मदत हवी आहे
नमस्कार,
कामाच्या व्यापामुळे मिपावर लिहिणे कमी (अल्मोस्ट बंदच) झाले असले तरी वाचन मात्र सुरु आहे. असो.
आपली मदत हवी आहे म्हणून हा एक नम्र विनंतीलेख!
कार्यालयाच्या कामानिमित्त ऑगस्ट २०१३ च्या पहिल्या आठवड्यात मूर्सव्हील (उच्चार चुकीचा असल्यास क्षमस्व, पहिल्यांदाच या गावाचे नाव ऐकले आहे), नॉर्थ कॅरोलीना, अमेरिका येथे सहकुटुंब (म्हणजे फक्त बायको आणि मी) जाण्याचे ठरते आहे. अजून इथली बरीच कामे बाकी आहेत. अशा नियोजित परदेशवारीचे विमान केव्हा वाकड किंवा हिंजवडीच्या ट्रॅफीकमध्ये गच्च रुतून बसेल याचा नेम नसतो. परंतु सध्या तरी हे जाणे अटळणीय आहे असे वाटते (असे नेहमीच वाटते). साधारण ६-८ महिन्यांच्या कालावधीसाठी जाणे होईल असे आम्हास सांगण्यात आले आहे.
कुटुंबासोबत प्रथमच परदेशवारी (आणि ती ही अमेरिका) घडते आहे. त्यामुळे जरा टेंशन आले आहे. तिथे घर शोधणे कितपत सोपे आहे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी आहे याचा अजून फारसा अंदाज आलेला नाहे. मला कार चालवता येत नसल्याने (हसणे बंद!) कार्यालयात आणि इतरत्र जाणे-येणे कसे करावे याबाबत भीतीदायक असा संभ्रम मनात ठाण मांडून बसलेला आहे. शिवाय घर शोधणे हे ही एक जिकीरीचे काम आहेच. हे गाव शॉर्लेपासून ('ट' चा उच्चार होतो की नाही माहित नाही, ईलिनॉयमध्ये 'स' चा होत नाही म्हणून इथे 'ट' चा होत नसावा असा भाबडा अंदाज) २५-३० माईल्सवर आहे असे ऐकले आहे. तिथले हवामान कसे आहे हे अजून पूर्णपणे कळालेले नाही.
मिपाकर मंडळींपैकी या भागात राहणारे किंवा या भागात ओळखीचे/मित्र/नातेवाईक राहत असलेले मिपाकर या बाबतीत मदत करू शकतील काय?
विशेषतः घर शोधणे आणि सार्वजनिक वाहतूकीची सोय याबाबतीत कुणी मदत करू शकले तर फार बरे होईल. बाकी उपयुक्त माहिती मिळाल्यास सोने पे सुहागा!
कृपया शक्य असल्यास मदत करावी ही विनंती!
आपला,
समीर
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
क्रेगलिस्ट बघा
:)
येलकम...येलकम :)
चांगल्या गावात दिलं हो
@चांगल्या गावात दिलं हो
धममामा.
हा हा हा!
शुभेच्छा
व्यनि केला आहे..
स्वागत
उत्तम माहिती
रंग्या आणि लंब्या...
स्वागत आहे
हा हा हा!!!
अरेच्च्या
अच्छा अच्छा!
कार असणे व नसणे
@बिनबाह्यांचं बन्यान आणि
आणखी काही
डिकी..
पिडां
हो ना
ब्रिटीश इंग्लिश्/अमेरिकन इंग्लिश वरुन हे आठवलं.
चपखल उदाहरणे
:-)
स्वागत. मी सध्या मिशीगन मधे
लायसन्स...
पुण्यातून लायसन्स काढून इकडं येण्यापेक्षा
लर्नर्स परमिट
महाराष्ट्र मन्डळ
क्रेडिट प्रोफाईल
मला मिळालेली माहिती..
सहमत
३०% लिमिट हे बेष्ट
जेब्बात
इन्शाल्लाह! आणि खुशामदिद...
अमेरीका सफर करायची असेल तर ....
अमेरीकेत स्वागत!!!
शाकाहारी खाद्य सेवा.
हो . चिपोटले आमच्या जवळ नसल्यानं आठवलं नाही पट्कन.
मी सध्या टी-मोबाईल प्रिपेड
माझ्याजवळ हँडसेट होता भारतातून आणलेला.
अच्छा! मला टी मोबिलवाले दर २२
मला नॉ कॅ ची फारशी माहिती
आरारारारा....
कसले कसले शिनेमे माहित असतात
रिकामा धम्या.....इंटरनेटला
रिकाम्या धम्या.....
हा हा हा!
@एकटाच असशील तर 'बाबुरावला