाटते.

कृपया कुकर आणू नये, कस्टम मधे त्रास होण्याची शक्यता आहे. गुगल करून अधिक माहिती मिळेल....ही एक बातमी: http://www.usatoday.com/story/travel/flights/2013/05/13/saudi-pressure-… प्रवासाकरिता शुभेच्छा....काही मदत लागल्यात व्यनि करा.

In reply to by gaikiakash

या बातमीतला माणूस सौदी असल्याने कारवाई झाल्याची शक्यता जास्त आहे. माझ्या माहितीप्रमाणे बरेच भारतीय बॅचलर असोत वा लग्न झालेले कूकर हटकून आणतात. त्यामुळे फार काळजीचं कारण नसावं

In reply to by किलमाऊस्की

माझ्या आई वडिलांनी दोन महिन्यांपूर्वीच भारतातून येतांना प्रेशर कुकर आणला, कुणीही काहीही विचारले नाही. बहुतांश भारतीय लोक पहिल्या खेपेस प्रेशर कुकर नक्की आणतात. मी पहिल्यांदा आलो होतो तेव्हा स्वतःसाठी नाही तर सहकार्‍यासाठी आणला होता. सदर बातमीमध्ये त्या प्रवाशाचे एकंदर वर्तनच संशयास्पद वाटले म्हणून त्यास अटक झाल्याचे लिहिले आहे. अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील कस्ट्म्स अधिकार्‍यांना भारतीय लोकांच्या नेहमीच्या वस्तू, अन्नपदार्थ चांगले ठाऊक असतात. येथील भारतीय वाणसामानाच्या दुकानातही भारतातून आयात केलेले कुकर असतात पण मूळ किमतीपेक्षा बरेच महाग असतात.

तुम्ही दोघांनी अमेरिकेतील भारतीयांचे जीवन ....किती सोपे किती कठीण किंवा स्वप्न की सत्य असला काहीतरी मथळा घेऊन सलीम- जावेद बना व एक धागा टाका... सगळ्या आस्पेक्टस येउ द्या. कसं ?

In reply to by चौकटराजा

चौरा - धम्या हे काम अधिक चांगले करू शकेल असे वाटते. पश्चिमी सभ्यतेचा आस्वाद तो घेत असावा असा अंदाज आहे. मी काय बॉ, 'पढना लिखना सिखों, ओ मेहनत करने वालों' गटात मोडणारा ;-).

सगळ्यांच्या माहितीपूर्ण आणि मदततत्पर प्रतिसादांबद्दल धन्यवाद! ज्यांनी संपर्कसुलभतेसाठी आपले क्रमांक आणि ईमेल पत्ते दिले आहेत त्यांच्याशी मी नक्कीच संपर्क साधेन. शक्य झाल्यास प्रत्यक्ष भेट अधिक आनंद देऊन जाईल यात शंका नाही. काही प्रश्न, शंका असल्यास मी याच धाग्यावर पुन्हा विचारेन. त्यावेळेस पुन्हा एकदा माहिती द्यावी ही विनंती! :-) --समीर

परदेशात जाण्याचा योग अथवा भोग आमच्या नशिबात नाही. आम्हाला आमचे वरणभातच बरे असे वाटते ( कोल्हा आणि आंबट द्राक्षे याचीही आठवण कोणाला येवु शकते). हा सर्व लेख / प्रतिसाद वाचले असता "अमृत" मासिकात या विषयावर लेख होऊ शकतो असे वाटले.

२०१३ सालचा हा धागा व प्रतिसाद पुन्हा एकदा वाचले. विशेष काही बदललेलं नाही गेल्या दोन वर्षांपासून अ‍ॅमेझॉनवर भारतीय उत्पादकांचे प्रेशर कुकर्स व स्वयंपाकाची भांडीही भारतातल्या मूल्यात मिळू लागली आहेत :-) . तसेच स्थानिक भारतीय वाणसामानांच्या दुकानातही या वस्तूचे दर थोड्याफार फरकाने एवढेच असतात. भारतातून नव्याने / प्रथमच येणारी मंडळी आता अधिक हलक्या बॅगा घेऊन येऊ शकतात :-) . महाग झालेली एक गोष्ट म्हणजे हेल्थकेअर इन्शुरन्सचे प्रिमियम्स.