मदत हवी आहे

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
17 Jul 2013 - 2:58 pm

नमस्कार,

कामाच्या व्यापामुळे मिपावर लिहिणे कमी (अल्मोस्ट बंदच) झाले असले तरी वाचन मात्र सुरु आहे. असो.

आपली मदत हवी आहे म्हणून हा एक नम्र विनंतीलेख!

कार्यालयाच्या कामानिमित्त ऑगस्ट २०१३ च्या पहिल्या आठवड्यात मूर्सव्हील (उच्चार चुकीचा असल्यास क्षमस्व, पहिल्यांदाच या गावाचे नाव ऐकले आहे), नॉर्थ कॅरोलीना, अमेरिका येथे सहकुटुंब (म्हणजे फक्त बायको आणि मी) जाण्याचे ठरते आहे. अजून इथली बरीच कामे बाकी आहेत. अशा नियोजित परदेशवारीचे विमान केव्हा वाकड किंवा हिंजवडीच्या ट्रॅफीकमध्ये गच्च रुतून बसेल याचा नेम नसतो. परंतु सध्या तरी हे जाणे अटळणीय आहे असे वाटते (असे नेहमीच वाटते). साधारण ६-८ महिन्यांच्या कालावधीसाठी जाणे होईल असे आम्हास सांगण्यात आले आहे.

कुटुंबासोबत प्रथमच परदेशवारी (आणि ती ही अमेरिका) घडते आहे. त्यामुळे जरा टेंशन आले आहे. तिथे घर शोधणे कितपत सोपे आहे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी आहे याचा अजून फारसा अंदाज आलेला नाहे. मला कार चालवता येत नसल्याने (हसणे बंद!) कार्यालयात आणि इतरत्र जाणे-येणे कसे करावे याबाबत भीतीदायक असा संभ्रम मनात ठाण मांडून बसलेला आहे. शिवाय घर शोधणे हे ही एक जिकीरीचे काम आहेच. हे गाव शॉर्लेपासून ('ट' चा उच्चार होतो की नाही माहित नाही, ईलिनॉयमध्ये 'स' चा होत नाही म्हणून इथे 'ट' चा होत नसावा असा भाबडा अंदाज) २५-३० माईल्सवर आहे असे ऐकले आहे. तिथले हवामान कसे आहे हे अजून पूर्णपणे कळालेले नाही.

मिपाकर मंडळींपैकी या भागात राहणारे किंवा या भागात ओळखीचे/मित्र/नातेवाईक राहत असलेले मिपाकर या बाबतीत मदत करू शकतील काय?

विशेषतः घर शोधणे आणि सार्वजनिक वाहतूकीची सोय याबाबतीत कुणी मदत करू शकले तर फार बरे होईल. बाकी उपयुक्त माहिती मिळाल्यास सोने पे सुहागा!

कृपया शक्य असल्यास मदत करावी ही विनंती!

आपला,
समीर

राहणी

प्रतिक्रिया

कृपया कुकर आणू नये, कस्टम मधे त्रास होण्याची शक्यता आहे. गुगल करून अधिक माहिती मिळेल....ही एक बातमी:
http://www.usatoday.com/story/travel/flights/2013/05/13/saudi-pressure-c...
प्रवासाकरिता शुभेच्छा....काही मदत लागल्यात व्यनि करा.

या बातमीतला माणूस सौदी असल्याने कारवाई झाल्याची शक्यता जास्त आहे. माझ्या माहितीप्रमाणे बरेच भारतीय बॅचलर असोत वा लग्न झालेले कूकर हटकून आणतात. त्यामुळे फार काळजीचं कारण नसावं

श्रीरंग_जोशी's picture

20 Jul 2013 - 8:35 am | श्रीरंग_जोशी

माझ्या आई वडिलांनी दोन महिन्यांपूर्वीच भारतातून येतांना प्रेशर कुकर आणला, कुणीही काहीही विचारले नाही. बहुतांश भारतीय लोक पहिल्या खेपेस प्रेशर कुकर नक्की आणतात. मी पहिल्यांदा आलो होतो तेव्हा स्वतःसाठी नाही तर सहकार्‍यासाठी आणला होता.

सदर बातमीमध्ये त्या प्रवाशाचे एकंदर वर्तनच संशयास्पद वाटले म्हणून त्यास अटक झाल्याचे लिहिले आहे. अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील कस्ट्म्स अधिकार्‍यांना भारतीय लोकांच्या नेहमीच्या वस्तू, अन्नपदार्थ चांगले ठाऊक असतात.

येथील भारतीय वाणसामानाच्या दुकानातही भारतातून आयात केलेले कुकर असतात पण मूळ किमतीपेक्षा बरेच महाग असतात.

चौकटराजा's picture

20 Jul 2013 - 9:47 am | चौकटराजा

तुम्ही दोघांनी अमेरिकेतील भारतीयांचे जीवन ....किती सोपे किती कठीण किंवा स्वप्न की सत्य असला काहीतरी मथळा
घेऊन सलीम- जावेद बना व एक धागा टाका... सगळ्या आस्पेक्टस येउ द्या. कसं ?

श्रीरंग_जोशी's picture

20 Jul 2013 - 7:16 pm | श्रीरंग_जोशी

चौरा - धम्या हे काम अधिक चांगले करू शकेल असे वाटते. पश्चिमी सभ्यतेचा आस्वाद तो घेत असावा असा अंदाज आहे.

मी काय बॉ, 'पढना लिखना सिखों, ओ मेहनत करने वालों' गटात मोडणारा ;-).

gaikiakash's picture

21 Jul 2013 - 3:57 am | gaikiakash

Here is one more link:
http://www.infowars.com/tsa-now-confiscating-pressure-cookers/
This started after Boston incident, just be careful. It is not worth to get stuck at the airport because of a pressure cooker. Aapan sudnya aahat :)

समीरसूर's picture

22 Jul 2013 - 9:07 am | समीरसूर

सगळ्यांच्या माहितीपूर्ण आणि मदततत्पर प्रतिसादांबद्दल धन्यवाद! ज्यांनी संपर्कसुलभतेसाठी आपले क्रमांक आणि ईमेल पत्ते दिले आहेत त्यांच्याशी मी नक्कीच संपर्क साधेन. शक्य झाल्यास प्रत्यक्ष भेट अधिक आनंद देऊन जाईल यात शंका नाही. काही प्रश्न, शंका असल्यास मी याच धाग्यावर पुन्हा विचारेन. त्यावेळेस पुन्हा एकदा माहिती द्यावी ही विनंती! :-)

--समीर

कलंत्री's picture

26 Jul 2013 - 3:25 pm | कलंत्री

परदेशात जाण्याचा योग अथवा भोग आमच्या नशिबात नाही. आम्हाला आमचे वरणभातच बरे असे वाटते ( कोल्हा आणि आंबट द्राक्षे याचीही आठवण कोणाला येवु शकते).

हा सर्व लेख / प्रतिसाद वाचले असता "अमृत" मासिकात या विषयावर लेख होऊ शकतो असे वाटले.

प्रभाकर पेठकर's picture

26 Jul 2013 - 3:30 pm | प्रभाकर पेठकर

"अमृत" मासिकात या विषयावर लेख होऊ शकतो असे वाटले.

ह्याला म्हणतात शालजोडीतील.

श्रीरंग_जोशी's picture

27 Oct 2013 - 10:28 pm | श्रीरंग_जोशी

आपल्या व्यापातून वेळात वेळ काढून ख्यालीखुशाली कळवा.

व्वा, उसगावाबद्दल कित्ती माहित्ती मिळाल्लि ईट्ठे.

आता लगेच उसगावचे तिकीटच काढतो :)

श्रीरंग_जोशी's picture

31 Oct 2017 - 4:16 pm | श्रीरंग_जोशी

२०१३ सालचा हा धागा व प्रतिसाद पुन्हा एकदा वाचले. विशेष काही बदललेलं नाही गेल्या दोन वर्षांपासून अ‍ॅमेझॉनवर भारतीय उत्पादकांचे प्रेशर कुकर्स व स्वयंपाकाची भांडीही भारतातल्या मूल्यात मिळू लागली आहेत :-) . तसेच स्थानिक भारतीय वाणसामानांच्या दुकानातही या वस्तूचे दर थोड्याफार फरकाने एवढेच असतात.

भारतातून नव्याने / प्रथमच येणारी मंडळी आता अधिक हलक्या बॅगा घेऊन येऊ शकतात :-) .

महाग झालेली एक गोष्ट म्हणजे हेल्थकेअर इन्शुरन्सचे प्रिमियम्स.